Susvadi Sahjivan books and stories free download online pdf in Marathi

सुसंवादी सहजीवन

Arun V Deshpande

9850177342

arunvdeshpande@gmail.com

मातृभारती आयोजित पत्र –लेखन-स्पर्धा –भाषा -विभाग –मराठी

सहभाग ..!

मातृभारती टीम ,

नमस्कार ,

आपण आयोजित केलेल्या पत्र-लेखन-स्पर्धेत माझा सहभाग नोंदवतांना आनंद होतो आहे.

पत्र-शीर्षक – “पत्र – नव-विवाहित जोडप्यांस

-सुसंवादी –सहजीवनासाठी .

माझे हे पत्र स्पर्धेत दाखल करून घेणे ही विनंती.

स्नेहांकित –

अरुण वि.देशपांडे

मातृभारती आयोजित पत्र –लेखन-स्पर्धा –भाषा -विभाग –मराठी

ले- अरुण वि.देशपांडे

पत्र -

नव-विवाहित जोडप्यास

-----------------------------------------

सुसंवादी सहजीवनासाठी ....!

----------------------------------

चि.मंदार

चि..सौ .सायली

अ.ऊ.आशीर्वाद .

आज तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.गेल्यावर्षी .नववर्षाच्या आरंभीच तुम्ही तुमच्या सह्जीवनास आरंभ केला .

तुमच्या परिवारातील स्नेहीजन ,आणि परिचित , तुमचे मित्र -मैत्रिणी , कार्यालयातील सहकारी , अशी विविध मंडळी

विवाह-प्रसंगी हजर होती. तुमची जोडी पाहून सगळ्यांनी खूप आनंद आणि समाधान व्यक्त केले . "अनुरूप अशी जोडी ", मेड फॉर इच अदर", लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय खरा ", एक ना अनेक रिमार्क्स मिळाले तुम्हा दोघांना.

मंदार - तू माझ्या नात्यातला , आणि सायली -तू माझ्या परिचित मित्राची मुलगी .म्हणजे तुम्हा दोघांनाही मी तुमच्या लहानपणापासून पहात आलोय.त्यामुळे तुमचा संसार कसा असणार ?याची मला खूप उत्सुकता होती..

तुम्ही एकमेकांच्या जुजबी ओळखीचे, अगोदरपासून तुमचा परिचय नव्हता ,किंवा तुमचा प्रेम-विवाह "आहे असेही नव्हते . परिचित परिवार -म्हणून एकमेकांची माहिती मिळवणे सोपे होते .आणि मग योग्य -स्थळ " म्हणून ,तुमचे लग्न ठरले आणि पार पडले.

तुमच्या दोघांचा परिचित "या नात्याने मी तुमच्या वर्षभराच्या सहजीवनाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. वर्षाभाराचा तुमचा सहजीवन -प्रवास आलेख " मांडायचा झाला तर ..मी म्हणेन की तुम्ही "नापास "झाला नाहीत हे नक्की ,पण..तुम्ही दोघे "जेमतेम काठावर पास झाला आहात ", हा रिझल्ट मात्र चिंता करण्या सारखा आहे",असे मी म्हणेन.

आणि म्हणूनच समक्ष बोलून तुम्हाला काही सांगणे "म्हणजे उपदेशाचे डोस ",देण्यासारखे होईल ,कदाचित ते तुम्हाला फारसे आवडणार नाही , पण,शब्दातून तुम्ही ते व्यक्त करणार नाहीत", मोठ्या माणसाला उलटून कसे बोलायचे ?" या विचाराने तुम्ही मी सांगितलेले निमुटपणे ऐकून घ्याल."

म्हणूनच मी -हे पत्र लिहून संवाद साधतो आहे . - तुमच्या हायटेक "पिढीला पत्र -महत्व कळणार

नाही , आजकाल पत्र-लिहिणे , ते पाठवणे ,त्याचे उत्तर देणे " हे जवळपास थांबले आहे.आमच्या पिढीला ,त्याही अगोदरच्या पिढीला आणि खूप जुन्या कालापासून पासून "पत्र ,आणि पत्र -लेखन यांना महत्व आहे . पत्र " म्हणजे -वैचारिक आणि भावनिक "संपर्काचे अतिशय प्रभावी मध्यम होते ,आजही ते तितकेच प्रभावी ठरू शकेल .पण.लेखन-प्रवाह अतिशय क्षीण" झालेला आहे.असे म्हणावेसे वाटते.

