Bhagy Dile tu Mala - 49 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ४९

अधुरा रेह जायेगा सफर
तेरी-मेरी मोहब्बत का
कसूर किसका है बता-ए-खुदा
क्यू दर्द सहे हम तेरी गलती का??

ती रात्रीची वेळ होती घट्ट काळोख पसरला होता. स्वराला आज ऑफिसमधूनच यायला उशीर झाला होता. ती घरी आली तरीही तीच मन काही कुठल्याच कामात लागत नव्हत. अन्वय हे ऑफिस सोडून कायमचा दिल्लीला जाणार हे ऐकूनच स्वराला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा आजचा प्रत्येक शब्द तिला त्रास देऊ लागला. त्याने आजपर्यंत कधीच मन मोकळं केलं नव्हतं पण आज जेव्हा तो बोलला तेव्हा त्याच्या डोळ्यात तिने खूप काही बघितलं होत. ते बघूनच आज स्वराला कस तरी वाटत होतं. अन्वयचे शब्द " कधी भेट होणार की नाही, सुंदर चेहरा बघायला मिळणार की नाही?" तिला त्रास देत होते. त्याच्या बोलण्यात खरेपणा होता म्हणून आज त्याच्या बोलण्याने ती विचारात पडली होती म्हणूनच कदाचित तो प्रेमाबद्दल बोलून गेला तरीही तिला राग आला नव्हता. मागच्या ८ वर्षात स्वराच्या आयुष्यातून खूप लोक निघून गेले होते तरीही तिला त्याचा जेवढा त्रास होत नव्हता आज त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तिला स्वतःला होत होता म्हणून ती आज गॅलरीमध्येच कितीतरी वेळ इकडून तिकडे चकरा मारत होती. बाहेर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या त्यामुळे वातावरण शांत वाटत होतं पण स्वराच मन काही शांत झाल नव्हतं. तिला आज स्वतःलाच काही प्रश्न पडत होते पण त्याच एकही उत्तर तिला मिळालं नाही. जी स्वरा आपल्याच प्रश्नःतून बजेर पडली नव्हती ती आता त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. तिला नक्की स्वतःसोबत काय होतंय कळत नव्हतं. ती बराच वेळ विचार करत होती. तिला तीच उत्तर मिळाल नव्हतं आणि स्वतःलाच म्हणाली," मी नाही जाऊ देणार सरांना. आता कुठे माझ्या आयुष्यात चांगले क्षण यायला लागले होते. हे मान्य की मी स्वतःला सावरून घेते आहे, जगायला शिकते आहे, हसायला लागले आहे, मुक्तपणे बागळायला लागले आहे पण अजूनही मी त्यांच्या मदतीशिवाय जीवनात समोर जाऊ शकत नाही. अजूनही मला त्यांच्याकडून बरच काही शिकायचं आहे. मी सांगेन त्यांना की मला तुमची खूप गरज आहे. ह्या प्रवासात मला कुणिच समजून घेतलं नाही पण तुम्ही पहिले आहात ज्यानि फक्त समजून घेतलं नाही तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सांगितले. तुम्ही माझे वेल विशर आहात तेव्हा तुम्हाला सोडून जाऊ देणार नाही. माहिती आहे स्वार्थी होतेय मी पण आज नाही ऐकणार मी मनाच. आज हा स्वार्थही मला आवडेल जर तुम्ही मला आयुष्याचे नवीन अनुभव द्यायला सोबत थांबणार असाल तर? अन्वय सर, स्वरा तुम्हाला वरून जरी मजबूत वाटत असली तरीही ती अजून पूर्णपणे मजबूत झाली नाहीये. तुमच्या हेल्पछु गरज आहे मला. मला स्वतःला कणखर होऊ दे मग खुशाल जा. मी तुम्हाला उद्या थांबवणार आहे. तुम्ही थांबणार विश्वास आहे मला. "

