Bhagy Dile tu Mala - 56 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ५६

खुदसेही छुपा रही हु
दिलं-ए- जजबात
जवाब वो मांग रहा है
मैं किसीं और मे धुंड रही हु

एखाद्या व्यक्तीवर असलेलं प्रेम कमी होऊ शकत का..?

कदाचित नाही... हा पण एखाद्या व्यक्ती वर्तमानात सोबत नसेल आणि अचानक तो येईल तेव्हा त्या प्रेमाला व्यक्त कस करायच हे पटकन समजत नाही. त्या काळात बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात, त्या जुळायला काही वेळ लागतो म्हणून तस होत. स्वरासोबतसुद्धा काहीसं असच सुरू होत. एक वेळ होती की ती त्याने प्रेम व्यक्त करावं म्हणून वाट बघत होती तर आता त्याने सरळ लग्नाचं विचारल असतानाही तिला, त्याला नक्की काय उत्तर देऊ कळत नव्हतं. त्या रात्री त्यांच्या बऱ्याच गप्पा चालल्या आणि स्वरा पुन्हा स्वयमच्या आईकडे येऊन झोपी गेली.

दुसरा दिवस....


सकाळचे १० वाजले होते जेव्हा स्वराच्या मोबाइलवर मॅसेज आला आणि तिचे डोळे उघडले. तिने उठून मोबाइलवर मॅसेज बघितला तर तो माधुरीचा होता. स्वराने तिला हसतच " गुड मॉर्निंग" विश केलं आणि बेडवरच बसली. तेवढ्यात स्वयमच्या आई मध्ये येत म्हणाल्या," गुड मॉर्निंग बेटा. इतने जलदी क्यू उठ गयी? आज सो जाती आराम से. रोज तो ऑफिस के लिये उठती ही होगी."

स्वरा हसतच उत्तरली," गुड मॉर्निंग आंटी. मै तो सोनेही वाली थि पर दोस्त का मॅसेज आया और आंखे खुल गयी. अब नही आने वाली निंद. वैसे भी हो गयी पुरी."

स्वराच्या चेहऱ्यावर फ्रेशनेस जाणवत होती आणि आई म्हणाल्या," कोई बात नही. चलो जलदीसे फ्रेश हो जाओ. स्वयमको थोडा काम है इसलीये वो ऑफिस जा रहा है. सो दोनो मिलकर कॉफी पी लो बाद मे हम गप्पे मारते बैठेंगे."

त्याच्या आई तिच्याकडे हसून बघत होत्या तर स्वराला अचानक काय झालं माहिती नाही. ती उठली आणि धावत स्वयमच्या रूममध्ये गेली. तो आपली तयारी करत होता आणि ती त्याला मोठ्या आवाजात म्हणाली," स्वयम प्लिज १५ मिनिट रुक जाणा. मैं जलदी से फ्रेश होंकर नीचे आती हु. मुझे जाते वक्त कॉलेज छोड देना. प्लिज जाना मत वरणा फिरसे टॅक्सी पकडणी पडेगी."

स्वयम समोर काही बोलणार त्याआधीच स्वरा त्याच्या रूम मधून पसार झाली. स्वयम तिच्यावर क्षणभर हसला आणि पुन्हा आपली तयारी करण्यात व्यस्त झाला.

स्वरा जाऊन जवळपास २० मिनिट झाली होती तरीही ती आली नाही तर इकडे स्वयमला ऑफिसला जायला उशीर होत होता. त्याला ऑफिसमधून फोनवर फोन येत होते आणि तो नाईलाईने बाहेर जाऊ लागला. तेव्हाच स्वरा त्याला जॉईन होत म्हणाली," सॉरी सॉरी! थोडी देर हो गयी. " स्वयम तिला बघून क्षणभर हसला आणि दोघेही बाहेर जाऊ लागले.

ते निघालेच होते की स्वयमच्या आई ओरडत म्हणाल्या," कॉफी, नाश्ता तो करके जाते तुम लोग. दिन भर क्या ऐसेही भुखे रहोगे ??"

त्यांच्या आवाजाने दोघेही मागे वळून बघत तिला म्हणाले," माँ देर हो रही है. बाहर कर लेंगे."

