Soubhagyavati Shapath - 3 in Hindi Drama by jayesh zomate books and stories PDF | सौभाग्याची शपथ - भाग 3

Featured Books
Categories
Share

सौभाग्याची शपथ - भाग 3

EPISODE 3   💫सौभाग्याची शपथ 💫

    

          माणसाचा भुतकाळ हा एका कोळ्याच्या जळमटासारखा असतो, कितीही विसरण्याचा प्रयत्न केला , किंवा नशीबातून कितीही साफ करायचं प्रयत्न केलं  तरी तो कधी ना कधी येऊन पुन्हा - त्याच जागी येऊन चिटकत बस्तान मांडतो -  

        आदीनचही तसंच होतं  - 6 वर्षापुर्वी ह्याच , ह्याच मुलीमुळे  त्याने भारत देश सोडलेला- तिला विसरण्यासाठी , तिची एक एक आठवण चेतनेतून घालवण्यासाठी   त्याने - ह्दयावर पाषाणाचे वार झेळलेले -   तब्बल  2:5 वर्ष अथक प्रयत्नाने तो तिला विसरलेला  - आज 6 वर्ष झालेली...- आदीन तिला कायमचा विसरलेला -    

        पण त्यासहितच प्रेम ही भावना सुद्धा त्याच्या मनातून मरुन गेलेली-  त्याने गेल्या 6 वर्षात ब्रम्हचर्यच पाळण केलेलं..

        पण 6 वर्षानंतर नियतीने- विलक्षण पद्धतीने त्या दोघांची पुन्हा भेट घडवलेली-  सर्वकाही अनपेक्षित वळण घेत  घडलेलं... 

        6 वर्ष ज्या मुलीला विसरायला लावली- जी भावना मारण्यासाठी त्याने ह्दय पाषाणी बनवलं - तिच भावना तिला पाहताच एका सेकंदात काळजात पुन्हा प्रगट झालेली...- तिला पाहताच त्याची कठोरता विरघळलेली ..-    

सकाळी 10:30 वाजता 

        राणधवा मेन्सन 


        उंच काळ लोखंडी गेट- त्यावर सोनेरी अक्षरांत लिहीलेलं -  Raandhva mansion  
गेटच्या दोन्ही बाजुला भव्य सिंहांच्या मुर्ती -  जणू आत येणा-याची परिक्षा घेतायत.. 

        गेटच्या पुढे समोर लांब , सरळ ड्राईव्हवे - दोन्ही बाजुला कट केलेलं - हिरवं गवत - 
        
दोन्ही बाजूला परफेक्ट कापलेली हिरवीगार झार्ड मध्ये मध्ये उंच फाउंटन पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात चमकतायत
मुख्खा इमारततीन मजली, पांढच्या संगमरवरी दगडात बांधलेली मोठे काचेचे पॅनेल्स.
बाल्कनींवर कोरीव रेलिंग,तर मध्यभागी मोठा घुमटरात्री लाईट्स लागल्यावर संपूर्ण मेंशन सोन्यासारखं चमकते. पोर्चमध्ये सहा उंच खांब- राजवाड्यासारखा प्रवेशद्वार

CCTV कैमेरे, सिक्युरिटी केबिनसगळे व्यवस्थित, शिस्तीत. हे घर फक्त श्रीमंतीचं नाही- तर सत्ता आणि प्रभावाचं प्रतीक आहे.
दूरून पाहिलं तरी कळतं-इथे राहणान्यांशी पंगा घ्यायचा नाही.

        
गेटसमोर दोन वॉचमन होते - त्यांनी 
भलं मोठं लोखंडी गेट हळूच उघडलं...-Range Rover हळू वेगात आत शिरली....

दोन्ही बाजूला उंच झाडं मध्ये लांब ड्राईव्हवे.
हवेलीच्या पोर्चमध्ये घरचे सगळेजण आदीनच्या स्वागतार्थ  उभे - होते.. गाडी पोर्चमध्ये थांबली..-  इंजिन बंद झालं.क्षणभर पूर्ण शांतता पसरली..

पोर्चमध्ये सर्वजन उभे होते - 

       सर्वात वर  पायऱ्यांवर आदीनचे वडील वीरेंद्रसिंह राणधवा वय  60  उभे होते -  -कडक चेहरा. डोळ्यांत अभिमान, शांत  पण प्रभावी व्यक्ती महत्व..