स्वरा स्वतःशीच बोलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. पुन्हा पुढे ती म्हणाली," कसे आहात ना अन्वय सर तुम्ही? मनातलं सांगितलं त्यात काही वाद नाही. खर सांगू तर मी चिडलेही नाही पण मला सांगा जेव्हा तुम्हाला माहीत आहे की मी अशी अचानक प्रेमास स्वीकारू शकत नाही तर माझ्या मनाला जिंकायला काही दिवस देताही आले नाही का? तुम्ही बोलत होतात तेव्हा मला आनंद नक्किच झाला होता पण तुम्ही जाणार हे ऐकून तो आनंद साजरा कसा करणार हे कळलं नाही का हो तुम्हाला? मला नाही माहीत सर माझं उत्तर काय असेल पण हे खरं की तुमचा स्वभाव, तुमची काळजी मी बघितली आहे. त्यात खरेपणा आहे म्हणून प्रेमाचा राग असूनही मी चिडले नाही. अन्वय सर जस तुम्ही मला इतर गोष्टी बदलवायला भाग पाडल तस तुम्हाला एकदाही वाटलं नाही का की तुम्ही इथेच राहून माझेच प्रेमाबद्दल विचार बदलू शकता? जसे समाजाबद्दल बदलू शकता तसे प्रेमाबद्दल बदलायला प्रयत्न का केला नाहीत? मला तर माझ्या चुकण्यात पण आनंद मिळाला असता. किती चांगलं समजून घेता तुम्ही मला मग हे कसं कळलं नाही तुम्हाला? तुम्ही प्रेम तर व्यक्त केलं पण मला उत्तर द्यायला थोडासा वेळ देता नाही आला का? सर मला एक सांगा तुम्ही मला सोडून जाताना मी आनंद मनवु की दुःख? काय उत्तर देऊ मी तुम्हाला? माझं मन जपताना देखील तुम्ही इथे चुकलात सर. हरकत नाही मी उद्या तुम्हाला विचारेन की प्रेम व्यक्त केल्यावर तुम्हाला पूर्णपणे ओळखायची संधी दिल्याशिवाय तुम्ही कसे जाऊ शकता? प्रेम करता ना तुम्ही माझ्यावर मग बघू हा प्रश्न ऐकल्यावर देखील मला सोडून कस जाता? स्वार्थी आहे मी सध्या पण हरकत नाही. आजपर्यंत लोकांचा भरपूर विचार केला आता मला माझा विचार करायचा आहे सो तुम्ही मला जगणं शिकविल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. तुम्हाला अधिकारच नाही जायचा. तुम्ही माझ्या आयुष्यात माझी परवानगी न घेता आलात हे खरं पण माझी परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही."

ती स्वतःशीच बडबड करत होती पण आता तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता कुठेतरी गायब झाली होती. तीच तिला उत्तर मिळालं आणि तिला आता उद्याची वाट होती कारण तिचा लकी चार्म तिच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही हे ती जाणून होती. तिचे प्रश्न ऐकून ज्याला अस्वस्थ वाटत तो एवढं सर्व ऐकल्यावर तिला सोडून जाइल शक्यच नव्हतं. आता तिच्या मनाची अस्वस्थता कुठेतरी गायब झाली आणि तीच रिमझिम रिमझिम बरसात तिला आता आनंद देऊ लागली.

तेरा होणेसे भी ज्यादा
तेरे होणे की सोच खास है
आयने ने जो दिखाया नही
वो दिखता है तेरी सोहोबत मे


रात्रीचे जवळपास साडे दहा वाजले होते. ती बाल्कनीमध्ये उभी राहून पावसाची मज्जा घेत होती की तिचा फोन वाजला. तिला आवाज येताच ती फोनकडे धावली. तिला वाटत होतं की ती आज रागावून घरी परतली तर सरांनी तिला कॉल केला असेल म्हणून ती धावतच फोन घेऊ लागली. तिने फोन हातात घेतलाच होता की तिचा अपेक्षाभंग झाला कारण तो फोन अन्वयचा नव्हताच. स्क्रीनवर एक नंबर फ्लॅश होत होता आणि स्वराने फोन उचलत म्हटले , " हॅलो…."

तिकडून कुणाचा तरी आवाज आला , " हॅलो क्या मैं स्वरासेही बात कर रहा हु?"

तो आवाज ऐकला आणि स्वराच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. तिला तो आवाज ऐकून इतका आनंद झाला होता की ती समोर बोलायचच विसरली. पुन्हा समोरून आवाज आला," हॅलो कोई है?"

स्वरा मात्र आता आनंदातच उत्तरली," हा बोलो ना स्वयम. कितने दिनो बाद याद आयी ना तुम्हे मेरी? मुझे बहोत अच्छा मेहसुस हो रहा है. कैसे हो तुम? क्या हाल है तुम्हारा! कॉलेज छुट गया तो भूलही गये तुम हमे. मैने कहा था ना की हम हमेशा अच्छे दोस्त रहेंगे."

