Gosht aajichi - 2 books and stories free download online pdf in Marathi

गोष्ट आजीची...- २

गोष्ट आजीची...- २

आजी अजयला हाक मारत होती पण त्याच्याकडून उत्तर मिळत न्हवत. आजीनी परत एकदा अजयला हाक मारली,

"अजय.."

"काय झाल ग आई.. का सारखी ओरडत असतेस?" अजय धावत आला आणि बोलला.

"लवकर ये इथे... ह्यांची काहीच हालचाल नाही..." आपल रडू आवरत आजी बोलली..

आई बोलण ऐकून अजय धावत वडिलांपाशी आला.. त्यानी चेक केल.. त्याचे बाबा गेले होते.. तो बोलला,

"आई.. बाबा गेले ग.." त्यानी पटकन त्याच्या बायकोला बोलावून घेतलं.

"काय.." आई किंचाळली... "मी आत्ताच त्याच्याशी बोलत होते.." आता मात्र आईला अश्रू अनावर झाले.. ती एकदम स्तब्ध झाली.. मटकन खालीच बसली. तिची वाचाच गेली..आणि मग मात्र तिचा बांध फुटला.

"आई, सावर स्वतःला. तू शांत होत. बाबांना बर न्हवत ग.. डॉक्टर नी सुद्धा आधीच सांगितलं होत! आता आहे ते मान्य कर.. मी सगळ्यांना फोन करून सांगतो! आणि हो.. दिवस वैगरे करू नका अस बाबांनी सांगितलं होत... २ दिवसांनी आपण त्याच विल वाचू..."

आपल्या मुलाच हे बोलण ऐकून तर आई आवक झाली.. वडील गेले त्याच त्याला काहीच न्हवत.. त्याला पडल होत ते विल वाचायचं... अजय नी सगळ्यांना फोन करून सांगितलं.. विजय हे कळल्या कळल्या धावत आला..

"आई.. बाबा गेले?"

आई नी काही उत्तर दिल नाही.. ते पाहून विजय अजय शी बोलायला लागला..

"काय झाल बाबांना एकदम?"

"मोठा हार्ट अॅटॅक आला असेल.." वडील गेल्याच दुख अजय ला न्हवतच... आणि विजय नी पण फक्त चौकशी साठी विचारलं होत..

"दिवस करायचे आहेत?" विजय म्हणाला..

"नाही.. थोड दान देऊ गरजूंना..."

"बर.. आणि विल कधी वाचायचं आहे? ते ठरवून ठेवा.." विजय म्हणाला.

"मी आईशी बोललो.. २ दिवसांनी विल वाचू.. पण आई काही बोललीच नाही! शून्यात हरवल्या सारखी झालीये... तिनी पण मान्य केल पाहिजे ना आता.. बाबांचं वय झालंच होत! मी तर म्हणतो फार त्रास न होता गेले हे चांगल झाल.."

"हो ना... त्यांना काही त्रास नाही आणि आपल्याला सुद्धा काही त्रास नाही झाला! मला तर टेन्शनच आल होत जेव्हा डॉक्टर बायपास करा म्हणले होते. बाबांनी नकार दिला म्हणून बर.... पैसे गेले असतेच आणि आपण उगाच अडकलो असतो..सारख हॉस्पिटल मध्ये जावा. सारख्या टेस्ट! सुटलो आपण..." विजय म्हणला..

"हो ना.. झाल ते चांगल झाल!" अजय इतक बोलला आणि त्यानी अॅम्ब्युलंस ला फोन केला.. घरी सगळे नातेवाईक आले. काही वेळातच दोघांनी सगळी काम आटोपली.. पण आई बाहेर आली नाही! आई खोलीत एकटीच बसली होती.. तिची चौकशी करायला सुद्धा कोणी आल न्हवत. जरा वेळानी सुनांनी आईची तोंडदेखली चौकशी केली आणि त्या हॉल मध्ये गेल्या.

दोन दिवसांनी आई अजय आणि विजय शी बोलायला आली..

