जोडीदारही करु शकतो आपल्या बाळांवर संस्कार ?
जोडीदारही करु शकतो आपल्या बाळांवर संस्कार, होय. जोडीदार आपल्या बाळावर संस्कार करु शकतो. परंतु जोडीदार तसाच हवा. तो जर दारु पित असेल, व्याभिचारात लिप्त असेल तर त्याची मुलं अवश्य बिघडतात. ती एवढी बिघडतात की नशेच्या आहारी जातात व आपल्याच जीवनाचं बरंवाईट करुन टाकतात.
एक इंजिनियरींग कॉलेज. ज्या कॉलेजमध्ये प्रसन्नवर्धक जागा. मुलांच्या तासिका होत होत्या का तर माहीत नाही. सर्व मुलं मैदानावर बसली होती झाडाच्या खाली. तसा उन्हाळा व कडक उन्हं.
मुलांचं झाडाखाली बसणं. कडक उन्हाळ्यामुळे झाडाचा आसरा. मग गोविंदानं परिस्थिती विचारात न घेता त्या मुलांना विचारलं,
"आपण असे झाडाखाली बसले आहात. तासिका नाही का आपल्या?"
तो गोविंदाचा प्रश्न. त्यावर एक मुलगा म्हणाला,
"सर, शिकवीतच नाहीत वर्गात."
"का बरं?"
"पंखेच आहेत सर. किती उकडतंय वर्गात. या झाडाखाली तरी बरं वाटतंय."
त्या मुलांची उत्तरं. तशी त्याची बरीच कारणं असतील व पहिलं कारण असेल, विद्यावेतन. जे अतिशय अल्प असेल. मग जॉब करणारी मुलं संसाराला लागणारी मिळकत कमविण्यासाठी कुठेही खाजगी ठिकाणी कामे करतात व पैसे कमवितात. मग ते अशा ठिकाणी पार्ट टाईम जॉब करतांना कधी उशिरा पाशिरा येतात तर कधी येतच नाही. त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काही घेणंदेणं नाही आणि इंजिनियरींग महाविद्यालय का असेना. परंतु त्यांनाही केवळ पैसेच कमविण्याशी मतलब असतो. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नाही. राहिला निकाल. तर निकालात गुण चांगलेच मिळतात. ते कॉलेजवर अवलंबून असतं. कारण परिक्षा कॉलेजच्याच असतात. गुण टाकणारेही कॉलेजचेच. आता राहिला नोकरीचा प्रश्न. तर काही मुलं आजच्या काळात मोबाईलमधून अभ्यास करतात. काही वेगळी शिकवणीही लावतात. ज्यातून त्यांना गुण जास्त मिळतात. अशा होतकरु मुलांसाठी खाजगी कंपन्या येतात. ज्या कंपन्यांना मुलांची गरज असते. ज्यांची महाविद्यालयाशी साठगाठ असते. परंतु बाकी विद्यार्थ्यांचं काय? त्यांना तर प्रात्यक्षिक स्वरुपाचा अनुभवच नसतो. मग अशी मुलं इंजिनियरींगची पदवी तर कमवतात. परंतु ते जागतिक स्तरावर स्पर्धेत प्रॅक्टीकल ज्ञान नसल्यानं टिकू शकतात का? याचंही उत्तर नाही असंच आहे.
परीसराचं निरीक्षण करतांना गोविंदानं पाहिलं की चार पाच मुलांमध्ये एक मुलगी होती व ती मुलगी एक मुलाच्या मांडीवर झोपली होती अगदी निवांतपणे. कदाचीत तो तिचा प्रियकर असेल. मग गोविंदाच्या चर्चा सुरु झाल्या. हे असं का? त्यावर दुसऱ्यानं उत्तर दिलं. यात तिच्या आईवडिलांचा दोष? मुलगी पळून जाते, तेव्हा आईवडील ओरडतात. परंतु ती घरी उशिरा येत असेल तर आईवडीलानं विचारायला हवं की तिला का वेळ झाला. तसंच ती एखाद्यावेळेस एखाद्या दिवशी नेहमीच्या जेवनापेक्षा कमी जेवत असेल, तर तिला विचारायला हवं की तू नेहमीच्या जेवनापेक्षा आजच का कमी जेवली. हे तेच मायबाप विचारु शकतात. जे त्यालायक असतात. जे दारु पिवून घरी येत असतील. जी बाई आपला पती असतांना दुसऱ्याच पराया माणसांसोबत आपल्या मुलांसमोर रंगरलिया साजऱ्या करायला जात असेल किंवा त्यांची किरकोळ कारणांवरून सतत भांडणं होत असतील तर ती आई वा ते वडील आपल्या मुलांना, ती कुठं गेली होती. ती का कमी जेवली. हे विचारुच शकत नाही. विचारण्याचा त्यांना हक्कं नसतोच. अन् समजा एखाद्यावेळेस एखाद्यानं विचारलंच तर मुलांचं त्यांना उलट उत्तर असतं, 'आपलंच पाहा ' मग मुलांसमोर आईवडिलांना चक्कं चूप बसावं लागतं. आता ही मुलगी त्या सर्व मुलांमध्ये एकटीच असून तिचं त्या मुलाच्या मांडीवर झोपणं. असं दर्शवते की त्या व्यक्तीचं बरोबर होतं. कदाचीत तिच्या आईवडिलांचं तिच्याकडं लक्ष नव्हतं. कारण तो व्यक्ती जर तसं बोलला तर तो अनुभवावरुन बोलला असावा. महत्वाचं सांगायचं झाल्यास अनुभव हाच गुरु. त्यानुसार आजच्या काळात मुलं घडत असतात. परंतु घरी जर आपण भांडणं होत असतील, आईवडील भांडत असतील, वडील दारुडे असतील. तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर किंवा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. असं होवू नये म्हणून घरी वडिलांनी सुधरावं. दारु पिवू नये. त्यातच भांडणं करु नये म्हणजे झालं. शिवाय आई व वडिलांनीही अनैतिक कामेही करु नये. तसंच कुटुंब म्हटलं तर भांडणं आलीच. परंतु अशी भांडणं करायची झाल्यास तिही आपल्या पाल्यांच्या समक्ष करु नये की ज्याचा परिणाम भविष्यात त्यांच्याच मुलांवरच होईल. मुलं बिघडतील. ती नशेच्या आहारी जातील. कोणी मांडीवर झोपतील. कोणी रेस्टॉरंटमध्ये जातील तर कोणी पळून. ज्यातून ती मुलं बलात्काराचे शिकार ठरतील. कोणाच्या किडन्या वा मानवी अवयव काढले जातील तर कुणाचा किरकोळ गोष्टीसाठी खुन केला जाईल तर कुणी खुनही करतील. एकंदरीत सांगायचं झाल्यास प्रत्येक मुलगा हा आपल्या जीवनाची राखरांगोळी स्वतःच करतील, यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०