Lekh - Sarvpriy Gaayak - M. Rafi books and stories free download online pdf in Marathi

लेख- सर्वप्रिय गायक - म.रफी

लेख -सर्वप्रिय गायक म.रफी .
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------ -----------------------------
३१ जुलै हा दिवस हिंदी फिल्म संगीत रसिका साठी भावव्याकुळ होण्याचा दिवस.३१ जुलै १९८० या दिवशी गायक म.रफी आपल्या अव्वाजातील हजारो गाणी मागे ठेवून या फानी -दुनियेला सोडून आपल्यातून निघून गेला , आज ३८ वर्षे झालीत रफीच्या जाण्याला ,पान आज ही रफीची असंख्य गाणी रसिकांच्या मनात जशीच्या तशी आहेत.
१९४६ च्या अनमोल घडी -संगीत नौशाद - या चित्रपटातील " तेरा खिलोना टूटा बालक.." या गाण्याने रफीच्या आवाजाला ओळख मिळण्यास सुरुवात झाली, एक गायक म्हणून त्याची प्रकाशझोतात येण्याची ही सुरुवात होती ..रफीची हे स्वर - पुढे ३४ वर्षे हिंदी चित्रपट संगीतास समृध्द करीत गेले . आजही रफीच्या आवाजाची मोहिनी त्याच्या आवाजाचे गारुड रसिकमनावर अधिराज्य गाजवते आहे.
नौशाद , शंकर -जयकिशन , मदनमोहन , रोशन, सचिन देव बर्मन , ओ .पी .नय्यर , चित्रगुप्त , रवी ,खय्याम , सलील चौधरी , लक्ष्मीकांत -प्यारेलाल , कल्याणजी -आनंदजी , राहुल देव बर्मन ,जयदेव हे प्रमुख संगीतकार सोबत रफीने एका पेक्षा एक सरस गाणी दिलीत ,त्याच बरोबर ..
उषा खन्ना , जी.एस.कोहली , सी.अर्जुन , सोनिक -ओमी , सपान-जगमोहन , सरदार मलिक , एस.एन.त्रिपाठी ,गणेश , प्रेमधवन , या संगीतकारांच्या साठी रफीने गायलेली गाणी .सदाबहार नगमे " आहेत ..हे विसरता येणार नाही.
रफीने बहुतेक सर्व कलाकारांना आपला आवाज दिला ..यात ..हिरो,विनोदी अभिनेते , चरित्र अभिनेते , सह-अभिनेते , खलनायक , अगदी एक्स्ट्रा म्हणवले जातील असे नगण्य -किरकोळ कलाकार ..या सर्वांचा समावेश आहे.


अशोक कुमार ,दिलीपकुमार, राजकपूर , देव आनंद , राजेंद्र कुमार , शम्मी कपूर , राजकुमार , मनोजकुमार , प्रदीप कुमार , भारतभूषण , धर्मेंद्र , जितेंद्र ,शशी कपूर ,राजेश खन्ना , विनोद खन्ना , विस्वजीत , जोय मुखर्जी ,सुजित कुमार , सुदेश कुमार , शैलेश कुमार .,जगदीप ..,प्रेमनाथ , प्राण , प्रेम चोप्रा , शत्रुघ्न सिन्हा ..यादी खूप मोठी आहे..असो.
जॉनी वॉकर आणि मेहमूद , या दोन प्रमुख विनोदवीरांना अनेक चित्रपटात रफीचा आवाज लाभला ..ही सोलो गाणी आणि युगल -गीत अजून ही तितकीच लोकप्रिय आहेत .
रफीची ही विशेष गोष्ट पहा - रसिकांच्या आवडीचा रफी .त्याच्या आवाजात .किती विविधता पूर्ण आहे हे -संगीतकार आणि रफीच्या जोडीवरून कल्पना येते -
१.नौशाद चा रफी , २. शंकर-जयकिशन आणि रफी - हा तर स्वतन्त्र आस्वाद-विषय आहे , ३.रवी आणि रफी ,
४.मदनमोहन आणि रफी , ५.चित्रगुप्त आणि रोशन यांचा रफी , ६.लक्ष्मीकांत -प्यारेलाल आणि रफी , .७.कल्याणजी -आनंदजी रफी ..
हे चित्रपट आणि त्यातले संगीत ,त्यातली गाणी , त्यातले कलाकार -या सगळ्या सोबत रफीच्या आवाजातली एक्से बढकर एक गाणी " म्हणजे हिंदी फिल्म-संगीताचा खजाना .
विशेष उल्लेख करण्यासारखे काही -...
१.संगीतकार रवी यांना त्यांचे पहिले फिल्मफेअर - १९६० साली..चौदहवी का चांद"साठी मिळाले ते गीत - रफीच्या आवाजातल्या शीर्षक गीता साठी .


