Shevtacha Kshan books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 22


खिचडी झाली होती.. गौरवाने ताटात वाढून आणली आणि तिला "जेवून घे आणि आराम कर" एवढं बोलून निघून गेला..

त्याच काहीच न बोलणं तिच्या मनाला रुतत होतं.. पण तोही किती दुखावला आहे हे ही तिला कळत होतं.. त्याने काहीतरी बोलावं त्याच्या मनात काय आहे ते एकदा तरी सांगावं अस तिला मनोमन वाटत होतं.. पण गौरव खूप शांत झाला होता.. त्यानेही तिकडे ताट वाढून घेतलं आणि tv बघत जेवण केलं.. tv सुरू होता पण त्याच त्यात काय सुरू आहे याकडे लक्षच नव्हतं, तो त्याच्याच विचारात जेवत होता.. गार्गीच जेवण आटपून गार्गी ताट घेऊन बाहेर आली.. तेव्हा tv वर मल्याळम चॅनेल सुरू होतं आणि गौरव जेवत होता.. त्याचती बाहेर आली याकडे सुद्धा लक्ष नव्हते.. ती काहीच बोलली नाही तसच ताट ठेवायचं म्हणून किचन मध्ये शिरली.. बघते तर ओट्यावर बराच पसारा होता.. म्हणून तिने तो आवरायला घेतला..आणि तेव्हाच तांदळाचा डबा जागेवर उचलून ठेवताना बाजूला असलेली थाळी तिचा हात लागून खाली पडली.. आणि त्या आवाजाने गौरव एकदम दचकला..किचन मधून कसला आवाज आला बघायला गेलं तर तिथे गार्गी त्याला आवरताना दिसली..

गौरव - अग तू इथे काय करतेय?? तुझी तब्येत ठीक नाही तू आराम करायचा तर इकडे कशाला आली?.. जा बर तू इथून मी आवरतो ते सगळं माझं जेवण झालं की...

गार्गी - मी ठीक आहे रे आता.. तू स्वयंपाक केलास ना...!! मला आयतं जेवायला दिलंस , त्यामुळे बरीच तरतरी आलीय मला .. बसुन बसून बोर होतं तसपण .. एवढं करू दे.. तू तुझं जेवण करून घे.. आणखी वाढू का तुला खिचडी??

गौरव - ठीक आहे जशी तुझी इच्छा..

म्हणत तो तिथून निघून गेला.. एरवी आपली गोष्ट मणवून घेण्यासाठी अगदी हट्टाला पेटतो पण आज तो जास्त काहीच बोलला नाही.. तिला त्याची मनःस्थिती कळत होती.. पण तो काय विचार करतोय हे विचारायची तिची हिम्मत होत नव्हती..

पुढे जवळपास 8- 10 दिवस असेच निघून गेले.. तो काही बोलेल याची गार्गी वाट बघत होती पण तो इतका शांत झाला होता की तो प्रेमाने बोलणं तर दूरच पण साधही बोलत नव्हता.. गार्गी काही बोलली तर फक्त तेवढ्याला तेवढ उत्तर देत असे.. त्याच अस वागणं आता गार्गीला असह्य होत होतं. "आपण गौरवला प्रतिकबद्दल सांगून चुकी केली का अस तिला वाटू लागलं.. पण तोच म्हणाला होता ना की एक मित्र समजून माझ्याशी बोल.. पण आता तो काहीच बोलत नाहीय मला खूप भीती वाटतेय, याआधी गौरव अस कधीच वागला नव्हता.. काय करू मी.. त्याला अस तर वाटत नसेल ना की मी त्याला फसवलं!! किंवा प्रतिकला नोकरी मिळाल्यावर मी गौरवला सोडून त्याच्याकडे जाईल.. काय सुरू आहे गौरवच्या मनात कसं कळेल?? तो काही बोलतही नाहीये.. त्याला कस सांगू की तो माझा भूतकाळ होता आणि आज मी फक्त फक्त त्याची आहे.. हो प्रतिकच्या आठवणींनी मला थोडावेळासाठी अस्वस्थ केलं होतं पण म्हणून काय मी माझा वर्तमान आणि भविष्य सोडून त्याच्या मागे लागेल का?? गौरव बोल ना रे.. काहीतरी बोल ना.." ती मनातच विचार करत बसली होती..