माझ्या या पत्रातून विवाहित जोडप्यांनी काय करावे ? ,काय केले पाहिजे ?जेणेकरून सहजीवन हे विसंवादी असेल तर ते नक्कीच सुसंवादी सहजीवन होऊ शकेल ,तुम्ही हे पत्र एकेकट्याने वाचा , नंतर दोघांनी मिळून वाचा , मी सांगितलेल्या मुद्यावर चर्चा करा , काही तुम्हा पटेल , काही पटणार नाही..पण, हे विचार तुमच्या मनापर्यंत तरी नक्कीच पोचतील, काय सांगावे कधी तरी यांचे महत्व तुम्हाला जाणवले तर ,मला अपेक्षित असा बदल तुमच्या सहजीवनात होईल ही. असो.

मंदार आणि सायली ..आता हे वाचा ...!

नव्याचे नऊदिवस सरले की ..-की खरी गोष्ट जाणवते आणि –दिसते "असे आपण नेहमी म्हणतो ",यात नक्कीच तथ्य आहे.

आता पहा ना , तुमच्या लग्नानंतरचे पहिले पाच-सहा महिने .सणवार आणि -कौतुक-सोहोळ्यात कसे गेले कळालेच नाही हो ", असे तुम्ही म्हणाल ,अगदी बरोबर आहे आहे हे तुमचे.

पण ,तुम्ही तुमच्या नोकरीच्या गावी गेल्यावर , स्वतःच्या घरात संसार सुरु केलात ,नॉर्मल रुटीन -सुरु झाले , त्या दिवसा नंतरच नवरा-बायको" म्हणून तुम्हाला एकमेकांचा सहवास लाभत गेला, व्यक्ती म्हणून स्वभाव जाणून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली , आणि इथूनच एकमेकांच्या वैचारिक पातळीची , आवडी-निवडीची ,ओळख पटायला लागली .

पती -पत्नी , नवरा -बायको -" हे नाते तसे म्हटले तर आयुष्यभर निभावून नेण्याचे नाते आहे. नवरा-बायको "यामध्ये - नोकरीकरणारी बायको "हवी असते , आणि घराची जबाबदारी देखील तिनेच घेतली पाहिजे "अशी अपेक्षा असते " आणि पिढी-दर-पिढी या मानसिकतेत काहीही फरक पडलेला नाहीये.आता असे करून चालणार नाही , "बायकोला मदत म्हणून का होईना - तिच्या कामात , जबाबदारीच्या ओझ्यात सहभाग घेतला पाहिजे .

2. पती-पत्नी या नात्यात- अधिकाराने .कोण मोठे कोण लहान .? असे नसावे .जरी आपल्याकडील परंपरेने पती हा कुटुंब -प्रमुख "या अधिकाराच्या भूमिकेत वावरत असतो तरी ,पण, संसाराचा -गाडा अगदी समर्थपणे ओढण्याचे कार्य मात्र फक्त बायको -पत्नी करीत असते ..हे लक्षात असू द्यावे ..ही गोष्ट निखळपणे मोठ्या मनाने मान्य करण्यात मुळीच कमीपणा नाही. गेल्या पिढीच्या नवरा-बायकोच्या सहवासात भावनिक कोंडमारा फार मोठ्या प्रमाणात होता , तो तुमच्या नव्यापिढीतील पती-पत्नींच्या सहजीवनात जाणवू नये.असा नक्कीच प्रयत्न करावा.

३. नवरा-बायको -दोन माणसे -दोन व्यक्ती आहेत ..त्यामुळे दोन-भिन्न मनं एकत्र येऊन साथ-देऊन-साथ घेऊन राहू लागतात ..त्या वेळेस दोघांच्या मनांची परीक्षाच असते. रोजच्या दैनंदिन दिनक्रमाची सुरुवात .एकमेकाच्या आवडी-निवडी , आणि स्वभावगुण लक्षात ठेवून करता आले तर "मतभेद "किंवा "कटुता " टाळता येणे सहज शक्य आहे.

४. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात अनेक गुण असतात तसेच अनेक अवगुण आणि दोष असतात . परंतु बहुसंख्य वेळा गुणवंत दुरक्षित राहून जातात कारण त्याच्यात उपद्रव शक्ती नसते , आणि अवगुणी आणि दोषपूर्ण व्यक्ती उपद्रवी असेल तर मात्र त्याच्या अवगुणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते ,

आणि अशावेळी गुणवान व्यक्तीवर नक्कीच अन्याय होतो .पती पत्नीच्या जोडीत अशी उदाहरणे नसतातच असे नाही ,ती असतातच , अशा उदाहरणात बायकोवर -पत्नीवर निभावून नेण्याची अपेक्षा लादली जाते घरातील मंडळी .."नवरा -मुलगा " त्याच्या बाबतीत "आपला तो बाब्या -दुसर्याचं ते कार्टं ..! असा न्याय लावतात .घरगुती वातवरणात असे काही होण्याची लक्षण जाणवू लागतील "त्यावेळी नवर्याने -आपल्या बायकोवर अन्याय होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी..

