Last Moment - Part 3 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 3


थोडावेळणी प्रतिकही आला.. त्याला बघून गार्गीला तिच्याकडे लपून बघणारा प्रतीक आठवला आणि त्याची खेचायच्या उद्देशानी ती बोलली..

गार्गी - काय मग झालं का तुझं काम?? आणि चेहऱ्यावर का बारा वाजलेत??

गार्गीच लग्न करणार आहेत हे पचवणं प्रतिकला अवघड जात होतं.. आणि ते त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं..

प्रतीक - हो झालं.. ते आईला काम होतं तर घरी गेलो होतो.. आणि मला काय झालं चेहऱ्यावर बारा वाजायला.. मी तर खुशच आहे.. ( जरासा हसतच तो म्हणाला)

स्वतःला शक्य तितक नॉर्मल ठेवायचा तो प्रयत्न करत होता.. पण त्याचे डोळे इतके बोलके होते की गार्गी ते सहज वाचू शकत होती..

विवेक - गार्गी बघ तो तर त्याच्या नेहमीच्याच मूड मध्ये आहे कुठे नाराज दिसला तुला तो.. ते सोड तू कुठे गेली होती?? आम्ही ऐकलं तुझ्यासाठी मुलगा पसंत केला म्हणे काकूंनी?

अमित - ( अगदी उत्सुकतेने) काssय?? हो का.. अरे वाह... बघ मी म्हणालो होतो ना सकाळी, तुला नक्की कुणीतरी भेटून जाईल आज लग्नात..

आता मात्र गार्गीच चेहरा पाहण्यासारखा झाला होता..

गार्गी - ऐ, काहीही काय?? ते फक्त ओळख करून दिली ते नातेवाईक आहे मावशीचे म्हणून.. आणि तुम्हाला कुठून मिळतात रे असल्या खबरा..

आरव - आहेत आमचे खबरी जागो जागी पेरलेले..

गार्गी- अच्छा.. मग तुझी आई तुझी बोलणी करतेय ते नाही सांगितलं का त्यांनी..

आरव - ऐ , काहीतरीच काय?? मला न सांगता ती अस कस करेल..

गार्गी - खोटं वाटतंय तर जाऊन बघ.. आपल्या आयांच काही सांगता येते का?? जा बघून ये.

गार्गी त्याची गम्मत घेत होती पण तो मात्र पुरता घाबरला होता.. कारण या आई वगैरे केव्हा काय करतील सांगताच येत नव्हतं.. तो तसाच उठून त्याच्या आईकडे पळाला.. आणि इकडे सगळे त्याच्या या अवस्थेवर जोर जोरात हसत होते.. गार्गीने तर फक्त तिच्यावरचा डाव उलटवला होता पण त्याला खरच वाटलं..

अशीच मस्ती करता करता सगळ्यांना भूक लागली आणि सगळे जेवायला पळाले.. गार्गी , प्रिया ,प्राची, पल्लवी चौघींनीही इमानदारीने त्यांचे ताट वाढून घेतलेत पण मुलांपैकी एकानेही ताट घेतलं नाही.. जास्त गर्दी होती म्हणून त्यांना कंटाळा आला होता.. जसं या चौघींनी ताट आणलेत सगळेच्या सगळे त्यातच तुटून पडलेत..

प्राची - ताई , हे सगळे ना एक नंबरचे आळशी आहेत .. बघ आपण एवढ्या मेहनतीने ताट वाढून आणलं आणि हे आयत्या बिळात नागोबा बघ कसे येऊन बसलेत आपल्यात..

अमित - अग आम्ही तर फक्त, प्लेट्स ची संख्या कमी करतोय उगाच कशाला सगळ्यांनी प्लेट घेऊन बिल वाढवायचं म्हणून मग आपण कॉस्ट कटिंग करतोय अश्यापद्धतीने..

प्रिया - हो का!! बरं बरं.. मोठे आले कॉस्ट कटिंग करणारे ते.. आता ताटातले जे संपलं ते तुम्ही आणायचं..

सोनू - ओके नो प्रॉब्लेम..

आणि सगळे एकत्रच एक गोलाकार टेबल वर बसून जेवू लागले.. प्रतीक गार्गीच्या बाजूने बसला होता तिच्याच ताटात जेवत होता.. तीच लग्न या विचाराने त्याच हृदय ढवळून निघाले होतं.. आणि जेवढा वेळ तिच्या सोबत घालवता येईल तो घालवायचा असं त्याला वाटू लागलं.. तो जरा शांत शांतच होता .. त्याच्या वागण्यातील अचानक झालेला बदल तिला जाणवला, कारणही कळलं होतं पण सगळ्यांसमोर कस बोलायचं म्हणून ती शांत होती..

संदेश - काय झालं प्रतीक?? इतका शांत कसा काय झाला तू?? सगळं ठीक आहे ना??

प्रतीक -( लगेच नॉर्मल होण्याची अकटिंग करत..) मी अन शांत अस का वाटलं रे तुला.. ( पटकन एक घास तोंडात टाकत) ते ... मी तर ते फक्त खाण्यावर लक्षकेंद्रित करत होतो.. भाजी माझ्या आवडीची आहे ना..

प्रिया - हो का जा मग घेऊन ये आम्हाला पण अजून थोडी.. आमची सम्पली..

पल्लवी - हो आम्हाला पण पाहिजे..

प्रतीक काहीच न बोलता खरच भाजी आणायला निघून गेला..44३. एरवी अस कुणी सांगितलं असत तर लगेच प्राची किंवा सोनूवर ढकललं असत त्याने.. पण तो गेला आणि विवेकच्या ते लक्षात आलं की हा डिस्टर्ब आहे ते.. विवेकही "मी पण पोळ्या आणतो " अस म्हणत त्याच्या मागे गेला..

