Shevantache Sundarban books and stories free download online pdf in Marathi

शेवंताचे सुंदरबन

Arun V Deshpande

arunvdeshpande@gmail.com

मातृभारती आयोजित

national story writting competition - Childeren story- या उपक्रमात मराठी - बाल-कथा - शेवंताचे सुंदरबन " माझा सहभाग नोंदवतो आहे. ही बाल-कथा दाखल करून घ्यावी.

या मेलची पोंच द्यावी.

उपक्रमास शुभेच्छा .

स्नेहांकित -

अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो- ९८५०१७७३४२

national story writting competition - Childeren story- या उपक्रमात

बाल-कथा -

शेवंताचे सुंदरबन "

ले- अरुण वि.देशपांडे

----------------------------------------------------

सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या . बिलकुल करमत नाहीये ग आई , चल ना बाहेर फिरून येऊ कुठेतरी , मस्त ट्रीप झाली की की छान वाटेल बघ , पिंकी आईला सारखे म्हणत होती ,पण आई-बाबंना काही केल्या सुट्टी मिळत नव्हती ,त्यामुळे सहल रद्द झाल्यातच जमा होती .

हे पाहून पिंकी फार उदास झाली होती ,तिचे मन काही केल्या अशा गोष्टी करण्यात रमत नव्हते .

एक दिवस तिच्या महेशमामाचा फोन आला , तो म्हणत होता ,पुढच्या आठवड्यात तो औषधी गोळा करण्या साठी रानोमाळ फिरून येणार आहे त्यासाठी ,त्याच्या एका मित्राच्या लहानशा गावात रहाणार आहे. पिंकीला आवडत असेल तर,ती मामाच्या सोबत तीन-चार दिवस राहू शकते . एखाद्या रिसोर्टच्या ठिकाणचा निसर्ग पहाणे वेगळा आणि लहानशा गावातले निसर्ग -जीवन अनुभवणे यात खूप फरक आहे .पिंकीने एक बदल म्हणून हा अनुभव जरूर घ्यावा अशी महेश्मामाची इच्छा होती.

मामाची सोबत आहे म्हटल्यावर .आई-बाबांनी परवानगी देत म्हटले ..पिंकी ,जरूर जाऊन ये , पण आमची एक अट आहे .. तुला आलेला अनुभव तू एकेक दिवस या प्रमाणे लिहून ठेवायचा ..आणि आम्हाला द्यायचा ..आम्ही तुझा अनुभव सगळ्यांपर्यंत पोन्चेल असे करू ..काय सांगावे ..तुझ्यामुळे अनेकांना अशा ठिकाणी जाऊन येण्याची प्रेरणा मिळेल ..

आई-बाबांची ही आयडिया पिंकी इतकीच महेश्मामाला आवडली ..त्याने पिंकीला या साठी मदत करण्याचे कबूल केले

मित्रांनो पिंकी आणि महेश्मामाचा ही सहल कशी झाली ते पिंकीने कळवले आहे.. आपण मिळून वाचू या ..

१. दिवस- पहिला ..

---------------------------------------------------------

मामा आणि त्याच्या मित्रान बरोबर त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही मोठ्या गाडीने निघालो.. सकाळच्या वेळी रस्त्यावर वाहनांची अजिबात गर्दी नव्हती , पहाट-शांतता कशी असते याचा अनुभव आम्ही सगळे घेत होतो . आमच्या मुक्कामाचे ठिकाण असलेले मामाच्या मित्राचे गाव मोठ्या गावा पासून दूर , डोंगरात अगदी आत होते .रस्ता मात्र छान असल्यामुळे येणे-जाणे कठीण नव्हते .एका नदीच्या काठी असलेले .. कमी लोकवस्ती असलेले टुमदार गाव आहे

चोहीकडून डोंगरांनी या गावाला जणू वेढून टाकलेले होते ..जिकडे तिकडे भली मोठीच्या मोठी दिसणारी झाडे होती ,भवताली घनदाट जंगल वाटावे अशी वनराई होती ,अशा -वनात फिरून मामा आणि त्याचे मित्र उपयोगी अशी वनस्पती औषधी शोधायचे आणि सोबत घेऊन जायचे .

