Bhikari ( part 1 ) in Marathi Short Stories by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | भिकारी ( भाग १ )

Featured Books
Categories
Share

भिकारी ( भाग १ )

     सुहाला आज कॉलेज मधून निघताना नेहमीपेक्षा उशिर झाला होता. तिची बस निघून गेली होती . पुढील बस एक - दीड तासानंतर होती . इतका वेळ बसस्टॉप वर बसून वाट पाहण्यापेक्षा तिला स्टेशनवर बसून वाट पाहूया असे वाटले . म्हणून ती बसस्टॉप पासून स्टेशन कडे जात होती ..ती ज्या मार्गाने ने जात होती  तिथे एक ब्रीज लागत होता . तो  बसस्टॉप ते स्टेशन मार्ग जोडत होता . त्या मार्गावर बरेच प्रकारची लोक बसलेली दिसत असत . काही जण आपली ट्रेन, बस किंवा एखादी गाडी यांची वाट पाहत बसलेले दिसत होते. काहीजण उगीचच तिथे टाईमपास साठी बसलेले दिसत होते . काही अंतर पुढे गेल्यानंतर काही भिकारी तिला दिसले . कोणी वयस्कर होत तर कोणी तरुण होत. कोणी लहान होते... तर कोणी मोठे होते !

तिला कोणाहीबद्दल खूप कुतूहल वाटत असे . तीच अस मत होत की प्रत्येकाची काही ना काही एक कथा असते . ती आपण जाणून घेतली तरच आपण कोणालाही समजून घेऊ शकतो . हे असं इकडे तिकडे फिरत असताना तिचा फोन वाजतो . ती हळूच बॅग मधून फोन काढत असताना , तिच्या हातातून ओढणी आणि फोन या गोंधळात फोन खाली पडला. फोन पडताच क्षणी एक लहान मुलगा धावत पुढे येतो  आणि एक गोड हास्य देऊन तिच्या हातात फोन देऊन जातो.  या गोंधळामध्ये फोन कट झाला होता . ती त्या मुलाला तितकंच छान हास्य देऊन थँक यू म्हणते ! तो मुलगा तिथून निघणार तितक्यात हि मुलगी त्याला काही पैसे देण्यासाठी पुढे हात करते.  आणि तो ही घेण्यासाठी हात पुढे करतो. पण मुलाला त्याची आई मागे खेचते आणि एक थोबाडीत लावते . म्हणते अजून आपण भिकारी नाही झालोय . हे ऐकून सुहाला धक्काच बसतो ! याचा अर्थ काय ? म्हणजे हे भिकारी नाहीत ? तिने पुन्हा एकदा त्या मुलाला आणि त्याच्या आईला पाहिलं ... ते तसे भिकारी वाटत ही नव्हते . पण सुहा विचार करत होती ...मी खरच याला भीक देत होते ? स्वतःलाच समजावत असताना ती जोरात म्हणाली...नाही नाही .. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे . मी भीक नव्हते देत ... त्याची आई म्हणाली, हे काय होत मग ? 

सुहा म्हणाली , अहो..ताई माझा फोन खाली पडला होता आणि या छोट्या ने उचलून प्रामाणिक पणे माझ्याकडे दिला म्हणून मी त्याला ते शाबासकी नाहीतर बक्षिस म्हणून देत होते .तितक्यात तुम्ही आलात ! आणि तुमचा गैरसमज झाला !    हे ऐकूनही काहीच प्रतिसाद न देता, त्या स्त्री ने तिच्या मुलाला ओढून मागे केले ( हळूच म्हणाली , तुला सांगितलं होत ना  .. या जागेवरून कुठे जायचं नाही ! मग?)

हे सगळ ऐकते पण तिचा फोन पुन्हा वाजतो .फोन तिच्या आईचा असतो .फोन उचलताच तिची आई सुरू होते..( कुठे आहेस ? आज कोणासोबत फिरते ? कोणती मैत्रिण आहे ? काही सांगता नाही येत का ?)

सुहा घाई घाई मध्ये म्हणाली .. अगं! आई ! कुठे नाही गेले ..ऐकून तर घेशील ...माझी नेहमीची बस थोड्या वेळासाठी निघून गेली  आणि आता दुसऱ्या बस साठी एक तास आहे . कुठे गेले नाही , कोणी मैत्रीण ही नाही ! येते दुसऱ्या बस ने..ठेव तू करते नंतर फोन ! ती घाई घाई ने फोन ठेवून त्या मुलाच्या आई सोबत बोलणार तितक्यात बघते तर ते दोघे गायब ! तिला त्या मुलाला आणि त्याच्या आईला बरंच काही विचारायचं होतं ! पण ते अचानक दिसेनासे झाले !

ती थोड अंतर चालत पुढे ही गेली , पुन्हा माघारी गेली ... बऱ्याच ठिकाणी तिनें नजर फिरवली पण तिला ते कुठे दिसले नाही . हे दोघे कुठे गेले अचानक हाच विचार ती करत होती .ते कुठेच नाही याची खात्री होताच ती बस साठी बस स्टॉप वर जाण्याचा विचार करते. 