दोघेही एकाच वेळी बोलून गेल्याने क्षणभर दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होत तर आई त्यांच्याकडे तशीच बघत राहिली. स्वराला तेव्हा काय सुचल माहिती नाही. ती पटकन धावत आली, तिने त्याच्या आईच्या गालावर किस्सी केली आणि पुन्हा बाहेर पळाली. स्वयमची आई तिला अस बघून खूपच खुश झाली तर स्वरा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत समोर जाऊ लागली.

स्वयमने कार सुरू केली. स्वरा नेहमीप्रमाणे बाहेरच वातावरण बघण्यात व्यस्त होती तर स्वयम कुणाशी तरी कॉल वर बोलत होता. अगदी दहा- पंधरा मिनिटांचा कालावधी निघून गेला होता. त्याचा कॉल झाला आणि स्वयम तिला हळूच म्हणाला," स्वरा मुझे लगा तुम इतनी जलदी तयार नही हो पाओगी. लडकीयो को तैयार होने मे देर लगती है ना इसलीये मैं छोड कर जा रहा था."

त्याचे शब्द ऐकून स्वराच्या चेहऱ्यावर निरागस हसू पसरल आणि ती हळूच गालातल्या गालात मिश्किल हसत म्हणाली," स्वयम पेहले की बात कुछ थि और अब.... पेहले जैसी होती तो एक घंटा इंतजार करणा पडता पर अब नही. सजने सवरने को कुछ बचाही नही. पर सच बोलू येही मस्त है. सिधे बाथरूमसे बाहर आओ कपडे पेहणे करो उपर से कंगी करलो और मॅगी के जैसे तयारी दो मिनिट मे ओके.."

स्वरा हसत- हसत बोलून गेली तर स्वयम तिच्याकडे रागाने बघू लागला. तिला ते कळताच आपल्या कानाला हात लावत म्हणाली," सॉरी सॉरी! आदत हो गयी है."

स्वराच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव बघून स्वयमचा राग क्षणातच गायब झाला आणि तो म्हणाला," आज कॉलेज जा रही हो कुछ खास बात??"

स्वरा हसतच उत्तरली," खास वगैरे कुछ नही. बस ऐसें ही मन किया तो सोचा के चलते है. वैसे भी दिल्ली आने के बाद कॉलेज नही आये तो क्या मजा? तुम तो घर पर थे नही और माँ काम करणे देती नही तो आ गयी कॉलेज की सैर करणे."

स्वयमने तिला पुन्हा प्रतिप्रश्न केला," सॉरी स्वरा, लेकिन एक बात बताओ, जीस कॉलेज मे तुम्हारे साथ इतना बडा हादसा हुआ ऊस कॉलेज मे जाणेसे तूम्हे डर नही लगता?"

स्वरा त्याच्याकडे बघून गोड हसली आणि पुढच्याच क्षणी म्हणाली," स्वयम पिछे बहोतसी बाते छुट गयी है. कुछ यादगार तो कुछ अनचाही. वो याद आती है तो बस हलकी सी मुस्कान आ जाती है. शायद मैने वो सच्चाई स्वीकार कर ली है इसलीये अभि ज्यादा तकलीफ होती नही. ये चेहरा दुनिया का सबसे बडा सच है जो कभी बदल नही सकता. फिर क्यू उसे मिटाया जाये या उससे डरा जाये. वैसे भी स्वयम वक्त के साथ आदमी सब कुछ सिख लेता है. मैने भी सिखा है डर से प्यार करणा. शायद राज मेरे सामने आ जाये तो मै उसे हसकर बात कर लु. बस इतनीसी जिंदगी है. क्यू लोगो से बैर करणा. कल चली जाऊंगी तो ना ये चेहरा याद होगा ना स्वरा की कहाणी. तुम ही बताओ अब क्या डर के वजह से जिना छोड दु??"

तीच उत्तर ऐकून स्वयम थोडा शांत झाला होता. ते काय तिचे शब्द आणि काय ती जगण्याची कहाणी. कहाणी जरी जुनी असली तरी ७ वर्षांनी ती त्याच्यासमोर येत होती आणि तो तिचा प्रत्येक शब्द ऐकून निशब्द झाला. काही वेळ तशीच शांतता पसरली आणि स्वयमने पुढच्याच क्षणी गाडी थांबवली. तिला लक्षात आलं की कॉलेजच गेट अगदीच समोर आहे. तिने गाडीचे हळूच दार उघडले आणि बाहेर पाहू लागली. तेव्हाच स्वयम म्हणाला," स्वरा मै २ घंटे मे लौट आ जाऊंगा. सो वेट करणा मेरा और याद से नाश्ता कर लेना.अभि मुझे देर हो रही है सो चलता हु मै बाय. याद रखना मै आ रहा हु घर अकेले मत जाना."