       गाडीपाशी सर्वात पुढे  - आदीनच्या आई म्हंणजेच माँ   संयमी, सन्मानित , घराचा आधार - सावित्रीदेवी राणधवा - वय 52  
आरतीचं धाळ हातात घेऊन डोळ्यांत पाणी.
सहा वर्षांनी मुलगा परत आलाय अश्या आवारात उभ्या होत्या -

आदीनचा  विवाहित मोठा भाऊ रणविरसिंह राणधवा - वय 38  स्थिर, जबाबदार - थोडा कठोर परंतू चेह-यावर थोडस स्मित .. त्याच्या वडीलांच्या बाजुला उभा होता - 

        त्याची बायको सध्या त्याच्या मुलीला 
घेऊन माहेरी गेलेली.

        
जरा दूर आदीनचे काका  उर्फ महेंद्रसिंह राणधवा - वय 50 बाहेरुन गोड आतून हिशोबी, खोटे आनंदीत भाव चेह-यावर ठेवून उभे होते..- 

        बाजुलाच त्यांची डीट्टो  जळकी कॉपी बायको -  कविता राणधवा - वय 46 मधाळ बोलणारी,  व तितकंच शकुनीसारख  डोकं चालवणारी - काकी .. 

       काका- काकी दोघांच्या बाजुला त्यांचा मुलगा  यशवर्धन राणधवा - वय 27 थोडा अहंकारी, आई-बापाची कार्बन कॉपी असा उभा होता. 

         व जरा बाजुला त्यांची मुलगी उभी होती- जी ह्या तिघांपेक्षा वेगळी चांगली म्हंणा हवं तर   - सान्वी राणधवा  वय 24 उभी होती. साधी निरिक्षक, मनाने खरंच गोड- मनमिळाऊ अशी सान्वी होती..-  

      काका - काकी, यश थोडे बाजूला उभे ही गच्चाल लोक  हात छातीवर घातलेले. डोळे बारीक करून सगळं मोजत पाहत होते..

काकांच्या नजरेतून मनात विचार -आला 

"सहा वर्षात खूप बदलला असेल  हा... पुन्हा सगळं त्याचंच होणार?" 
  त्यांच्या चेहऱ्यावर हलकी अस्वस्थता. नजर थेट गाडीवर होती..-

काकी काकांच्या शेजारी.

ओठांवर कृत्रिम हसू, पण डोळ्यांत नाराजी होती. 

ती हळू आवाजात काकांना म्हणली.."आता घरात सगळी सत्ता याच्याकडे जाईल."

काकांनी हलकीशी मान  हळवली...

        

बॉडीगार्ड  दरवाजा उघडून बाहेर आला - मग त्याने  आदीन बसलेला - तो दरवाजा उघडला..

आदिन हळकेच खाली उतरला...-.
परिपक्व, शांत , प्रभावी.

         सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्यापण पुढच्या क्षणी - तो गाडीच्या मागच्या दरवाज्यापाशी चालत गेला.-


        सर्वजन त्याच्या ह्या कृतीला न समजून पाहत होते -  काका , काकी  त्यांचा मुलगा यशवर्धन आपल्याला काय फरक पडत नाहीत - असे अविर्भावात आदीनची हालचाल पाहत होते..-  त्यांना वाटत होतं - बाहेर देशातून गिफ्ट वैगेरे आणल्या असतील.. 

        पण जो गिफ्ट तो आता काढणार होता - ते पाहून ह्या तिघा शकून्यांना चांगलाच सरप्राईज मिळणार होता - बरं !


    आदीनने दरवाजा उघडला -    तो दरवाज्यातून  पुढे झुकत गाडीच्या आत वाकला.....

आणि  दोन्ही हातांत त्या बेशुद्ध मुलीला  उचलत बाहेर काढ़ले.. - 

तोच पूर्ण पोर्चमध्ये प्रत्येकाच्या चेह-यावर धक्कादायक वीज कडाडली..- 

        आदीनच्या दोन्ही हातांत उचलून धरलेल्या त्या मुलीचा चेहरा पाहताच -


     सावित्रीदेवींच्या हातातली आरतीची थाळं हळली-  दिवा फडफड करत फडफडला व ठण, ठण  असा आवाज करत - आरतीच ताट खाली पडलं....-   

        गरागरा ताट फिरू लागलं- तांदूळ, हळद -कुंकू असतव्यस्थपणे  -खाली जमिनीवर पसरलं..- अशुभ घडलं. 

