Shevtacha Kshan books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 13



अगदी आनंदात मज्जा घेत घेत पाहिलं वर्ष कसं संपलं दोघांना कळलंही नाही..

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला गौरव आणि गार्गी barbeque मध्ये गेलेत.. गार्गीने त्यादिवशी मुद्दाम लॉंग, स्लीवलेस, स्किन टाईट onepiece घातला होता.. त्यावर हलकासा ड्रेसला साजेशा मेकअप.. ती खूपच वेगळी आणि stunning दिसत होती.. तिला बघून गौरव तर पुरता वेडा झाला होता..
barbeque मध्ये जायची गार्गीची कधीची इच्छा होती, पण कुठल्या तरी पर्वावर जाऊ यात अस तीच सुरू होत.. म्हणून मग लग्नाच्या वाढदिवशी गौरव तिला तिकडे घेऊन गेला.. तिथे त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे कळल्यावर तिथल्या वेटर नि केक आणला.. आणि सगळा त्यांचा स्टाफ गौरव आणि गार्गी भोवती जमा झालेत.. गार्गीला आधी कळलंच नाही पण केक वर happy anniversary लिहिलेलं बघून तिला कळलं.. त्यात लगेच त्या वेटर ने गौरव आणि गार्गीला उभे व्हायला सांगून केक कट करायला सांगितला एकाने विचारले फोटो काढायचे का?? गार्गीने लगेच मोबाइलचा कॅमेरा सुरू करून फोन त्याच्याकडे दिला.. आणि "कॉंग्रेच्युुलेशन्स अँड सेलिब्रेशन ..विष यु अ वेरी हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी...👏👏👏" अश्या सगळ्या स्टाफच्या गजरात केक कट केला.. गार्गीने आणि गौरवाने आधी एकमेकांना केक भरवला .. वेटरने ही पटापट त्यांचे छान फोटो काढून दिलेत.. मग नंतर तिने पटकन त्या केकचे तुकडे करून सगळ्यांना दिला.. अस celebration बघून गार्गीला खूप मस्त वाटलं.. ती आणखी खुश झाली होती.. दोघांचाही आजचा दिवस एकदम छान गेला होता..

गौरवच्या सोबत राहून गार्गीला वाटलं की ती आता प्रतिकला विसरली.. त्या भावना विसरली.. आणि आयुष्यात पुढे निघून आलीय..

गार्गीच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष झालं असेल.. एक दिवस आईशी बोलताना सहजच प्रतिकच्या आईवडिलांचा विषय निघाला, ते दोघे पुण्यात आले आहे अस आई सांगत होती.. कारण प्रतिकही पुण्यात राहत होता म्हणून त्याला भेटायला आले होते..

एकदा फोन करून "घरी या अस म्हणशील त्यांना.." आई म्हंटली..

" ठीक आहे" म्हणून गार्गीनेही फोन ठेवला..

प्रतिकचा विषय निघाला आणि तिला पुन्हा त्याची आठवण झाली.. नंतर मात्र ती थोडी अस्वस्थ झाली.. प्रतीक पुण्यात आहे मला माहिती पण नाही हा विचार तिला खात होता.. "पण असो मला काय करायचं त्यानेही सांगितलं नाही आणि मी पण तर विचारलं नाही, जाऊ दे.." म्हणून तिने लगेच तो विचार मनातून झटकला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.. गौरव ऑफिसमधून आला फ्रेश झाला आणि लगेच दोघांनीही जेवण करून घेतलं.. किचन आवरून थोडावेळ tv बघून गौरव झोपायला गेला, आज ऑफिस मध्ये जास्त काम असल्यामुळे तो थकला होता त्यामुळे त्याला लगेच झोप लागली.. पण गौरवी ला काही केल्या झोप येत नव्हती..

शेवटी ना राहून तिने फोन हातात घेतला आणि मेसेजेस बघत होती तिने बघितलं कधीतरी प्रतिकचा खूप जुना मेसेज आलेला होता hi असा पण हिने त्याला उघडून काही प्रतिक्रिया ना देत तसाच बंद केला त्यावेळी जरा घाईत असल्यामुळे नंतर बोलूयात असा विचार तिने केला होता पण नंतर पुन्हा मेसेज करायला विसरून गेली.. तिला थोडं अपराधी वाटलं.. बघितलं तर प्रतीक online दिसत होता.. तिने लगेच त्याला मेसेज पाठवला..

📱गार्गी - hi

📲 प्रतीक - hi, अरे वाह.. ओळख आहे तर.. आज कस काय माझी आठवण काढली??

📱गार्गी - हम्म.. मला टोमणे मारण्याचा तु एक चान्सही सोडत जाऊ नको.. सहज आली आठवण.. का येऊ नये का?? तू तर पूर्ण विसारलासच ना..

📲 प्रतीक - अस नाहीय.. मी मागे तुला मेसेज केला होता पण तुझ काही उत्तर आलं नाही.. म्हणून मला वाटलं की गौरव ला आवडत नसेल म्हणून तू बोलली नसावी..

