Shevtacha Kshan - 27 in Marathi Novel Episodes by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 27

शेवटचा क्षण - भाग 27

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गार्गीची तपासनी आणि iv वगैरे लावणे सुरू झालं.. थोडावेळासाठी फ्रेश व्हायला म्हणून गौरव आणि आई घरी गेलेत आणि गार्गीचे वडील तीच्याजवळ थांबले होते.. ओपरेशनच्या वेळेपर्यंत येऊ म्हणून ते गेलवत पण 9:30 चा वेळ दिला असताना 9 वाजताच गार्गीला ओपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले.. तिच्या वडिलांना काही सुचत नव्हतं पण त्यांनी लगेच फोन करून गौरव आणि आईला बोलावून घेतलं आणि गार्गीलाही गौरवनी यावं आणि तिला भेटावं अस वाटत होतं.. पण त्याला थोडा उशीरच झाला आणि ओपरेशनच्या आधी त्याला तिला भेटता आलंच नाही.. 10 : 30 पर्यंत गार्गीच ओपरेशन झालं होतं.. सर्वात आधी डॉक्टरांनी गार्गीच्याच मुलीला दाखवलं.. पण शुद्धीत नसतानाही तिने तिच्या लेकीला बघितलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळलेत.. जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी तिचे अश्रू अलगद पुसलेत.. आणि तिला झोपेचं इंजेकशन देऊन झोपायला सांगितलं.. पण तरीही गार्गी मात्र झोपायला तयार नव्हती.. तिला गौरवच्या चेहऱ्यावरच आनंद बघायचा होता..

थोडावेळणी ओपेरेशन झालं आणि गार्गीला बाहेर आणलं तेव्हा बाळ आईच्या हातात होतं आणि गौरव एकदम आनंदाने तिच्या कडे बघत होता.. तिने दुरूनच हात हलवून त्याला हॅलो केलं तिकडून गौरवणेही लगेच हात उंचावून तिला दाखवला... तिच्या अश्या बालीश वागण्यावर तिला थिएटर मधून खोलीकडे घेऊन जाणाऱ्या नर्स तिच्यावर हसत होत्या, तसं तिला एकदम लाजल्यासारखं झालं.. पण त्याला आणि बाळाला बघून गार्गीला खूप समाधान वाटलं.. तिच्या चेंजऱ्यावरच हास्य मावळतच नव्हतं.. पण इंजेकशन मुळे तीला झोप लागली..

पुढे 5-6 दिवस आणखी दवाखान्यात काढल्यावर गार्गी आणि बाळाला घरी आणलं.. गौरव मात्र नेहमी गार्गीसोबतच होता.. पण आता त्यालाही अधिक सुट्या मिळणार नव्हत्या म्हणून गार्गीला घरी आल्यानंतर दुसऱ्या शिवशी रात्री तो पुण्याला परत जायला निघाला..

काही दिवसांनी बाळ 3 महिन्याच झालं असेल तेव्हा बाळाचा नामकरणाचा मोठा कार्यक्रम करण्याची गार्गीच्या आईवडिलांची इच्छा होती.. तसं गार्गीच्या सासरच्यांनीही होकार कळवला.. तसे लगेच एक तारीख पक्की करून गार्गीचे बाबा कार्यक्रमाच्या तयारीला लागलेत..

जवळपास कार्यक्रमाची सगळी तयारी झाली ,सगळ्यांना आमंत्रण वैगेरे दिलीत..

आज कार्यक्रम होता सकाळपासूनच घरात पाहुण्यांची गर्दी आणि रेलचेल सुरू होती.. कार्यक्रम जरी हॉल मध्ये असला तरी काहि जवळचे पाहुणे आधी घरी आले होते.. गौरव आणि त्याच्या घरचे आधीच्याच दिवशी आले होते.. बाळाची आत्याही आली होती तिलाच बाळाच्या कानात नाव सांगायचं होत ना!! सगळे हॉलवर जमलेत आणि बाळाचं नाव ठेवण्यात आलं.. आत्यानी हळूच बाळाच्या कानात नाव सांगितलं आणि शांत झाली सगळे वाट बघू लागले की काय नाव ठेवलंय आत्या सांगेल पण त्या काही बोलत नाहीये बघून गार्गीनेच विचारलं..

गार्गी - ताई काय नाव ठेवलं तुमच्या भाचीच?? सांगा ना..

ताई - नाही हा.. असं सहज नाही सांगणार.. आधी काही तरी गिफ्ट पाहिजे..

