Last Moment - Part 6 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 6


मित्रमैत्रिणींच्या मस्तीमध्ये गार्गी सकाळची बाब विसरली होती...

पण रात्री जेव्हा गौरवचा फोन आला तेव्हा मात्र ती पुन्हा विचारात पडली, कसाबसा तिने फोन घेतला..

गौरव - हॅलो, गार्गी

गार्गी - हा, हॅलो बोल ना..

गौरव - झालं का जेवण?

गार्गी - हो आताच झालं.. तुझं??

गौरव - हो माझ ही आताच झालं...

गौरव अगदी मोकळेपणाने सगळ्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता.. सकाळच्या वाक्याबद्दल त्याने विषयही काढला नाही की तीच उत्तरही विचारलं नाही, गार्गी मात्र अजूनही अवघडल्यासारखीच बोलत होती..

गौरव - गार्गी काय झालं?? तू इतकी शांत का आहेस?? काही बोलत का नाहीय??

गार्गी - बोलते तर आहे ना..

गौरव - नाही तसं नाही.. जरा अवघडल्यासारखी वाटतेय, काय झालं?? कुणी आहे का तिथे??

गार्गी - नाही ते .. असच .. काही नाही.. कुणी नाही इथे.. काही झालं नाही.. तू बोल ना .. मी ऐकत आहे..

गौरव - गार्गी, तू मला सांगू शकतेस.. कुठली गोष्ट खटकते आहे तुला??

गार्गी - काही नाही रे असंच.. काही झालं नाहीय..

गौरव - ठीक आहे तुझी इच्छा तुला नाही सांगायचं तर.. पण काही तरी नक्की आहे.. असो.. तुला जेव्हा सांगावस वाटेल तेव्हा सांग..

गार्गी - काही नाही रे ते तू सकाळी बोलला ना शेवटी!!

गौरव - काय?? बाय??

गार्गी - नाही त्या आधी

गौरव - आय लव्ह यु??

गार्गी - हा तेच

गौरव - त्याच काय?? अग वाटलं म्हणून बोललो..

गार्गी - हो पण अस कसं तुला .. म्हणजे अगदी पहिल्याच फोन कॉल मध्ये.. i mean इतक्या लवकर.. असं..

गौरव - अग , त्यात काय लवकर ,उशिरा , मला खरच वाटलं ग म्हणून बोललो मी , मी असाच आहे जे मनात ते ओठांवर.. आणि हो तुला जर अस वाटत असेल की मी बोललो म्हणून तुला पण बोलावं लागेल वगैरे, तर तस काहीच नाही तू तुझा वेळ घे, मला माहिती आहे तुझ्यासाठी अस लगेच हे सगळं बोलणं शक्य नसावं किंवा अजून तुझ्या तश्या भावनाही नसतील.. अस गरजेचं तर नाही ना की मी प्रेम करतोय तर तू ही करावं.. ही तर बदल्याची भावना झाली ना.. प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळायलाच हवं नाही तर द्वेष करायचा, शंका घ्यायची... अस काही मला पटत नाही .. असही होऊ शकते की तुला माझ्याबद्दल सद्धे तसं काहीच वाटत नसावं.. गार्गी सहवासाने पण प्रेमाचे अंकुर रुजतात.. आता नाही पण जेव्हा आपण एकमेकांच्या सहवासात येऊ तेव्हा तुलाही हळूहळू प्रेम होईल कदाचित.. अस लगेच नाही होणार.. ठीक आहे... मी हे सगळं समजून घेऊ शकतो.. माझी काहीच बळजबरी नाहीय की मी बोललो तर तुही बोलच.. मी फक्त माझं सांगितलं.. आणि हे कसं झालं ? का झालं ? कधी झालं? इतक्या लवकर कसं झालं ?? तर ते मलाही माहिती नाही.. पण हे मात्र खरं आहे की माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या आहेत.. आणि प्लीज असा कुठला चुकीचा ग्रह करून घेऊ नकोस की मी उतावीळ आहे किंवा अजून काही.. अस काहीच नाहीय हं ..

गार्गी अगदी भारावून गेल्यासारखं गौरवच बोलणं ऐकत होती.. त्याच्या समजदार पणाच तिला खूप अप्रूप वाटलं..

गार्गी - किती छान बोलतोस रे तू.. तुझे विचार ऐकून खूप छान वाटलं, आणि मनावरचं खूप मोठं दडपण उतरलं.. दिवसभरापासून किती अस्वस्थ झाले होते मी उगाच.. पण एक प्रश्न आहेच..

गौरव - काय??

गार्गी - तुला तुझ्या या माझ्यावरचा प्रेमाच्या भावनांची जाणीव कधी झाली??