"हे गेले... आता काय करायचं ठरवलं आहेत?" आईचा आवाज खोल गेला होता...

"बाबांना दिवस करायचे न्हवते.. त्यांनी तस सांगितलं देखील होत.. त्यामुळे आता उद्या त्यांच विल वाचून टाकू.."

"ठीके... मी जाते माझ्या खोलीत!" इतक बोलून आई तिच्या खोलीत गेली.. तेव्हाच मोठ्या सुनेचे आई वडील आले.. हसत खिदळत सगळे गप्पा गोष्टी करत होते. आवाज आत जात होता. हा प्रकार पाहून आई च्या मनाला भयंकर यातना झाल्या. तिनी खोलीच दार लाऊन घेतलं. तिला जाणीव झाली वडिलांच्या जाण्यानी कोणालाच काही फरक पडला न्हवता. ती डोळे मिटून शांत बसून राहिली.

विल वाचायचा दिवस आला. वकील आले. सगळे आजूबाजूला जमले होते. सगळ्यांनाच उत्सुकता होती की आपल्याला काय मिळणार आहे. अजय ला खात्री होती की त्याच्या जवळ दोघ राहत होते म्हणजे त्यालाच जास्ती मालमत्ता मिळणार. आणि विजय ला वाटत होत, मी लहान.. त्यात फार कमावत नसल्यामुळे बाबांनी माझ्यासाठीच जास्ती पैसे ठेवले असतील. शेवटी वकीलांनी विल वाचायला सुरु केल. अजय आणि विजय लक्षपूर्वक विल ऐकत होते. विल वाचून पूर्ण झाल आणि दोघांच्या अस लक्षात आल की त्यांच्यासाठी वडिलांनी काहीही ठेवलं नाहीये. सगळ होत ते आईच्या नावावर आणि आईबरोबर कोणी दीपा च्या नावावर अर्धे पैसे आणि बाकीचे हक्क ठेवले होते. आईनी विल ऐकल पण तिला कोण्याच गोष्टीनी फरक पडला न्हवता. तिनी तिचा नवरा गमावला होता आणि तिच्यासाठी ते दुख विल पेक्षा खूप जास्ती होत. आणि त्यांच्या शेवटच्या काळात, त्यांच्या बरोबर एकही मुलगा न्हवता याच देखील आईला फार दुःख झाल होत. पण तिनी याबद्दल कोणाकडे मन मोकळ केल न्हवत. तिला अंदाज आला होता तिची मुल तिला काय उत्तर देतील. विल ऐकून अजय आणि विजय जाम भडकले.. दोघ एकसुरात बोलले,

"हे काय.. बाबांनी आमच्या नावावर काहीच ठेवलं नाही? आणि हि दीपा कोण? तिचा का हक्क आमच्या मालमत्तेवर?"

"मी तर बाबांची किती काळजी घेतली होती.. तरी? आणि हो ना.. कोण कुठेली दीपा?" अजय म्हणाला..

"आणि मी छोटा आहे... मला पैश्यांची किती गरज आहे हे बाबांना चांगलाच माहिती होत! त्यांना माहिती होत मला बिझिनेस मध्ये किती त लॉस झाला होता. हे बाबांनी बरोबर नाही केल..." विजय चा सूर बदलला आणि तो पण चिडला.

आई दोघांच बोलण ऐकत होती. आईनी फक्त एकाच उत्तर दिल, "तुमची मालमत्ता? सगळ ह्यांनी उभ केल होत! त्यावर तुमचा हक्क सांगू नका! आणि दीपा माझी मुलगी! तसही पैसे ह्यांचे होते.. कोणाला काय द्यायचं हे तुम्ही ठरवणारे कोण? त्यांचे पैसे होते त्यांनी अर्धे पैसे दीपा ला दिले!"

"अग पण आई.. दीपा कोण? आम्हाला बहिण कुठे आहे?" अजयनी प्रश्न केला..

