Bhagy Dile tu Mala - 15 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग १५


स्वरा मोठ्याने किंचाळली. तिच्या आवाजाने आजूबाजूच सर्व काही शांत झाल होत. क्षणभर सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावर होत्या. तर ती चेहऱ्यावर हात ठेवून किंचाळत राहिली. तिच्या किंचाळल्याने पूजाच लक्ष तिच्याकडे गेलं. ती सर्व सामान फेकत धावतच तिच्याकडे आली. ती पोहोचेपर्यंत आजूबाजूचे सर्व लोक गोळा झाले होते. गाड्याची लांबच लांब रांग लागली होती. गाड्यांचे कर्कश हॉर्न वाजत असतानाही त्या सर्वात एकाच व्यक्तीचा आवाज सर्वात मोठा होता. स्वरा आई आई म्हणून ओरडत होती. सर्वाना काय झालंय काहीच कळत नव्हतं. पूजा तिच्या बाजूला पोहोचली आणि तिच्या चेहऱ्यावरचा हात जबरीने काढू लागली. तिने तिचा हात काढलाच होता की समोरच दृश्य बघून ती स्वतःच खाली कोसळली. पूजाच्या हाताला काहीतरी लागलं होतं म्हणून तिने त्यावर लक्ष दिलं. ती स्वराची स्कीन होती. चेहऱ्याची पूर्ण स्किन गळून पडली होती. पूजाला नक्की काय करू काहीच कळत नव्हतं. सर्व पब्लिक तोंडावर हात ठेवून स्वराची स्थिती बघत होती पण तिचा चेहरा बघून कुणालाही तिची मदत करायची हिम्मत होत नव्हती. लांबच लांब रांगा असलेल्या गाड्यातून लोक तिला पाहायला उतरत होते आणि त्यांना आपल्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सर्वाना एवढा शॉक लागला होता की ती मोठ्याने किंचाळत असतानाही तिची मदत करायची हिम्मत होत नव्हती.

पूजाला तर स्वराला बघू धक्काच लागला होता. ती डोळे उघडून होती पण शुद्ध हरपून बसली होती. तिला काय करू काहीच कळत नव्हतं. तिला स्वतःच वेड लागलं होतं. लोकांचं लक्ष आता तिच्या ओरडण्यावर जाऊ लागलं आणि कुणीतरी रुग्णवाहिकेला फोन केला. कुणीतरी पोलिसांना फोन केला होता आणि कुणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये नेता यावं म्हणून पूर्ण ट्रॅफिक क्लिअर करत होते. हळूहळू गाड्यांचे हॉर्न तीव्र झाले आणि त्यात स्वराचा आवाज दाबल्या गेला. गाड्यांच्या हॉर्नमुळे पूजा भानावर आली. तिने पॉकेटमधला फोन गडबडीत हातात घेतला आणि कियाराला घाबरतच कॉल केला. रिंग जात होती पण कियारा कॉल उचलत नव्हती. पूजाची धडधड आणखीच वाढत होती. तिचे हातपाय थरथर कापत होते. ती नक्की काय करतेय ते तिला आताही कळत नव्हतं. कियाराने कॉल उचलला नाही पण पुडच्याच क्षणी समोरून तिचा कॉल आला. पूजाने लगबगीने कॉल उचलला आणि अडखळतच रडत बोलून गेली," कियारा, स्वरा!! "

तीच रडन ऐकून कियाराला भीती वाटत होती त्यामुळे ती मोठ्यानेच ओरडत म्हणाली," पूजा स्वरा क्या? "

तिच्या आवाजाने रूम पार्टनर जाग्या झाल्या. कियारा खूपच घाबरली होती आणि आता रूम पार्टनर पण घाबरल्या. रूम पार्टनरना काय झालं ऐकायचं होत म्हणून कियाराने फोन स्पीकर वर ठेवला. आता पूजा हिम्मत करून ओरडून गेली," स्वरा पे ऍसिड अटॅक हुआ है!! हम कॉलेज गेट के बाहर है. मुझे कुछ समझ नही रहा प्लिज जलदी से आ जाओ. "