पुन्हा त्याच मार्गाने जाताना ती बरेच भिकारी बघते जे तिथे वेग- वेगळ्या प्रकारे भीक मागत असतात . काही तर शरीराचा अवयव नकली लावून भीक मागत होते . पैसे कसे मिळवणार हाच एक उद्देश असतो त्यांचा! हे सगळं पाहून ते दोघे किती निरागस होते अस तिच्या मनात येतं! मग ते जर भिकारी नव्हते तर असे इथे का बसले होते ? त्यांच्याकडे तसं सामान ही बरंच होतं ! नक्की काय झाल असेल त्याच्या आई सोबत ? ( असे बरेच विचार घेऊन ती बस स्टॉप वर पोहचली )

तिची बस येण्यासाठी अजून थोडा वेळ शिल्लक होता तसा !  तिथे एक बाजूला जाऊन उभी राहते . थोड्या वेळात तिची बस येते . ती बस मध्ये चढते आणि तिला तिच्या मनासारखी खिडकीच्या बाजूला जागा ही मिळाली. बसल्याबरोबर बॅग मधून ती एक पुस्तक काढते . तिला वाचनाची खूप आवड असते . तितक्यात बस सुरू होते, बस तिथून हळू हळू बाहेर पडत असते .एक बस समोर आडवी असल्यामुळे ही बस निघू शकत नव्हती . खिडकीमधून तिला खूप जास्त आवाज येत होते आणि पुस्तक ही व्यवस्थित वाचता येत नव्हतं . म्हणून ती खिडकी बंद करण्यासाठी पुढे होते . ती काच अशी ओढून घेणार तितक्यात बस स्टॉप वरील एका बाकावर तिला तो मुलगा आणि त्याची आई दिसली . हिची नजर ही लगेचच त्यांच्याकडे खेचली गेली.

पण बस सुरू झाली होती ... म्हणून दुरून फक्त बघण्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय ही नव्हता ...

तिने खिडकी बंद केली आणि पुस्तक वाचू लागली. तिच्या मनात त्या स्त्री ला भेटायच आहे हे सतत होत ...हे दुर्लक्ष करत ती पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होती.

मागचा प्रवास दुर्लक्ष करत तिने तिचा घरचा प्रवास सुरु केला. ती घरी पोहचताच आईची बडबड सुरू झाली .... तुझी कशी बस कशी गेली ? काय केलं इतका वेळ? कोण होत सोबत ? ती थकून आली होती आणि यामध्ये आईला उत्तर देण्याच्या मनस्थिती मध्ये ती बिलकुल नव्हती . तरी आई शांत का बसले ..उत्तर दे.. असं म्हणून तिला टोकत होती. 

 सुहाला आता शांत राहवलं नाही . अगं आई ... थोडी शांत राहणार का ? किती बडबड ? ( ती चिडून म्हणाली )

सुहा फ्रेश झाली आणि आरामात बेडवर पडली . तिचा स्वभाव हा इतरांपेक्षा वेगळा होता . एखादी गोष्ट मनात राहिली की त्याचा शेवट तिच्या मनासारखा होई पर्यंत तिला चैन नसे !!!  खरं तर तीच वाचन खूप होत. तिला नवीन नवीन कथा वाचायला आवडत असे .  ती कधी कधी लिहत असे . खरं तर ती प्रत्येक गोष्टी एकदम मनापासून करत असतं.

आता सध्या तिच्या मनात हाच विचार होता की ती स्त्री तिथे का होती ? नंतर तीच विचार करत स्वतःला समजावत होती कदाचित थोडी फार भांडण झाली असणार घरामध्ये म्हणून निघाली असेल घरातून रागाने !  मी का इतका नकारात्मक विचार करतेय.. चल झोपून घे ( स्वतःला समजावत तिने झोपून घेतलं )

सुहाचा कॉलेज ते घर प्रवास खुप व्यवस्थित आणि एकदम बिझी चालू होता. ती घरातून लवकर जात असत आणि घरी मात्र येण्यासाठी उशीर होत असे ... 

   एकदा कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी सुहा दुसऱ्या शहरात गेली होती. तिथे ती एक आठवड्यासाठी राहणार होती. तिच्या कॉलेज मधून काही मुली आणि एक शिक्षिका ही तिच्या सोबत होते.  ते ज्या हॉटेल मध्ये राहत होते त्यापासून काही अंतरावर एक मंदिर होत . सुहा ला घरी येण्याआधी तिथे जायची खूप इच्छा होती . एकदा सगळे एकत्र बसले असताना .. ती तिच्या सोबत असलेल्या शिक्षिकेला विनंती करू लागली ....एकदा आपण तिकडे जाऊया... प्लीज...