विवेक - प्रतीक!!! काय झालंय?? संदेश म्हंटतो तस तू जरा वेगळा वाटतोय आज..

प्रतिकनी खूप टाळलं सांगायचं.. पण नंतर काही तरी सांगावं लागेलच म्हणून

प्रतीक - ते अरे काही नाही.. थोडा भावनिक झालो आहे.. आपली गीत अरे .. आज तीच लग्न आहे.. आपण लहानपणा पासून एकत्र आहोत सोबत वाढलो ,खेळलो, आणि आता थोड्यावेळात ती आपल्या सगळ्यांना सोडून जाणार आहे ना म्हणून.. कस असत ना मुलींच आयुष्य .. एक क्षणात बदलून जातं..

आता मात्र विवेकला खर पटलं.. आणि तो पण त्याच्या सोबत थोडा भावनिक झाला.. आणि गीत तर विवेकची बहिनही होती.. किती दिवसांपासून ती जाणार म्हणून त्याला वाईट वाटत होतं आणि आता तर प्रतीक बोलल्यामूळे आणखी जाणवलं.. त्याचे डोळे पाणावले.. प्रतिकला ते दिसलं..

प्रतीक - म्हणून मी चूप होतो.. काही सांगत नव्हतो.. झाला ना आता तू पण सेंटी.. असच सगळे होतील कारण सगळे आपण सोबत आहोत लहानपणापासून.. आता नॉर्मल हो , रडण्यासाठी बिदाई आहे.. ओके .. चल सगळे वाट बघत असतील..

त्यांच्याच मागोमाग उठून आलेल्या गार्गीने त्यांचं बोलणं ऐकलं.. आणि तिला वाटून गेलं की आपण तर गैरसमज करून घेतला.. तो गीत साठी सेंटी झालाय.. तिला थोडं वाईट वाटलं.. तिने एक ग्लास पाणी पिलं आणि पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसली..

सगळे मस्ती मजा करतच होते आता प्रतिकही जरा मोकळेपणाने वागत होता.. पण डोळ्यात मात्र अजूनही काहीतरी होतं..

खर तर प्रतिकला त्याच मन कुणाकडेच मोकळं करायचं नव्हतं.. त्याच्या मनातल्या गार्गीसाठी असलेल्या भावना त्याला कुणाला कळू द्यायच्या नव्हत्या, गार्गीलाही नाही.. कारण त्याला नेहमी हेच वाटत होतं की तो आणि गार्गी कुठेच एकमेकांसाठी योग्य नाहीत.. गार्गीच्या शिक्षणाची आणि प्रतिकच्या शिक्षणाची दिशा अगदी विरुद्ध होती.. अजून त्याला कुठलीच नोकरीही मिळाली नव्हती आणि कधी मिळेल याचा काही अंदाजही नव्हता... त्याच स्वतःच भविष्य टांगणीला लागलं होतं ते कधी मार्गी लागेल काही माहिती नव्हतं आणि तोपर्यंत गार्गीला थांबवून ठेवण योग्य नाही आणि तिचे आई वडीलही याला कधी संमती देणार नाही.. त्याला माहिती होतं.. उगाच पारिवारिक वाद, आणि नातेसंबंध खराब नको व्हायला हाच विचार त्याने केला होता... त्यांचा समाज पण वेगळा होता आणि त्याला नेहमी वाटे की गार्गी माझ्यापेक्षा खूप चांगला मुलगा deserve करते ... माझ्यामुळे तीच आयुष्य खराब नको व्हायला.. त्यामुळे तो नेहमी तिला स्वतःपासून आणि स्वतःला तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असे.. खूप कठीण होत हे त्याच्यासाठी पण त्याने केलं .. सुरुवातीला बरेच प्रेमाचे क्षण जगले होते ते जवळ जवळ 2 वर्ष ते प्रेम संबंधामध्ये होते पण जस जसे मोठे झाले आणि प्रतिकला समज आला त्याने गार्गी आणि स्वतःमध्ये एक दुरावा निर्माण केला, बोलायचं पण आधीसारखं नाही.. शक्य तोवर एकांतात भेटायचं नाही.. तो तिला टाळत असे नेहमी.. किंवा तिची टर उडवून तिला राग देत असे .. त्याला वाटायचं की अस करून ती मला विसरून जाईल आणि तिच्या आयुष्यात ती सुखी होईल..

तिला कळत गेलं की प्रतीक आपल्याला टाळतो, आपल्यापासून लांब जायचा प्रयत्न करतोय, तस तिनेही मग त्याच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न नाही केला, तिला वाटलं की आता त्यांच्यात जे होतं ते सगळं संपलं.. त्याला त्या वयात थोडं आकर्षण वाटलं असेल पण आता कदाचित त्याच्या मनात मी नसावी कुणी दुसरी भेटली असेल.. तिने आपलाच ग्रह करून घेतला आणि त्यांचं प्रेमाच नात संपवलं.. आता जवळ जवळ 3 वर्ष झाली होती या गोष्टीला.. पण दोघांच्याही मनात तर ते अजूनही तसाच जिवंत होतं..

गीतच्या पाठवणीची वेळ झाली आणि सगळे भावनिक झाले.. सगळ्याच मुलांच्या मोठ्यांच्या डोळ्यांत आसवं होती.. गितची पाठवणी करून सगळे आपापल्या घरी परतलेत.. झोपताना प्रतीक आणि गार्गी एकमेकांच्याच विचारांमध्ये होते.. गार्गीला चोरून लपून बघणारा प्रतीक आठवत होता तर प्रतिकला आज साडी घालून मिरवणारी गार्गी..


-----------------------------------------

क्रमशः