Miss'tery - 1 in Marathi Thriller by lekhani books and stories PDF | Miss'tery - भाग 1

The Author
Featured Books
Categories
Share

Miss'tery - भाग 1

" ब्रेकिंग न्यूस "
"असे कळले आहे कि, भारतातील आसाम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, करणाटका या राज्यांमधून कित्येक मुली,बायका, छोटी मुलं ही सगळी बेपत्ता असल्याचे समोर येत आहे.ही सगळी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलीस लोकांनी काही शोध वैगरे घेतला का नाही याचा सवाल आता पूर्ण भारत करत आहे.
बेपत्ता असलेली काही जने ही गरीब कुटुंबातली आहे, काही श्रीमंत घराण्याची आहेत आणि काही सामान्य घरातली आहेत.प्रॉपर कोणाला टार्गेट करण्यात आले का नाही हे सध्या अस्पष्ट.या लोकांचे काय केले जाते हे अद्याप माहिती नाही.हे कोन्ही केले याचा शोध अजून घेतला गेला नाहीये.....". टीव्ही बंद करत इन्स्पेक्टर आरोही सरपोतदार सोफ्यावर आडवी झाली . या सगळ्या मीडिया प्रकरणामुळे पोलीस बिनाफुकट बदनाम होत आहे असे तिला वाटले.

पण माळेचे मणी हे सारखे नसतात हे तिला ही माहित होते. तिचे डोके दुखत होते आणि सध्या या केस मुळे पास्ट ट्रौमा मधनं ती चालली होती. ह्यासाठी तीची psychic healer and consultant मिस.दुर्गा भोंसले ह्यांच्याकडे अपॉइंटमेंट नेहमी असायची आणि त्या आरोहीच्या बालपणीच्या मैत्रीण होत्या. म्हणून या दोघींची ओळख खूप जुनी आणि घट्ट अशी होती.

तिचा फोन वाजू लागला. तिने पाहिले कि इन्स्पेक्टर.अभय शिर्के जे तिचे सिनियर देखील आहेत यांचा फोन होता.तिने लगेच उचलला." जय हिंद सर. आपला फोन आज मला का? पोलिस स्टेशन ला सगळे ठीक आहे का?" 

" जी इन्स्पेक्टर. आरोही सरपोतदार. सध्यातरी मीडियाची रेड पडली नाहीये. पण आपण जास्त वेळ शांत नाही बसू शकत. आपल्याला ही केस हाती घ्यावीच लागेल. मीडियाची जर एकदा रेड पडली तर मग आपली पोस्टिंग होईल दुसरीकडे, आणि मला हे नको आहे.आपण उद्या भेटूया आणि या केस वर चर्चा करूया. उद्या 8 वाजे पर्यंत रिपोर्ट व्हा आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांना ही सांगा. "

" ओके सर. Have a good day". आणि तिने फोन ठेवला. उद्या तिचा सुट्टी घ्यायचा विचार होता;पण आता उद्या जाने गरजेचे ठरले.पाहिले तिने त्यांच्या कॉमन ग्रुप वर सिनियरचा मेसेज फॉरवर्ड केला आणि तिने लगेच जेऊन घेतले. घरातले सगळे कामे आवरली.

आपल्या बेडरूम मध्ये गेली. Skincare केले. दुर्गा ला फोन लावला.पहिले फक्त रिंग गेली तिने उचलला नाही. दुसऱ्यांदा पुन्हा केला तेव्हा तिने उचलले.

" हा बोल ना गं आरु, काय झाले? एवढ्या रात्री का फोन केलास. सगळे ठीक आहे ना गं. Any problem? " 
" हो अगं सगळे ठीक आहे. Don't worry😊. मी एवढेच सांगायला फोन केलता कि उद्या मला तुझ्याकडे यायला जमणार नाही. " 
" का गं काय झालं अचानक? 🤨" 
" अगं उद्या ड्युटी लगली आहे मला आणि लवकर देखील बोलावले आहे माझ्या सिनियर ने. "
" ठीके, पण मेडिटेशन विसरू नकोस. तो कर. आणि आज पण झोपायच्या अगोदर योग निद्रा कर. म्हणजे शांततेत झोपशील. आजची न्यूस मी पण ऐकली. बेशख ह्या मुळे तुझा पास्ट ट्रौमा वर आला असणार तुझा. पण डोन्ट वरी यू विल tackle इट "😉
"😊 हो. तु आहेस तर मग नक्कीच होईल."
" चल तु झोप.मी जरा कामात व्यस्त आहे . बाय, शुभ रात्री "
" शुभ रात्री 😊"

तिने फोन ठेवला आणि योग निद्रा करून झोपी गेली..
इथे दुर्गा आरोहीच्या काळजीत होती. " बिचारीला किती काय काय सहन कराव लागतंय. " 😏
देवाच्या मूर्ती समोर तिने हात जोडले आणि प्रार्थना केली. " देवा, हिच्या आयुष्यातून सगळे दुःख काढून टाक रे. आणि त्या हरामखोरांना चांगलीच शिक्षा दे आणि माझे काम पण चोख होउदे."😏😁. हात जोडून नमस्कार केला आणि आपल्या कामात  गुंतली.


