Dear Sona..your purchase in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | प्रिय सोना ..तुझी खरेदी

Featured Books
Categories
Share

प्रिय सोना ..तुझी खरेदी

खरेदी कोणतीही असे ती करण्यात तुला अतिशय आनंद वाटत असे कोणत्याही खरेदीत तुझा चॉईस कायम उत्तम असे माझे कपडे, साड्या बूट, पर्स, चप्पल असो वा इतर कोणतीही खरेदी असो तुझा सहभाग असायचाच तुझ्या कपड्याच्या खरेदीत मात्र तुला माझे मत लागायचेच तुझा चॉईस उत्तम असून सुद्धा..अगदी बूट,रुमाल, चप्पल खरेदी साठी सुद्धा तुला माझा चॉईस हवा असायचा कपड्यांचे रंग,पोत, क्वालिटी, त्याची स्टाईल, फॅशन सगळ काही तू पसंत करायचाऍमेझॉन वर खरेदी करताना कपड्याचे वर्णन त्याचा पोत यासंबंधी तू बारकाईने वाचायचा दर वर्षी आपल्या कुलदेवी साठी साडी घेतली की त्यातला आणखी एक रंग मला पसंत करायला सांगून तू ती माझ्यासाठी खरेदी करायचा मी नवीन फॅशनचे कपडे घातलेलं तुला खूप आवडायचं वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट, फ्रॉक, पॅन्ट, टॉप तू माझ्यासाठी कायमच खरेदी करायचा एखादा ड्रेस आवडला आणि जर तो अती फॅशनेबल असेल तर हा घेऊ नकोस असे तू स्पष्ट सांगायचा आणि मलाही ते पटायचंउत्तम प्रतीचे चांगले कपडे बूट किंवा इतर वस्तू खरेदी करताना तू किंमती कडे नेहेमीच दुर्लक्ष करायचा आपले फिरायला जाण्याचे बूट तू दर सहा आठ महिन्यांनी बदलत होतास आपले फिरणे भरपूर असल्याने बुटाचा सोल पण झिजत असे मग नवीन बूट घ्यायचा एकदा चप्पल बूट खरेदीला गेले की दोन तीन प्रकारचे बूट घेऊन ठेवायचेमी तर सँडल ,चप्पल सुद्धा माझ्या पसंतीचे दोन तीन घेत असे मला भरपूर चपलांची आवड होती कधी कधी तू रागाने मला म्हणत असे इतके कशाला घेतेस काय चपलाचे दुकान काढायचे आहे का..पण तो राग तेवढ्यापुरता असे कुठ देश परदेश प्रवास असेल तर नवीन बूट वापरायला काढायचा नंतर तो नेहेमीच्या वापराला घ्यायचा आपले फिरायचे बूट सुद्धा तू दर सहा महिन्यांनी बदलून नवीन वापरायला घेत असे जुने चांगल्या कंडीशन मधले बुट गरजू लोकांना देऊन टाकायचे कपड्यांच्या किंवा बूट चपलांचा बाबतीत तुझे एक गमतीशीर गणित असे कोणता कपडा किती रुपयाला घेतला आणि त्याची क्वालिटी काय आहे यावर तो हिशोब असे समजा तीनशे रुपयाचा कपडा असेल तर एक दिवस घातला की त्याचे दहा रुपये फिटले तीस दिवसांनी तो वापरायचा बंद करून देऊन टाकायच्या कपड्यात व्यवस्थित धुवून इस्त्री करून ठेवायचा कोणालाही द्यायची वस्तू कायम उत्तम असावी इकडे तुझा कटाक्ष असे धान्य खरेदी मध्ये तू वाकबगार होतास वेगवेगळी धान्ये,डाळी कधी खरेदी करायच्या त्या कशा टिकवायचा तांदुळ तूर डाळ जुनी नवी कोणती हे तुला चांगलं समजायचे ते बाळकडू तुला तुझ्या वडीला कडून मिळाले होते जे पुढच्या पिढीत नाही गेले ताजी भाजी आणणे तर तुझा आवडता छंद आठवड्यातून एकदा तुझ्या आवडत्या ऋण मुक्तेश्वर मार्केट मध्ये जाऊन मनसोक्त ताजी भाजी तू घेऊन यायचा प्रत्येक भाजी साठी जाळीच्या पिशव्या तुझ्याकडे होत्या