Shevtacha Kshan - 9 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 9




रात्री तिची जायची वेळ झाली पण गौरव मात्र अजूनही रुसलाच होता.. तिला त्याचा रुसवा कळत होता, पण मनवता आलं नाही.. सगळं आवरून दोघेही स्टेशन कडे निघाले.. तो तिला सोडायला जात होता.. जस जशी गाडीची वेळ जवळ येत होती गौरवची हुरहूर आणखी वाढत होती.. शेवटी त्याने आपला रुसवा सोडला आणि गार्गी सोबत बोलायला लागला.. त्याला वाटलं 'जेवढा वेळ आहे तो तरी निदान आनंदाने सोबत घालवावा आणि मी तिला अस रुसून बाय केलं तर तिला पण वाईट वाटेल' म्हणून तो शांत झाला आणि तिच्याशी बोलू लागला..

गौरव - गार्गी, नीट सांभाळून जा.. मला फोन करत राहा.. आणि पोचली की पण लगेच सांग, मी इकडे काळजी करतोय लक्षात असू देशील..

गार्गी - थँक्स गौरव, अरे मला नाही जमलं तुझा रुसवा घालवायला.. त्यासाठी सॉरी.. आणि हो मी करते तुला फोन.. पण जास्त काळजी नको करू मला सवय आहे एकटीने प्रवास करण्याची.. शांत झोप घे रात्री.. गाडीत रेंज कमी जास्त झाली आणि तुझा फोन लागला नाहीं तर घाबरू नको अजिबात..

गौरव - ठीक आहे.. आणि रुसवा यासाठी सोडला कारण इतका वेळ उगाच मी तुझ्याशी रुसवा धरून वाया घालवला.. रुसवा नसता धरला तर त्या वेळेच्याही आपण आपल्या गप्पांमधून चांगल्या आठवणी तयार करू शकलो असतो... आणि आता काहीच क्षण उरलेत मग तू निघून जाशील.. आणि उगाच मला वाईट वाटत राहील म्हणून..

गार्गी - ठीक आहे रे. तुझा हक्क आहे तो माझ्यावर रुसण्याचा..

गौरव - आणि तुझं कर्तव्य नाही का माझा रुसवा सोडवण्याचा..

गार्गी - आहे ना .. पण मला खरच माफ कर गौरव मला नाही रे हे सगळं जमणार.. तू समजून घे ना प्लीज..

गौरव - ठीक आहे माझी जान.. तुला हवं तसं.. तू तुझा वेळ घे.. माझच चुकतं कधीकधी.. तू इतक्या वेळा सांगूनही मी आज तुला समजून घेतलं नाही.. मी पण सॉरी..
पण तू आता जातेय ना मला खरच खूप वाईट वाटतंय ग..

गार्गी - ही ओढच आपल्याला जवळ आणेल गौरव.. थोडा धीर धर.. चल गाडीची अन्नोउन्समेंट झाली आपल्याला प्लॅटफॉर्मवर जायला हवं..

गौरव - गार्गी... प्लीज एकदा मिठीत घे ना ग ... प्लीज..

गौरव अगदी हळवा होत बोलला.. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून गार्गीलाही वाईट वाटलं.. आणि तिने पण लगेच त्याला मिठी मारली.. त्याच्या मिठीत तिला आज खरं प्रेम, दूर जाण्याचं दुःख, तिची काळजी जाणवत होती.. त्याने आपले डोळे गच्च मिटून घेतले होते... कसाबसा येणार हुंदका आवरला होता... गार्गीने हळूच मिठी सोडवली त्याला सावरलं आणि ते दोघेही प्लॅटफॉर्म कडे निघाले.. गाडी प्लेटफॉर्मवरून सूटेपर्यंत गौरवचे गार्गीला उपदेश सुरूच होते..

गार्गीची गाडी निघाली.. गौरव गाडीत येऊन तिच्या फोटोला बघून पुन्हा थोडा भावनिक होत बोलला " गार्गी खरच खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर.. अगदी वेडा झालोय बघ, पण तू कधी समजशील?? आणि तुझ्या प्रेमचीही तेवढ्याच आतुरतेने वाट बघतोय.. आपलं लग्न होणार आहे म्हणून तू माझी होशीलच पण मला तू अगदी मनापासून आपलं करावं अशी माझी इच्छा आहे.. मी वाट बघतोय .. " आणि तिच्या फोटो ला किस करत फोटो ठेऊन देतो... आणि गाडी घराच्या दिशेने वळवतो..

