Letter Sumne in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्र सुमने

Featured Books
  • બેઇન્તેહા : નફરત અને પ્રેમ - 7

        બૉસ તેને આપણે બિઝનેસમાં હરાવી દેશું, પણ તે તેના મનથી કોઈ...

  • પંચાયત - ભાગ 5

    ચૂંટણી અધિકારીની ઓફિસમાં ભારે તણાવ હતો. બહાર સેંકડો લોકો એકઠ...

  • રઘુવંશ - ભાગ 3

    "જેના નામ પરથી આ ધરા 'પૃથ્વી' કહેવાઈ, એ પ્રથમ ચક્રવર...

  • પત્ર

    વહાલા પપ્પા આજે પાંચ વર્ષ પછી તમારી સામે દિલ ખોલીને વાત કરવા...

  • સફળતા?? - 3

    રોહનને અટકાવતા કહ્યું , “હા ! મને ખબર છે  , પણ મારે હવે તારા...

Categories
Share

पत्र सुमने

पत्र सुमने प्रिय सोना..सोशल मिडिया आणि तू आपल्या तरुणपणी सोशल मिडिया प्रकार नव्हताच वर्तमानपत्र रेडिओ इतकेच माध्यम खुप नंतर टीव्ही आला जेव्हा स्मार्ट फोन आले तेव्हा आपण त्याचे सर्व फिचर त्याचा वापर हे दोघांनी एका इंटरनेट कॅफे मधून शिकून घेतले होते आपण स्वतः ही त्यात बरीच सुधारणा केली होती या शिक्षणात त्या वेळेस आपल्या वयाच्या लोकांच्या आपण किती तरी पुढे होतोलोकांना आपल्याला सगळे येते याचे नवल वाटायचे तुझे आणि सोशल मिडिया चे तसे फारसे सख्य मात्र जमले नव्हते त्यापूर्वी माझ्या मैत्रिणी माझे नोकरीतले सहकारी निवडक मित्र फेसबुक वरील मित्र माझे कवितावाचन ग्रुप मधील मित्र यांच्या विषयी मी तुला कायम सगळ सांगायचे तुझ्या पासून काही लपवावे असे कधी काहीच मी केले नाही या सर्व लोकामधे प्रत्यक्ष भेट झाली असता तू इतका सहज मिसळायचा की माझ्या पेक्षा तुझंच इम्प्रेशन तिथे जास्त असे जो तो तुला डॉक्टर डॉक्टर म्हणत तुझ्याच मागे असे तुझ्या निर्मळ स्वभावाची प्रत्येकाला भुरळ पडत असे फेसबुक वरील माझ्या मित्र मैत्रिणी सोबत अनेक गावी अनेक गेट टुगेदर मधे तू आनंदाने सामील झाला होतास सोशल मीडिया चे तुला फारसे आकर्षणे नसले तरी तुला मी फेसबुक खाते काढून दिले होते मात्र ते फेसबुक खाते नावाला होतेतू फार रमला नाहीस आणि devlop पण केले नाहीस तुझ्या वॉट्स अप वर पण दोन चार लोक असायचे त्यांना गुड मॉर्निंग टाकले की झाले कधीतरी सणाला आणखी दोन चार शुभेच्छा येत आम्हाला तुमच्या सारख्या दिवसभर टिकल्या लावायला लागत नाहीत रोजचे चार मेसेज टाकले झालं.. की झाले माझे मोबाईल स्क्रोल करणे मेसेज करणे चाट करणे याला तू टिकल्या लावणे म्हणायचासमाझे वॉट्स अप वर मित्र मैत्रिणीशी चाट पण चालायचे कधी कधी तू चाट तर कधीच कुणाशी करायचा नाहीस माझे छंद .. गायन,कविता ,लिखाण ,स्वयंपाक या आवडी मुळे फेसबुक व यू ट्यूब वर माझी खाती पण होती माझ्या स्वतःच्या स्वयंपाक चॅनेल साठी काही पदार्थ करून देण्यात अथवा सजावटी सुचवण्यात तू नेहेमी मदत करायचा त्यासाठी लागणारी काही क्रोकरी मी घेतली तर तुझी ना नसायची उलट प्रोत्साहन असायचे माझी सोशल मिडिया अकाऊंट मी कायम अप डेट ठेवत असे त्यात तुझी कधीच आडकाठी नसायची माझे मित्र कोण ..