📱गार्गी - नाही रे अस काहीच नाहीय.. त्याला माझ्या मित्रांपासून काहीच अडचण नाही.. खर तर तेव्हा माझीच चुकी होती.. मी थोडी घाईत असल्यामुळे नंतर बोलते असा विचार केला अन विसरून गेली..

📲 प्रतीक - हेच हेच... तू विसरली.. मी नाही..

📱गार्गी - बरं बाबा चुकी झाली.. sorry.. का शिक्षा देणार आहे आता??

📲 प्रतीक - हम्म .. ठीक आहे तशी तुला शिक्षा देण्याचा आता मला काही अधिकार नाही..

📱गार्गी - म्हणजे??

📲 प्रतीक - सोड जाऊ दे.. कस काय आठवण आली??

📱गार्गी - आई सांगत होती की काका काकू आलेत पुण्यात?? त्यांना माझ्याकडे बोलवायचं होतं..

📲 प्रतीक - हो आले होते पण आजच गेलेत , आताच त्यांना बसवूनच आलोय मी गाडीत..

📱गार्गी - ओहह.. अच्छा.. पुढच्या वेळी आले की सांग..

📲 प्रतीक - ठीक आहे..

📱गार्गी - आणि तू कधी आला पुण्यात?? कशासाठी?? मला आज माहिती होतंय की तू पुण्यात आहे..

📲 प्रतीक - तुला मेसेज केलेला ना तेव्हाच आलो.. खर तर तुला सांगायचं म्हणूनच मेसेज केला होता मी..

📱 गार्गी - ओहह .. म्हणजे बरेच दिवस झालेत..

📲प्रतीक - हो इथे एक एंट्रन्स एक्सामच्या तयारीसाठी आणि classes करण्यासाठी आलो होतो..

📱गार्गी - बरं , ये मग घरी कधी वेळ मिळेल तेव्हा..

📲 प्रतीक - हो बघेल..

📱 गार्गी - ठीक आहे.. चल बाय.. झोपते आता.. शुभ रात्री..

📲 प्रतीक - गुड night..😊 काळजी घे.. बाय..

त्याच्याशी बोलून ती जरा शांत झाली ... तोही अगदी तसाच बोलला जसा आधी बोलायचा.. निर्विकारपणे... गौरवच्या बाजूने पडताच त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिलाही तशीच झोप लागली..

-------------------------------------------------------


दुसऱ्या दिवशीही रात्री तसाच गौरव झोपला पण गार्गीला झोप येत नव्हती म्हणून तिने फोन हातात घेतला बघितलं तर प्रतीक ऑनलाइन होता.. तिने ना राहवून आजही एक मेसेेज केला..

📱गार्गी - hi, busy आहेस का??

त्याचही लगेच उत्तर आलं..

📲 प्रतीक - नाही ग बोल ना.. अजून पर्यंत तू जागी??

📱गार्गी - हो रे झोप येत नव्हती.. म्हणून फोन घेतला बघितलं तर तू ऑनलाइन दिसला.. म्हणून मग मेसेज केला..

📲 प्रतीक - अच्छा बोल कशी आहेस??

📱गार्गी - मी अगदी मजेत, तू कसा आहेस??

📲प्रतीक - मी ही ठीक आहे..

📱गार्गी - कशी सुरू आहे तुझी स्पर्धा परिक्षेची तयारी??

📲 प्रतीक - चालली आहे.. प्रयत्न करतोय.. पण तुला तर माहितीय ना मी किती बुद्धू आहे ते.. थोडा वेळ लागेल बहुतेक मला ..

📱गार्गी - काहीही काय बुद्धू वगैरे.. प्रयत्न कर नक्की होईलच.. गरजेचं आहे का एका प्रयत्नात पास होणं आणि तेच लोक हुशार असतात असही गरजेचं नाही.. अरे तू स्पर्धा परीक्षा देण्याची हिम्मत तरी दाखवतो.. माझी तर तयारी करायची पण हिम्मत होत नाही मी तर आधीच हात टेकून दिलेत..

📲 प्रतीक - तुला काय गरज आहे.. तु तशीच हुशार आहे आणि अहिक्षां पण चांगलं आहे तुला तर तसाच जॉब मिळेल..

📱गार्गी - अस काही नाहीये... अस असतं तर मी अजून घरीच बसलेली नसते..

📲प्रतीक - मिळेल ग नक्की.. तू पण प्रयत्न कर..

📱गार्गी - हम्म.. करते आहे रे मी प्रयत्न मिळेलच .. जाऊ दे ते..

आता पुढे काय बोलावे दोघांनाही कळत नव्हतं.. दोघेही कितीवेळ फोन हातात धरून तसेच बसले होते.. प्रतिकच्या मनात उलथापालथ होत होती.. त्याला काही सांगायचं होत तिला पण आता लग्न झालंय तिचं सांगावं का नाही म्हणून तो विचारात होता.. पण आजही नाही सांगितलं तर त्याच मन नेहमी असच अस्वस्थ राहील.. आणि एक सल त्याच्या हृदयात बोचत राहील..