        सावित्रीबाईंची रियेक्शन अगदी तारक मेहता का उलटा चष्मामधील दया भाभी सारखी हे माँ माताजी वाली होती..- 

      धक्का बसल्यागत  आदीनचा  भाऊ एक पाऊल पुढे आला..-

काकांच्या डोळ्यांत चमक  आली..-"ही परत आली..." काकींच्या चेहऱ्यावरही आनंददायक भाव पसरले- कारण सुखातल्या  सुवासात - कळष पाहण म्हंणजे कवितादेवींना मेजवानी जी मिळालेली..-

वीरेंद्रसिंह कठोर आवाजात -
    "आदिन"  म्हंणाले.

        
पण  आदिनने त्यांच्याकडे न बघता पुढे चालू लागला..-  एक एक पायरी- ताठ पाठीने चढत  
कोणालाही न पाहता -तो वर वर जाऊ लागला.- 

     काका आणि काकी दोघांनी  एकमेकांकडे पाहायलं - व एका गालात क्प्टी हसले - जणू त्यांच्या मनात नवीन खेळ सुरू झाला असावा.


दोन्ही हातांत बेशुद्ध तिला - आदीन  मेंशनच्या आतल्या हॉलमध्ये घेऊन आला - 

भव्य, उंच छत. मध्ये मोठा क्रिस्टल झुंबर-
सोनसळी प्रकाश संपूर्ण हॉलमध्ये पसरलेला.
पांढ-या संगमरवरी फरशा ,भिंतींवर मोठी  पूर्वजांची तेलचित्र मधोमध रुंद, वळणदार जिना वर जातो. जिन्याच्या रेलिंगवर सोन्याची नक्षी. दोन्ही बाजूना लाग सोफासेट्स,
मध्यभागी काचेचा टैबल संपूर्ण घरात श्रीमंती..
पण त्या क्षणी फक्त ताण आणि शांतता

आदिन सरळ जिन्याकडे वळला.
तोच पुन्हा  आदीनच्या वडिलांचा  वीरेंद्रसिंह ह्यांचा करारी  आवाज घुमला-

" आदीन  ssss "
त्या आवाजाने आदीन क्षणभर थांबतो...

      तरुण होता - त्यावेळेस त्याला त्या आवाजातील जरब, कळत होती- त्या हाकेला तो घाबरत होता - त्याला लगाम बसत होती, पण आताचा आदीन वेगळा होता - त्याला आपण  काय करत आहोत ह्याची जाण होती..  

        त्याच्या वडीलांच्या वाक्यावर

तो जागीच थांबला -पण मागे वळला.. नाही

        आदीन तिला उचलून जिना चढतो.
त्याच्या बुटाच्या पावलांचा  टोक टोक आवाज संगमरवरी जिन्यावर घुमतो, खाली सगळे शांत.

कोणीही त्याला  थांबवत नाही- फक्त वर वर जाणारी त्याची आकृती पाहत राहतात..


सहा वर्षांनंतर मुलगा परत आलाय
पण आनंदाचा उत्साह नाही-
हवेत जड शांतता होती-
वडील  वीरेंद्रसिंह जरी बाहेरून शांत दिसत असले, तरु आतून अस्वस्थ दिसत होते..-
आईचा चेहरा काळजीने भरलेला मुलासाठी आणि त्या मुलीसाठीही.

भाऊ विचारात  होता -"ही परत कशी?"

काका परिस्थिती मोजत , आनंद घेत होते - शकूनी फैमिली ईज ऑन वे..- 

        सान्वी मात्र - तिच्या काकीला - म्हंणजे सावित्रीबाईंच्या जवळ येऊन त्यांना दोन्ही खांद्यांना पकडून उभी होती.

घरात नोकरचाकर हळू आवाजात बोलत होते..- कोणीही आनंदीत नव्हतं. जणू हवेलीला कळालेलं - आज काहीतरी मोठ घडणार आहे.

आदिनची रूम , मोठी मिनिमल पण रॉयल
डार्क दूड फर्निचर ,मोठी काचेची खिडकी.
भिंतीवर त्याच्या  6 वर्षाअगोदरच्या फोटो फ्रेम्स होत्या ..-

          आदीनने अलगद तिला बेडवर  ठेवलं...