स्वराने त्याला बाय म्हटले आणि स्वयम पटकन पसार झाला. आता ती गेटच्या समोर उभी होती आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू परतल . ती गेटकडे बघतच होती की तिला एक वाक्य आठवलं " गेट के इस तरफ जिंदगी को हम नचाते है और गेट के ऊस तरफ जिंदगी हमे नचाती है." वाक्य आठवलं आणि तेच हसून आणखीच प्रखरतेने चेहऱ्यावर पसरल.

अगदी सिम्पल वाक्य होत ते पण आयुष्याच वास्तव त्यात मांडल होत. ते वाक्य आठवताच तिने मागे वळून बघितले. तिला सहज आठवलं की काही वर्षांआधी आपण त्याच जागी रडत बसलो होतो. आपण ओरडत होतो आणि लोक आपल्याला बघत होते. कितीतरी लोक आपल्याबद्दल काळजीचे शब्द बोलत होते पण ते त्या दिवसा पुरतच कारण त्यानंतर तिच्या त्याच चेहऱ्यावर लोकांनी टीकास्त्र सोडले. स्वरा समोर बघत होती आणि तिला क्षणभर जाणवलं की ती जुनी स्वरा अजूनही तिथे एकटीच ओरडत आहे. " मला वाचवा वाचवा ओरडत आहे " पण कुणीच तिला हात लावायची देखील हिम्मत करत नाहीये. स्वराला दिवसाला सुद्धा त्या स्वराचा भास होत होता आणि स्वरा मनातल्या मनात म्हणाली," स्वरा उठ स्वतःच. तुला इथे कुणीच समजून घेणार नाही. इथे लोक फक्त तमाशा बघायला आले आहेत. त्यांच्या बोलण्याच कारण बनू नकोस. बघ लोक कसे बोलत आहेत तुझ्याबद्दल. तू इतकी कमजोर केव्हा झालीस. फक्त चेहराच जळाला आहे ना हिम्मत तर नाही उतही तेव्हा उठ आणि जा स्वतःचा रस्ता स्वता शोध. तुला दुसऱ्या कुणाची गरज नाही. तू एकटीच ह्या जगाला हरवू शकतेस. तुला इथल्या कुठल्याच व्यक्तीच्या दयेची गरज नाही. उठ स्वरा आणि आधी चेहरा लपविन बंद कर. हाच चेहरा तुझं जीवन आहे मग त्याला लवपुन काय मिळणार आहे. त्या चेहऱ्याला स्वीकार आणि संघर्ष सुरू कर. आता हेच तुझं जीवन आहे. विसरू नकोस. "

स्वरा मनातल्या मनात बोलत होती आणि तिला भास झाला की समोरच्या स्वराने चेहऱ्यावरून हात काढला. समोरच्या स्वराचा चेहरा खूपच जास्त भाजला होता पण ह्या स्वराला हसताना बघून तिला स्वतःला ओरडावस वाटत नव्हतं. समोरच्या स्वरानेही चेहऱ्यावर हसू आणलं आणि लोकांसमोरूनच गर्दीतून वाट काढत ती गायब झाली. ती निघाली होती पुन्हा एकदा इतिहास लिहायला.

एक आग बन गयी हु
मुझको ना फिर सुलझाना
जल जाओगे मेरे साथ
साहब मुझे खिलोणा मत समझना

स्वरा आता स्वतःच स्वतःवर हसत होती आणि पुन्हा एकदा कॉलेजच्या दिशेने वळाली. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा कुठेही लवलेश नव्हता आणि तोच विश्वास ठेवून तिने गेटच्या आतमध्ये पाऊल टाकले. स्वराने जसे पाऊल आत टाकले तिला जाणवू लागल की कॉलेजचे विद्यार्थी तिच्याकडेच बघत होते. स्वरा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून क्षणभर हसलीच कारण जेव्हा ती चांगली दिसायची तेव्हाही लोक तिच्याकडे असच बघत होते तर आज चेहरा विद्रुप झाल्यावरही तिच्याकडे पाहणाऱ्याची कमी नव्हती. स्वरा क्षणभर स्वतालाच म्हणाली," वा स्वरा! तुझी फॅन फॉलोविंग तर अजूनही कमी झाली नाहीये. खूप फेमस आहेस तू. अशीच राहिलीस तर आयुष्यात काहिच कमी राहणार नाही तुझ्या. अशीच मेहनत करत रहा."