स्वरा एकाच श्वासात सर्व बोलून गेली आणि स्वयम हसत उत्तरला," तुमने मेरे आवाजसेही पहचान लिया मुझे? मै तो क्या क्या सोच रहा था? गुस्सा करोगी तोभी सून लुंगा पर यहा तो तुम बिलकुलही शांत हो. तूम्हे आज भी मै याद हु?"

स्वराला आपल्याच शब्दांवर नियंत्रण नव्हतं. त्याचा आवाज येतावज ती पटकन बोलून गेली," भूलेही कब थे स्वयम तुम्हे. मै तो आज भी तुमसे……"

तिने स्वतःच्याच शब्दांना अडवलं पण स्वयमला तिला काय बोलायचं होत ते समजलं. तरीही तो काहीच म्हणाला नाही. त्याला माहित होतं की त्याने एवढी मोठी चूक केली होती की त्याला ह्या विषयावर सहज बोलणं शक्य नव्हतं पण त्याला बर वाटल होत की ती अजूनही त्याला विसरली नाहीये सोबतच तिला त्याचा राग नाही. स्वयम शांतच होता की स्वरा म्हणाली, " तुम कैसे हो? पापा, मम्मी कैसे है?"

स्वयम आता थोडा शांत झाला होता तर त्याच्या श्वासांचे आवाज तिला ऐकू येत होते आणि स्वरा घाबरतच उत्तरली," कुछ हुआ है क्या स्वयम? तुम्हारी सांस लगती है तो मुझे पता चलता है. प्लिज बताओना क्या हुआ है? मेरा दिलं सूनने को मचल रहा है?"

स्वरा घाबरली होती तर स्वयम हळुवार आवाजात उत्तरला," पापां नही रहे. कुछही दिन पेहले उनका देहांत हुआ है. अस्थमा का अटॅक आया था ऊन्हे. मै घर पर नही था. हॉस्पिटल मे ले जाणे वक्त तक उनकी सांसे थम चुकी थि. बस अब हम दोनो जी रहे है!!"

स्वराचा आनंद पुन्हा क्षणात नाहीसा झाला. तिला जाणवलं की स्वयमच्या डोळ्यात अश्रू होते. स्वयम रडतोय बघून स्वराच्याही डोळ्यात आपोआप अश्रू आले आणि स्वरा हळुवार आवाजात उत्तरली," स्वयम प्लिज रोना बंद करो. मुझे नही देखा जाता तुम्हे ऐसें!"

स्वरा मनाला वाटेल ते बोलत होती आणि तिची काळजी बघून स्वयम शांत झाला. स्वरा पुन्हा हळुवार आवाजात उत्तरली," मम्मी कैसी है स्वयम? उनकी हालत कैसी है? "

स्वयम उदास स्वरात उत्तरला," ठीक है! तुम्हे याद करती है? आओगी उनसे मिलणे?"

स्वरा आता हलकेच हसत म्हणाली," हा जरूर!! ऐसें वक्त अपने नही तो कौन काम आते है? आउंगी स्वयम!!"

स्वयमला तीच उत्तर ऐकून बर वाटल होत आणि तो थोड्या वेळ शांत होत म्हणाला," स्वरा मैने कुछ और बताने के लिये तुम्हे कॉल किया था. बहोत वक्त से दिलं मे रखा है पर आज नही रखं सकता!! क्या तुम्हारे पास पाच मिनिटं है मेरे लिये?"

स्वरा हसतच उत्तरली, " तुम्हे जितना चाहे वक्त लो. काहो क्या बात है?"

स्वयम हसतच उत्तरला" तो सुनो....."