गौरव - आग ताई देतो ना तुला गिफ्ट नंतर.. आता नाव सांग ना आधी..

ताई - काय देशील?? ते सांग आधी..

गौरव - साडी, ड्रेस तू मागशील ते..

ताई - नाही ते नको मला..

गौरव - मग काय हवंय??

ताई - मला तुझी मुलगी सून म्हणून देशील?? माझ्या पार्थसाठी ??

ताई अस बोलली आणि सगळ्यांचे चेहरे खाडकन पडले.. पार्थ 12 वर्षाचा होता आणि हे अस अचानक.. आणि पुढचं बाळाचं भविष्य आता असं.!!. गौरवला तर काय बोलावं काहीच सुचत नव्हतं, गार्गी पण एकदम शांत झाली.. पण ताई मात्र गालातल्या गालात हसत होती.. सगळ्यांचे चेहरे पाहून तिला राहवलं नाही आणि ती मोठमोठ्याने हसायला लागली.. आणि बोलली..

ताई - कशी फजिती केली... अरे किती शांत झाले सगळे.. मी तर गम्मत करत होते...

तसे सगळ्यांनी एक सुस्कारा सोडला..

ताई - अरे गौरव तुला माहिती आहे हे अस सगळं मलाच पटत नाही मग मी तुला अस बोलेल का.. खोडी केली रे जरा.. आणि गार्गी काहीच विचार करू नको माझ्या मनात खरच अस काही नाहीय हं.. ते तर उगाच मला पार्थ झाला तेव्हा आम्ही सगळे गौरवला चिढवायचो की "तुला मुलगी झाली की मीच तिची सासू होईल.. देशील ना तू??" आणि तेव्हा माहितीये गार्गी हा अगदी सहज "हो हो तूच करून घेशील तिला सून".. अस सुद्धा म्हणायचा.. मला ते आठवलं आणि म्हणून मग आज गम्मत करावीशी वाटली.. आणि आता विचारलं तर बघा किती गोंधळाला होता हा..

गौरव - वाह ग ताई.. अस भावाची गम्मत घेत का कुणी?? तू पण ना कमाल आहेस हं!!

विभा ताई( गौरवच्या चुलत मोठी वहिनी) - हो तेव्हा तो एकटा होता ना.. आता तो बाप झाला आहे आणि सोबत (गार्गी )बायको पण आहे ना म्हणून एकदम बोलता नसेल आलं त्याला.. ही खरच गंमत आहे असं आम्हाला कुणालाच वाटलं नाही हं .. अस वाटलं तू खरच आमच्या मुलीला आजच मागणी घालत आहे की काय.. चांगला अभिनय केलास तू.. बरं नाव सांग ग लवकर आता..

ताई - हो हो सांगते सांगते ... माझ्या गोड भाचीचं नाव आहे

"गौरांगी..."

गौरव आणि गार्गी दोघांच्याही नावाच मिश्रण गौरांगी अस ठेवलंय...

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.. आणि मग पुढचे विधी कार्यक्रम सुरू झाले..

गौरव आणि गार्गी दोघांनाही नाव खूपच आवडलं होतं..

पुढे एकेक जण बाळाला बघायला येत होता आणि गार्गीच्या हातात बाळासाठी भेटवस्तू देऊन जात होता.. तशीच गार्गीच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधलेही काही जण त्यांच्या परिवारासह आले होते.. कारण त्यांचे परिवारही गार्गीच्या परिवाराच मित्रमंडळ होतेच.. पण प्रतीक मात्र एकटाच होता.. त्याचे आई बाबा काही कामानिमित्त निशा ताईकडे मुंबईला गेले होते आणि प्रतिकलाही जायचं होतं पण घरच्यांनी गार्गीच्या बाळाचा कार्यक्रम करून मग ये अस सांगितल्या मुळे तो तिथेच थांबला होता.. थोडी गर्दी सरली आणि प्रतीक गार्गीजवळ आला.. गौरांगीला बघायला आणि तिचं गिफ्ट द्यायला.. त्याला बघून आतापर्यंत अगदी हसून सगळ्यांशी भरभरून बोलणारी गार्गी 2 क्षण एकदम शांत झाली पण स्वतःला लगेच सावरत.. तिने त्याची विचारपुस केली.. प्रतिकसोबत सोनूचा भाऊ साकेत ही होता.. तो लहान असल्यामुळे नि शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असल्यामुळे आतापर्यंत यांच्यात कधी मिसळला नव्हता.. गार्गीे येणाऱ्या प्रत्येकासोबत फोटो घेत होती.. तसाच तिने प्रतीक आणि साकेतसोबतही एक फोटो घेतला.. गार्गी थोडावेळासाठी नुसत्या या विचाराने सुखावली होती की तिला आज पहिल्यांदा प्रतीक सोबत असा फोटो काढायला मिळाला.. दोघही अगदी सहज बोलत होते पण दोघांच्याही नजरा मात्र एकमेकांच्या डोळ्यांमधून मनापर्यंत केव्हाच पोचल्या होत्या... दोघेही बोलण्यातून एकमेकांची भौतिक विचारपूस करत होते तर डोळ्यांतून एकमेकांच्या मनाची विचारपूस करत होते.. त्या नजरेतलं प्रेम आजही अगदी तसच जिवंत होतं.. फक्त ते दोघांनीही नजेरेआडच लपवलं होते.. नंतर गार्गीशी थोडाफार बोलून प्रतीक जेवण करून निघून गेला..

कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला प्रतीकच्या आजच्या भेटीने पुन्हा गार्गीच्या मनाची तीच सैरभैर अवस्था झाली होती पण कुणालाच तस काहीही कळू ना देता ती तिच्या मुलीमध्ये स्वतःला गुंतवून तिच्यासोबत वेळ घालवते आहे असंच दाखवत होती.. खरंतर तिला तसच करायचं होतं, मुलीमध्ये गुंतून तिच्या उधाणलेल्या मनाला शांत करायचं होतं.. पण तरीही तसं होत नव्हतं.. दिवसभर तर तिने स्वतःला गप्पा गोष्टी गौरांगी मध्ये गुंतवले होते पण रात्रीचा एकांत तिला प्रतिकच्या आठवणीने विचलित करत होता.. पण डोळ्यातून एकही अश्रू बाहेर ना येऊ देता तिने तिच्या सगळ्या भावना पुन्हा अगदी मनातच डांबून ठेवल्यात..

पुढे मुलीला वाढवण्यात आता गार्गी खूप व्यस्त राहू लागली... जवळपास सात महिन्यानंतर ती सासरी परत आली होती.. गौरांगी हळू हळूहळू मोठी होऊ लागली तिच्या इवल्या इवल्या हातांच्या पायाच्या मोहक हालचाली, हळूहळू फुटणार बोबडे बोल गार्गीला सुखावत होते.. गौरांगी अाल्यामुळे गौरव थोडासा गार्गीपासून अलिप्त राहू लागला.. प्रेम कमी झालं होतं असं नाही पण गौरांगी रात्री केव्हाही उठायची रडायची कधी तीला भूक लागायची तर कधी तिला झोपच येत नसे, कधी रात्री उठून तिला खेळावस वाटायचं पण रात्रीच जागरण गौरव ला मात्र झेपणार नव्हतं.. कदाचित गौरव आणि गार्गी दोघेच असते तर परिस्थिती वेगळीही असू शकली असती पण गार्गीच्या सासूबाईंनी गौरवला झोप नीट होण्यासाठी वेगळंच झोपत जा म्हणून सांगितलं होतं आणि गौरवलाही ते पटलच होतं , त्यामुळे गार्गी आणि गौरांगी वेगळ्या खोलीत झोपायच्या तर गौरव त्याचा वेगळा झोपायचा.. गार्गीच्या सासूने गार्गीलाही कधीच लवकर उठण्याची किंवा घरातल्या कुठल्या कामांची सक्ती केली नाही..गौरांगीमुळे गार्गीचीही झोप होत नाही ही वास्तविकता त्या जाणून होत्या त्यामुळे घरातल्या सगळ्या कामांचा भार त्यांनी स्वतःवर घेतला होता.. सगळं काही खूप खूप चांगलं होतं.. पण तरीही गार्गीला काहीतरी चुकल्या सारख वाटत असे.. तो म्हणजे गौरवचा सहवास .. दिवसभर नोकरी , आई वडील आणि गौरांगी या सगळ्यांना वेळ देता देता गौरवला गार्गीसाठी वेळच मिळत नसे.. आणि याच दुराव्यात तीच मन प्रतीक आणि गौरव दोघांच्याही प्रेमासाठी झुरत होतं.. तिला सगळं मिळत होत पण कुठेतरी प्रेम भावना किंवा आपल्या व्यक्तीचा सहवास कमी पडत होता.. घरात सगळे असून सुद्धा तिला एकटं वाटायला लागलं होतं.. ती तर फक्त प्रेमाच्या दोन शब्दांसाठी आसुसलेली होती..