त्यात भाज्या घालून फ्रीज मध्ये टाकायच्या म्हणजे हवेशीर राहतात कुजत नाहीत टोमॅटो थोडे पक्के थोडे कच्च्यावर घ्यायचे म्हणजे चार पाच दिवसात पिकत येतात मेथी पानाला कडेने लाल रंग हवा म्हणजे ती ताजी असते कोथिंबीर फुले आलेली घ्यायची नाही बटाटा इंदोरी हवा कांदा मध्यम साईझ हवा लसूण टपोरा हवा किचना नकोमश्रुम पांढरे शुभ्र हवेत मेथी कोथिंबीर पालक पोकळा अशा पालेभाज्या आणल्या की आधी त्या सोडवून वेगळ्या करायच्या थोड्या वेळाने त्या कोरड्या झाल्या की निवडून ठेवायच्या निवडायला सुद्धा दोघांचे हात लागले म्हणजे काम पटकन होते असे तुझे म्हणणे कोणतेच काम तू मला एकटीला कधी करू द्यायचा नाही तुझा सहभाग सगळ्यात माझ्या पेक्षा जास्त असे डाळिंबाचे दाणे काढणे आणि मटार सोलण ही काम मात्र तुझी फार आवडीची नसायची ती मीच हौसेने करायचे भाज्यामधला ओलसरपणा कमी झाला की निवडून लगेच त्या जाळीच्या पिशवीत भरून फ्रीज मध्ये टाकायच्या त्या सुद्धा सिस्टिमॅटिक पद्घतीने कोणती भाजी कधी कशा पद्धतीने करायची हे मी तुलाच विचारून ठरवत असे कोणतीही भाजी नेहेमीच आपल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने तयार होत असे दर महिन्याला डी मार्ट ला खरेदीला जाणे तुला आवडायचे तिथे वस्तू योग्य किमतीत मिळतात असे तुझे म्हणणे असायचे आपण दोघेही एकत्र डी मार्ट ला जायचो मात्र माझी उगाचच वायफळ खरेदी खूप होत असे तेव्हा तुला डी मार्ट ला सोबत घेऊन गेले की बिल डबल होते अशी खोटी तक्रार तू करायचा बेडशीट पिलो कव्हर पायपुसणि दर सहा महिन्याला बदलून वेगळी घ्यायची टीव्ही,मोबाईल, गाडी दर तीन ते पाच वर्षाने बदलायची जून देऊन नवीन घ्यायची तू आत्तापर्यंत सहा सात गाड्या बदलल्या होत्यासफळे खरेदी मध्ये तर तुझा हात कोणीच धरू शकणार नाही कोणते फळ कधी किती पक्व घ्यायचे तुला बरोबर समजायचे अननस "राणी" हवा कलिंगड काळया रंगाचे"शुगर बेबी" हवे बोर पेढ्या सारखे गोड आणि टपोरे हवे हे सारे तू पारखून घ्यायचा तुझ्या ओळखीचा एक पेरू वाला तुला पेरू घेतल्या शिवाय सोडायचा नाही पण त्याने काढलेले पेरू न घेता तू स्वतः पेरू वेचून घ्यायचा सगळ्याच बाबतीत तुझी नजर पारखी आणि चोखंदळ होती अननस, कलिंगड, खरबूज आणले की ते लगेच छान सुबक चिरून डब्यात ठेवून द्यायचा मला तर अगदी आयते खायला मिळायचे फणस तुझा आवडता नव्हता पण माझ्यासाठी तू करकरीत गोड गरे आणत होतास तुझी आंबा खरेदी मात्र मनसोक्त असायची पार मार्केट यार्ड पासून लक्ष्मीपुरी पर्यन्त तुझ्या ओळखीचे फळ व्यापारी तू तुझ्या अदबशीर बोलण्याने अनेक वर्षे आपलेसे केलेले होतेस ते तुला अगदी हुकमी फळ योग्य दरात देऊन तुझ्या डॉक्टरी पेशाला आणि तुला आदर देऊन पार गाडीत पोचवायचेमहाराष्ट्रातला आंब्याचा सिझन संपला तरी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, नागपूर इथले सुद्धा आंबे सुद्धा तू आपल्याला चवीसाठी खायला विकत घ्यायचा एकंदर जुलै अखेर पर्यंत आपण आंबे खात असू खरेदीच्या विश्वाचा राजा होता रे तू ❤️