पूजा ने बोलून फोन कट केला. बातमी ऐकताच त्याही भान हरवून बसल्या. आताच सर्व बेडवरून उठल्या होत्या त्यामुळे त्यांचा अवतार झाला होता पण स्पीकर वर पूजाच बोलणं ऐकताच त्या होत्या तशाच अवतारात धावत बाहेर निघाल्या. त्यांना धावताना बघून सर्वांनी त्यांना विचारायला सुरुवात केली आणि एकाच्या तोंडून एक करत बातमी पूर्ण हॉस्टेलभर पसरली. फक्त गर्ल्स हॉस्टेल नाही तर बॉईज हॉस्टेल मधून सुद्धा मूल-मुली धावतच येऊ लागले. सर्वाना जणू शॉकच लागला होता. कियारा धावतच रोडवर पोहोचली. तिथे इतकी गर्दी होती की तिला त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच कितीतरी वेळ लागला होता तरीही गर्दी बाजूला सारत कियारा तिथे पोहोचली. कियारा त्यांच्यासमोर पोहोचली आणि समोरच दृश्य बघून स्वतःच हरवली. स्वरा चेहऱ्यावर हात ठेवून ओरडत होती तर पुजा तिला कशीतरी सावरत होती. पूजा सावरत होती पण तिलाच सावरायला कुणीतरी हवं होतं. हा शॉक कियाराला पचविणे सोपे नव्हते. तरीही त्यांची हालत बघून तिने मन घट्ट केलं आणि धावतच स्वरा जवळ पोहोचली. एक दोन मुलींनी तिला पकडून रस्तेच्या बाजूला केले तर शोभना पूजाला पकडून होती.

क्षणात सर्व काही बदलल. तिचा हसरा चेहरा कुठेतरी गायब झाला होता मुळात आता चेहराच राहिला नव्हता. ती किंचाळत होती. तिला किती वेदना होत होत्या त्यावेळी कुणीच कल्पना करू शकत नव्हत. तिचा आवाज इतका वेदनादायी होता की सर्वांच्या हृदयाला पाझर फुटला होता. तिथे उभ्या असलेल्या अर्ध्या लोकांना तर नक्की काय करावं तेच सुचत नव्हतं. हळूहळू बातमी पूर्ण दिल्लीभर पसरू लागली. त्यामुळे कॉलेज समोर गर्दी वाढतच होती. बातमी मिळताच पोलीस तिथे आले होते पण गर्दी बघून त्यांनाही घाम सुटला होता. त्यांना पब्लिक क्लिअर करायला अतिरिक्त पोलीस बोलवावी लागली होती. पोलीस असो की रुग्णवाहिका त्यांना फक्त १० मिनिटाच अंतर पार करायला कितीतरी वेळ लागत होता. लोक तिला बघण्यास उत्सुक होते पण तिला होणाऱ्या वेदना कुणालाही दिसत नव्हत्या. ती १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ तडफडत होती. फायनली पोलिसाची अतिरिक्त टीम आली आणि त्यांनी गर्दी क्लिअर केली.. रुग्णवाहिका सुद्धा जवळ आली. कियारा आणि काही मैत्रिणींच्या मदतीने स्वराला रुग्णवाहिकेत चढविण्यात आलं आणि गर्दीने आक्रोश करायला सुरुवात केली. स्वरा सोबत पूजा, कियारा दोघीही निघाल्या होत्या तर शोभना, तिच्या मैत्रिणी मागून येणार होत्या. हळूहळू रुग्णवाहिका चालू लागली पण तेवढ्या गर्दीतही स्वराचा आवाज सर्वात जास्त होता. किती यातना तिला होत असतील ह्याबद्दल कल्पना न केलेलीच बरी.