"माझी मुलगी आहे दीपा.. ह्यांनी सुद्धा तिला आपल मानल होत! आणि तिच म्हणाली की मला गावात राहू द्या! म्हणून तुम्हाला ती माहित नाही!"

अजय आणि विजयला काही कळल नाही.. ते दोघ विचार करायला लागले आई काय बोलती आहे. पण पुढची उत्तर द्यायला आई तिथे थांबली नाही.. आई सरळ तिच्या खोलीत गेली आणि तिनी दार लाऊन घेतलं. इथे दोघांना जाणवलं आता आईच मन वळवून आपल्या नावावर सगळे पैसे करून घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि त्यांनी विचार केला, दीपा कोण हे नंतर शोधू! दोघ धावत आईच्या रूम पाशी गेले..

"आई तू ठीक आहेस ना? काळजी करू नकोस.. बाबा गेले पण आम्ही तुझी मुल आहोत ना!" दोघ एकसुरात बोलले.. सरड्यासारखा रंग बदलत दोघ बोलले..

"मला चांगलाच माहितीये तुम्ही दोघ आहात.. आणि आता मला जरा वेळ शांत बसायचं! दोघ प्लीज खोलीच्या बाहेर जा.."

"हो आई तू बस शांत.. इतका मोठा धक्का बसला तुला बाबांच्या जाण्यानी... तू हवापालट म्हणून माझ्याकडे येतेस का? तिथे आलीस की इथल्या आठवणी पुसल्या जातील..." विजय नाटकीपणे म्हणाला.. खर तर त्याला त्याला फक्त आईकडून पैसे उकळायचे होते.

"आई..तू इथेच राहा! आमच घर तर मोठ आहे! विजय च घर छोट आहे! तिथे तुला अडचण होईल.." अजय बोलला...

"अजय.. तुझ घर आहे ना हे! बर झाल सांगितलस! मला तर वाटत होत हे आमच सुद्धा घर आहे."

"आमच म्हणालो का मी.. सॉरी ग आई... मी पण खूप डिस्टर्ब झालोय बाबा गेल्यामुळे.. मला म्हणायचं होत, आपल घर मोठ आहे..."

"ओह.. ठीके.. आणि बघू... मी अजून काही ठरवलं नाहीये कुठे राहायचं!"

"लवकर ठरवून सांग आई... तुला काही त्रास झालेला मला चालणार नाही! आधी बाबा होते.. पण आता मी बाबांची जागा घेऊन तुझी काळजी घेईन.. तुला बँकच काही कळणार नाही.. तू मी सांगेन तिथे फक्त सह्या करून दे. मी सगळ बरोबर सांभाळतो! तू काळजी अजिबात करू नकोस!" अजय म्हणाला..

"नको नको.. मी शिकेन बँकेचे सगळे व्यवहार! गरज पडली तर तुझ्या बाबांचे विद्यार्थी आहेत त्यांची मदत घेईन... ते नाही म्हणणार नाहीत मला मदत करायला... आणि दीपा आहेच! "

"तुला काही कळणार नाही आई.. आणि उगाच कोणीतरी बाहेरच येऊन तुला फसवेल... आणि दीपा कोण आहे? ते तू सांगतच नाहीयेस आई!" विजय म्हणाला...

"नका काळजी करू माझी.. आणि आता प्लीज बाहेर जाता का? मला जरा शांत बसायच आहे. दीपा बद्दल सांगायला मी बांधील नाही आहे.. " आई म्हणाली... "जातांना फक्त दार ओढून घ्या.. आणि कोणी येऊन मला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या.."

