प्रिय सोना
आपल्या संसारात काही गोष्टी तुझ्या अत्यंत प्रिय होत्या त्यातली एक म्हणजे छोटा मिक्सर ज्याला फक्त दोन भांडी म्हणजे उभट जार आणि चटणी अटैचमेंट होतेतसे घरात दोन मिक्सर होतेअगदी छोटी चटणी किंवा वाटप साठी तू कधीच आपल्या मोठ्या मिक्सर चे छोटे भांडे घ्यायचा नाहीसतुला या मिक्सर चे छोटे भांडे आवडायचेत्याच्या मोठ्या जार मध्ये सुद्धा तू कायम मिल्क शेक ज्यूस वगैरे करीत होतासताटल्याकाही काही ताटल्या तुझ्या अतिशय आवडत्या होत्या छोट्या गोष्टी चिरून ठेवायला तू त्याच वापरायचाकधी चुकून जर त्या घासायला असतील तर तू थोडा अस्वस्थ व्हायचातुझा चेहरा बघून मला थोडं हसू यायचेअरे दुसरी घे ताटली असे म्हणले.. तर तू म्हणायचा त्यात बरोबर मावत असते गबशी पातेले काही असो पदार्थ त्याच्या अंगाबरोबर असला पाहिजे असा तुझा त्यामागे आग्रह असायचाआपली दुधाची पातेली ठरलेली होतीअर्धा लिटर दूध ते तापवायचे भांडे घासायला असल्याने जर मोठ्या पातेल्यात तापवायला लागले तर ते तुला आवडायचे नाहीबशाखुप जुन्या अशा दोन चिनिमातीच्या बशा घरात होत्या त्या तुझ्या आवडत्या होत्यात्या वापरल्यावर तू कधीच घासायला टाकू द्यायचा नाहीसस्वतः घासून पालथ्या टाकायचातुझ्या मते भांडीवाली त्या बशा नीट घासत नाहीचहा करायची पातेली सुद्धा तुझी ठरलेली होतीएकदा तर चहा उकळायला बरे आहे म्हणून तू दांड्याचं पातेल विकत घेतले होतेसपण दोन माणसाच्या चहा साठी ते मोठे वाटू लागलेमग आपण त्यात भाजी आमटी करू लागलोबंडीतुला बंडी वापरायला खूप आवडायचीनेहमी तुझ्या कलेक्शन मधे चार पाच बंड्या असतस्पेशली उन्हाळ्यात तू पांढरी बंदी वापरायचातुला खूप उकडत असेत्यामुळे या कॉटन च्या असतदिवसभर आणि संध्याकाळी आपल्या भागात फिरताना तू त्याच घालून हिंडत असेतुझ्यामुळे आपल्या नातीला सुद्धा बंडी आवडत असेमग उन्हाळ्यात आपण तिच्यासाठी सुद्धा पांढऱ्या बंड्या विकत घेत असूपांढरी चड्डीमागल्या वर्षी मुंबईत ट्रीपला गेले असताना तुला एक सुंदर मोठी बाहेर फिरायला घालायची चड्डी आपण घेतली होतीखरेतर तू पांढरी नको नको म्हणत होतासपण त्याचे मटेरियल उत्कृष्ट होतेम्हणून मी आग्रहाने घ्यायला लावली होतीनंतर तुला ती इतकी आवडायला लागली की रोज फिरायला ती वापरत होतासअगदी पुण्याला किंवा कुठे गावाला जाताना सुद्धा आठवणीने पांढरी चड्डी तू घेत होतासतुला ती खूप छान दिसायचीमुंबईत आपल्याला एक ओपन जीन चे जाकीट मिळाले ते खूप छान आणि नवीन फॅशन चे होतेतुला ते फार आवडायचे तू नेहमी ट्रीपला जाताना बरोबर घ्यायचाते मला पण बसते असे म्हणण्यावर तुझी आहेत की इतकी जाकीट माझे कशाला हवे असे खोट्या रागाने म्हणायचाजीन चे एक खाकी जाकीट तुला ऍमेझॉन वर पसंत पडले होतेमला दाखवून हे मी घेऊ का असे विचारून तू ते घेतले होतेसविमानात किंवा AC बस मध्ये तू ते नेहमी वापरायचापूर्वी आपण बहुधा शिमला फिरायला गेलो तेव्हा तिथली स्पेशालिटी म्हणून तू एक टोपी घेतली होतीती तुझी इतकी आवडती होती की आपल्या घरच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात तू ती हौसेने घालायचातशीच आणखी एका ट्रिप मध्ये हिमाचल टोपी घेतली होतीस ती सुद्धा तुला खूप आवडायचीराजस्थानला गेलो तेव्हा तिथली खास टोपी तू विकत घेतली होती आपण दोघांनी त्या टोपी मधे खूप फोटो काढले होतेअसेच एका नातेवाईकांच्या लग्नात राजस्थानी टोपी तुला मिळाली होती ती तुला खूप छान दिसेनंतर एका फर ची पांढरी टोपी तुला भेट म्हणून आली होतीमला ती फार आवडली होतीबरे झाले आपल्याकडे फर ची टोपी नव्हती ती मिळालीतुला ती खास नव्हती आवडलीपण तुझ्या वाढदिवसा ला आणि दिवाळीत माझ्या आग्रहासाठी तू ती घातलीतुझे त्या टोपी मधले फोटो शेवटचे ठरलेमध्य प्रदेश ला गेलो तेव्हा एक माफ मफलर तुला खुप आवडलातो घेतल्यापासून तू नेहमी गळ्यात टाकून हिंडायला जायचालेटेस्ट डिझाइन चे बूटएक लेटेस्ट डिझाइन चे बूट खूप आवडले होते म्हणून घेतलेकिती तरी दिवस बूट घालताना तू नेहमी म्हणायचा ह्याचे सोल कमफर्ट खूप छान आहेचार खिशाची बॅगी पॅन्ट तुला खूप आवडायचीप्रवासी भारतीय पॅन्ट असे तू तिला म्हणायचा ऍमेझॉन वर ती विकत घेऊन आधी प्रवास करताना वापरायचा आणि नंतर हळूहळू ती फिरताना वापरून परत नवीन घ्यायचामुंबई ट्रिपच्या शॉपिंग मध्ये तू ती घेतली होतीभरपूर खिसे असले म्हणजे बऱ्याच गोष्टी ठेवता येतात असे तू म्हणायचाएका खिशात छोटी चॉकलेट, एका खिशात टूथ पिक असे काहीबाही तू सगळ्या खिशात ठेवायचातशी तुझ्या आवडत्या गोष्टींची लिस्ट अजून मोठी होईल..या सगळ्या वस्तू घरात पाहिल्या की त्या घेताना अथवा त्या वापरता वेळचा तुझा उत्साह आठवतो