Finally, the discussion is important. in Marathi Children Stories by Ankush Shingade books and stories PDF | शेवटी चर्चा महत्वपुर्ण

Featured Books
Categories
Share

शेवटी चर्चा महत्वपुर्ण

चर्चेतून घडवावे आपलं आयुष्य?   

     *चर्चा...... चर्चा कोणत्याही विषयावर व्हायलाच हवी.  कारण चर्चेतून मार्ग निघतो. तसेच जो मार्ग निघतो. तो मार्ग आपलं मार्गदर्शन करणारा ठरतो वा आपलं आयुष्य घडविणारा ठरतो.*          अलिकडील काळात आत्महत्या होत आहेत. कधी शेतकरी आत्महत्या तर कधी घरगुती वादातून पती पत्नीची आत्महत्या तर कधी गुण कमी मिळाले म्हणून विद्यार्थी वर्गाची होणारी आत्महत्या तर कधी सासू सुनेच्या आत्महत्या कधी आपल्या म्हातारपणाच्या वयोवृद्ध जीवनाला कंटाळून वयोवृद्धांच्या आत्महत्या. कधी स्रीच्या आत्महत्या तर कधी पुरुषांच्या आत्महत्या. कधी लहान बालकांच्याही आत्महत्या तर कधी तरुणवर्गाच्या आत्महत्या.           आत्महत्या होण्याला जबाबदार आहे निराशता. निराशता ही नेहमीच जीवनात येत असते. ज्याप्रमाणे सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख येतं. तशीच निराशताही येत असते. तसं पाहिल्यास आजच्या काळात कोणताच घटक सुखी नाही. साधं दगडाचं उदाहरण घेतल्यास तोही सुखी नाही. त्यालाही उन, पाऊस, थंडी, वारा झेलावं लागतं. ज्यातून त्याचे तुकडे होतात. तसा सजीव घटकही सुखी नाही. सजीव प्राण्यांनाही दुःख नसतं असं नाही. त्यांनाही दुःख असतंच. त्यांना तर जंगलात असतांना सुरक्षीतता नसते. तेच दुःख. सरपटणाऱ्या प्राण्यांनाही दुःख असते सरपटावं लागते याचं. वृक्षवल्लींनाही दुःख असतंच. त्यांना एकाच जागेवर राहावं लागतं. इकडे तिकडे स्थलांतरीत होता येत नाही त्याचं. ते झाडंही आत्महत्या करतंच. कधी त्याची एखादी फांदी. हे दिसतं, अचानक झाडं वाळण. यातून त्या झाडाची आत्महत्या दिसत असते. लोकं म्हणतात की त्या झाडाला कीड लागली. परंतु असं कधीकधी होत नाही. तसं माणसांनाही दुःख असतं. परंतु त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. परंतु आत्महत्या घडतातच.         आत्महत्येबाबत सांगायचं झाल्यास आत्महत्या थांबवता येवू शकतात. त्या रोखताही येवू शकतात. जर आपण एखाद्या गंभीर प्रश्नांवर निराशता न बाळगता चर्चा केली तर....... आपण चार लोकांना त्याबद्दल सांगीतलं तर....... काहीजण काहीबाही बोलतात. बोलू शकतात. कारण त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु काही लोकं असेही असतात की जे उगाच बोलत नाही तर त्यावर उपायही सांगतात. चर्चेतून आत्महत्या थांबतात.          चर्चा..... चर्चा करणे हा आत्महत्या रोखण्याचा प्रभावी उपाय. त्यातून फक्त आत्महत्याच थांबवता येत नाही, तर त्या चर्चेतून बरेच मुद्दे तेही गुंतागुंतीचे क्लिष्ट असलेले मुद्दे सोडवता येतात. शिक्षकांच्या जीवनाचा विचार केल्यास चर्चेला अतिशय महत्व आहे.          चर्चेतून घरातील घरगुती वाद सोडवता येतात. आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे व या घटस्फोटाच्या वाढत्या काळात पतीपत्नींमध्ये सकारात्मक चर्चा घडून आली तर बस. त्यांच्यात घटस्फोट न होता, तो थांबून त्यांचा संसार हा चांगल्याप्रकारचा होत असतो.           चर्चा...... काही चर्चा या सकारात्मक असतात तर काही चर्चा या नकारात्मक. सकारात्मक चर्चेतून चांगले मार्ग निघतात तर नकारात्मक चर्चेतून वाईट मार्ग. गत दहा वर्षापुर्वी अशाच स्वरुपाच्या चर्चा झाल्या की ज्यातून आजच्या सरकारी शिक्षकांच्या जीवनात उदासीनता आणली. लोकांनी आपली मुलं गत दहा वर्षापुर्वी वस्तीवस्तीत चर्चा करुन कॉन्व्हेंटला टाकली. त्यावेळेस कॉन्व्हेंटला नावे टाकण्याचा त्याचा ओघ कमी होता. परंतु आज वाढला. कारण वस्तीतील ज्या पालकांची मुलं कॉन्व्हेंटला जात होती. त्याची चर्चा वस्तीत व्हायची व वस्तीवस्तीत तशी चर्चा झाली की लोकं आपली मुलं कॉन्व्हेंटला टाकायला नेत असत. अशातच आज असा काळ आला की आज सगळीच मंडळी आपली मुलं कॉन्व्हेंटला टाकायला नेत आहेत. त्यांच्या मनात आज