School... For everyone who went to school... books and stories free download online pdf in Marathi

शाळा... शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी...



नववी चं शेवटचं पान...


शेताडी च्या रस्त्याने चालत जाताना मला खूप भरून आलं होतं कारण त्या दिवशी सगळचं संपल होतं. आता शाळेत ती मजा येणार नव्हती, कारण चित्रे कदाचित बांद्रा ला जाणार होता, फवड्या ची तर शाळा च सुटली होती, म्हात्रे तर नववी तच राहिला. आता शाळा आपली राहिलीच नव्हती कारण वर्ग बदलला म्हणून आता खिडकीतून बाहेर मैदान दिसणार नव्हतं. मांजरेकर सर सारखे शिक्षक नव्हते, माझे मित्र मला दिसणार नव्हते आणि दिसणार नव्हती ती शिरोडकर....
घरी आल्यावर आईसाहेब लगबगीनं माझ्या रिझल्ट बद्दल विचारू लागल्या. त्यांच्या आशेवर मी अर्थात पाणी फेरलं नव्हतं. पाचवा नंबर पाहून आईसाहेबांनी माझं तोंड गोड केलं. कधी नाही तर अंबाबाई ने देखील माझं कौतुक केलं पण बोलता बोलता बोलून च गेली ज्या विषयाचे क्लास लावले त्यात तर एवढे चांगले मार्क्स नाही आलेत. तिथे त्यावर मी तिच्याशी काही वाद घातला नाही.पण एकूण सर्वजण खुश च होते. बाबा आल्यावर त्यांना देखील रिझल्ट पाहून आनंद झाला. त्यानी पार्टी म्हणून आम्हा सगळ्यांना आइस क्रीम खायला पैसे दिले. मी दाखवण्या साठी सर्वा सोबत हसत खेळत होतो पण मलाच माहीत होत की आतून माझ्या मनाला किती वेदना होत आहेत. त्याच कारण शिरोडकर होती की माझे मित्र होते माहिती नाही पण सगळ चांगल चाललेलं असून काहीतरी भकास पणा ची जाणिव होत होती. मला माहित होतं की हे सुध्दा काही काळापुरती ची भावना आहे. नंतर मला याची सवय झाली की सगळ बर होईल. मी माझ्या मनाला हेच सांगत राहिलो. पण आता दहावीच्या नवीन वर्गात जाण्याचं धाडस होत नव्हतं. तरी शाळा चालू व्हायला अजून एक महिना अवकाश होता.
त्या दिवशी सकाळी रविवारी जरा मला लवकरच जाग आली. अंबाबाई च्या कॉलेज ला सुट्ट्या च लागल्या होत्या तर ती अस ही खूप उशिराच उठायची.आईसाहेब अर्थातच उठल्या होत्या. कारण त्यांना काही आमच्या सारखी सुट्टी नाही. आई लोकांना रविवार काय, उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी काय सर्व दिवस सारखेच.
मी उठून अंथरूण घेऊन असाच डोळे बंद करून होतो. माझ्या मनात खूप सारे विचार चालू होते. आता पुढे काय करायचे. दहावीला थोड सिरीयस व्हायला हवं. मनातून वाटत होत की बरच आहे जे झालं ते कोणी म्हटल य ना,
"मन का हो तो अच्छा,न हो तो और भी अच्छा।"
" बरं आहे ना , जे झालं ते चांगल्या साठीच होतं. माझे सर्व मित्र किंवा शिरोडकर मुळे माझं लक्ष अभ्यासात लागलच नसत. देवाला कदाचित मला आठवण करून द्यायची असेल की आता अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणूनच अशा गोष्टी झाल्या." मी मनाशीच म्हणालो. अर्थात हे मी स्वतः च्या च मनाला समजून सांगण्या चा प्रयत्न करीत होतो. कदाचित असं बोलल्याने माझं दुःख कमी होईल आणि नरू मामा बोलतो तसं एकदम फाsssईन होईन. विचार करता करता अचानक आठवलं आता नरू मामाच लग्न झालंय आता तो ही जास्त इथे येणार नाही. म्हणजे मग मला दोस्त बोलायला कोणीच राहील नाही. हे विचार करता करता माझे डोळे भरून आले. पण मी स्वतः ल सावरलं. नाही आता नाही रडायचं आता पूर्ण फोकस दहावी वर.