"ठीके आहे." अजय आणि विजय मनाविरुद्ध खोलीबाहेर गेले. त्यांना आईच अस वागण अपेक्षित न्हवत. बघू लवकरच आईच मन वळवू अश्या विचारांनी दोघ बाहेरच्या हॉल मध्ये गप्पा गोष्टी करायला लागले. आई खोलीत बसून विचार करत होती. पाहता पाहता आजोबांना जाऊन बरोबर एक महिना झाला. आजीला दीपा ची खूप आठवण येत होती.. दीपाला सुद्धा खूप वाईट वाटल होत पण तिनी मुद्दाम आईला भेटायला येण टाळल होत. दीपा खूप समजूतदार मुलगी होती. तिच्यामुळे कोणाला त्रास व्हावा अस ती कधीच वागायची नाही. आजी अजून त्या धक्क्यातून सावरलीच न्हवती. पण तिनी आजोबांच्या विद्यार्थ्यांकडून बँकेचे सगळे व्यवहार समजून घेतले.. तिच मन अजून आजोबा या जगात नाहीयेत ते मानतच न्हवत. ५५ वर्षाचा संसार दोघांना केला होता. एकमेकांच्या सुख दुखामध्ये दोघ सुंदर आयुष्य जगले होते. आणि अचानक आजोबा गेल्यानी आज्जीच्या मनावर खूप आघात झाला होता. आणि जेव्हा आजोबा गेले तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी आजोबांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल होत. त्याचा सुद्धा आजीच्या मनावर भयंकर आघात झाला होता. आजी एकटीच बसली होती. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर आजोबांच्या शेवटच्या दिवस यायला लागले. आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आल. त्याक्षणी तिला समोर आजोबा असल्याचा भास सुद्धा झाला. आजी नी मनोमन काही निर्णय घेतले .. आणि ते निर्णय सांगायला अजय आणि विजय दोघांना बोलावलं. दोघ आईचा निर्णय काय असेल ते आतुरतेनी ऐकायला लागले..

"हे जाऊन १ महिना झाला! त्यांची कमी मला नेहमीच खलत राहील.. पण आयुष्य तर जगलच पाहिजे! ते नाहीत तरी त्यांच्या इतके वर्षाच्या आठवणी तर माझ्याबरोबर आहेत... मी एक निर्णय घेतला आहे.."

"सांग आई... कुठे राहायच ठरवलं आहेस आता? इथेच ना? तुला इथली सवय पण आहे.. हे घर मोठ पण आहे.." अजय म्हणाला..

"आई तू इतके दिवस दादाकडे राहिलीस.. आता माझ्याकडे चल की.. मला कधी मिळणार तुझा सहवास?" विजय सुद्धा बोलला..

"मला माहितीये तुम्हाला दोघांना माझ्याबद्दल किती आणि काय वाटतंय.. त्याची स्पष्टीकरण देऊ नका. मी असा निर्णय घेतला आहे की मी आमच्या घरी जाऊन राहणारे...दीपा बरोबर!"

"तुझ्या म्हणजे? हेच घर ना? आणि आता प्लीज सांग कोण दीपा!" अजय म्हणाला...

"नाही नाही.. हे तर तुझ घर आहे अजय! ह्यांनी माझ्यासाठी खूप काय काय ठेवलं आहे. आमच घर.. गावातल आमच घर जे खूप मोठ आहे.. आता मी तिथेच राहणारे! तुम्ही कोणीच त्यांच्यासारखे झाला नाहीत! तुम्हाला स्वतःपुढे कधी काही दिसलच नाही.. आणि पैसे हेच तुमच आयुष्य आहे. कोणासारखे झालात तुम्ही दोघ देव जाणे... ते जाउदेत! आहे ते आहे! मला आधी हे मान्य न्हवत पण तुमच्या बाबांनी तुम्हाला पुरत ओळ्खल होत! म्हणूनच त्यांनी तुमच्या दोघांच्या नावावर काहीही ठेवलं नाही. आणि दीपा माझी मुलगी! आमच्या लग्नाच्या आधी माझ एका मुलावर प्रेम होत. आमच लग्न झाल होत पण माझ प्रेम मला सोडून गेल.. म्हणजे एका अपघातात पहिला होणारा नवरा गेला.. तेव्हा दीपाचा जन्म झाला होता.. पण जेव्हा मी तुमच्या बाबांना भेटले त्यांनी मला समजून घेतलं.. त्यांनी माझ्याशी लग्न केल... दीपा ला आपली मुलगी मानल! आम्ही दीपा ला म्हणलो होतो आमच्या जवळ राहा पण ती इथे यायला तयार झाली नाही.. तिला कोणामध्ये गैरसमज निर्माण करायचे न्हवते. तिला तुमची आणि आमच्या दोघांची खूप काळजी होती.."