स्वरा आतुरतेने ऐकू लागली. स्वयम तिला त्याच्या मनातलं काहीतरी सांगू लागला आणि सुरुवातीला आनंदी असलेलं वातावरण थोडं शांत होऊ लागलं. तो एक-एक शब्द सांगत होता आणि क्षणात वातावरण पूर्णता बदललं. तिने काही क्षणापूर्वी त्याला हसवल होत पण आता जेव्हा ती त्याच्या तोंडून काहीतरी ऐकत होती तेव्हा तिला स्वतःचे अश्रू पुसन कठीण होऊन बसल. स्वयम त्याच्या मनातलं काहीतरी सांगू लागला आणि स्वराच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलू लागले. तो १५ मिनिट काहीतरी बोलत होता. तो बोलत असताना दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. स्वराला ते सर्व ऐकून स्वतःला आवरण कठीण होऊ लागलं आणि ती स्वतःच रडू लागली. त्याने फोन ठेवला तेव्हा रूमच वातावरण पुन्हा शांत झाल होत. तो बोलून तर गेला पण स्वराची पुन्हा एकदा स्थिती खालावली. तिने मोबाइल बाजूला ठेवला आणि कसल्या तरी विचारात हरवली. त्या पूर्ण वेळेत असा एक क्षण नव्हता जेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते आणि पुन्हा एकदा जीवघेणे विचार!! काय म्हणाला होता स्वयम???

स्वयमसोबत ती बोलली आणि जणू अन्वयचा विषय तिच्या डोक्यातून गायबच झाला. आज स्वराचा दुहेरी गोंधळ सुरू होता. काही वेळ अशी होती की ती अन्वयला थांबवायला आतुर झाली होती तर आता अशी वेळ होती की आपण नक्की त्याला कोणत्या अधिकाराने थांबवायच हा प्रश्न ती स्वतालाच करत होती. ह्यात स्वराचा विचार काहिच नव्हता. ही जादू होती स्वयमच्या शब्दाची. स्वयम जरी तिच्यासोबत चुकीच वागला होता तरीही ह्या प्रसंगाने हे सांगितलं होतं की स्वरा अजूनही त्याला विसरू शकली नाही. मनाच्या एका कोपऱ्यात तो कुठेतरी बसला होता. त्याने बोलायची फक्त वेळ होती आणि स्वरा गोंधळात पडली. काय होता तो गोंधळ? स्वयम अस नक्की काय बोलून गेला होता की काही क्षण पूर्वी हक्काने थांबवतो म्हणणारी ती आता त्याला कोणत्या हक्काने थांबवू म्हणत होती? ती रात्र स्वराच्या आयुष्यातील पुन्हा एक कठीण रात्र होती. त्यामुळे तिला रात्री काही झोप लागली नाही.

गुम कर दिया है उसके सवाल ने
जवाब दु तो भी मरणा है ना दु तो भी??

सकाळचे ११ वाजले होते. काल कधी एकदा दिवस होतो आणि अन्वयला थांबवते अस स्वराला झालं होतं तर आज ऑफिसची वेळ होऊनही तिचे पाय घराबाहेर निघायला तयार नव्हते. तिने आज आपला मोबाइल देखील बंद करून ठेवला होता. स्वराने सकाळी फक्त एक चहा घेतला होता तेव्हपासून तिने कशाला सुद्धा हात लावला नाही. एवढंच काय ती अजूनही अंथरुणावरच बसून होती. स्वतःच्या मनाला सांगणारी की मला वेळ न देता अन्वय जाऊ कसा शकतोस, आता त्याला थांबवायला ऑफिसला जात नव्हती. काही तासात अस काय घडलं होत की स्वराने आपला विचारच बदलून टाकला. तिला त्याहीवेळी माहिती होत की आपण त्याला जायला देऊन चूक करतोय पण काहीतरी होत तिच्या मनात जे तिला अन्वयकडे जाऊ देत नव्हत? त्याच कारण अन्वयच्या प्रेमावर शंका होती की स्वयमचे शब्द? उत्तर तिलाच माहिती होत आणि ती आज कुणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. आजही तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ते नेमके कुणासाठी होते? अन्वयसाठी की स्वयमसाठी? तिचा गोंधळ सुरू होता आणि ती स्वतालाच हरवून बसली होती.

वेळ तीच होती. इकडे अन्वय शेवटचा दिवस म्हणून ऑफिसला पोहोचला होता. त्याने येताच तिच्या डेस्कवर नजर टाकली. ती आज आली नाही म्हणून त्याला थोडं वाईट वाटलं होतं. त्याला अंदाज होताच की तिला मनातलं सांगितल्यावर ती असच काही वागेल म्हणून त्याला आज स्वतालाच त्याच्या वागण्याच वाईट वाटत होतं पण तिच्याशी बोलायला तरी ती नेमकी कुठे होती? सकाळची दुपार व्हायला आली होती. अन्वयची काम करत असताना सुद्धा नजर स्वराच्या डेस्कवर जात होती पण स्वराचा आज काहिच पत्ता नव्हता. तिला शेवटच पाहून त्याला जायच होत म्हणून तो तिच्या डेस्ककडे नजर ठेवून होता पण तिची येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.