तिच्या सोबत असणाऱ्या सर्वच मैत्रिणींनी तिच्या विनंती ला दुजोरा दिला ..म्हणून त्यांची शिक्षिका ही नाही म्हणाली नाही .. उद्या सकाळी उठून आपण सगळे एकत्र तिकडे निघूया मग आपण आपल्या शहराकडे निघूया अस त्याच्या शिक्षिका म्हणाल्या. सुहा आणि तिच्या सोबत असणाऱ्या चार ही मैत्री लवकर झोपण्यासाठी गेल्या . पहाटे ६ ला उठून त्या तयारी करू लागल्या , व्यवस्थित त्यांची रूम आवरू लागल्या . सर्व आवराआवर झाल्यावर त्या मॅडम कडे गेल्या . तिच्या सोबत असणाऱ्या सर्वच मैत्रिणींनी तिच्या विनंती ला दुजोरा दिला ..म्हणून त्यांची शिक्षिका ही नाही म्हणाली नाही .. उद्या सकाळी उठून आपण सगळे एकत्र तिकडे निघूया मग आपण आपल्या शहराकडे निघूया अस त्याच्या शिक्षिका म्हणाल्या. सुहा आणि तिच्या सोबत असणाऱ्या चार ही मैत्रिणी लवकर झोपण्यासाठी गेल्या . पहाटे ६ ला उठून त्या तयारी करू लागल्या , व्यवस्थित त्यांची रूम आवरू लागल्या . सर्व आवराआवर झाल्यावर त्या मॅडम कडे गेल्या . मॅडम ही तयारच होत्या !

त्यांनी त्यांचं सर्व समान गाडी मध्ये ठेवलं आणि त्या सगळ्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाल्या. तिथे खूप प्रसन्न वाटत होते. वातावरण ही निसर्गरम्य होत. त्या बऱ्याच फोटो, व्हिडिओस काढत काढत मंदिरामध्ये प्रवेश करतात . मंदिर ही खूप मोठ, शांत आणि प्रसन्न असे होते.  मंदिरामध्ये अनेक कथा , अनेक चित्र भिंतीवर लावलेले होते . सुहा सर्व खुप मन लावून वाचत होती , जवळून बघत होती . पुढे जात असताना तिला एक मुलगा त्या परिसरात साफसफाई करत असताना दिसला !

तो मुलगा अगदी मन लावून काम करत असताना तिला दिसला . तिला वाटल त्याच कौतुक करावं ! इतक्या लहान वयात इतक मन लावून अशी कामे खूप कमी मुले करत असतील .. म्हणून ती त्याच्या जवळ गेली . तिने त्याला हळूच ये बाळा ..म्हणत चेहऱ्यावर हास्य ठेवत..कौतुकाने आवाज दिला...त्या मुलाने थोडा विलंब न करता.. हो बोला ताई ..असं बोलता बोलता मागे वळून पाहिले...

त्याने मागे पाहताच सुहाच्या चेहऱ्यावरील हास्य, कौतुक दिसेनासे होते ... हा मुलगा ? इथे कसा ? हा तर तो बस स्टॉप वरचा भिकारी मुलगा आहे  ... नाही नाही भिकारी नाही पण हा तर तोच मुलगा आहे ..इथे कसा पण ? आणि याची ती आई कुठे आहे ? जी खूप चिंतेमध्ये होती ...असे बरेच प्रश्न ती स्वतःच स्वतःला विचारत असते ... तितक्यात तो मुलगा पुन्हा म्हणाला ... ," " ताई काय झाल ? तुम्हाला काही हवं आहे का ? " तिला समजलं होत की याने तर मला नाही ओळखलं! हा आणि का ओळखणार ! 

ती म्हणाली , " काही नाही बाळा ! काही नको !  तू इथे कसा ? इथेच राहतोस का ? " तो छान चेहऱ्यावर हास्य देवून म्हणाला , हो ! मी इथेच राहतो ... सुहाला असं वाटल याला नक्कीच घर नसावं म्हणून हा आई सोबत इथे आला असावा ! ती पुढे म्हणाली.. बरं..बाळा तुझी आई कुठे आहे ? दिसत नाही कुठे? तो म्हणाला, आई.. आई...( थोडा गोंधळून गेला होता ..) ती म्हणाली , हो तुझी आई ..कुठे आहे..इथे दिसली नाही.. 

तो म्हणाला ...आई इथे नसते ...आणि शांत झाला !

सुहा आता इतक्यात शांत बसणारी मुलगी नव्हती..ती म्हणाली , म्हणजे इथे नसते म्हणजे कुठे असते ...

तो काही बोलणार तितक्यात एक पुजारी बाहेर आला ...आणि म्हणाला .." ओम! इथे काय करतोयस....चल लवकर घरी .... ! तुझी आई वाट बघते आहे...

तुझी आई ? मग हा मला असं का म्हणाला ?  नक्की काय आहे यांचं?

आणि तो माणूस तर ओम ला घेऊन गेला पण सुहासाठी बरेच प्रश्न सोडून गेला ......