*******
" काम झाले का? "
" yess झाले.. आता उद्या पुन्हा धमाका भेटणार आहे 😂"
" yess. I was waitng for it so long.. Waiting for the surprise 😂😂" आणि फोन ठेवला..
"उलटा टाइम सुरु झाला आहे हरामखोरांना 😏.... बोट तुम्ही दिले नाही पण मी पकडले..... हळू हळू पूर्ण खानदान धरून खेचून त्याचा परदाफाश करेल 😂😂😂😂.". ती व्यक्ती शैतानासारखी हसली...
काहीतरी नक्कीच मोठा डाव साधला गेला होता..
सगळे लवकर उठले होते.. नवीन ऑफिसर काही वेळेतच तिथे येणार होती.... सगळे जण त्यांच्या स्वागताची तयारी करत होते...
काही वेळातच त्यांची गाडी क्लिनिक जवळ आली.. सगळे उत्सुकतेने वाट बघत होते..
गाडीतून एक शरीरयष्टी दिसायला नाजूक.. पण चेहऱ्याने चलाख,कपड्यांनी फॅशनेबल, सुगंधाने श्रीमंत असणारी स्त्री मूर्ती उतरताना दिसली... सगळे त्या चर्येला बघून थक्क होते.. अभय तर बघतच राहिला होता... 😳
दुर्गा सामोरे आली आणि तिला ओवाळले.."खूप छान आणि bossy वाटत आहात तुम्ही. तुमचे स्वागत आहे. 😊"
ती होती IG. नियती देशमुख.... One of the renowned police officers for crime scenes and intelligence.
दुर्गा आणि आरोही तिला आत घेऊन गेल्या..
" माल चांगला आहे 😏याला फस्त करायला मज्जा येईल... बॉस ला हिच्याबद्धल सांगितले पाहिजे 😄😏".. वाईट विचारांची एक सर येऊन गेली कोणाच्यातरी....
दुर्गाने नियतीला चहा आणि भाकरवड्या खायला दिल्या....
पहिले लाजत होती पण... दुर्गाने आग्रह केला म्हणून मग तिने घेतले..
" अहो 🤭, किती लाजाळू आहात तुम्ही... वाटत नाही तुम्ही तश्या 😄.. ". आरोही मनातले बोलून गेली.
" अहो ते ड्युटी मध्ये... असे personally भेटला तर मी अशीच दिसेल.. 🤭. आणि तुम्ही दोघी मला अहो जाहो करू नका... मी लहान आहे तुमच्याहून.. नावानेच हाक मारा.. "
" आम्ही वयाने मोठ्या आहोत. पण कर्माने नाही 😊. तुमचा मान तुम्हाला मिळायलाच हवा. 😊"
" बाहेर ठीक आहे पण घरी नको. Please 😙"
दोघी पर पाघळल्या.. त्यांनी मान डोलावली...
शुभम आत आला.. त्याला आरोही ने प्रश्न केला.. " अभय कुठे आहेत..? "
"तो अंगणात फोन वर बोलत आहे कोणाशी तरी. येईलच म्हणला." दुर्गा गंभीर झाली होती पण चेहऱ्यावर ते दिसत नव्हते...
" तुम्ही बोला मी आलेच त्या माकडाला बोलवून.😉". सगळे हसले..
दुर्गा अंगणाच्या दिशेने वळली... चेहऱ्यावर साफ गंभीर भावना उमटली होती.. जसे कि तिला तो काय बोलतोय हे सगळे ऐकू येत होते...
अभयला कोणीतरी येण्याची चाहूल लागली होती... त्याने लगेच गोष्ट पालटली..
"आई, डाव्या बाजूला वळलीस कि बघ तुला तिथे तळा दिसेल.. त्याच्या आत म्हणतात कि सोने लपलेले आहे..
आणि उजवीकडे वळलीस कि फार्म हौस दिसेल... तिथे गहू चाळण्याचे काम होते... चांगले गहू निवड 😊ठीके चल मी ठेवतो... 😊" आणि त्याने फोन ठेवला. मागे वळला तर त्याने पाहिले कि दुर्गा मागेच उभी होती...
" काय गं, इथे काय करतेस? "
" मी बोलवायलाच आलते.. तु कोणाला फार्म हौस चा पत्ता सांगत होतास आणि काय म्हणत होतास ते... अं... हा तळा.. त्यात लपलेले सोने..? "अभय ला वाटलेच होते कि ही असे विचारेल..
" अगं माझी आई होती... पुण्यात एक छोटेसे ठिकाण आहे.. तिथे फार्म हौस आणि समोर तळा आहे.. तर तिथला मालक असं म्हणला कि तिथे कदाचित सोने लपलेले आहे... आणि आम्ही त्या मालकाकडून नेहमी गहू नेहतो.. त्याचे गहू खूप चांगले आहे "
" अच्छा. चल तुला बोलावले आहे ". दुर्गा तिथून निघून गेली..
" हिला माझ्यावर संशय आलेला दिसतो आहे.. जपून राहायला हवे..पण जरी तिला कळले तरी काय नाय.. तोंड उघडायच्या आतच तोंडात गोमूत्र आणि कडुनिंबाचे पान घालेल.. 😂😂😂"तो हसला.