       तोच उघड्या दरवाज्यातून घरातले डॉक्टर धावत आले - त्यांच्या मागून आदीनचा मोठा भाऊ रणविरसिंह, चुलत बहिण सान्वी - आई माँ  सावित्रीदेवी दुडुदुडु धावत  चालत आल्या -

        
        डॉक्टरांनी तिची  BP बैंक... नाडी तपासली -  मग काहीवेळाने तपासून म्हंणाले.

"मुलगी शॉकमध्ये आहे, पण काळजी करू नका , मी तिला इंजेक्शन दिलंय- लवकरच शुद्धीवर येईल..-  आणि ह्या मेडीसीन आहे. वेळेवर द्या, आणि  हळका आहार द्या - तिची बॉडी पावर खुप लॉ झालीये , असं वाटतंय दोन- तीन दिवस तरी उपाशी असावी!"  आदीन खिडकीजवळ उभा होता. 

        डॉक्टरांची ही माहीती ऐकताच , काळजी, भीती, चिंतेने त्याचा - चेहरा पछाड़ला..
परंतू - त्याने कसंतरी स्वत:वर कंट्रोल ठेवलं - त्याला सर्वाँना दाखवायचं नव्हतं , किंवा स्वत:लाच तो तसं दाखवत असावा ? की आपण तिची फिकिर ,काळजी करत नाही आहोत - आपल्याला काहीही फरक पडत नाहीये..- 

         परंतू   त्याच्या बोटांची घट्ट पकड सांगत होती..-  त्याला तिची काळजी आहे..-

आदीन सहा वर्षांत बदलला आहे-
हे  सगळ्यांना  जाणवत होतं.. -  

        नजरेत , वागण्यात एक रुबाब आलेला - समोरचा 1 मिनिट त्याच्याशी कसं बोलावं - आदबीने , प्रेमाने -  ह्याचंच विचार करेल- असा आदीनचा एटीट्यूड  झालेला..-  

    डॉक्टरांनी  त्यांची सुटकेस उचल्ली- 

        " डॉक्टर ! या  , मी सोडतो तुम्हाला..!"
आदीनचा मोठा भाऊ  रणविरसिंह म्हंटला.

        दोघेही खोलितून बाहेर निघुन गेले..-

    आदीनने - तिरकस नजरेने - पलंगावर निपचित बेशुद्ध अव्स्थेत पडलेल्या तिच्या चेह-याकडे पाहिलं - 

        मग नकळत नजर तिच्या - हातावर गेली- ज्या हातावर टैटूने  तिच नाव  लिहिलेलं..- 

      ❤adira  ...
     " आदीरा ssss !  " 

तिच्या नावाकडे पाहताच - आदीनने बंद  तोंडावाटे दात एकमेकांवर दाबले - त्याच्या कपाळावरचे स्नायू फुगले-   झटकन  तो मागे वळाला...

      त्याच्या अगदी समोरच  पाच पावळांवर ओळावलेल्या डोळ्यांनी - सावित्रीबाई उभ्या होत्या..-  

        थरथरत्या एका हाताने, त्यांनी  आदीनच्या एका गाळावर मायेने हात ठेवला .- हलकेच हात फिरवला..-  

        " मी ठिक आहे  माँ -  आज्जीची रुम कुठे आहे .....!"  आदीन थंड स्वरात म्हंणाला..

        त्यावर सावित्रीदेवींनी - फक्त हो करत मान हळवली-  व म्हंणाल्या. 

        " सान्वी!  बाळा तू ईथेच थांब, आम्ही आलोच .!"   

        त्यांच्या वाक्यावर सान्वीने फक्त हो काकी करत समजूतदारपणे मान हळवली..- 

     - सावित्रीदेवी प्रथम खोलितून बाहेर पडल्या- मग आदीनने एक कटाक्ष आदीरावर टाकला व तो ही खोलितून बाहेर पडला -..

               क्रमश : 
        

आदीरा - आदीन , ह्या दोघांचा 6 वर्षा अगोदरचा भुतकाळ नक्की  आहे तरी काय ? 
आदीनला तिच्याविषयी काळजीही आहे, आणि तेवढाच रागही..- 

        शकूणी काका- आणि काकी आता काही डाळ भात तर शिजवणार नाहीत ना ? या पाहू पुढच्या भागात.. !