.मी तर अशी ग्रीनरी " पहिल्यांदाच पहात होते ..बाहेर सगळीकडे कडक उन्हाळा होता ..इथे मत्र त्याचा मागमूसही नव्हता मस्त थंडगार सावली होती ,.डोळ्यांना खूप शांत शांत वाटू लागले ..कडक उन्हाचा त्रास इथे मुळीच होणार नव्हता .या कल्पनेने छान वाटू लागले होते .

आम्ही पोंचलो तेव्न्हा दुपार झालेली होती ,प्रवास छान झाला ,थकवा तर मुळीच आलेला नाही हे जाणवत होते.

, मामानेच माझी ओळख घरातल्या सगळ्यांशी करून देत म्हटले .. ही तुमची पाहुणी" नाही बरे का ..घरातलीच एक समजा हिला ..आणि तुमच्या कामात सहभागी करून घ्या अगदी हक्काने .खूप काम करून घ्या .

मामाचे हे बोलणे मला खूप आवडले ..किती सहजतेने तो सगळ्यांबरोबर वागत होता ..बोलत होता ..त्याच्या वावरण्यातून आपलेपणा जाणवत होता ..मग मला पण मोकळेपणा वाटायला लागला .

त्या घरात माझ्याच वयाची मुलगी होती .आमची लगेच छान मैत्री झालीआम्ही मोकळेपणाने बोलू लागलो ,जणू आम्ही जुन्या मैत्रिणी ,आज खूप दिवसांनी भेटलो होतो .. ती सांगू लागली..मी ऐकू लागले ..

ती म्हणाली - माझे नाव ..शेवंती ..म्हणतात सगळे शेवंता . मला एकदम पिवळ्या धम्मक शेवंती पुहालंची आठवण झाली ,ही शेवंता सुद्धा तसीच नाजूक नि सुंदर दिसत होती .म्हणतात "सिम्पल इज ब्युटी ..!".

आमच्या या छोट्याश्या गावाचं नावं आहे- सुंदरबन . तुला खूप आवडेल आवडेल आमच गाव ..

.वाव- ! .सुंदरबन ...! कित्ती सुंदर न हे नाव ..नावाला शोभेल असेच वातावरण होते या गावात ..आजूबाजूला सुंदरसा निसर्ग ..त्याचा निर्मल सहवास .शेव्न्ताला म्हणाले - खूप नशीबवान आहात तुम्ही लोकं..

आता आमच्या घरात कोण कोण आहेत ते सांगते ..माझी आई- तिचे - नाव तुळसा , , ,बाबाचे नाव -विश्वनाथ , मोठ्या ताईचे नाव- मंजुळा .तिचे लग्न झाले आहे .आणि ,

माझ्या ,दादाचे नाव- श्रावण-तो शिकायला म्हणून मोठ्या गावाला असतो. आता आम्ही तिघेजन इथे राहतो

सोबतीला माझा एक खास दोस्त आहे .आता बाबांच्या सोबत शेतावर गेलाय तो ..येईलच थोड्या वेळात .तसेच झाले,

शेव्न्ताचे बाबा घराकडे येतांना आम्हाला दिसत होते , मळ्यातील ताजाताजा भाजीपाला त्यांच्या हातात होता , घरात आल्यावर ..माझ्याकडे पाहून ते हसत - हसत म्हणाले - पाहुण्या साठी हा बघा रानमेवा आणलाय .!

त्यांच्या पाठोपाठ भलामोठ्ठा डॉगी-आला ..काळाभोर .रंग आणि पांढरे पांढरे ठिबके ..नवी माणसे पाहून त्याने मोठठ्ठ्याने भुंकायला सुरुवात केली ..मग मात्र मी घाबरून शेव्न्ताच्या मागे उभी राहिली .. शेव्न्ताने त्याला आवाज दिला ..झेंड्या ..चूप बस , ओरडू नको .आपली ताई आहे ही. लगेच गप्प झाला कि तो..

.

मी विचरले ..शेवंता ..काय ग हे नावं ..झेंड्या ?..विचित्र ना ..

