Shevtacha Kshan - 10 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 10

अमितला बघताच गार्गी त्याच्या जवळ गेली..

गार्गी - अमित तू इथे काय करतोय??

अमित - हुश्श , आली तुझी गाडी .. किती फोन केलेत तुला तुझा फोनच लागत नाहीय.. अग अर्धा तास झाला मी वाट पाहतोय तुझ्या गाडीची..

गार्गी - अरे हो पण का??

अमित - अग तुला घरी सोडायचं ना..

गार्गीला काही कळत नव्हतं.. तिच्या बाबांनी तिला फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता त्यामुळे अमित घ्यायला येतोय हे त्यांना गार्गीला कळवताच आलं नाही..

गार्गी - अरे बाबा येणार होते मला घ्यायला , तू कसा आला?? ते ही इतका उलटा फिरून..

अमित - तुला काकांनी सांगितलं नाही का?? अग मी प्रतिकला सोडायला येणार होतोच स्टेशनवर तर काकांना कळलं की मी स्टेशनवर जातोय आणि नेमकं त्यांना आताच ऑफिसमधून महत्वाचं काम असल्याचा फोन आला म्हणून त्यांनी मला सांगितलं तुला आणायला.. चल आता, किती प्रश्न विचारत बसते..

गार्गी त्याच्यासोबत घरी जायला निघाली, प्रतीकच नाव ऐकून पुन्हा एकदा तीच हृदय हेलवालं..

गार्गी - प्रतीक कुठे गेला?? आणि केव्हा होती त्याची ट्रेन?? गेली का??

अमित - हो ग अर्ध्या तासा आधीच गेली त्याची गाडी.. निशा ताईकडे गेला तो मुंबईला भाऊबीजेसाठी.. तुझी गाडी वेळेवर आली असती तर झाली असती तुमची पण भेट.. किती
दिवस झालेत ना आपण सगळे एकत्र भेटलोच नाही..

गार्गी - अच्छा.. हा.. हो ना..

अमित - आता तुझ्या लग्नातच भेटता येईल बहुतेक..

गार्गी - हा..

अमित - बरं तू पुण्याला गेली होती म्हणे जिजुकडे.. काय म्हणतात मग तिकडे सगळे कसे आहेत??

गार्गी - चांगले आहेत, मजेत आहेत..

अमित - काय झालं गार्गी?? तू एवढी शांत का आहेस?? सगळं ठीक आहे ना??

गार्गी - हो हो सगळं ठीक आहे.. मी कुठे शांत आहे.. बरं प्रतीक काय म्हणतो रे ?? म्हणजे काय सुरु आहे त्याच आजकाल?? मला काही माहितीच नाहीय इतक्यात कुणाबद्दल.. आणि एवढ्यात कधीतरी गीत सोडली तर फार कुणाशी बोलणं पण नाही झाल माझंं..

अमित - अग त्याच B.A च शेवटचं वर्ष सुरू आहे ना.. तुला माहिती नव्हतं का?? बस यावर्षी संपून जाईल.. गार्गी गेल्या काही दिवसांपासून खर तर महिन्यांपासून मला आपला प्रतीक जरा बदलल्यासारखा वाटतोय ग.. मला कळत नाहीय काय झालं ते..

अमित, प्रिया आणि प्रतीकच घर जवळ जवळच होते त्यामुळे ते एकमेकांना बऱ्याचदा भेटायचे..

गार्गी - म्हणजे ?? कसा??

अमित - अग तो आजकाल जास्त बोलत नाही, आधीसारखं मस्ती आणि गमती पण करत नाही.. कुठल्या तरी विचारात आपला नेहमी बुडल्यासारखा वाटतो.. खूपदा विचारलं पण तो कधी काही सांगतच नाही.. मला वाटतं त्याला नोकरी किंवा भविष्याच टेन्शन आलं असावं.. आता पण आम्ही सोबत आलो पण तो काहीच बोलला नाही .. आणि आणखी एक आश्चर्य म्हणजे आता त्याची आणि तुझी गाडी एकाच वेळेला किंवा तुझी आधी येणार होती.. आज तुला भेटता येईल म्हणून मला मस्त वाटत होतं पण तो जस काही टाळत होता असं मला वाटलं.. माहीत नाही त्याला कुणाला भेटायची पण इच्छा राहिली नाही .. एकदम असा कसा झाला हा काही कळत नाहीय आणि काही बोलून पण दाखवत नाही, मनातल्या मनात ठेवतो सगळं..