२.लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचेही पहिले फिल्मफेअर - रफीच्या सोबतीने मिळाले - फिल्म-दोस्ती - १९६४ ,
गीत - चाहुंगा मै तुझे सांज सवेरे ..


३.आर.डी. बर्मन -पंचम - आणि रफी - १९७७ - फिल्म हम किसीसे कम नही .. क्या हुवा तेरा वादा...


४.शंकर-जयकिशन आणि रफी एक जबरदस्त जोडी ..या जोडीला ३ फिल्मफेअर अवार्ड मिळाले -
१. १९६१ - ससुराल - तेरी प्यारी प्यारी सुरत को...
२. १९६६ - सुरज - बहारो फुल बरसाओ..
३. १९६८ - ब्र्हम्चारी - दिल के झरोखे मे....
------------------------------ ---
रफीला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार
१.१९६८ - फिल्म- नील कमल , गीत - बाबुल की दुवाये ..संगीतकार - रवी ,
२.१९७७ - फिल्म- हम किसीसे कम नही - क्या हुवा तेरा वादा.. संगीतकार - राहुल देव बर्मन
रसिक हो - रफीची सोलो गाणी असो की सह-गायकांच्या सोबतची गाणी असो ..ती लोकप्रिय आहेत ,रफी-लता ,रफी-आशा , रफी-शमशादबेगम , रफी- गीता दत्त , रफी- सुरैय्या , गायिका असो की ..
रफी -मन्ना डे, रफी- किशोर , रफी--मुकेश , रफी -तलत , रफी -महेंद्र कपूर , रफी- बलबीर असे सह-गायक असो
गाणे आपल्या मनात घर केल्या शिवाय रहात नाही.
माझाही आवडता गायक रफी - रफीची सगळीच गाणी मला आवडतात , नेहमी गुणगुणत असतो मी माझ्याशी रफीची गाणी , रफीच्या आवाजातील माझ्या अतिशय आवडीची काही गाणी लिस्ट करून देतो आहे तुम्ही जरूर ऐका .
या लिस्ट मधली ही गाणी म्हणजे रफीच्या हरहुन्नरी आवाजाची प्रचीती देणारी अशीच आहेत ..
म.रफीची ही सोलो songs- एकल गाणी -
------------------------------ ------------------------------ --------------
गीत फिल्म - संगीतकार
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------
१.पास बैठो तबियत बहेल जायेगी - पुनर्मिलन - सी. अर्जुन .
२.मुझे तुमसे मुहब्बत है.. बचपन - सरदार मलिक
३. हम तुमसे जुदा हो के एक सपेरा एक लुटेरा उषा खन्ना
४.मैने रख्खा है मुहब्बत शबनम उषा खन्ना
५.तेरी गलियो मे न .... हवस उषा खन्ना
६. अभी क्म्सीन हो, नादा हो .. आंधी और तुफान लक्ष्मीकांत -प्यारेलाल
७. चल उड जा रे पंछी .. भाभी चित्रगुप्त
८. कल चमन था आज एक .. खानदान रवी
९. लग जा गले दिलरुबा दस लाख रवी
१०.सौ बार जनम लेंगे उस्तादो के उस्ताद रवी
११.दिवाना केह के आज मुझे मुजरीम रवी
१२.ये शमा तो जली आया सावन झुमके लक्ष्मी-प्यारे
१३.आनेसे उस के आये बहार जिने की राह लक्ष्मी-प्यारे
१४.खिलोना जान कर तुम तो . खिलौना लक्ष्मी-प्यारे
१५.पर्देसियो से न आखीया जब जब फुल खिले कल्याणजी -आनंदजी
१६.चले थे साथ मिलकर हसीना मान जायेगी कल्याणजी -आनंदजी
१७.सुख के सब साथी गोपी कल्याणजी -आनंदजी
१८.बडी दूर से आये है समझोता कल्याणजी -आनंदजी
१९.दिल ने प्यार किया है .. शरारत गणेश
२०.अपनी आंखो मे बिठा कर ठोकर श्यामजी घन्श्याम्जी
२१. फिर आने लागा याद व्ही .. ये दिल कीस को दु इक्बाल कुरेशी
२२. जाने क्या धुंडती रेहती है .. शोला और शबनम खय्याम
२३. तुम चली जाओगी .. शगुन खय्याम
२४ .है कली कली के लब पर लाला रुख खय्याम
२५ . मना मेरे हसीन सनम .. एद्व्हेन्चार्स ऑफ
रोबिन हूड जी.एस. कोहली
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
रसिक हो ..नौशाद , शंकर जयकिशन , मदनमोहन , रोशन , सचिन देव बर्मन , जयदेव ,सलील चौधरी यांची रफीच्या आवाजातली गाणी ..तुमच्या माझ्या मनात ..आजच्या लेखात .थोडे भुले बिसरे गीत - घेतलीत .
प्रिय गायक रफीला भावांजली ...!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------ लेख -

सर्वप्रिय गायक म.रफी .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------