ती हसत म्हणाली ..अग- याच नावं आहे ..झेंडू .! झेंडू फुल माहिती आहे ना तुला ..सणासुदीच्या दिवशी याच्या माळा करतो आपण ..तेच झेंडू फुल ..याची गम्मत सांगते ..आता हा एव्हढा मोठ्ठा झालाय झेंड्या ..पण पिल्लू होतां एव्ह्धासा ,आमच्या घरामागे शेतात झेंडू-फुले आहेत.एक दिवशी तिथे हा दिसला मला , याच्या पायाला जखम झालेली ,नुसता रडत होता ..मग मला राहवले नाही , उचलून आणला घरी..तेव्न्हापासून घरातलाच झालाय झेंड्या . खूप हुश्हार आणू समजदार आहे बरं का .तुझ्यावर ओरडायचे नाही ..सांगितले .की बसला की नाही चूप.

शेवंता म्हणत होती त्या प्रमाणे " झेंडू -कुत्रा तिचा बेस्ट-फ्रेंड होता" ,तिला सतत सोबत करणारा ,शाळेत जातांना सोबत.. घरी येतांना सोबत असायचा झेंडू.. शेव्न्ताला कशाची भीती वाटतच नव्हती माणूस आणि प्राणी एकमेकाचे मित्र असतात "याचे छान उदाहरण मला शेवंता आणि झेंडू यांच्या फ्रेन्डशिप मुळेदिसले होते.

शेव्न्ताच्या आईने आम्हा सर्वांसाठी खमंग जेवण बनवले ..पिठलं -भाकरी ,लोणच आणि दाण्याची चटणी , बाहेर अंगणात आम्ही सारे जेवणास बसलो ..वनभोजन करोती असेच मला वाटले.

शेव्न्ताला घरकामाची खूप सवय होती ती लगेच आवराआवर करू लागली ..तिची आई म्हणाली .आमच्या शेव्न्ताला रिकाम बसवत नाही ..घराच्या स्वच्छतेची आवडच आहे तिला ..मला कधी सांगायची वेळच येत नाही ..आपणहून करते आमची ताई ..खूप कामाची आहे पोरं .

खरे तर ..मी मनातून खूप खजील झालेली होते .कारण मला या गोष्टींची आणि कामाची सवय नव्हती .आवड नव्हती ..आई एकटी काम करणारी ..मी नुसतच पहाणारी .माझ्यातील हा दुर्गुण आणि कमीपणा .आज शेव्न्ताच्या छान सवयी मुळे ठळकपणे जाणवला ..आपण पण बदलण्याचा प्रयत्न करू.असे मी ठरवले.

संध्याकाळी मी आणि शेवंता आजूबाजूला फिरून आलो, रस्त्यात तिच्या मैत्रिणी भेटल्या ,सगळ्याजणी आमच्याशी बोलून मगच पुढे गेल्या ,नाहीत तर आमच्या सोसायटीत रोजचे लोक , मनात नसेल तर ओळख सुद्धा दाखवणार नाहीत .. छान वागण्याची सुद्धा आवड असावी लागते हेच खरे.

त्या लहानश्या गावात रात्र सुद्धा लवकर झाली.. बाकीच्या अवांतर गोष्टी नव्हत्या .सेव्न्ताच्या घरातल्या सर्वांना "लवकर निजे -लवकर उठे " याची सवय होती. त्या प्रमाणे साडेनऊ वाजता घरात शांतता .अशा वातावरणाची मला सवय नव्हती ..माझी आजी हे पाहून तर म्हणते ..तुम्हा लोकाना रात्र झाली की दिवस उजाडतो " ..किती सांगा तुमच्या डोक्यात चांगल्या गोष्टी शिरतच नाही. कठीण रे बाबा तुमचं.

कित्ती छान गेला हा पहिला दिवस. कधीच व्सिरू शकणार नाही मी.

दिवस दुसरा –

शेवंता आणि तिची आई सकाळी खूपच लवकर जाग्या होतात ..बरोबरच ना ..पूर्ण आणि शांत झोप झाली की जाग येणार ..आणि इथे तर किती प्रसन्न सकाळ ..त्यांच्या पाठोपाठ ..मी पण उठले .. घरा समोरचे अंगण , गाय असलेला गोठा , झेंडू कुत्रा बसून असायचा तो कोपरा .. कसा साफ करायचा ? शेव्न्ताला विचारीत .मी या जागा साफसूफ केल्या , घाण मुळीच वाटले नाही ..उलट स्वच्छ परिसार कसा असतो हेच मी अनुभवले .