तिची वाट पाहता पाहता केव्हा दुपारचे २ वाजले त्यालाही कळलं नाही. २ वाजने म्हणजे त्याच्या निघण्याची वेळ होती. त्याला सायंकाळी ६ वाजता फ्लाइट पकडायची असल्याने तो खिन्न मनाने केबिनमधून बाहेर पडला. आताच सर्व जेवायला उठले होते आणि अन्वय मोठ्या आवाजात म्हणाला," हॅलो फ्रेंड्स!! खर तर तुम्हाला सर्वाना सोडून जाताना वाईट वाटत आहे पण पर्याय नाही. माझी जॉब, घर सर्व तिकडेच आहे सो मला जावं लागेलच. पण एवढं नक्की म्हणेन की हे काही महिने माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. मी हे क्षण कधीच विसरू शकणार नाही. मला माहित आहे की मी बॉस म्हणून भरपूर रागावलो आहे, त्या पलीकडे माझ काही चुकलं असेल तर माफ करा. मी इथून आज जातोय खर पण खूप सुंदर आठवणी घेऊन. ज्या मी कधीच विसरणार नाही. आज मी इथून बॉस म्हणून नक्किच जातोय पण एक मित्र म्हणून कायम तुमच्यासोबत राहीन. कधी पैशाची गरज असो किंवा मग कसलीही मला नक्की आठवण करा. चला येतो मी."

अन्वयचे प्रेमळ शब्द ऐकून सर्वच भावुक झाले होते. दीपिकाने त्याला लगेच बुके नेऊन दिला सोबत काही गिफ्ट आणल होत तेही दिलं. तीच नाही तर सर्वांनी त्याच्यासाठी काहीतरी आणलं आणि तो सर्वांचे गिफ्ट प्रेमाने स्वीकारत होता. आज शेवटची आठवण म्हणून सर्वांनी त्याच्यासोबत फोटो काढले. अन्वयही खूप भावुक झाला होता. त्या सर्वांच प्रेम बघून त्याच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले होते आणि तो निघू लागला. जाताना त्याची स्वराच्या डेस्ककडे नजर गेली आणि त्याचे पाय क्षणभर थांबले. तो तिच्या डेस्कजवळ गेला . समोर बाप्पाची मूर्ती ठेवून होती. त्याने डोळे घट्ट मिटले आणि मनातल्या मनात म्हणाला," बाप्पा मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितल नाही. मागायला तू ठेवलंच काय? सर्वंच दिलंस तू आधीच. तरीही आज स्वार्थी होऊन काहीतरी मागतोय. बाप्पा स्वराने आयुष्यात खूप काही सहन केल आहे. तिला आता नको दुःख देऊस. जर तिच्या आयुष्यात काही दुःख येणार असतील तर ते मला दे. पुन्हा एकट्याने आयुष्य काढणं सोपी नाही रे. ती माझी नाही झाली तरीही हरकत नाही पण तिच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठव. ज्याला ती स्वीकारायला मागे पुढे बघणार नाही आणि तोही तिची सर्व स्वप्न पूर्ण करेल. बाकी मला काहीच नको देवा. प्लिज ही इच्छा पूर्ण कर माझी. तिला कायम आनंदी ठेव. तिचा जीवणावरचा विश्वास उडाला आहे तेव्हा अस काही कर की ती पुन्हा जीवन जगायला लागेल आणि स्वतःहून नव्याने आयुष्याची सुरुवात करेन. बाप्पा नक्की कर हा पूर्ण प्रार्थना. वाटल्यास मी लाडू भरवेन तुला खूप सारे. प्रॉमिस माझं.."

त्याने डोळे उघडले आणि स्वराच्या डेस्ककडे बघून क्षणभर हसला. ती त्याक्षणी तिथे नव्हती तरीही त्याला ती तिथे दिसत होती. ती त्याला म्हणत होती की " सर काळजी घ्या बाय.." तो तिच्याकडे बघून क्षणभर हसला आणि ती पुन्हा गायब झाली. तो तिच्या डेस्ककडे बघून हसला आणि ऑफिसच्या बाहेर पडला. बाहेर पडताना त्याच्या डोक्यात एकच वाक्य होत" स्वप्न की आभास हा?"