आम्ही काय चाट करतो ...किंवा सोशल मीडिया वर मी काय करते किंवा नोकरीत माझे मित्र कोण आहेत मी त्यांच्या सोबत काय बोलते कुठे जाते याविषयी कधीच कुठलेच प्रश्न तू मला कधीच केला नाहीस कारण माझ्या मर्यादा मी ओळखून आहे हे तुला चांगलेच ठाऊक होते माझ्या फोन चा पासवर्ड माहीत असून सुद्धा तू कधी माझ्या फोन ला हात लावायचा नाहीसकधी कोणाचा फोन आला मी आत असेन जरा बघा फोन कोणाचा बघा की असे म्हणले की तू लांबून बघून ते सांगायचा आपण दोघांनी कधी एकमेकांच्या फोन ला अथवा पर्स पाकिटाला हात लावला नाही सोशल मिडिया पेक्षा तुझा इंटरेस्ट पेपर संपूर्ण वाचणे,राजकारण, क्रिकेट,हवामान, अंतर राष्ट्रीय राजकारण यात जास्त असे मोबाईल वर राजकारण पोडा कास्ट बघणे त्याविषयी माझ्या सोबत चर्चा करणे हे तुला आवडे यू ट्यूब चा उपयोग फारतर जुनी गाणी ऐकणे इतकाच सकाळचा नाश्ता कॉफी झाली की तू पेपर वाचायला आपल्या दारातल्या छोट्या बाल्कनीत बसायचा मग मी तुला सांगून वरच्या खोलीत स्टार मेकर वर गाणी गायला निघायचे आज काय गाना बजाना का असे तू कौतुकाने म्हणायचा स्वतः सोशल मीडिया जास्त वापरत नसला तरी माझी you ट्यूब चॅनल,स्वयंपाकाचे ग्रुप, कवितांची आवड आणि ग्रुप सगळ्याचे तुला मनोमन कौतुक असे मी कोणतीही कविता लिहिली की आधी तुला वाचून दाखवायचेएखादे गाणे छान जमले की तुला ऐकवायचे तू ऐकून झाले का संपले का असे गमतीने म्हणायचा तेव्हा मला थोडा राग यायचा किती अरसिक हो तुम्ही असे मे म्हणायचे पण मला माहित होतं माझ्या प्रत्येक गोष्टीचे तुला कौतुक होते TV वर वन डे किंवा कसोटी क्रिकेट बघायला तुला खूप आवडत असे मला खरेतर क्रिकेट मधे फार रुची नव्हती पण तुझ्या साठी मी सोबत बसून बघायचे तेव्हा त्यातले खूप बारकावे तू मला सांगायचा कारणं तू सुद्धा एक उत्तम क्रिकेट प्लेअर होतास आणि तुझा अभ्यास सुद्धा जबरदस्त होता नेहेमी नाही पण कधी कधी मॅच असेल तेव्हा घरीच लिमिटेड ड्रिंक. घ्यायला तुला आवडायचे मग त्यासाठी तुला लागणारे पापड शेंगदाणे वगैरे मी तयारी करून देत असे तुझे पिणे ही लिमिटेड पेग असे ते  सुद्धा सात च्या आत संपवायचे आणि मग साधेच जेवायचे असा तुझा नियम तुझे सगळे वागणेच नियमित आणि नियमात बसणारे होते तुझ्या डॉक्टरी व्यवसाय मुळे तू बाहेर कधी मित्रा बरोबर ड्रिंक नाही घ्यायचा तुला ते आवडायचे नाही इमेज खराब होते अशी तुझी धारणा होती कधी कधी वन डे क्रिकेट मॅच बघताना रात्री मी झोपून जात असे तू मात्र पूर्ण मॅच बघायचास तू झोपायला आला की मी काय झाले मॅच चे विचारायची भारताने मॅच जिंकलेली असली की तुला फार आनंद झालेला असायचा कधी कधी मात्र भारताची टीम हरली की आम्ही मॅच बघायला बसलो की भारत खेळत नाही असा त्रागा असायचा दररोज रात्री लागणाऱ्या अंतर राष्ट्रीय बातमी पत्रात मात्र तुला रस होता ते मात्र आपण नेहेमी बघत असू आणि मगच दहा नंतर झोपायला जात असू