इकडे गार्गी तिच्या घरी फोन करून आणि गौरवच्या बाबांना पण फोन करून ती व्यवस्थित बसली आणि गाडी निघाल्याच कळविते..

गाडीत बसल्यानंतर गार्गी गौरवच्या आजच्या वागण्याचा विचार करत असते.. " एवढा कसा हळवा झाला आज गौरव.. खरच किती प्रेम करतो तो माझ्यावर.. आणि मी अजूनही अशी अलिप्त राहते.. माझं मन का हे मान्य करत नाही?? मला का प्रेम म्हंटल की प्रतीकच आठवतो.. मी खरच खूप प्रेम केलं होतं रे प्रतीक.. आज बघ मला पुढे जाताना किती त्रास होतोय.. तू अस का केलंस, काही कारण तरी द्यायचं ना रे.. तुझा रागही करू शकत नाही मी.. आज गौरव च प्रेम बघितलं तेव्हा कुठेतरी एक अपराधी पणाची जाणीव होत होती मला.. मी त्याला एवढं प्रेम देऊ शकेल का?? माझच मन मला प्रश्न करत होतं आणि माझ्याकडे काहीच उत्तर नाहीय.. गौरव खरच मी खूप नशीबवान आहे की तुझ्यासारखा इतकं प्रेम करणारा मुलगा माझा नवरा होणार आहे पण मी!! मी तुझ्या लायकीची आहे का रे?? मी पुढे जायचंय, आता तूच माझं आयुष्य आहेस म्हणून तुझ्यासोबतच जुळवून घ्यायचं आहे, तुझ्यातच गुंतून राहायचं आहे असा विचार करत होते.. पण तुझ्यावर प्रेमही करायचं आहे असा कधी विचारच केला नाही. आणि ते मी करू शकेल का नाही ते ही माहीत नाही.. गौरव तुझ्या प्रेमाला मी न्याय देऊ शकेल की नाही मला नाही माहिती?? मी काय करू?? मी काय करू?? " गाडीत बर्थवर झोपल्या झोपल्या तिच्या डोळ्यातून घळ घळ अश्रू गळायला लागलेत.. ती तिच्या भावनांपुढे खूप हतबल झाली होती.. तेवढ्यात गौरवच मेसेज आला..तिने डोळे पुसलेत आणि फोन घेऊन मेसेज वाचू लागली..

गौरव - हाय जान, पोचलो घरी आताच.. सगळे झोपले आहेत फोनवर बोलता येणार नाही, म्हणून मग मेसेज केला..

गार्गी - अच्छा.. ठीक आहे तू पण झोप आता.. मी अगदी व्यवस्थित आहे.. काळजी नको करू..

गौरव - तुला झोप येतेय का??

गार्गी - नाही , अजून नाही आली, गाणे ऐकत ऐकत झोपून जाईल..

गौरव - मग बोल ना मला पण झोप नाही आली.. बर सांग काय करत होती?? मला आठवत होती ना??

गार्गी - तू ना..!! हो रे तुझाच विचार करत होते..

गौरव - काय काय विचार केला मग?? लवकर लवकर सांग..

गार्गी - काहीच नाही.. तू ते नको विचारू.. आणि आता बोलत काय बसलाय झोप चल.. उगाच जागु नको, उद्या बोलू आपण.. हे अस मेसेज मध्ये बोलायचा कंटाळा आलाय मला आज..

गौरव - जशी आज्ञा राणीसरकार.. झोप मग..

गार्गी - हो गुड नाईट बाय..

गौरव - बाय.. गुड नाईट, हॅपी जर्नी..LU.. tc..

----------------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी पोचली आणि स्टेशनवर तिला अमित दिसला.. गार्गीचे वडील येणार होते तिला स्टेशनवर घ्यायला पण त्यांना काहीतरी महत्वाचं काम आलं तेवढ्यात त्यांना कळलं की अमित प्रतिकला सोडायला स्टेशनवर जातोय अमितला गार्गीच घर रस्त्यातच लागणार होतं त्यामुळे मग गार्गीच्या वडीलांंनी त्याला फोनकरून गार्गीला घेऊन ये म्हणून सांगितलं..

--------------------/---
क्रमशः