सपणे मे जो थि
कही वो तुम तो नही
वो तुमही थि या सपना
सच बताना यारो मै नशे मे तो नही..

***********

सायंकाळची वेळ होती. घड्याळात साडे पाच वाजले होते. त्याने तिकीट वगैरे काढून ठेवली आणि एका जागी बसला. त्याला माहित होतं की स्वरा त्याला भेटायला येणार नाही तरीही ती येईल अशी एक वेडी आशा त्याच्या मनात होती. तो वाट बघतच होता की फ्लाइटला बसण्यासाठी शेवटचा पुकारा झाला आणि अन्वयची राहिलेली आशाही मावळली. त्याने मोबाइलमध्ये बघितले. त्यावर कुणाचाच कॉल आला नव्हता म्हणून पुन्हा हसून तो फ्लाइटमध्ये बसायला निघाला. तो फ्लाइटकडे जात होता तरीही त्याच्या हातामधून मोबाइल सुटला नव्हता. काही क्षण गेले. अन्वय फ्लाइटमध्ये बसला आणि मोबाइलकडे बघतच होता की हवाई सुंदरी त्याच्या जवळ येत म्हणाली," सर फ्लाइट निघणार आहे प्लिज फोन बंद कराल का?"

त्याने क्षणभर त्या मुलीकडे बघितले आणि नंतर फोनकडे बघितले. त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू होत म्हणून तोही हसला आणि पटकन त्याने मोबाइल बंद केला. त्याने मोबाइल बंद केला आणि त्याचा अर्धा प्रवास इथेच संपला. आता फक्त फ्लाइट निघायची वेळ होती. सायंकाळचे बरोबर ६ वाजले आणि फ्लाइट उडायला सज्ज झाली. अन्वयच्या हृदयाचे ठोके वाढले होते. नजर बाहेर होती. पहिल्यांदा तो घाबरला होता म्हणून त्याने सिटला घट्ट पकडून ठेवले होते. त्याची हालत दयनीय झाली होती आणि क्षणात फ्लाइटने उड्डाण घेतली. उड्डाण घेताच त्याच्या हार्ट बिट काही क्षणात नॉर्मल झाल्या पण डोळे पाण्याने भरले होते. आज ते अश्रू काहीही करून थांबणार नव्हते पण त्या क्षणासोबत अन्वयच्या मुंबई मधील प्रवास इथेच थांबला. त्याच प्रेम अपूर्ण नक्की राहील होत पण त्याने एका मुलीला जीवन जगायला शिकविले हे समाधान घेऊन तो कायमस्वरूपी दिल्लीला गेला. अशाप्रकारे अन्वय हा विषय इथेच संपला...

रात्रीचे ९ वाजले होते. स्वराने मोबाइल ओपन केला आणि दीपिकाला फोन केला. दीपिकाने पटकन फोन रिसिव्ह करत म्हटले," काय स्वरा कुठे आहेस? किती कॉल केले तुला? सकाळपासून गायब आहेस नुसती? ऑफिसला पण आली नाहीस? "

स्वरा जड आवाजात उत्तरली," काही नाही ग जरा तब्येत बरी नव्हती. येणार होते पण ताकदच नव्हती अंगात म्हणून राहील ऑफिसला येण्याच.."

दीपिका आता थोडी उदास होत म्हणाली," तू यायला हवं होतंस यार आज. सर भावुक झाले होते खूप. जाताना आमच्याशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. शेवटच्या क्षणी त्यांनी तुझ्या डेस्कवर ठेवलेल्या बाप्पाच्या मूर्तीला बघून डोळे मिटले आणि काहीतरी मागितल!! बहुतेक त्यांना तुझ्याशी बोलायच होत पण तू नव्हतीस म्हणून त्यांनी बाप्पाला काहीतरी मागितल. असो आता काही फायदा नाही. ते दिल्लीला पोहोचले असतील एव्हाना."

स्वराच्या डोळ्यात क्षणभर पाणी उभं राहिलं आणि ती म्हणाली," सरांनी माझ्याबद्दल काही विचारलं का?"