"आई. आम्हाला कधी सांगितलं नाहीस तुझ्या पास्ट बद्दल... म्हणजे आता तू एकटी राहणार नाहीस! दीपा बरोबर राहणार? पण तिला इथेच का नाही बोलवत? आम्हाला पण बहिण मिळेल..." अजय म्हणाला...

"हो.. मला ह्यांनीच सांगितलं होत, कोणाकडे पूर्व आयुष्याबद्दल चकार शब्द काढू नकोस! म्हणून नाही सांगितलं... आणि माझी नका करू चिंता.. ह्यांना तुम्ही किती वेळ दिलात ते मला चांगलच माहिती आहे! अजून माझ्यासाठी तुमचा वेळ वाया घालवायची काही गरज नाही... दीपा आणि मी आता एकत्र राहणार! आधी तिला वेळ देता आला नाही पण आता माझा सगळा वेळ तिला.."

"ओह.. तू सगळ आधीच ठरवलं आहेस?" अजय आणि विजय च्या चेहऱ्यावर संताप दिसत होता.

"मी नाही हे तुमच्या बाबांनी ठरवल आहे! त्यांना चांगलाच कळल होत कोणाला माझी आणि त्यांची किती काळजी आहे! आणि त्यांना दीपा ची काळजी आहेच! त्यांना हार्ट अॅटॅक आला त्या आधी त्यांनी मला सगळ सांगितलं होत.. ते आत्ता ह्या जगात नाही म्हणून काय झाल? त्यांनी त्यांच्या नंतर सुद्धा माझी नी दीपा ची नीट काळजी घेऊन ठेवली आहे.."

"पण तू तुझ्या पैश्यांची वाटणी नाही का करणार?" विजय ला प्रश्न पडला..

"मी पण माझ विल करून ठेवलय.. ते मी गेल्यावर वकील वाचून दाखवतीलच! मला तुम्हाला त्या बदल सांगायची गरज वाटत नाही.."

अजय आणि विजय यांनी आईच बोलण ऐकल आणि त्यांच्या माना खाली गेल्या. आपण आईशी बाबांशी नीट वागलो नाही याची दोघांना जाणीव झाली.

"आई.. आम्ही चुकलो! आम्ही बाबांची योग्य काळजी घेतली नाही.."

"ठीके.. पण हो गोष्ट कळायला तुम्हाला फारच उशीर झाला. मी उद्याच निघणारे.. दीपा येऊन मला घेऊन जाईल! माझी काही सामान राहील तर नंतर माणसाकडून पाठवून द्या. तुम्ही कोणी यायची गरज नाही.."

अजय आणि विजय दोघांच्या डोळ्यात पाणी आल. पण या अश्रूंचा काहीही उपयोग न्हवता,. आई नी तिचा निर्णय पक्का केला होता. दुसऱ्या दिवशी आई खरच गावातल्या घाई जायला निघाली.. दीपा त्याला घ्यायला आली.. आता तिला कोणत्याही प्रकारच दुःख न्हवत. नवऱ्यानी सांगितल्या प्रमाणेच ती वागली होते. वडिलांनी आपल्या मुलांना चांगलाच ओळखल होत. आई दीपा बरोबर जायला निघाली... मनात बऱ्याच आठवणी होत्या.. पण त्या आठवणी फक्त आजोबांच्या होत्या! आई घराबाहेर पडली मागे वळून न पाहता! तिच नवीन आयुष्य दीपा बरोबर चालू करायला. आणि आजीनी न डळमळता तिचा नवीन प्रवास चालू केला होता.

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com