ती हॉस्पिटलकडे निघाली पण कॉलेज समोर गर्दी काही कमी होत नव्हती. आता पहिल्यांदाच सर्वांची नजर त्या जागेवर गेली जिथे स्वरा बसून होती. तिथे स्वराच्या चेहऱ्याची स्किन पडली होती. सर्वाना बघून धक्का बसला होता. स्वरा गेली पण काहीच क्षणात मीडिया आली . मीडियामुळे तो मुद्दा घरा-घरात पोहोचला. सोशिअल साइट्सवर तर चर्चाना उधाण आलं होतं. घरा-घरातून लोक कॉलेज समोर पोहोचू लागले होते. जिकडे-तिकडे नुसती हळहळ सुरू होती. जेव्हा हा क्षण घडला तेव्हा ती बाबांसोबत कॉलवर बोलत होती. तिच्या आईच्या किंचाळीने त्यांना धक्काच बसला होता पण स्वराच्या हातून मोबाइल खाली कोसळला आणि तो तुटलाच. त्यांनी नंतर कितीतरी कॉल केले पण तिचा मोबाइल बंद येत होता. आज सरविकडे फक्त टेन्शनच टेन्शन होत. स्वराने पहिल्या दिवशीच म्हटलं होतं की हे कॉलेज तिच्या नावाने ओळखल जाईल पण अशा पद्धतीने ओळखल्या जाईल ह्याबद्दल तिलाही कल्पना नव्हता. आज फक्त कॉलेज नाही तर पूर्ण दिल्ली तिला ओळखत होती.

स्वराला रुग्णवाहिकेने नेण्यात येऊ लागले होते पण तिच्या आवजाने कियारा, पूजा दोघीही घाबरून गेल्या होत्या. तिला इतक्या वेदना होत होत्या की तिला रुग्णवाहिकेत आवरण कठीण जाऊ लागलं. तिला नर्स, व्हॉडबॉय, कियारा सर्वांनी पकडून ठेवले होते पण ती त्यांना सर्वाना हलवून सोडत होती. तिचा चेहरा इतका भयानक दिसत होता की क्षणभर कियाराला तिला बघून भीती वाटत होती. तिच्या शरीरावर गुज बम्प्स होते तरीही कियाराने हिम्मत हरली नाही. ती पूर्ण ताकद लावून सर्व फेस करत होती. पूजा तर स्वतःच स्वतःला सावरू शकत नव्हती. ती स्वराला काय सावरणार. रुग्णवाहीकेमधील एक एक सेकंद आता जड जाऊ लागला होता. तिच्या वेदना आणखीच वाढत होत्या आणि आपण केव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो अस त्याना झालं होतं. त्यांना पोहोचायची घाई होती तर ट्रॅफिक त्यांची आणखीच वाट अडवू लागली. कियाराला नुसता घाम सुटला होता. पूजा तर होशमध्ये नव्ह्तीच पण आणखी जास्त वेळ कियारा तिथे राहिली असती तर तीही बेशुद्ध पडली असती तरीही स्वतःला सावरत ती तिथे बसून राहिली.