दीपिका पुन्हा शांत होत म्हणाली," अगदी सर्वांबद्दल बोलत होते. तुझ्याबद्दलही बोलले. खूप छान आहेत सर. आले बॉस म्हणून पण गेले मित्र बनवून. प्रेमात पाडल त्यांनी सर्वाना!!"

तिचे शब्द ऐकून ती शांतच झाली. ते वाक्य ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. आज स्वराने ऑफीसमध्ये काय घडलं हे जाणून घ्यायला फोन केला होता आणि तिला समोर काहीच विचारायची गरज पडली नाही. दीपिकाने तिला सर्वच सांगितलं. काही वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला. स्वरा पुन्हा बाल्कनीमध्ये होती आणि तिला दीपिकाचे शब्द आठवले" सर बाप्पाला हात जोडून काहीतरी मागत होते."

स्वरा क्षणभर स्वतःवरच हसली आणि म्हणाली," माहिती आहे सर तुम्ही मला आयुष्यात खूप आनंद मिळावा हेच मागितल असणार. तुम्ही खूप चांगले आहात सर. पण मीच स्वार्थी निघाले. आहे सर काहीतरी मनात जे तुम्हाला सांगू शकले नाही. मला माहित आहे की तुम्ही समजून घेतलं असत पण नाही जमलं यायला मला आणि तुम्हाला सांगायला. ते सांगितलं असत तर तुम्ही खूप दुखावला असता. तुमच्याशी नजर नसते मिळवू शकले. आता आपल्यात हेच बेस्ट आहे की आपण दूर राहू. मी मिस करेन सर तुम्हाला कायम. मीही बाप्पाला तुम्हाला आनंद मिळावा हीच प्रार्थना करेन. बाप्पा सरांना चेहऱ्याने, मनाने सुंदर मुलगी मिळू दे. बस हीच इच्छा पूर्ण कर. मला खूप आनंद होईल तू माझी ही इच्छा पूर्ण केली तर. तस केलंस ना वर आल्यावर मी तुझी खूप सेवा करेन. डील हा!! तुला तर माहिती आहे मी माझं वचन मोडत नाही."

स्वरा आपल्याशी बोलून पुन्हा बाहेरच्या अंधारात हरवली होती. तो अंधार जो तिच्या आयुष्यात खूप आधीच आला होता पण अन्वयच्या जाण्याने तो जास्त जाणवू लागला. तिने कधीच विचार केला नव्हता की एक व्यक्ती सर्व काही देऊन स्वतःलाच हरवून बसेल. आनंद वाटून स्वता दुःखी होऊन जाईल. दुसर्याला आयुष्य देऊन स्वता मात्र खाली हात जातील. अन्वय त्यातलाच होता. ज्याला प्रेम शब्दाचा खरा अर्थ कळाला होता. तो गेला स्वतःसोबत आपलं प्रेम घेऊन. त्याने तिला नवीन जीवन दिले कदाचित ह्यातच त्यांच प्रेम होत. तो पुन्हा कधी येईल का परत माहिती नाही? पण तिला माहीत होतं की तो तिला मिळवायला परत येणार नाही तर स्वराच्या मनात एक असा प्रश्न होता जी ती कुणाला सांगू शकत नव्हती. भावना बंदिस्त झाल्या होत्या आणि कदाचित वेळही. काय असणार होती स्वराची पुढची कथा!!!!

कुछ पल का ये सफर
अधुरा रेह गया
तुमने हलकेसे दि दस्तक
दिलं ने न जाणे क्यू ठुकरा दिया?

क्रमशा....

( माहिती आहे सध्या तुमच्या डोक्यात हजारो प्रश्न आहेत. त्याच उत्तर मी आता नाही देऊ शकत पण स्वरा ह्या पात्राला खुलवायला हा भाग लिहिणे फार गरजेचे होते. तुम्ही एवढा विश्वास ठेवला त्यात आणखी १५ भाग वाट बघा कारण त्या भागात तुम्हाला तुमच उत्तर मिळेल तेव्हा तुम्हाला समजेल की मी कुठलीच गोष्ट विनाकारन लिहीत नाही. त्यामागे काही कारण आहेत पण ते मी आता सांगू शकत नाही. ते समजायला तुम्हाला कथा वाचाविच लागेल. स्वराला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कदाचित हाच भाग पुढे फार महत्त्वाचा ठरणार आहे.)