आजकाल गौरवच कामही बरच वाढलं होतं, कामाचे तास आधीपेक्षा जास्त वाढलेे होते.. अनेक जबाबदाऱ्या त्याच्यावर येत होत्या.. तो कधी गार्गीशी बोलला तरी त्याच काम आणि त्या मुळे त्याच वाढणारा ताण हे सगळंच बोलायचा, ऑफिसमधल्या साऱ्या गोष्टी तो तिला सांगायचा.. ती ही ते ऐकून त्याला समजून घेत असे.. खरच घराची जबाबदारी आहे आणि त्यात ऑफिसमध्ये जास्त कामामुळे येणारा ताण म्हणून तिने कधीच स्वतःच्या भावना किंवा तिच्या मनाची चलबिचल त्याला बोलून दाखवली नाही.. पण मनात मात्र कुढत राहिली.. गौरवच्या कामाच्या अति ताणाचा परिणाम त्याच्या शरीरावर होऊ लागला.. त्याच जेवण अगदी कमी झालं होतं तर चिडचिड करणं वाढलं होतं.. पण गौरांगीशी खेळून त्याला फ्रेश वाटत असे..

गौरांगी जवळपास दीड वर्षाची झाली असेल.. आता गार्गीने स्वतःला एकटेपणातून बाहेर काढण्यासाठी आणि गौरवची थोडी मदत म्हणून नोकरी करायचा विचार केला पण तिच्या सासू सासर्यांनी मात्र स्पष्ट नाही म्हणून सांगितलं.. "गौरांगी लहान आहे आणि खूप मस्ती करते आम्हला तिच्या मागे पळायला नाही जमत, आम्हाला तिला नाही सांभाळता येणार, तेव्हा ती मोठी झाली की मग कर तू नोकरी" अस बोलुन त्यांनी पुन्हा गार्गीला घरात बसवलं.. यामुळे तिचा मानसिक ताण आणखीच वाढला.. तिने गौरवशी या विषयावर बोलून बघितलं, कदाचित तो त्याच्या आईवडिलांशी बोलून बघेल एकदा, कारण गौरवची कुठलीही गोष्ट आई कधीच टाळत नव्हत्या.. पण तो त्याच्या आईबाबांशी काहीच बोलला नाही.. "त्यांनी गौरांगीला सांभाळायला हवं पण आता ते तयार नाहीत तर आपण बळजबरी नाही करू शकत ना" एवढंच बोलून त्याने विषय संपवला..

गौरांगी मुळे गार्गी तिच्यात गुंतून असायची पण जेव्हाही एकांत असला की ती मात्र तिच्या एकटेपणाच्या तणावात गुरफटून जायची, इतक्यात घरात किंवा फोनवरही तिने बोलायचं खूप कमी केलं होतं, त्यामुळे ती तिच्या मनातल्या भावना, मनातली सल, कुणाकडेच बोलून दाखवत नव्हती.. एकटीच आपल्या विचारांमध्ये अडकून राहायची.. पण तीच अस शांत राहणं घरात कुणाच्याच लक्षातही आलं नाही.. सगळे फोनवर असो व प्रत्यक्षात गौरांगी आणि बाकीच्यांची चौकशी आवर्जून करायचे पण कुणीच गार्गीला तू कशी आहे हा प्रश्न कधी केला नाही.. आणि तीही कधी कुणाला काहीच बोलली नाही.. प्रतिकची आठवण येते म्हणून तिने एकदोनदा त्याच्याशी msg करून बोलण्याचाही प्रयत्न केला पण तो ही खूप तुटक आणि अगदी जेवढ्याला तेवढंच अस बोलला, त्यामुळे त्याला कदाचित आता आपल्याशी बोलायचं नाही अस गार्गीला वाटलं ,तिला थोडा रागही आला आणि पुन्हा कधीच आपण स्वतःहून त्याच्याशी बोलावायचं नाही अस तिने ठरवून टाकलं..

तिला मानसिक आधाराची खूप गरज होती पण गौरवचा आधार मिळत नव्हता.. त्याने एकदा तरी प्रेमाने तिला जवळ घेऊन तिची विचारपूस करावी अस तिला खूपदा वाटत होतं पण तसं काहीच होत नव्हतं आणि ती फक्त झुरत होती..

एकदा सुटीच्या दिवशी गौरवशी एकदा बोलून बघू म्हणून गार्गीने त्याला एकांतात गाठलं.. थोडस इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यावर तिने मुद्द्याला हात घातला..