हे सगळं ऐकून गार्गीला मात्र शॉकच बसला.. याच कारण कदाचित तिला माहिती होतं.. किंवा ती स्वतःच आहे असं तिला वाटुन गेलं.

गार्गी - नेमकं कधीपासून अस वागतोय तो?? म्हणजे कुठल्या घटनेनंतर असा काही बदल जाणवला का??

अमित - अग , त्यादिवशी तुझा साखरपुडा झाला ना त्या दिवशी आम्ही परत आलो. त्यानंतर तो खूप थकला होता आमच्याशी जास्त न बोलता घरी निघून गेला.. आणि नंतर मला प्रिया सांगत होती की त्याची तब्येत खराब झाली होती म्हणजे ताप वगैरे नाही पण ती गेली तेव्हा तो झोपलेलाच होता पण जेव्हा उठला तेव्हा डोकं जड वाटत आहे म्हणे आणि लगेच बेडवर पडला... त्याला कमजोरी आली होती.. मग प्रियाने लिंबू पाणी दिलं आणि मग चांगला झाला.. त्यानंतर पण काही दिवस चांगला बोलला पण नंतर एकदम शांत राहायला लागला.. आता पण तसाच आहे.. तुला थोडा वेळ मिळाला तर बघ बोलून तू त्याला..

गार्गी - त्यानी तुला नाही सांगितलं काही तर तो मला सांगणार आहे का?? माझ्यापेक्षा तू जवळचा आहे त्याच्या..

अमित - हो पण .. सहज बघशील बोलून..

गार्गी - ठीक आहे..

बोलत बोलत ते गार्गीच्या घरी पोचलेत.. गार्गीच्या आईने अमितला घरात बोलावलं.. दिवाळीच फराळ वगैरे दिलं.. आणि थोडावेळ थांबून अमित निघून गेला.. थोडावेळणी आईच्या फोनवर गौरवचा फोन आला.. फोन गार्गीनेच उचलला..

गौरव - हॅलो,

गार्गी - हा, गौरव बोल ना..

गौरव - अग तुझा फोन कुठे आहे?? किती फोन लावलेत लागतच नाहीयेत, आणि तू पोचल्याचा साधा एक फोनही नाही केला मला, मी किती चिंता करतोय आहे केव्हापासून माहिती आहे का तुला? एकदा सांगायचं ना ग पोचल्यावर.. आई बाबा पण विचारात होते... केव्हा पोचलीस??

गार्गी - अरे तो फोन बंद झाला आहे, आणि मी घरी आता 20 मिनिटं झालेत पोचली.. ते डोक्यातून निघूनच गेलं रे फोन करायचं .. sorry..

गौरव - सॉरी म्हणे.. अस कस ग करते तू , इकडे मी किती परेशान झालोय तुला काही कल्पना आहे ?? किती वेळापासून वेड्यासारखं तुला फोन लावतोय.. असो तू पोचली ना नीट बस एवढच ऐकायचं होतं.. चल बाय बोलूयात नंतर..

गार्गी - ठीक आहे, चिढु नको रे ... मी आवरते आधी आणि मग करते तुला फोन.. बाय..

फोन ठेवला आणि गार्गी आवारायला लागली, अमितच बोलणं तिच्या कानात घुमत होतंं.. प्रतीक बद्दल ऐकून तिला वाईट वाटत होतं.. "कदाचित माझं लग्न होणार आहे म्हणून तर तो असा ... " तिच्या हृदयाची गती एकदम वाढली.. पण स्वतःला समजावत.. "नाही नाही.. अस नसेल कारण तो माझ्याशी ज्यापद्धतीने बोलायचा त्यावरून तरी तो मला विसरला होता असच वाटलं मला... कदाचित अमित म्हणतो तस भविष्याचा विचार करत असेल.. आता शेवटचं वर्ष आहे यानंतर तरी नोकरी मिळायला हवी असा काही... मी करू का त्याला एक फोन..नको नको .. जर माझ्यामुळे तो डिस्टर्ब असेल तर उगाच त्यावर मीठ चोळल्यासारखं होईल.. आणि विसरायचा प्रयत्न करत असेल तर उगाच त्याला आठवण होईल.. नाही मी नाही करणार फोन.. मी पण तर त्याच्या प्रेमाला विसरण्याचा प्रयत्न करतेय ना , मलाही त्रास होतच आहे, तो शांत झाला, अबोल झाला.. पण मला तर बदलता ही आलं नाही कुणाला माझ्या भावना सांगताही येत नाहीत.. पण माझ्या सोबत गौरव आहे.. तो तर एकटाच आहे.. हे ईश्वरा, त्याला शक्ती दे स्वतःला सांभाळून पुढे आनंदाने जगण्याची... " ती तिच्याच विचारांत मनाशी बोलत होती..