फायनली हॉस्पिटल आलं. व्हॉडबॉय ने दार उघडलं आणि त्यातून हळूहळू स्वराला बाहेर आणण्यात आल. ती तिथून जात होती तेव्हाही तीच ओरडण थांबल नव्हतं आणि पूर्ण हॉस्पिटल तिच्याकडे लक्ष देऊ लागल. कियाराने तिला कसतरी पकडून ठेवलं होतं पण पूजा येता - येताच बेशुद्ध पडली. तिला हॉस्पिटलच्या एका नर्सनेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. स्वराची हालत बघताच पूर्ण हॉस्पिटलच रेड अलर्ट वर आलं. डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली. ऑपरेशन थेटर क्षणात सज्ज झाल. हॉस्पिटलच्या समोरची आता गर्दी वाढू लागली होती. तिच्या मैत्रिणी कशाबशा तिथे पोहोचल्या होत्या. शोभनाने येताना स्वराचा मोबाइल आणला होता पण आता कुणाचीच इतकी हिम्मत नव्हती की ते कुणाशी काही बोलू शकतील. सर्व निशब्द झाले होते. डॉक्टरांची धावाधाव अजूनही सुरूच होती आणि पुढे काय होईल म्हणून ते सर्व बाकावर बसून राहिले. स्वरा हे एक नाव आज पूर्ण दिल्ली ऐकत होती. हे नक्की का झालं ह्याच कोड अजूनही त्यांच्या मनात घर करून होत. दिल्ली करांची आजची सकाळ भयानक होती. पूर्ण घर शांत होती आणि प्रत्येक घरात एकच नाव होतं. स्वरा मोहिते!!!

स्वरा ऑपरेशन थेटरमध्ये होती. तिच्या सर्जरीला सुरुवात झाली होती. हॉस्पिटलमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती घाबरून होता. पूजा स्वराचा चेहरा बघूनच बेशुद्ध पडली होती त्यामुळे तिला सलाइन लावले होते. कियारा सर्व एकटीच मॅनेज करत होती पण तीही स्वराच ओरडण बघून घाबरून गेली होती. तिने कधी स्वप्नांतही विचार केला नव्हता की हे अस कधीतरी पाहावं लागेल. जी स्वरा आनंदात पूर्ण जीवन जगत आली होती तीच स्वरा आता दुःखात बुडाली होती. ती ऑपरेशन थेटर मध्ये होती तेंव्हापर्यंत ठीक होत पण जेव्हा ती बाहेर आली असती आणि स्वतःचा चेहरा तिला पहावा लागला असता तेव्हा काय झालं असत कियाराला कल्पनाच करवत नव्हती. तिचे हात पाय थरथरू लागले होते, डोकंही बधिर झालं होतं म्हणून एका बेंचवर ती तशीच पुतळ्यासारखी बसून राहिली. तिच्या आजूबाजूने लोक येत जात होते पण तिला कशाचच पडलं नव्हतं.

२-३ तास गेले होते पण अजूनही डॉक्टर बाहेर आले नव्हते म्हणून थोडी भीती आणखीच वाढली होती. तिच्या जीवाला भीती तर नाही ना म्हणून सर्वांनी श्वास रोखून धरला होता तेवढ्यात ऑपरेशन थेटरच दार उघडलं आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर बाहेर येताच शोभना, कियारा धावतच डॉक्टरकडे पोहोचल्या. त्या डॉक्टरला काहीतरी विचारणार त्याआधीच स्वरालाही बाहेर काढल आणि त्या तिला पाहू लागल्या. स्वराचा पूर्ण चेहरा बँडेजने कव्हर केला होता त्यामुळे चेहऱ्याचा अंश सुद्धा दिसत नव्हता. ऍसिड बहुतेक थोडं फार मानेवर पडलं होतं म्हणून मानेवर काही घाव दिसत होते. ती बघतच होती की स्वराला पुन्हा आय.सी.यु. मध्ये नेण्यात आल. इकडे डॉक्टर निघणारच तेवढ्यात कियारा धावतच डॉक्टरकडे पोहोचली आणि अडखळतच बोलून गेली, " सर अब स्वरा कैसी है? उसका चेहरा तो ठीक हो जायेगा ना? "

डॉक्टर साहेब हळूच पण उदास स्वरात म्हणाले, " सॉरी बेटा!! शुक्र मनाओ की वो बच गयी पर उसका चेहरा इतना बिघड गया है की उसे ठीक करना लगभग मुमकीन नही. उसे अब इसी चेहरे के साथ जिंदगी गुजारणी है. "

कियाराच अंग आता थंड पडलं होतं कारण कियाराने स्वता तिला पाहिलं होतं तेव्हा ती स्वराला बघायची हिम्मत करू शकली नव्हती तर स्वरा आयुष्यभर अस कस वावरणार होती. तिला भीतीने अंगावर काटे उभे झाले होते. ती पूर्णता खचली होती म्हणून हळूच बाजूला सरकली तर शोभना पुढे म्हणाली, " सर हम मिल सकते है उसे??"