स्वरा स्वतःवरच हसली आणि एक एक पाऊल टाकत समोर जाऊ लागली. स्वराकडून शिकाव नाकारात्म गोष्टीतून सकारात्मक गोष्ट कशी घ्यायची. तीला खर तर आता चहाची गरज होती म्हणून सुरुवातीने तिने कॅन्टीन गाठले. ऑर्डर देऊन ती खुर्चीवर बसली आणि चहा येण्याची वाट बघू लागली. आज स्वरा ह्याच वातावरणात पुन्हा येऊन खुश झाली होती. कारण हेच ते कॉलेज होते जिथे स्वराच्या काही सुंदर आठवणी सुद्धा होत्या. मग त्या कियारा, पूजा सोबत असोत की तिच्या जिवलग स्वयमसोबतच्या असोत. ती त्यांना आठवण करून स्वतःच हसू लागली. आज तिच्या चेहऱ्यावर ते अल्लड हसू कुणीही बघू शकत होत. ती हसतच होती की समोर चहा आला आणि तिने हसन बंद केलं. ती आता शांतपणे चहा घेऊ लागली. चहा घेताना तिची नजर आता इकडे- तिकडे जाऊ लागली आणि तिला जाणवलं की एक मुलगी सतत आपल्याकडे बघत आहे. तिला सुरुवातीला वाटलं की हे भास असावे म्हणून तिने कानाडोळा केला पण जेव्हा जेव्हा तिची नजर त्या मुलीवर जायची तेव्हा ती तिच्याकडेच बघत असल्याचं जाणवत होतं. स्वराला आता ते तीच बघन विचित्र वाटू लागलं होतं त्यामुळे तिने बाजू बदलून चहा घेणे सुरू ठेवले. ती पुढे काही विचार करणार त्याआधीच ती मुलगी तिच्याकडे येताना दिसली. स्वराला नक्की काय सुरू आहे काही कळत नव्हतं आणि ती मुलगी समोर येऊन बसली. स्वरा त्या मुलीकडे एकटक बघत होती तर ती मुलगीही तिला एकटक बघत होती. काही क्षण त्या एकमेकांकडे बघतच होत्या की ती मुलगी स्वराला म्हणाली," ताई तुमचं नाव स्वरा मोहिते ना?"

स्वराला हे ऐकून धक्काच बसला होता कारण स्वरा त्या मुलीला ओळखत नव्हती मग ती स्वराला कशी ओळखते असा स्वराला प्रश्न पडला होता त्यामुळे न राहवता स्वराने विचारले," हो पण तुला कस माहिती?"

आता ती मुलगी सरळ उठली आणि स्वराला मागून मिठी मारत म्हणाली," स्वरा ताई किती इच्छा होती माझी तुला भेटायची! बघ आज पूर्ण झालीच. लव्ह यु स्वरा ताई!!"

स्वराला तीच ते वागणं क्षणभर हसवून गेलं कारण एखाद्या अनोळखी मुलीने तिला अस मिठी मारण अपेक्षित नव्हतं. तरीही स्वरा तिला काहीच म्हणाली नाही. ती मुलगी काहीच क्षणात समोर येऊन बसली आणि गोंधळलेली स्वरा तिला विचारू लागली," माफ कर डियर!! पण मी तुला खरच ओळखलं नाही. तुझं नाव काय आहे आणि तू कस ओळ्खतेस मला??"

ती मुलगी आता हसतच म्हणाली," तू मला बघितलंच नाहीस तर ओळखणार कशी? सो लेट मी इन्ट्रोड्युस. आय एम मृन्मयी. आता ओळखलं?" ती हात पुढे करत म्हणाली…

तिचा हात समोर येताच स्वराला ती कोण आहे समजलं आणि स्वरा हॅन्ड शेक करत म्हणाली," अरुण काकांची मुलगी! हो मो विसरलेच तू इथे शिकतेस ते. छान वाटलं तुला भेटून आणि गोड दिसतेस हा खूप. एकदम काकांची परी."

