Jijabai is a strong personality books and stories free download online pdf in Marathi

जिजाबाई एक बाणेदार व्यक्तीमत्व

जिजाबाई एक बाणेदार व्यक्तीमत्व

आज सगळं जगच शिवरायाच्या पराक्रमाचा अभ्यास करत आहे. कोणी शिवरायांसारखा व्यक्ती कधी झालाच नाही असे मानतात नव्हे तर जय भवानी जय शिवाजी म्हणत शिवसेनाही शिवरायांचा गौरव करते. अशा या शिवरायांना घडवलं कोणी?ते घडवलं शिवाजीची माता जीजाबाईंनी.
जीजामाईचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा इथे १२/०१/२०१८ ला झाला. तिला चार भाऊ अनुक्रमे दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादूजी. ज्यावेळी जीजाऊने खेळणी हातात पकडायची होती. त्यावेळी जीजाभच्या हातात लखुजींनी तलवार देवून युद्धनीतीचे डावपेच शिकवले. बालविवाह प्रथा अस्तीत्वात असल्याने वयाच्या सातव्या वर्षांत म्हणजे डिसेंबर १६०५ ला जीजाऊचा विवाह शहाजीशी झाला. पहिला पुत्र संभाजी त्यानंतर एक एक करीत जीजाऊला आठ मुलं झाली. (सहा मुली आणि दोन मुलं.) संभाजी चांगला साहित्यीक होता. त्यांचे मन लढाईत रमले नाही. तरीही जीजाऊच्याच प्रेरणेने तेही युद्धकला शिकले होते. जेव्हा २५जुलै १६४८ ला मुस्तफा खानाने फितुरीने जीजा या गावी शहाजीने कैद केले. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विजापुरतर्फे लढत असतांना १६५५ मध्ये संभाजी युद्धात मरण पावला. पुढे रपेट करीत असतांना घोड्यावरुन पडून घायाळ झाल्यानंतर शहीजीदेखील २३ जाने १६६४ ला मरण पावले.
महत्वाचं म्हणजे युद्धप्रसंगी शहाजी बाहेर बाहेर असतांना याच मा जीजाऊने शिवरायांना सांभाळले. त्यांचे संगोपनही केले. विशेषतः स्रीयांना युद्धात परवानगी नसल्याने शिवरायांनी घडवीत असतांना त्यांच्यात लखुजींनी शिकविलेल्या गुणांचा व युद्धकौशल्याचा वापर करुन महत्वाकांक्षा भरली. त्यांना राम क्रिष्ण यांच्या युद्धकौशल्यनीत्या शिकविल्या. रामायण महाभारत यातील व्यक्तीमत्वाचा अभ्यास त्यांच्याकडून पाठ करुन घेतला. तसेच जनाबाई, मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर शिकवला. तुकाराम समर्थ रामदासही. या सर्वांच्या चरित्रातून प्रेरणा घेवून शिवरायांनी स्वतःच मित्र बनवले. लहानपणापासून डोंगरं फिरणे, किल्ले फिरणे, आडवाटा शोधणे, घोड्यावर बसून फिरणे, नव्हे तर जीवाला जीव देणारे मित्र मिळवणे. ती मैत्री टिकवणे या सा-या गोष्टी बालवयातच शिवाजींनी हस्तगत केल्या. सांबरे पाटलाकडून घेतलेल्या जागेवर पुढे १६३९ ते १६४७ च्या काळात पुण्यात लालमहाल बांधून त्याच ठिकाणी सुरक्षीत ठिकाण मानून जीजाऊला ठेवल्यानंतर जीजाऊंनी त्याच काळात शिवरायांना घडवलं. स्वराज्यस्थापनेसाठी जीजाऊंनी स्वतःचा पोरगा दावनीला लावला.
आज शिवराय हवा आहे. पण आपल्या घरात नाही तर दुस-यांच्या घरात. स्वतःच्या पोराला साधं खरचटलेलंही आपल्याला बघवत नाही. तो मुलगाही मी माझी पत्नी आणि माझी मुले यातच गुरफटून राहतो. पण शिवाजी घडवीत नाही. माय तर नाहीच नाही. आईबाप फक्त शिकवितात. नोकरीसाठी. नोकरीचे आमीष दाखवतात मुलांना. मग मुलेही नोकरीसाठी शिकतात. मग जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा आत्महत्या करतात.
आज आम्हाला शिवाजीची वेशभूषा करणारा शिवाजी हवा नाही, तर नाही वेशभूषा केली तरी चालेल. पण शिवाजी महाराजांसारखे गुण असायला हवे आहेत. तसा मुलगा हवा आहे आम्हाला. आम्ही वेषभुषेलाच महत्व देतो शिवरायांच्या. प्रत्यक्षात गुणाला महत्व देत नाही. जर एखाद्यानं म्हटलं की देशावर शत्रूनं चढाई केली. आपल्या मुलाला युद्धावर पाठव. तर कोणीही आपल्या मुलाला युद्धावर पाठवणार नाही. कारण आम्हाला आज आमचा पुत्र प्रिय आहे. मात्र जीजामातेनं तसं केलं नाही. तिनं आपला मुलगा दावणीला लावला. त्याला स्वराज्यासाठी तयार केलं. ती होती म्हणून स्वराज्य घडलं. कारण तिनं मरणालाही घाबरु नये हेच शिवरायांना सांगीतलं होतं. म्हणूनच आज शिवरायांचा आपल्याला अभिमान आहे. त्यामुळंच आपण आपल्या मुलाची वेषभुषा शिवाजी महाराजासारखी करुन घेतो. तसाच अभिमान जीजावूबद्दलही मनात बाळगावा. ती होती म्हणून स्वराज्याची व्याख्या आपल्याला समजली. तिनं जरी शिवरायांना औरंगजेब, आदिलशाही व निजामशाहीशी दोन दोन हात करायला लावले असले तरी त्याच गोष्टीपासून बोध घेवून आपण अनेक औरंगजेबाच्या अत्याचारी वहीवाटींना तोंड देवू शकलो व त्याचाच फायदा आपल्याला इंग्रजांची गुलामगिरी धुडकावून लावण्यात झाला. ती जर त्या काळात झाली नसती तर आजही आपण इंग्रजांचेच गुलाम असतो.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०