डॉक्टर साहेब पुन्हा हळू आवाजात म्हणाले, " मिल सकते हो लेकिन अभि नही. उसे बहोत दर्द हो राहा था इसलीये बेहोशी का इंजेक्शन देणा पडा. सो वो आज नही उठ पायेगी. सुबहँ बात कर लेना और उसके ममी-पापा को जरूर बता देणा. "

डॉक्टर निघून गेले आणि आता समजलं की तिच्या आईबाबांना कुणीच कळवल नव्हतं. त्यांच्याकडे नंबर तर नव्हताच पण त्यांना नक्की काय सांगायचं हेच कळत नव्हतं. सांगितल्यावर त्यांना काय बर वाईट तर होणार नाही ना अशी भीती दोघीनाही सतावू लागली होती. त्यामुळे एकाच्या हातात एक हात टाकून त्या बेंचवर बसल्या होत्या. काही क्षण तसेच गेले. आता सर्व काही शांत झाल होत. हॉस्पिटलमधील गर्दी कमी झाली होती आणि हळूहळू सर्वच आपापल्या कामाला लागले होते. तेवढ्यात पूजा धावतच कियाराकडे आली आणि कियाराजवळ बसत म्हणाली," कियारा क्या हुआ? उसे कुछ हुआ तो नही ना? वो ठीक तो हो जायेगी ना?"

पूजा पटापट प्रश्न विचारत होती तर कियारा शांत बसून राहिली. कियाराने खूप वेळेपासून स्वतःला सावरलं होत पण आता तिला ते जमणार नव्हतं आणि ती रडू लागली. कियारा रडत आहे बघून दोघीही तिला शांत करू लागल्या पण कियाराच्या मनात काहीतरी सुरू होत जे ती बोलू शकली नव्हती. कियारा रडते आहे हे बघून पूजा आणखीच घाबरली आणि घाबरतच तिने विचारलं, " कियारा कही स्वरा?"

कियारा तीच तोंड बंद करत म्हणाली," चुप!! डॉक्टरने कहा है की अब उसका चेहरा कभी ठीक नही हो सकता. अपनी स्वरा अब ऐसेही रहेगी. "

पूजाला हा धक्का पचवणे कठीण होते त्यामुळे तीही तिच्यासोबत रडू लागली. शोभना आतापर्यंत कसेतरी अश्रू आवरून होती पण आता तिलाही स्वतःला थांबवता आलं नाही. काही क्षण तसेच गेले आणि पूजा म्हणाली," क्या मिला कियारा राज को? प्यार प्यार करता था ना? तो क्या प्यार को जिंदा जला देना येही प्यार है? ये कैसा प्यार है जो लडकी को अपनी मर्जीसे जिने नही देता और अगर लडकीने मना कर दिया तो ऐसें पेश आते है? साले मर्द नही है ये, ये तो हिजडे है हिजडे!! किडे पडकर मरेंगे साले ये लोग. भगवान इनको कभी माफ नही करेगा. भगवान क्या मै खुद इसको सजा दिलाने वाली हु. "

कियारा, शोभनाच्या मनातही आग भडकली होती त्यामुळे त्याही त्याला सोडणार नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात आग होती जी आता विझनार नव्हती. काही क्षण पुन्हा गेले आणि टीव्हीवरची बातमी बघून शोभना म्हणाली," पूजा तुम्हारे पास स्वरा के पापा का नंबर होगा तो उनको बता देते है. "

पूजा घाबरतच म्हणाली," शोभना नंबर तो है लेकिन मेरी इतनी हिम्मत नही की मै बात कर सकू..!!!"