त्याची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली पण गौरव अजून आला नाही.. म्हणून तिला जर काळजी वाटत होती एरवी उशीर होणार असला की कळवतो पण आज तसही काही कळवलं नाही.. तीच्या मनात नको नको ते विचार येत होते.. त्याला फोन लावला तर त्याचा फोनही लागत नव्हता.. ती खूप घाबरली होती.. बाल्कनी मध्ये उभी राहून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.. तिच्या मनातले विचार इतकं तीव्र होते की तिच्याही नकळत तिचे अश्रू वाहायला लागले होते..

तेवढ्यात गौरवची गाडी तिला येताना दिसली.. आणि पटकन डोळे पुसून फ्रेश होऊन ती दरवाजा उघडून त्याची वाट बघू लागली.. कितीही फ्रेश झाली असली तरी तिचे डोळे ती रडल्याच सांगतच होते.. तो आला तिने पटकन त्याच्या हातून बॅग घेतली आणि जागेवर नेऊन ठेवली.. तो आत आला.. दोघेही काहीच बोलत नव्हते.. गार्गीच्या मनात खुप राग , काळजी , प्रेम दाटून आलं होतं पण एक शब्दानेही ते तिने बोलून दाखवलं नाही.. त्याला पाणी आणून दिलं.. आतातरी काही बोलेल अस तिला वाटलं म्हणून ती तिथेच उभी राहिली.. पण त्याने गटागटा पाणी पिऊन ग्लास रिकामा केला.. तिला काही बोलायचं आहे त्याच्या लक्षात आलं होतं.. पण तरीही त्याने काहीच विचारलं नाही..तो उठला आणि ग्लास ठेवायला निघाला.. तस तिने त्याला आवाज दिला.."गौरव!!!" तोही लगेच वळला.. तिच्या पापण्यांवर पाणी तरळलं होतं.. तिने जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि हुंदके देऊन रडायला लागली.. तिच्या अचानक अश्या वागण्याने तो जरा गोंधळून गेला.. पण तिला सावरत तीच्या पाठीवरून आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.. त्याचा अबोला तिला त्रास देत होताच पण आज असं न कळवता उशिरा येणं यामुळे ती खूप दुखावली होती.. त्यानी एकदा बोलावं म्हणून तो आल्यापासून त्याच्या मागेपुढे करत होती पण त्याने साधं यायला उशिर का झाला याच स्वतःहून स्पष्टीकरण ही दिलं नव्हतं.. त्यामुळे तिला भरून आलं आणि ती त्याच्या मिठीत शिरून त्याला तिची भीती , तीच प्रेम आणि तिची आजची झालेली घालमेल स्पर्शाने सांगण्याचा प्रयत्न करत होती.. तरीही तो अजूनही शांतच होता फक्त, रडू नको एवढंच काय ते बोलत होता.. थोडावेळानी ती शांत झाली आणि त्याच्यापासून लांब झाली..

गौरव - रडू नको, आलोच मी फ्रेश होऊन..

अस म्हणत निघून गेला साधं "काय झालं रडायला ?" हे सुद्धा विचारलं नाही.. गार्गीला त्याच इतकं तुटक वागणं जणू येणाऱ्या संकटाची जाणीव करून देत होतं.. तिने लगेच त्याला जेवायला वाढलं.. त्याच्याच आवडीची भाजी केली होती.." वेळ हातातून जाण्याआधी आणि गौरव आणखी गैरसमज करून घेण्याआधी मला काहीही करून त्याच्याशी बोलायला हवं, त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे जाणून घ्यायला हवं .." असा आज तिने पक्का निर्धारच केला..