५.संवाद असणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे , तसेच सहमती असो वा मतभेद .दोन्ही वेळी .व्यक्त होता आले पाहिजे ,असे करता आले नाही नाही तर .विनाकारण मोठ्ठाच मन:स्ताप सहन करावा लागतो .त्यामुळे "वेळ आणि संधी" हातून निसटता कामा नये.पती आक्रमक स्वभावाचा असतो ,पत्नी देखील अशाच स्वभाव्ची असेल तर पाहायलाच नको."कुणी माघार घायची ?" या प्रश्नावरच गाडी अडून बसते .भांडता येणे ,वाद-घालीत बसणे" स्वतःचेच खरे "हा दुराग्रह कायम ठेवून त्याच ठसक्यात वावरणे ..यामुळे संसारात शांतता असणे केवळ अशक्य आहे.

६. पती असो व पत्नी - दोघांनही आपल्या संसारात सुख-शांती -समाधान "असावे असे वाटणे अगदी योग्य आहे.

त्यासाठी एकमेकांचा सन्मान करा , कुरघोडी करू नये , इतरांच्या समोर एकमेकांची उणी-दुणी काढून पाणउतारा करणारी जोडपी –म्हणजे आपल्याच नात्याचा अपमान करणारी माणसे असतात. .अशा जोडप्य पासून इतर माणसे कायम दूर असतात.

७. सहजीवन हे संगीत सुरावटी सारखे आहे.एखादा बदसूर .सारे संगीत बेसूर करून टाकणारा असतो.म्हणून बेरंग होणार नाही ,एकमेकांची मनं दुखावली जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे . माणसाचे मनं नाजूक असते "हे मान्यच आहे..त्याही पेक्षा -जास्त नाजूक असते -ते नवरा-बायकोचे मधुर नाते ".या नात्याला तडा जाता कामा नये .

नवरा-बायकोच्या नात्यात -विस्वास हा अत्यंत महत्वाचा आहे.दोघात समन्वय असला तर .इतरांनी किती ही खोटं सांगू देत, त्यास सत्य मानता कामा नये . कारण तुमचे सहजीवन व्यवस्थित चालू असलेले पहाणे "हा अनेकांच्या मत्सराचा विषय बनू शकतो .सबब -तुमचे नाते दृढ असू द्या .त्याच बरोबर ते सुदृढ असू द्या.

८. एकमेकांच्या सोबतीने संसार करणे ,सह्जीवांतील आनंद घेणे हे तर अपेक्षित आहेच ,त्याच बरोबर .येणाऱ्या समस्या , संकटं , कसोटीच्या वेळा , दुखद -प्रसंग , मनास कोलमडून टाकणार्या घटना ,या गोष्टी घडत रहाणार ,या वेळीच तर पती-पत्नीच्या नात्याची परीक्षा असते.आणि जे नवरा-बायको अशा कठीण समयी एकमेकांना विस्वसाने आधार देऊन आवरतात -सावरतात ..त्यांच्या सहजीवनाची नौका निर्धोकपणे संसार-सागरातून मार्ग- क्रमणा करीत असते.

९. सहजीवनात पती-पत्नी त्यांना अपत्य झाल्यावर .आई-बाबा आणि पालकांच्या भूमिकेतून जगण्यास सुरुवात करतात .जी अधिकाधिक जबाबदारीची भूमिका असते. एक उत्तम पालक ,आई-बाबा .सर्वार्थांने मुलांना घडवू शकणारे शिल्पकार असतात . प्रत्येक पती-पत्नीने हे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे.

मंदार आणि सायली ..माझे मनोगत .तुमचा एक जेष्ठ -मित्र म्हणून आज शेअर केले आहे.माझ्या विवेचनातले तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचा विचार जरूर करावा. आग्रह नाही पण विनंती नक्कीच आहे..

वेळ मिळाला तर पत्राचे उत्तरं द्या, तुमचे पत्र येणे मला खूप आवडेल .

तुमच्या नात्याला -सहजीवनाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

स्नेहांकित -

एक मित्र.

मातृभारती आयोजित पत्र –लेखन-स्पर्धा –भाषा -विभाग –मराठी

ले- अरुण वि.देशपांडे

पत्र -

नव-विवाहित जोडप्यास

-----------------------------------------

सुसंवादी सहजीवनासाठी ....!

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

मो-९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

Share

NEW REALESED