तरी गरीबी नाही. शिक्षण नाही. शिक्षणाचा दर्जा नाही. फक्त आहे, तो भव्यदिव्यपणा. ज्यातून गरिबांच्या घरच्या चुली पेटत नाहीत. परंतु मुलं शिक्षणासाठी कॉन्व्हेंटला असतात. शिवाय ते कॉन्व्हेंटचं शुल्क देतात. त्यासाठी कर्ज काढतात. त्याच कर्जात घरही चालतं. मग कर्ज वाढत जातं व असं कर्ज वाढलं की सर्रास आत्महत्या. परंतु कॉन्व्हेंटला मुलं शिकविणं बंद होत नाही. शिवाय ज्यावेळेस पैसे नसतात व आपल्या मुलांना अशावेळेस कॉन्व्हेंटमधून काढून सरकारी शाळेत जरी टाकतो म्हटलं तरी कॉन्व्हेंटच्या शाळेतील मंडळी मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सोडण्याचे दाखले देत नाहीत. ते आपल्या कॉन्व्हेंटचं बाकी असलेलं शुल्क मागतात. ज्यातून मुलांचं पुढचं शिक्षण सुटतं व ती मुलं पुढे न शिकता हमाल बनतात. हे सगळं आज का घडतं? हे घडतं, काल दहा वर्षापुर्वीपासून होत आलेल्या चर्चेतून. काही काही चर्चा अशाच चालत असतात की ज्यातून अशा प्रकारच्या कृती घडत असतात समाजात.           चर्चा...... चर्चेतून एखाद्या सौभाग्यवतीचा होणारा घटस्फोट थांबवता येवू शकतो. चर्चेतून शेतकरी आत्महत्या थांबवता येवू शकतात नव्हे तर आजच्या गरीबांना, उद्या होणारं  कॉन्व्हेंटपासून नुकसान कळत नाही. तेही प्रकर्षानं समजावून सांगीतलं जावू शकतं.          आजच्या काळात कालच्या पालकांच्या चर्चेतून सरकारी शाळेला समस्या निर्माण झालेली असून आज लोकं त्याच चर्चेचा प्रभाव एवढा पडलेला आहे की त्या चर्चेतून आज कॉन्व्हेंटला मुलं टाकली जात आहेत व हवाला दिला जात आहे की तिथं शिक्षण चांगलं आहे.          सरकारी शाळेत शिकविलं जात नाही. असं लोकं म्हणतात.  सध्या हम दो हमारे दो म्हणत प्रत्येक पालक कुटुंबनियोजन शस्रक्रिया करतो. अशावेळेस आपल्या मुलांना प्रत्येक पालक आज कॉन्व्हेंटचं शिक्षण कमी पैशाचं असल्यानं शिकवू शकतो. ज्यातून सरकारी शाळेत मुलं मिळत नाहीत व सरकारी शाळा बंद होत आहेत. काही शाळा बंद पडण्याच्या कगारवर आहेत. मात्र उद्याचं संभाव्य भविष्य असं आहे की जर मुलंच सरकारी शाळेत मिळालीच नाही तर उद्या सरकारी शाळा बंद पडतील नव्हे तर सरकारला अशा शाळा चालविणे परवडणार नाही व त्या बंद कराव्या लागतील. अशावेळेस उद्या कॉन्व्हेंटच्याच शाळा सुरु राहतील व त्या शाळेचं शुल्क वाढलेलं असेल व ते अमाप वाढलेलं असेल. तेव्हा एखाद्या गरीबाजवळ अशा कॉन्व्हेंट शाळेत शिकवायला पैसा नसल्यास त्यांनी काय करावं? हा प्रश्न आज जरी तेवढ्या प्रमाणात तीव्र वाटत नसला तरी उद्या तीव्र होणार आहे. यासाठीच काल जरी कॉन्व्हेंट संदर्भात चर्चा झाल्या असल्या तरी आज त्या चर्चा बंद करुन सरकारी शाळा कशा सुरु राहतील. याबाबतीतील चर्चा वस्तीवस्तीतून होण्याची गरज आहे. त्याच चर्चेची आज गरज आहे. या चर्चेतूनच समाजात चांगलं वातावरण तयार करता येवू शकतं नव्हे तर याच चर्चेतून अपेक्षीत असलेला वर्तनबदल घडवून आणू शकतो.          कॉन्व्हेंटच्या शाळेत चांगले शिकवीत नाही, असं नाही. तिथंही चांगलंच शिकवलं जातं. यावरुन मराठी माध्यमाच्या शाळेत चांगलं शिक्षण शिकवीत नाहीत. असा होत नाही. परंतु पालकांची आजची मानसिकता अशी आहे की आजचे शिक्षक हे कॉन्व्हेंटच्याच शाळेत जास्त शिकवतात. मराठी माध्यमाच्या शाळेत जास्त शिकवीत नाही. हीच चर्चा होते वस्तीवस्तीतून, अविरत आणि चांगल्या स्वरुपाची. म्हणूनच पालकवर्ग कॉन्व्हेंटच्या शाळेकडे जास्त झुकत चाललेला आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास चर्चेतूनच घडवावे आपलं आयुष्य.  असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण चर्चेतून आपलं आयुष्य चांगलं घडत असतं, जर चर्चा सकारात्मक झाली तर..... आज समाजात गरज आहे सकारात्मक चर्चेची. नकारात्मक चर्चेची नाही. सकारात्मक चर्चा व्हायला हव्यात. त्यांची शिबीरं व्हायला हवीत. शिबीरं घ्यायला हवीत. त्यातच अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणलेल्या हव्यात. हे तेवढंच खरं.    


      अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०