मृन्मयी हसतच उत्तरली," तू पण खूप गोड दिसते आहेस ताई! अगदी माझे बाबा तुझी स्तुती करतात त्यापेक्षाही जास्त. खूप इच्छा होती ग तुला भेटायची बघ आज पूर्ण झालीच पण ताई तू आज इकडे?"

स्वरा तिच्याकडे बघत उत्तरली," बहुतेक तुझिच भेट नशिबात होती अस समज."

स्वराच बोलणं ऐकून ती क्षणभर हसलीच. त्यांच्यात संवाद सुरूच झाला होता की स्वराने वेटरला बोलावलं आणि दोघांसाठी नाश्ता बोलावून घेतला. काहीच क्षणात नाश्ता समोर आला आणि स्वरा हसत उत्तरली," बर मॅडम! अभ्यास वगैरे कसा सुरू आहे? काही लागलं तर बिनधास्त सांग हा मला. पैसे असोत की मग अभ्यासाची हेल्प मी आहे करायला. ताई ला विसरू नकोस तेव्हा. नाहो तर फक्त स्तुती करायला ताई आणि बाकी मदत लागली तर विचार करत बसशील!!"

मृण्मयी आता हसतच उत्तरली," हो ताई हक्काने आठवण करेन पण मला वाटत त्याची गरज पडणार नाही कधीच."

स्वराही आता हसतच उत्तरली," हा बाबा हुशार आहेस तू!! तुला का गरज पडेल माझी? नको मागू मग हेल्प."

स्वरा हसत होती तर मृन्मयी उदास स्वरात उत्तरली," मला तस नव्हतं म्हणायचं ताई. बहुतेक तुला वाईट वाटलं सॉरी..मला म्हणायचं होत की कुणी तरी आहे जो मला आधीच मदत करतो आहे. इथे आल्यापासून त्याचीच मदत आहे म्हणून सर्व सोपं जातंय."

स्वरा आज गमतीच्या मूडमध्ये होती म्हणून पटकन बोलून गेली," कोण तुझा बॉयफ्रेंड??"

आणि मृन्मयीच उत्तर," माझा नाही तुझा बॉयफ्रेंड. मिस्टर अन्वय इनामदार."

अन्वयच नाव ऐकून ती एकदमच शांत झाली आणि मृन्मयी हसत उत्तरली," आय मीन तुझा फ्रेंड. अन्वय दादा महिन्यातून दोन- तीन वेळा नक्की भेटायला येतात. नको म्हटलं तरी हातात पैसे देतात. बुक्स वगैरे सर्व खरेदी करून देतात शिवाय मला बाहेर खायला नेतात त्यामुळे म्हटलं गरज पडणार नाही. तो असताना कुणाची गरज तोच पडू देणार नाही पण ह्या काही दिवसात एक गोष्ट जाणवली मला. सतत त्यांच्या ओठावर एक नाव असतच. त्या नावाला वेळ नाही की काळ नाही. हवं तेव्हा बाहेर येत."

स्वरा हळूच शब्दात उत्तरली," कुणाच नाव?"

आणि मृन्मयी मोठ्याने उत्तरली," द ग्रेट स्वरा मोहिते! असा एक मिनिट जात नाही की त्यांच्या ओठांवर तुझं नाव नसत. मला ते कायम सांगतात की कधी वाटलं ना की आपण हरत आहोत तर स्वराला आठवायचं, तिची हिम्मत आठवायची, तिचा संघर्ष आठवायचा मग कधीच हरणार नाहीस. ते मला नेहमी सांगतात की स्वरासारखं खूप नाव कमाव. तुला प्रत्येक क्षणी मदत करायला तुझा हा भाऊ आहे. मी ना आधी तुझी फॅन होते पण आता अन्वय दादाची झाले आहे. तुम्ही दोघे माझ्या जीवनाची खरी प्रेरणा आहात. लव्ह यु दि. तो असायला हवा होता आता तिथे मग मज्जा आली असती."

स्वरा क्षणभर तिच्याकडे हसून बघत होती तर मृन्मयी पुन्हा उत्तरली," ए पण काय ग तू आलीस तर दादाला सांगायला नको होतं का? ते पण आले असते ना भेटायला. किती मस्त झालं असत ना आपण सोबत असतो तर?"