अचानक बाहेरून आईसाहेबांचा थोडा घाबरट आवाज आला. " अहो हे काय बोलतात तुम्ही, आता कसं शक्य आहे" त्या म्हणाल्या.
" थोडं हळू बोला मुलं उठतील." बाबा थोड्या दबक्या च आवाजात म्हणाले.
पण मी जागा असल्याने मला त्याचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. बाबांच्या ऑफिस बद्दल काही चर्चा चालू होती. विषय थोडा गंभीर होता हे मला त्यांच्या बोलण्यावरून कळलं. एवढ्यात मला लक्षात आलं काही दिवसांपासून बाबा थोडे टेन्शन मधे दिसत होते. मला आधी वाटल की असेल काहीतरी मोठ्या लोकांचं. टेन्शन घेण्यात आईसाहेब एक नंबर. त्यांना तर खूप लहान लहान गोष्टीचं टेन्शन येतं. माझी दहावी कशी जाईल, पुढे इंजिनियर मधे कोणत्या कॉलेज घ्यायचं, अंबाबाई च लग्न चला हे तर ठीक आहे पण कहर म्हणजे संध्याकाळी जेवणात काय बनवायचं याचं देखील त्यांना टेन्शन. पण बाबा तसे करत नाही ते त्यांच्या मनात काय आहे ते कधीच चेहऱ्यावर वर दिसून देत नसत. पण काही दिवस त्याचं चेहरा काहीतरी झाल आहे हे सांगत होता. मी आधी त्यावर विचार केला नाही पण या दोघांची गुप्त चर्चा ऐकून डाऊट आला नक्की काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला दिसतो.
मी उठून बाहेरच्या खोलीत गेल्यावर ते अर्थात शांत बसले पण वातावरणात गंभीरता होतीच. ती घालवण्यासाठी बाबां नीच विचारले, " अरे आज लवकर उठलास, आजारी तर नाही ना?"
मला कळलं की त्यांना मला काही माहित करुन द्यायचं नाही म्हणून ते विषय बदलत आहेत. पण मग मी काही न कळल्या सारखं सुम मधे होतो. " आज चित्रे आहे ना आमच्या शाळेतला तो बां द्र्या ला चाललाय कायमचा. त्यालाच भेटायला जायचं आहे घरी. सगळे जण जमणार आहोत, म्हणून उठलो लवकर" मी म्हणालो. बाबांनी ठीक आहे करत मान हलवली.
मी देखील तयार होऊन लगेच चित्र्या च्या घरी निघालो. तिथे सर्व आले होते. सुऱ्या, फावड्या त्यांना पाहून मला एक वेगळाच आनंद झाला. पण काही क्षणा साठी.खरतर हा शेवटचा दिवस होता जेव्हा आम्ही सगळे एकत्र जमलो होतो त्यानंतर माहित नव्हत कधी भेटू की नाही. आम्ही थोडी मस्ती केली पण मग नंतर चित्र्या च्या गाडीचा टाईम झाला होता तो निघून गेला मग आम्ही ही आपापल्या घरी निघालो.
घरी आलो तेव्हा अंबाबाई पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. अभ्यासाचं नाही. तिला तिच्या कोणत्या एका मैत्रिणीने कवितांचं पुस्तक दिलं होतं ते. आईसाहेब जेवण बनवत होत्या. आणि बाबा आजचा पेपर वाचत होते. पण पेपर वाचता वाचता मी आलेला पाहून ते थांबले पेपर बाजूला ठेवला आणि आम्हा तिघांना बोलावलं आईसाहेब गॅस बंद करुन आणि अंबाबाई पुस्तक बंद करून त्यांच्या समोर असलेल्या कॉट वर बसले. अस खूप कमी वेळा झालं आहे की आम्ही सर्व मिळून काही गोष्टीवर चर्चा केली आहे माझ्या शिवाय ही लोक करतात हे मला माहीत होत. कारण त्यांना अजूनही मी लहानच वाटतो. पण आज यांच्या चर्चेत मला देखील सहभागी केल्यामुळे थोड मोठ असल्या सारखी फील आली मग मी लगेच बाबांच्या शेजारच्या खुर्ची वर जाऊन बसलो. बाबा थोडे सिरीयस होते मला वाटलच सकाळच्या च विषयावर बोलायचं असेल. अंबाबाई झोपली होती तिला तर काही माहिती नव्हत याची मला खात्री होती.पण आता माझं लक्ष बाबांच्या बोलण्याकडे होतं.
" मुलांनो, आपल्याला आता ही चाळ हे घर सोडून जावं लागणार." बाबा म्हणाले," पुण्याला."