Naate Janmapalikdache in Marathi Love Stories by lekhani books and stories PDF | नाते जन्मापलिकडचे - भाग 7

The Author
Featured Books
Categories
Share

नाते जन्मापलिकडचे - भाग 7

"नौटंकी, हिला बरोबर माहिती आहे कि मी तिला भलं मोठं lecture देईल ह्यावरून, म्हणून अशी नाटकं करतेय 🤭" गालातच ती हसली.

"चला आता बाहेर जायचं आहे. खरं सांगायचं गेले तर धास्ती वाढतेय हृदयात. माझं काय होणार आहे माहित नाही." निश्वास टाकत ती बाहेर गेली.

दोघीही बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये पधारल्या. दोघीही एकी मेकीला बघून थक्क होत्या.
यधण्या ने ताजा हिरव्या रंगाची नऊवारी नेहसली होती,काठ चंदेरी आणि त्याला राणी पिंक ची बॉर्डर. गळा मस्त सोनेरी ठुशी आणि आणि नाजूक पेंडंट ने सजलेलं. नाकाशी प्रेस वाली नथ,कानात  छोटे सोनेरी झूमके, हातात हिरव्या बांगड्या आणि चेहऱ्यावर ती चंचलता! नजरेत आपल्या bestie प्रति माया.

तिथेच दुसरीकडे वैदेही भगव्या रंगाची,प्रुशियन निळा ज्यावर अगदी सुरेख बारीक नक्षीकाम असलेली नऊवारी. गळ्यात डायमंड चा हार आणि नाजूक मोत्यांची ठुशी. नाकात तिच्या आईची सोन्याची नथ आणि कानात छोटे झूमके. हातात हिरव्या बांगडयासह सोनेरी रंगाचे चार कडे,कंबरेत कमरपट्टा. चेहऱ्यावर सुखावणारी शांतता आणि आश्वासन देणारी तिची smile, आणि आपल्या bestie प्रति अभिमान तर आहेच.

त्या दोघी एकीमेकीला थक्क होऊन पाहत होत्या.वैदेही पटकन जवळ आली. यधण्याचे हात हातात घेत, तिला पूर्ण न्याहाळत उद्गारली 
"खूप सुंदर दिसतेस गं.. माझीच नको नजर लागायला "काटकन बोटं तिने मोडली.
"पण 😏, मुलांपेक्षा माझं नशीब जास्त चांगलं आहे, कारण अप्सरेचं दर्शन मला पहिले घडले 😌. "अभिमानाने मान उंचावत ती म्हणली.

"ए गप गं, तुझं आपलं काहीतरीच "लाजत ती म्हणाली. वैदेही खुलून हसली.

"माझ्यावर लट्टू होण्या अगोदर पहिले स्वतःकडे बघ. सुंदर तर ऑलरेडी दिसतेस पण ती तुझी गोड smile 😘, भाई किती गोड हसतेस गं तू.. कोण कसं राहील थाऱ्यावर तुझी ती smile बघून गं 🤌✨पोरगा असती तर तुला propose केलं असतं पहिले, पण माझं दुर्दैव 😩"वैदेही आपलं लाजणं लपवायचं प्रयत्न करत होती. पण ते काही लपले नाही. यधण्या ने ते पकडले.

"हं हं, राहूदे हा, लाजणं लपवू नकोस. मला पण त्याचं दर्शन घडू दे "शेवटी वैदेही पण लाजून हसली.
"बस झालं आपलं, फोटो घेऊया आपण? नंतर मग हॉल मध्ये जाऊ "यधण्या ने मान हलवली.

त्या दोघींनी एकी मेकीचे छान फोटो घेतले, इतर मैत्रिणीसोबत सेल्फी घेतल्या. तेवढ्यात वैदेही ची नजर शिव च्या आईकडे गेली. ती खुश झाली. म्हणायला गेले तर त्या दोघी एकी मेकीला ओळखत होत्या.

" काकू तुम्ही आमच्यासोबत फोटो काढणार? "
" हो चालेल ना "त्यांनी फोटो घेतला.
" छान दिसत आहात तुम्ही काकू☺️ "वैदेही म्हणाली.
"Thankyou, तुम्ही सगळ्या देखील खूप छान दिसत आहात 😊"त्यांचे आभार मनात वैदेहीने विचारले "काकू, शिव कुठे आहे?"

"अगं तो आहे घरी, काय झालं कि मला फेटा बांधायचा होता.. त्याला ही बांधायचाच आहे पण कसं आहे कि काका घरी नाहीत, ड्युटी वर गेलेत आणि मिली (त्यांची कुत्री ) घरी एकटी जास्त वेळ थांबू शकत नाही, तिच्यावर लक्ष ठेवायला लागते. म्हणून मग शिव घरी थांबलाय"

"अच्छा.. मग तो कधी पर्यंत येईल?"
"काका येतीलच थोड्या वेळात, मग येईल तो "
"चालेल ☺️" 
"तुम्ही परफॉर्म करणार आहात ना आज? "
"नाही, आम्ही काही ठरवले नव्हते "यधण्या बोलली. त्यावर काकू हलक्याचं खेळकर हसल्या.
"हो मी नृत्य सादर करणार आहे "वैदेही उत्साहाने म्हणाली 
"छान 😊" तेवढ्यात मागून त्यांना बोलावलं 
"मी येतेच, तयारी करायची आहे सगळे यायच्या अगोदर"असे म्हणून त्या निघून गेल्या.

"तेच म्हणले शिव अजून आला कसा नाही " यधण्या बोलली.
" येईल तो. तो पर्यंत "वैदेही फिल्मी style मध्ये म्हणाली 
"Hey pretty lady, you are looking beautiful as always, since i have gotten chance to express myself can i ask something "
" yes sure"
"Will you be my Valentine beautiful lady🙂‍↕️🫴"यधण्या पूर्ण लाल झाली. वैदेहीच्या दंडावर हलकच मारत ती म्हणाली.
"बाई बस गं 😳🫣🫣"दोघी हसत होत्या.तेवढ्यात एका काकूंनी त्यांला कामावर बोलावले. त्या निघून गेल्या.

तो पर्यंत शिव देखील हॉल मध्ये आला होता..
तिने अधून मधून चोरून बघायचा देखील प्रयत्न केला, पण जेव्हा केव्हा त्याची झलक बघण्यासाठी ती खटपटायची तेव्हा काही ना काहीतरी मध्ये येऊन तिच्या नजरेत अडथळा आणत असे.
अखेरीस सगळे सविस्तर उरकून तिने हॉल मध्ये प्रवेश केला.

तिने ते गोड हास्य तिच्या चेहऱ्यावर ठेवले. हळूच तिची चंद्रावळी शांत नजर शिवच्या दिशेने वळली......

पुढील काय होईल ह्या साठी वाचत राहा ✨
प्रतिक्रिया नक्की द्या. आणि आवडल्यास रेट किंवा सपोर्ट करा✨
लेखनविषयी सल्ल्यांसाठी मी नेहमी ओपन आहे..