खर तर स्वराचीही तिची इच्छा होती पण त्याला फेस करायला ती खूप घाबरत होती म्हणून तीच उत्तर द्यायला स्वरा म्हणाली," अग मी बोलले त्याच्याशी पण तो कामात आहे म्हणून मीच आले. बर झालं ना अटलिस्ट तुझी भेट तर झाली. भेटू ना आपण मिळुन तिघेही कधीतरी पण आता नको."

मृन्मयीने समोर काहीच विचारलं नाही आणि तिने दीर्घ श्वास सोडला. दोघांच्या गप्पा सुरूच होत्या की मृन्मयीला कॉल आला आणि ती कॉल ठेवत म्हणाली," सॉरी ताई क्लासचा वेळ झाला. मला निघावं लागेल पण मी बाबांकडून तुझा नंबर घेऊन तुला कॉल करेल. आठवणीने करेन. मला आठवण ठेव हा कायम. बाय लव्ह यु दि."

ती जाणारच की तेवढ्यात स्वराने तिचा हात पकडला आणि तिच्या हातात काही पैसे दिले. मृन्मयींला पैसे नको होते म्हणून उत्तरली," नको ताई. माझ्याकडे आहेत. खूप आहेत. दादा कमी पडू देत नाही पैशाची."

स्वरा आता हसतच उत्तरली," वेडाबाई प्रेम आहे माझं. प्रेमाला नाही म्हणू नकोस. प्लिज!!"

मृन्मयी तिला बघतच होती. स्वरा थोडी भावनिक झाल्यासारखी जाणवत होती म्हणून तिने पैसे घेतले. स्वराला घट्ट मिठी मारली आणि तिच्या गालावर किस करून पळत म्हणाली," आज घेतेय पण मला जॉब लागल्यावर तुम्हाला माझ्यासोबत फिरायला यावं लागेल. मी नेईन तिथे. मग नाही म्हणालीस ना तर मी बोलणारच नाही. "

ती बोलत- बोलत पसार झाली तर स्वरा क्षणभर तिच्याकडे बघून हसत राहिली. ती गेली आणि आता स्वराही बिल पे करून बाहेर पडली.

ती एकदा पुन्हा कॉलेजच्या आवारात पोहोचली आणि तीच लक्ष कॅम्पसवर जाऊ लागलं. काय बदललं होत त्यात. फार काही नाही. सेम तसच होत. त्याच त्या बिल्डिंग आणि तेच सर्व ते. तेच अभ्यासासाठी धावपळ करणारे मूल आणि तीच मज्जा मस्ती. स्वराला ते सर्व बघून पूजा सोबत घालवलेले क्षण आठवू लागले आणि नकळत तिच्या गालावर हास्याची कळी खुलली. ती ते सर्व नजारे बघत समोर चालली होती. तीच कुणाकडे लक्ष नव्हत तेव्हाच तिला कुणीतरी आवाज देत असताना जाणवलं. स्वराला इथे आणखी कोण ओळखत नाही म्हणून ती भास झाला अस समजून चालू लागली. ती समोर समोर चालतच होती की तिच्या खांद्यावर कुणाचा तरी हात येऊन पडला आणि ती क्षणभर घाबरली. तिला मागे वळून बघायलाही भीती वाटत होती पण ती वळाली आणि क्षणात तिची भीती नाहीशी झाली. त्याला बघताच स्वरा उत्तरली," सौरभ सर आप? "

सौरभ श्वास घेत म्हणाला," हा मैं. कितने देर से तूम्हे आवाज दे राहा हु पण तुम सूनती ही नही हो. पेहले लगा की तुम नही हो पर बाद मे ध्यान से देखा तो तुमही थि. इसलीये दौडते- भागते आ गया. मेरी माँ अब हम बुढे हो रहे है इसलीये ज्यादा चलना नही होता. थोडा धीरे धीरे चला करो."

स्वरा सौरभ सरांच्या बोलण्यावर हसत होती आणि तो तिला बघून म्हणाला," हा हस लो और क्या? चलो वो छोडो पर ये बताओ की आज यहा का रस्ता कैसे भूल गयी?"