गार्गी - गौरव गौरांगी आता दीड वर्षाची झाली , तेव्हा आता तरी तू आमच्याजवळ झोपू शकतो ना.. कधी तरी उठते ती रात्री पण ती उठली की तुला उठायची काहीच गरज नाही.. मी बघत जेल ना तिला..

गार्गीच्या बोलण्याचा गौरवाने चुकीचा अर्थ घेतला..

गौरव - अग गार्गी काय फरक पडतो झोपायला इथे किंवा तिथे.. एकाच घरात आहोत ना आपण.. मी तर तुमच्या दोघींना तुमची privacy द्यायचा प्रयत्न करतोय.. आणि शारीरिक संबंध म्हणजेच प्रेम असते का??

त्याच्या या उत्तरामुळे मात्र गार्गीला राग आला, आणि ती दुखवल्याही गेली पण स्वतःला शांत करत ती बोलली..

गार्गी - मी तुला शारीरिक संबंधाच बोलतच नाहीय गौरव.. मी तर फक्त आमच्याजवळ झोपायचं बोलले.. म्हणजे आपल्या मुलीला आई बाबांच्या मधात झोपायचा आनंद मिळेल.. आणि मलाही एक मानसिक आधार वाटेल.. अरे रात्रभर मला काळजी वाटत राहते की चुकून मी एक बाजूला झोपली राहिली आणि आपली गौरांगी झोपेत खाली पडली तर.. जर दोन बाजूनी आपण दोघे असलो तर ती काळजी मला राहणार नाही.. मी शांत झोपू तरी शकेल.. दिवस दिवसभर आपलं साधं बोलणं सुद्धा होत नाही गौरव कदाचित रात्री तरी थोडावेळ मिळेल आपल्याला दोन गोष्टी एकमेकांशी बोलायला.. तुला माझ्याशी बोलावसही वाटत नाही का आता?? तू तुझ्याच घरात आहे गौरव .. तुझे आईबाबा तू एकमेकांशी बोलतात तु त्याना वेळ देतो याबाबत माझी काहीच तक्रार नाही तू त्यांना वेळ द्यायलाच हवा पण माझ्यासाठी तुझ्याकडे काहीच उरत नाही, मी कुणाशी बोलू रे?? या घरात मी तुझ्याच भरवश्यावर आहे ना.. मग तूच अस लांब राहशील तर मी कुणाकडे बघू?? तुला tv बघताना रात्री कितीवेळ पर्यंत झोप येत नाही पण माझ्याशी बोलायचं म्हंटल की तू लगेच थकतो तुला झोप येते.. आणि privacy च बोलतो ना तू तर ती बाहेरचे, दूरचे लोक देतात आपलाच नवरा बायकोला privacy कसा देऊ शकतो?? जेव्हा की बायको पूर्ण त्याचीच असते.. हे असे शब्द नवरा बायकोच्या नाही शोभत गौरव.. तुझं घर आहे तू तुला हवं ते करु शकतोस.. अचानक एवढा कसा आणि का बदललास तू गौरव... आज या घरात मी परकी आहे याची तू ही मला जाणीव करून दिली.. ठीक आहे यापुढे काहीच नाही बोलणार मी.. ज्यादिवशी तुला वाटेल त्यादिवशी तू आमच्याकडे येऊन झोपू शकतो.. फक्त खूप उशीर नको करू, नाहीतर तू जवळ झोपलेला असताना तुझ्या मुलीला विचित्र वाटेल, नको वाटेल आणि मी ही दगड होऊन जाईल.. आणि नंतर तू माझ्यात तुझी बायको शोधशील आणि ती तुला कुठेच सापडणार नाही..

एवढं बोलून गार्गी निघून गेली.. बोलताना तिचे अश्रू बाहेर येऊ पाहत होते पण तीने मात्र मोठ्या कष्टाने त्यांना अडवून धरले होते.. आणि जशी तिच्या खोलीत गेली तसा एक आसू तिच्या डोळ्यातून खाली पडलाच.. तिने लगेच तो पुसून रडायचं नाही अस स्वतःला समजावून पुन्हा तिच्या कामाला लागली..

एवढा बोलूनही गौरवाने गार्गीकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच लक्ष tv मध्ये घातलं..

----------------------------------------------------------------


क्रमशः

Rate & Review

Mansi Gaikwad

Mansi Gaikwad 1 year ago

Sonali Nikam

Sonali Nikam 1 year ago

Payal Karlekar

Payal Karlekar 1 year ago

Arati

Arati 1 year ago

sushama kesare

sushama kesare 1 year ago