इकडे गार्गीला त्याला ती लग्नाआधी दिवाळीच्या वेळेस पुण्यावरून परत आल्यानंतर अमीतकडून कळलेल्या तिच्या साखरपुड्यानंतर त्याच्यात झालेल्या बदलाचं कारण विचारायचं होतं.. पण ती ही तशीच शांत बसली.. आता विचारून काय उपयोग तसही म्हणून टाळत होती स्वतःला समजावत होती.. पण जर विचारलं नाही तर आपण नेहमी त्याच्याबाबतीत विचार करत राहू पण तो खरं खरं सांगेल का? तो खरा सांगू दे व खोटं तो जे सांगेल ते खरं मानून घे ना तू.. तुझ्या मनीची ही घालमेल तर कमी होईल.. ती ही तिच्याच विचारात होती तेवढ्यात प्रतीकचाच मेसेज आला..

📲 प्रतीक - झोपली का?? थोडस बोलायचं होतं..

📱गार्गी - बोल ना.. तुझ्याशी बोलताना मला कुठे झोप येणार आहे.. मला पण तुला काहीतरी विचारायचं आहे...

📲 प्रतीक - हो का.. बरं मग आधी तूच विचार...

📱 गार्गी - नाही तू बोल ना मी नंतर विचारेल..

📲 प्रतीक - हे बघ.. तू मी .. मी तू .. अस काही करू नको विचार तू आधी मग मी माझं सांगतो..

आता तिने ही जास्त ना लांबवता लगेच बोलायचं ठरवलं

📱गार्गी - ठीक आहे पण तू मला खरं खरं सांगशील आणि माझं झालं की तुझी गोष्ट सुदधा सांगशील, प्रॉमिस कर..

📲 प्रतीक - बरं.. ते ही सांगतो.. आणि खरं सांगतो.. प्रॉमिस..

📱गार्गी - तुला आठवते का मागच्या दिवाळीला तू मुंबईला गेला होता निशा ताईकडे तुला अमितने स्टेशनवर सोडलं होतं..

📲 प्रतीक - हो.. का ग?? त्याच काय??

📱गार्गी - त्याच दिवही मी पुण्यावरून तेव्हाच परत येणार होती .. पण मझिंगसी उशिरा आल्यामुळे आपली भेट दिली नव्हती..

📲 प्रतीक - हम्म..

📱गार्गी - त्यादिवशी अमितने मला सांगितलं होतं की तू माझ्या साखरपुड्यानंतर शांत आणि अबोल झाला होता आणि त्या रात्री तुझी तब्येतही बिघडली होती.. हे खरं आहे का??

📲 प्रतीक - अ .. हो खरं आहे हे..

📱 गार्गी - तो बोलला की कदाचित भविष्याचा ताण असावा.. पण मला तुझ्याकडून ऐकायचं की नेमकं काय झालं होतं तुला??

📲 प्रतीक - तुला काय वाटतं गार्गी??

📱गार्गी - मला त्यावेळेसच शंका आली होती थोडी, पण आज तुझ्याकडून कन्फर्म करायचंय.. सांग ना .. माझा साखरपुडा झाला ते तुला सहन झालं नव्हतं ना??

खरतर प्रतीक या प्रश्नाला सहज टाळू शकला असता पण आज त्यालाही काही सांगायचं होत आणि तिनेच विषय काढल्यामुळे त्याला ते सांगण सोपी गेलं असत.. तरीही त्याने टाळण्याचा एक प्रयत्न केलाच कारण या संभाषानंतर तिला त्रास होईल असं त्याला वाटत होतं..

प्रतीक - त्याला बरेच दिवस झालेत गार्गी, काय त्या जुन्या गोष्टी घेऊन बसते.. जाऊ दे ना.. आता तसही काय उपयोग आहे या सर्व गोष्टींचा...

गार्गी - हो उपयोग नाहीच आहे पण माझ्या मनाची शांती कर ना एकदा.. त्याची हुरहूर थांबावं ना..

प्रतीक - ठीक आहे.. तू म्हणते तर सांगतो..

आणि पुढे बराच वेळ प्रतीक लिहीत होता.. गार्गीला वाटलं एवढं काय लिहितोय.. त्यापेक्षा फोनवर बोलून घेते.. तिंने मेसेज केला

गार्गी - एवढं काय लिहितोय??

.. मेसेज वाचला पण उत्तर आलं नाही.. तिने पुन्हा मेसेज केला..

गार्गी - त्यापेक्षा फोनवर बोलायचं का??

तरीही उत्तर आलं नाही.. तीने परत एकदा मेसेज केला.. पण आता लिहिताना मधातच हिला कसे उत्तर देणार होता तो.. लिहिलेलं सगळं वाया गेला असता ना.. तरी तिने पुन्हा पाठवलंच..

गार्गी - मी कॉल करू का??

" टिंग टिंग टिंग टिंग" तिने कॉल करूनही बघितलं पण प्रतीकने फोन कट केला.. आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही म्हणून ती शांत बसली..

--------------------------------------------------------
क्रमशः