" चला आत जाऊया. 😏नाहीतर येईल ती पुन्हा... चौकशी करायला..". अभय आत निघून गेला.
सगळे गप्पा मारत होते... दुर्गाच्या चेहऱ्यावर राग होता त्याच्या प्रति.त्याने विचारले " एवढ्या रागाने का बघतेस माझ्याकडे 🤨?".
"विचार करते कि... तुला कोणी थोबाडीत का नाही मारत "
तो गोंधळला.." का? "
" कारण स्वतःची भांडी आणि उरलेले खरकटक तु ठिकाणी नाही लावलेस 😑". त्याच्या लक्षात आले." मी दुसराच विचार करत होतो. " हळूच बोलला..
" सॉरी करतो सगळे मी.. बस? "आणि तो निघून गेला..
" जीव घेता आला असता तर घेतला असता ". मनातच दुर्गा बोलली." आयुष्यातले पण खरकटे साफ करता आले पाहिजे याला. "She smirked 😏..
अभय आपले काम उरकून आला आणि बसला...
तो ही गप्पा मारायला लागला.. आरोही एका कोपऱ्यात बसून न्यूस बघत होती.. तिचे डोळे न्यूस ऐकून मोठे झाले...
ती धावतच त्या तिघां जवळ आली. सगळे चकित होतेकी काय झाले.. " आरोही धावत का आलीस?".त्यानी चिंतेत विचारले..
" ही न्यूस ऐका पाहिले.. चकित करणारीच आहे" तिने न्यूस दाखवली..
सगळे कान देऊन ऐकत होते.. काहीतरी खूप महत्वाचे असणार हे त्यांला कळले होते...
" ब्रेकिंग न्यूस
नुकतीच एक जबरदस्त बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी हरवलेले सगळे victims हे पुन्हा सुखरूप सापडले गेले आहेत. प्रत्येक जण आपल्या परिवाराला सुखरूप जाऊन एकरूप झालेत..
आनंदश्रू साजरे केले जात आहेत.
" उशीर झाला असता तर विकले गेलो असतो " हे हृदय पिळवटून टाकणारे वाक्य त्या प्रत्येक मनाला भिडते..
प्रत्येक जण'Miss'tery चे खूप कौतुक करत आहेत..
" ' Miss'tery मुळेच आम्ही वाचलो, आम्हाला सुखरूप तिने परतावले हे आमचे भाग्य होते. नक्कीच काहीतरी मोठा कर्म मागच्या जन्मी केला असेल कि ती आमच्यासाठी धावून आली.. आमची दुःख समजली.. देवा हिला नेहमी सुखरूप ठेव 🙏 कोणाची नजर ना लागो "
प्रत्येक जण हेच बोलत आहेत.'Miss' tery चे खूप उपकार आहेत आमच्यावर हे प्रत्येकाचे मत आहे..
आता फक्त mastermind शोधण्याचे बाकी राहिले आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे का नाही माहीत नाही. पण लवकरात लवकर शोध घेणे गरजेचे आहे"
सगळे जण शॉक मध्ये होते. कोणाला काहीच कळत नव्हते.
दुर्गा धीरगांभीर झाली होती..
पण नियतीच्या चेहरा स्मित हास्य झळकत होता.कोणी बघत नाही असे कदाचित तिला वाटले असेल. पण अभयचे तिच्याकडे लक्ष होते. त्याला संशय आला होता.
" ही एवढी का हसत आहे. नक्कीच काहीतरी गुपित आहे. हिला नजरेत ठेवले पाहिजे. हिच्या जवळ व्हायला लागेल म्हणजे कळेल कोण आणि काय आहे ही 🤨".
****************-**
" 😂😂😂आता फक्त ते तीन मूर्ख राहिले आहेत. पण त्यांला लवकरच पकडेल मी.. पण आधी त्यांला ही सगळी माहिती पुरवणारे पण भेटले पाहिजे..
पण तरी पहिले मालिक मग नौकर 🤭😁😁"
" चला. ही एक जबादारी सुटली 😊 आता राहिले फक्त त्या तिघांला पकडायचे. लवकरच होईल म्हणा ते. 😊"शुभम मनाचे बोलला.
"अगदी बरोबर बोललात sir 😊 आपण आज काहीतरी गोड करूया. चतुर्थी आहे आणि एवढे चांगले कार्य आज घडले. देवाचे आभार मानुयात काय गं दुर्गा. काय म्हणतेस?"
दुर्गा हाव भाव नसलेल्या चेहऱ्याने बघत होती. ती विचार करत होती का काय माहित नाही.
आरोहीने तिला हलवले. दुर्गा भानावर आली.
" अं-.. बोल ना "
" अगं आम्ही बोलत होतो कि आज गोड करूया काहीतरी ".
" हो चालेल कि 😊 शेवटी चांगली बातमी आहेत ही 😊"
*****************
" ohhhhhhhh gooodddddddd. What the heck is this? "
कथा आवडली तर नक्की rate करा आणि छान reviews
द्या 😊