तेवढ्यात आईने आवाज दिला आणि ती भानावर आली..

आई - गार्गी अग , आवर ना पटकन.. जेवण करून घे गरम गरम..

गार्गी - हो आई आलेच..

ती तिच्या विचारांतून बाहेर पडली आणि जेवायला बसली.. जेवणात मन नव्हतं आज पण कस बस दोन घास खाल्ले आणि प्रवासाने थकली जेवण जात नाहिये अस कारण सांगून उठली.. गौरव तिच्या फोनची वाट बघतच होता.. तिने फोन केला त्याच्याशी थोडं बोलून घेतलं आणि मला आराम करायचाय थोडा वेळ म्हणून फोन ठेऊन दिला... ती आज विचार करून करून खरंच थकली होती, तिने थोडी झोप घेतली नंतर तीला थोडं रिलॅक्स वाटलं.. दिवाळीचा सण संपला.. आणि पुढे पुन्हा कॉलेज आणि सगळ्यांच रोजच रुटीन सुरू झालं..

दिवसांमागून दिवस जात होते , लग्नाची तारीख जवळ जवळ येत होती, त्यानुसार सगळी खरेदी करण्यासाठी गौरव कडचे सगळे गार्गीकडे आले होते... दोन्हीकडच्यांची सगळी खरेदी गार्गीच्याच पसंतीने झाली.. गौरवने कुठंल्याच बाबतीत तिची इच्छा मोडली नाही.. एखादी वस्तू महाग असेल पण गार्गीला आवडली तर तिची आई तरी तिला "एवढं महाग नको बघू" म्हणायची पण गौरव मात्र तिची सगळी मागणी आनंदाने पूर्ण करत होता.. फक्त तिच्या आनंदासाठी... कपडे , दागिने सगळं काही गार्गीच्या पसंतीनेच खरेदी करण्यात आलं.. गार्गी खूप आनंदी होती.. खरेदीच्या वेळी गार्गी आणि गौरवाला पुन्हा एकत्र राहण्याची संधी मिळाली होती.. जवळ जवळ 3 दिवस खरेदी चालली.. एक दिवस दागिने, एक दिवस कपडे आणि एक दिवस आहेराचे कपडे आणि वस्तू.. सगळी खरेदी करून गौरव आणि त्याच्या घरचे पुण्याला परत गेले.. आणि लग्नाची पुढची तयारी सुरु झाली.. गार्गीच्या लग्नाच्या साड्या तयार करणे, पार्लर, मॅचिंग ज्वेलरी, सँडल, ओढणी या सगळ्या गोष्टींच्या तयारी मध्ये गार्गी खूप व्यस्त झाली होती, तिच्या मैत्रिणीही तिची मदत करायच्यात.. आणि एवढ्या सगळ्यात पण शेवटच्या वर्षाचा अभ्यासही सुरूच होता.. आई वडीलही इतर तयारी बघण्यात व्यस्त होते हॉल, केटरर्स, डेकोरेशन आणि बराच काही.. लग्न दुसऱ्या गावी असल्यामुळे गार्गीच्या आई बाबांना बरेचदा तिकडे जावं लागतं होतं आणि गार्गी घरी एकटीच असायची तेव्हा तिच्या मैत्रिणी यायच्या तिच्याकडे राहायला..

प्रतिक बरेच दिवस असाच अबोल आणि एकटा राहत होता.. पण त्याच्या मित्रांनी त्याला कधी एकटं पडू दिलं नाही आणि मित्रांच्या मदतीने त्याने पुन्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा सगळ्यांसमोर तरी आधीसारखं वागू लागला..

------------------------------------------------------------
क्रमशः