स्वरा आणि ते दोघेही आता समोर चालू लागले. स्वरा पुढच्याच क्षणी उत्तरली," सर यहा काम से आयी थि तो सोचा क्यू ना कॉलेज की सैर कर लु. खयाल आतेही मै यहा. कुछ यादे ताजा हो गयी."

सौरभ हसतच उत्तरला," अच्छा किया! वैसे मै इतना दौडकर ऐसें ही नही आया हु. मुझे तुम्हे किसीं का मॅसेज देणे का काम सोपा गया है.!!"

स्वरा विचित्र नजरेने बघत म्हणाली," मॅसेज और मुझे? किसका?"

सौरभ हसतच उत्तरला," मेरे लफंगे दोस्तो का. ऊन लोगोने कहा था की अगर तुम मिल जाओ तो ये पैगाम देना."

सौरभ सर नक्की काय बोलत आहेत तिलाच कळत नव्हतं. तो हसत म्हणाला," सबने तूम्हे थॅंक्यु केहणे को कहा है. अन्वय जबसे मुंबईसे लौटा है ना बहोत बदल गया है. पेहले वो ऐसें बिलकुल नही था. पर अब सबसे मिलणे लगा है, बात करणे लगा है. वो हमेशा केहता है की रिशतो की कदर करणा तुमने उसे सिखाया है. ये अन्वयना सबसे अलग है. जो हमे कभी पता नही था इसलीये थॅंक्यु उसे हमसे मिलाने के लिये."

पुन्हा एकदा अन्वयच नाव अचानक तिच्यासमोर आलं आणि तिची बोलती बंद झाली. सौरभ पुन्हा म्हणाला," किसीं दिन ऊन सबसे मिलने जरूर आणा. फिलहाल मेरी क्लास है सो मै चलता हु और सच मे थॅंक्यु हमे ऊस अन्वयसे मिलाने के लिये. हमारी मंडली आपका शुक्रगुजार करती है."

सौरभ तिच्याकडे हसत पटापट निघू गेला तर स्वरा क्षणभर अन्वयच्या नावात हरवली. ती त्याच्या आयुष्यात प्रत्यक्षात नव्हती पण तरीही त्याच्या शब्दात ती कायमच असते हे ऐकून तिला खूप आनंद झाला होता. अन्वयच नाव येताच अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा आलं आणि ती समोर जाऊ लागली.

आज ती जुन्या सर्व शिक्षकांना भेटली होती. स्वरा ज्या ज्या लोकांना कॉलेजमध्ये भेटत होती त्या सर्वांमध्यें अन्वयच नाव यायचं आणि नकळत स्वराच्या चेहऱ्यावर हसू परतायचं. काय होत एकट्या अन्वयच्या नावात माहिती नाही पण कितीतरी दिवसाने तिच्या मनाला शांती मिळाली होती. ती कॉलेजमध्ये फिरत होती आणि तिला सतत अन्वयचे भास होत होते. ती त्याला कधी विसरली तर नव्हतीच पण आज तो नव्याने तिच्यासमोर आला होता. क्षणभर तीच मन तिलाच विचारू लागलं," काय आहात अन्वय सर तुम्ही? जी तुम्हाला मिळू शकत नाही हे माहिती असतानाही तिच्याबद्दल कायम आदरच करता. तिच्याबद्दल एक अपशब्द नाही. कुठून आणता एवढं मोठं मन आणि साहस?? "

ती स्वतःच स्वतःला प्रश्न विचारत होती आणि नकळत एका डोहात फसली. दिल्लीने पुन्हा एकदा तिला बुचकाळ्यात पाडल. तिचे दोन्ही जिवलग इथलेच. एकीकडे होती स्वयमने तिला लग्नासाठी घातलेली मागणी तर दुसरीकडे अन्वयच व्यक्त न होताही दिसणार अमर्यादित प्रेम. तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा तो अन्वय खास होता की तिला जगापासून वाचवायला तयार असलेला आणि तिला असेल तशा स्थितीत आपलंसं करू पाहणारा स्वयम. एक डोह आणि त्यातून निघण्याचा मार्ग नाही. काय असणार होत स्वराच उत्तर...

मांगा था दुवाओ मे
जो प्यार तुणे दे दिया
पर सोचती हु इस पल मेरे खुदा तुने
इतना प्यार क्यू भेज दिया??

क्रमशा....