Someone's pov
*********** 
" आह ssssssssss.." कोणीतरी वेदनेत ओरडले.
" सोड मला. नको मारुस. मी साधे फक्त सांगितलेले काम केले. बाकी माझा काही दोष नाही यात. " तो ओरडू लागला.
"अश्या कामाला तुसाधा म्हणतोस. 😠 लाजा विकल्या तुम्ही सगळ्यांनी पैश्यासाठी. एवढी चांगली घराणे आहेत तुमची तरी कसं काय तुम्हाला आणखी पैश्याची हवस...... तुम्ही हरामखोर तडपून तडपून मरण्याच्याच लायकीचे आहात."आणि त्या व्यक्तीने समोर असलेले १० ही जणांला गोळी मारून या जगातून बरखास्त केले...

त्यांच्या रक्ताने तिचा १० टक्के बदला पूर्ण झाला होता.
शैतानी हास्य तिच्या ओठांवर होते.
तिने फोन काढून तिच्या मॅनेजर ला कॉल केला. Only trusted manager.
" हॅलो, बेसमेंट मध्ये लगेच १० पोते पाठवा  " 
" जी लगेच पाठवतो. कश्यासाठी हवी आहेत? " 
" पिसाळलेल्या कुत्र्यांला नुकताच मोक्ष प्राप्त झाला आहे. त्यांच्या बॉडी ठिकाणी नको का लावायला.."Smirk😏 होता चेहऱ्यावर.
" जी.मग पाठवायलाच हवं😏,आणि टेम्पोही पाठवतो. यात्रेला जाऊया 😈" 
" आता कसे बोललात.😏 लवकर पाठवा 😉"
तिने फोन ठेवला.डोळ्यातनं अश्रू बाहेर आला.

लगेच पोती आणि टेम्पो दोन्ही हाजीर झाले. तिने पटापट त्या सगळ्या बॉडी भरल्या टेम्पोत लोड केले आणि घेऊन गेली ठिकाणी लावायला.


**********
.......... " त -ताई, मला वाचव... 😭😭😭😭.आहssssss 😫😫😫😫😫😫"
" ए हरामखोराssssss,सोड तिला, नाहीतर तुझा खरं नाही 😠😠😠"ती करड्या आवाजात म्हणाली."
एक पुरुष तिथून व्यंगात्मक हसत त्या मुलीच्या जवळ आला. तिला खुर्चीवर बांधले होते. पण उसळता लाव्हा होता.

तिच्या चेहऱ्यावरून अगदी घाणेरडा स्पर्श करत तो हात फिरवत होता.
" babygirl, sorry but i can't stop. U know it's just pleasing and too satisfying for me to see you and your whole family in pain. 😈"

त्याचा हात चेहऱ्याच्या झटक्याने झटकत, त्याच्या डोळ्यात डोळा घालत, गोळीबारा सारखे शब्द तिच्या तोंडून निसटले. " तुला मी सोडणार नाही उमेश, यू विल रेगरेट इट. तुला माझ्याशी बदला घ्यायचा होता ना मग घे ना. यू आर कॉवर्ड, आ बिग कॉवर्ड. माझ्या परिवाराला का ह्यात ढकलतो आहेस.त्यांची काही चूक नसताना."

" कारण मला तुला खूप त्रास द्यायचा आहे especially. U know it's my job too. And my revenge too.आता बघच तुझ्यासामोर रक्ताचा खेळ कसा मांडतो. "😈 तो लगेच गेला आणि तिच्या आई बाबांला, बहिणीला चाकूने मारून टाकले..... 🥀

" नाही ssssssssssssssss"😱😱. तिच्या रक्तबंबाळ झालेल्या निष्प्राण कुटुंबाला बघून ती ढसाढसा रडू लागली. अजून त्रास व्हावा म्हणून त्याने तिची गाठ खोलाली आणि ती तिच्या कुटुंबाच्या दिशेने पळू लागली. तो मुलगा केव्हाच हे तृप्त करणारे दृश्य बघून पळून गेला.

ती त्या निष्प्राण मुर्त्यांजवळ आली. खाली गुडघ्यावर आपटून बसली.त्या तिघांच्या चेहऱ्या वरून हात फिरवू लागली. त्यांला हलवू लागली. " आई -बाबा उठा ना 🥺🥺 तुमच्या मुलीकडे ब-बघाना. प्लीज आई बाबा उठाना."त्यांचा हात आपल्या गालाशी फिरवीत त्याला कवटाळीत ती म्हणाली.😫😫😭😭. "ए मिनू तु तरी उठ ना गं. 🥺बघ ना तुझ्या ताई कडे. तिला हाक मार ना गं एकदा.
ए -ए मिनू उ - उठ ना गं 😫😫🥺😭😭". ती ढसा ढसा रडू लागली.

तिथल्या सगळ्या भिंती हे सगळे निमूटपणे ऐकत होते. तिला आसरा द्यायचा होता पण भक्कम बुरुजेच कोसळली होती......
शेवटी तिच्या तोडून एकच चित्कारा सुटला
"aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa........." आणि दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळू लागला.फक्त वेदनेच्या किंकाळ्या त्या रूम मध्ये ऐकू येत होत्या.काय पाप केले कि हा असं दिवस बघावा लागला हे तिचे प्रत्येक अश्रू देवाला जाब विचारात होते.हा तिचा सर्वात काळा दिवस ठरला होता.आपला हृदयच कोणी काढून नेले असे वाटले होते. 🥀💔

रसिक वाचकोहो, कथा कशी आहे नक्की सांगा, आवडली तर rate करा. पुढील भाग येत राहतील 😊