गौरव फ्रेश होऊन आला तिने जेवायला वाढलं, त्यानेही निमूटपणे जेवण केलं पण "तू जेवली का?" एवढं सुद्धा विचारलं नाही, नेहमी दोघे सोबत जेवायचे पण आज तो एकटा असताना सुदधा त्याला गार्गीला काही विचारावसं वाटलं नाही.. त्याच्या या वागण्याने गार्गीला खूप वाईट वाटत होतं.. तिची एवढी काळजी घेणारा अचानक एवढा बदलला.. त्याच जेवण झालं आणि तो tv बघत बसला.. शेवटी गार्गीनेच विचारलं..

गार्गी - आज उशीर झाला तुला घरी यायला??

गौरव - हो थोडं काम होतं म्हणून.. तिच्याकडे न बघताच त्याने उत्तर दिलं..

गार्गी - हो पण कळवायच तरी ना.. नेहमी कस कळवतो उशीर होणार असला की.. आणि आज तुझा फोनही बंद होता..

गौरव - अ.. हं.. हो.. ते फोन बंद पडला चार्जिंग संपली होती..
अजूनही त्याचा तसच तिच्याकडे न बघता जेवढ्याला तेवढं बोलणं सुरू होत..

शेवटी ना राहून तिने त्याच्या हातातला रिमोट हिसकून घेतला आणि tv बंद केला.. आणि सरळ त्याच्या पुढे येऊन उभी राहिली..

गार्गी - गौरव , काय झालंय?? मी प्रतिकबद्दल संगीतल्यापासून बघतेय तू मला टाळतोय.. का आणि कधीपर्यंत टाळणार आहेस?? अरे काही तर बोल..तुला राग आला असेल तर व्यक्त कर.. मला बोल, तुझ्या मनात काय सुरू आहे मला कळू दे.. तू दुखावला असशील मला मान्य आहे, पण अस अबोला धरून तुझं दुःख दूर होणार आहे का?? तुझं अस वागणं माझ्या मनाला खूप रुततं रे, खूप भीती वाटतेय मला.. अस ना बोलून तू मनात किती किती आणि काय काय विचार करतोय ?? मला आणखी तुला खूप काही सांगायचं आहे रे पण तू बोलणारच नसशील तर मी कसं सांगू?? मला वाटतं की मी उगाच तुझ्या बोलण्यात आले आणि तुला सगळं सांगितलं.. या सर्वांचा आपल्या नात्यावर इतका विपरीत परिणाम होईल अस मला कधी वाटलंच नव्हतं.. नेहमी समजून घेतोस , यावेळीही घेच अस नाही पण एकदा बोलून तर बघ ना.. गौरव.. मला नाही सहन होत आहे रे तुझा असा अबोला.. प्लीज माझ्याशी बोल गौरव .. काहीतरी बोल..

बोलता बोलता ती त्याच्या पायाजवळ येऊन बसली आणि रडत रडतच त्याच्या गुडघ्यांवर आपलं डोकं ठेऊन हात जोडत त्याला विनवत होती..

तिला अस रडताना बघून त्यालाही वाईट वाटलं.. त्याने पटकन तिच्या दोन्ही खांद्यांना पकडून तिला त्याच्या बाजूला बसवलं.. तिला रडताना बघून त्यालाही त्रास होत होता.. त्याने तिचा हात त्याच्या दोन्ही हातात पकडून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.. एक हाताने तिला जवळ ओढत..

गौरव - बस बस गार्गी, अस रडू नको ग, मला नाही तूला अस बघवत.. तू म्हणते तर आपण आज बोलूया.. पण तू आधी शांत हो.. माझ्याही मनात खुप काही आहे ग.. पण बोलू का नाही किंवा कस बोलू या सगळ्या विचारांमध्ये मी गुंतलो होतो.. पण आज वाटतं बोलून टाकावं.. म्हणजे मी सुद्धा शांत होईल..

गार्गीने डोळे पुसले.. आणि तो पुढे काय बोलतो हे ऐकण्यासाठी त्याच्याकडे चेहरा करून बसली..

----------------------------------------------------------------