तिने दोघांकडे पाहिलं, त्यांची खरच अशी स्थिती नव्हती की ते बोलू शकणार म्हणून पूजाकडून नंबर घेत तिने त्याला कॉल लावला. तिने कॉल लावताच समोरून क्षणात उचलल्या गेला. शोभना हळुवार आवाजात बोलून गेली," आप स्वरा के पापा बात कर रहे है?"

तिचे बाबा हळूच बोलून गेले," हा!!! आप स्वरा की दोस्त बोल रही है ना? कैसी है मेरी स्वरा?? मैने कॉल किया था तब उसका फोन कट हो गया और वो चिल्ला रही थि. मैने बहोत कॉल किये लेकिन उसका नंबर बंद आ राहा था. हम बहोत घबरा गये है इसलीये थोडी देर मे यहा से निकल रहे है. तुम बताओ ना वो ठीक तो है ना? वो कहा है अभि?"

ते इतक्या फास्ट फास्ट बोलत होते की शोभना क्षणभर घाबरलीच होती. पुढे काय बोलू तिलाही कळत नव्हतं. तरीही मन घट्ट करत ती म्हणाली," अंकल ठीक है वो बस छोटासा ऍक्सिडेंट हुआ है. वो आप को याद कर रही है बस आप आ जाइये जलदी से. "

शोभना त्यांची स्थिती बघून खोट बोलली होती तर स्वरा ठीक आहे हे एकूण त्यांना बर वाटल होत. त्यांच्या आवाजात आता शांतता वाटत होती आणि ते म्हणाले," ठीक है बेटा हम कल शाम तक आ जायेंगे. रखता हु."

त्यांनी फोन तर ठेवला होता पण पुढे काय होईल ह्याबद्दल कुणाला काहीच अंदाज नव्हता. स्वराच्या घरच्यांना कळलं असत तर ते सहन करू शकले असते का कुणाला काहीच माहीत नव्हतं.

आजचा दिवस कसातरी गेला होता. कियारा, शोभना, पुजाने क्षणभर सुद्धा एकमेकांची साथ सोडली नव्हती. सकाळ झाली आणि कियाराची झोप उघडली. त्या दोघी अजूनही उठल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना तशीच झोपू देत कियारा स्वराकडे गेली. क्षणभर ती तिला तिथेच बघत बसली. स्वराचा हात तिने हातात घेतलाच होता की स्वरा हालचाल करत असल्याचं कियाराला जाणवलं आणि ती आनंदाच्या भरात बाहेर पळाली. स्वरा हालचाल करत असल्याचं तिने त्यांना सांगितलं आणि त्याही धावतच आय.सी.यु. मध्ये पोहोचल्या. स्वरा स्वतःच उठायचा प्रयत्न करत होती पण तिला उठण जमत नव्हतं. त्याच वेळी त्या तिघे तिथे पोहोचल्या आणि स्वराला नीट बसवू लागल्या. स्वरा आता बरी आहे हे बघून त्यांना छान वाटलं होतं. आता त्या फक्त स्वराची बोलण्याची वाट बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता . काही वेळ स्वरा शांतच होती आणि पहिले वाक्य बोलून गेली," कियारा मेरी क्या गलती थी? "

तिच्या एका वाक्याने सर्व वातावरण बदलून गेल. हसणार्या चेहऱ्यावर उदासी पसरली होती. डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न," काय चूक होती स्वराची???"

या प्रश्नाचं उत्तर ते स्वतःच शोधत होते. स्वराला काय उत्तर देणार होते. हेच की तू चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवला म्हणून तुझ्यासोबत हे घडलं आहे आणि सांगतील तरीही कोणत्या तोंडाने?

क्रमशा ...