गौरव - अग, आजच सकाळी.. तू अखंड बोलत होती, माझ्यावर चिढली होती पण मला तुझा राग न येता तुझं ते बोलणं तसच ऐकत राहावंसं वाटत होतं.. आणि हे अस तुझ्याबद्दल वाटत असलेल्या प्रेमामुळेच होतं, हे कळायला मला वेळ लागला नाही.. तुला माहिती आहे गार्गी खरं तर तू मला आपल्या पहिल्याच भेटीत आवडली होती.. तुला बघितलं तेव्हाच तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटलं होतं मला पण तिथे सगळ्यांच लक्ष फक्त तुझ्या आणि माझ्याकडेच होत म्हणून मी स्वतःला सावरलं.. मग एकांतात तुझ्याशी बोलायला मिळालं तेव्हा तुझं लक्ष नव्हतं पण मी मन भरून फक्त तुला बघून घेतलं होतं.. आणि इकडे पुण्याला आल्यावर फेसबुकवरून तुझा फोटो घेतला आणि त्याच्या ४-५ प्रिंटेड कॉपीस करून आणल्या, सगळे विचारायचे मुलीचा फोटो दाखव म्हणून मग.. आणि त्यातली एक चूप चाप माझ्याजवळ लपवून ठेवली आणि बाकीच्या आईबाबांना दिल्यात.. तुझे काही फोटो मी माझ्या मोबाइलला मध्ये पण save करून ठेवले आहेत.. आपण प्रत्यक्षात बोलत नव्हतो पण मी रोज रात्री मनातल्या मनात तुझ्या फोटोशी बोलायचो.. तेव्हा तुझ्याबद्दलची ओढ जाणवली.. साखरपुड्यात भेटल्यावर अनोळखी व्यक्ती समजून तू अवघडलेली होती पण माझ्यासाठी मात्र तू तेव्हाही माझ्या अगदी जवळची होती.. तुला बघून अनोळखी किंवा परकेपणा मला कुठे जाणवतच नव्हता.. तुला आठवते त्यादिवशी अगदी अनाहूतपणे मी तुला सगळ्यांसमोर एक प्रश्न विचारला होता पण त्याच उत्तर मात्र तू अजूनही दिलेलं नाही हं..

गार्गी गौरवच्या या शेवटच्या वाक्यावर पुन्हा गडबडली..

गार्गी - अ.. ते.. खरं तर .. अस.. म्हणजे.. तेव्हा काय बोलू मला काही कळतच नव्हतं..

गौरव - ठीक आहे .. आता सांग मग..

गौरव उगाच तिची मजा घ्यायची म्हणून बोलत होता पण गार्गीची अवस्था मात्र..

गार्गी - अ.. अ... ते... म्हणजे.. मी..

गौरव मोठमोठ्याने हसू लागला.. आणि गार्गी चिढली

गार्गी - म्हणजे माझी मस्करी करत होता?? मी नाही बोलणार जा..

गौरव - अग ए वेडा बाई .. मी आताच बोललो ना तुला की तुला जेव्हा वाटेल तेव्हा उत्तर दे .. मला घाई नाही आहे.. बर .. जाऊ दे ते.. . सोड ना ग रुसवा.. so sorry.. बरं कान पकडून sorry..

त्याच्या अशा बोलण्यावर आता गार्गीला हसू आलं..

गार्गी - ठीक आहे.. बराच वेळ झालाय आपण बोलतोय, चला झोप आता.. बाय गुड नाईट..

गौरव - हम्म.. आज फोन ठेवावाच वाटत नाही आहे.. अss.. ठीक आहे ... गुड नाईट.. love you sweetheart..

गार्गी - गौरव प्लीज .. अस काही नको रे बोलत जाऊ..

गौरव - का?? तू नको बोलू पण मला तर एक्सप्रेस करू दे.. त्याला तू नाही नाही म्हणू शकत आणि माझ्या होणाऱ्या बायकोलाच बोलतोय ना काही चूक आहे का त्यात..

आता गार्गीला काय बोलावे कळत नव्हतं..

गार्गी - ठीक आहे.. जशी तुझी इच्छा.. 😊 चल बाय.😊😊 वेडा

गौरव - हम्म ... बाय..

आता गार्गी प्रतीकच्या विचारांतून बाहेर पडत होती.. याचा अर्थ ती प्रतिकला विसरली अस नाही.. प्रतीक तर तीच पाहिलं प्रेम आहे, ती त्याला विसरणं तिला कधी शक्यच नाही फक्त त्या भावना तिने कैद करून ठेवल्यात.. साक्षगंधानंतर तिने स्वतःला मोकळं केलं आणि पुन्हा एक नवं नातं जुळवण्याचा प्रयत्न करू लागली.. गौरव म्हणजेच तिचा होणार नवरा खूप समंजस, शांत होता.. आता गौरव आणि गार्गी फोनवर तासनतास गप्पा करू लागले.. एकमेकांना जाणून घेऊ लागले, त्यांच्या पूढील जीवनाचे सोबतीने स्वप्न रंगवू लागले... महिन्यातून एकदा तरी गौरव पुण्याहून गार्गीला भेटायला यायचा, तिच्यासोबत वेळ घालवायचा, कुठेताफी फिरायला जायचे किंवा मग कुठला चित्रपट बघायचे.... असेच जवळपास 3 महिने गेलेत.. आता गार्गीही हळूहळू त्याच्यात गुंतत चालली होती..

-------------------------------------------------------------------


क्रमशः