महेशमामाने हे सगळे दृश्य पाहिले मला शाबासकी देत तो म्हणाला ..ये बात पिंकी..,सांगून तर कुणी ही करेल, न सांगता मनापासून जे जे करू ते काम आनंद देणारे असते . आम्ही शहरी माणसांनी हे जरूर अनुभवले पाहिजे ..निदान वर्षातले काही दिवास अशा वातावरणात घालवता आले तर जरूर घालवावेत."निसर्ग आपला गुरु आहे..शिक्षक आहे.. जीवन विषयक अनेक गोष्टी त्याच्या सहवासात शिकता येतात " अशी संधी सोडू नये.

ताजे अन्न- ताजे पाणी ", हा मंत्र शेव्न्ताच्या घरातीलच नव्हे तर आसपास रहाणारी सगळी मानं आचरणात आणीत होती .त्यामुळे सगळेजण कसे वेगळे आणि फ्रेश वाटत होते .

दुपारी चार-पाच वाजता आम्ही नदी-काठी जाऊन बसलो ..खूप पक्षी दिसत होते सगळ्यांची नावं शेव्न्ताला माहिती होती ,मला काही पक्षी ओळखू आले हे पाहून शेवंता खुश झाली. .मला निसर्ग-जीवनाची माहिती फक्त वाचनातून होती..शेवंता तर रोज अनुभवत होती.आमच्या सोबत झेंडू-कुत्रा होता.

एखादा दोस्त जसा बाजूला बसून न बोलता गप्पा शेअर करतो म्हणजे ऐकतो ..बोलत नाही .तसाच वाटत होता ..झेंडू.आज मला त्याचीभिती वाटत नव्हती ..त्याच्या अंगावरून मी हात फिरवला ..त्याने सुद्धा झुबकेदार शेपूट हलवून - थ्यांकू ताई " असे म्हटले असावे

रात्रीच्या जेवण मस्त चांदण्यात झाले. नंतर महेश्मामा आणि त्याचे मित्र शेव्न्ताच्या बाबांच्या सोबत औषधी विषयी चर्चा करीत बसले .आम्ही ऐकत होतो. बाबा म्हणाले .. माणूस मोठा हावरट आणि अधाशी प्राणी आहे. तुझं ते माझं आणि माझं ते माझचं " असा अप्पलपोट्या झालाय माणूस . स्वतःच्या स्वार्थापायी बहुमोल आणि जीवन उपयोगी वन-संपत्तीची लुट करतोय,त्याला काळात नाही की आपल्या अशा करणीने पर्यावरण -नुकसान होते आहे ",

महेशमामा ..तुमच्या सारख्या जाणकार तरुणांनी याबाद्ल लोक-जागरण केले पाहिजे " तरच आपल्या पालन-कर्त्या निसर्गाचे रक्षण होईल".

मी शेव्न्ताला म्हणाले ..तुझे बाबा कित्ती हुशार आहेत ग , लहान गावातले आहेत असे वाटतच नाही

.

पिंकीताई ..हीच तर गम्मत आहे .माझे बाबा अडाणी -निरक्षर नाहीत , ते उच्च -शिक्षित -प्रशिक्षित कृषी-तज्ञा आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या दिसण्यावर जाऊ नको."

शेवंता - अशा हुशार बाबांची तू पण तितकीच हुशार लेक आहेस बरे का .

यावर शेवंता खूप गोड हसली .कित्ती छान दिसत होई ..लाईक अ ब्युटीफुल फ्लावर".

झोपण्याच्या तयारीत असतांना महेश्मामा म्हणाला ..पिंकी ..सॉरी बरे का , उद्या सकाळीच निघायचे आहे आपल्याला , दुसर्या एका ठिकाणी महत्वाची मिटिंग ठरलीय अचानक , नाईलाज आहे,

तुला घरी सोडून .लगेच पुढे जाईन मी.

अरे देवा.. हे काय झाले..! शेवंता खूप नाराज होऊन म्हणाली , मला सुद्धा खूप वाईट वाटले ,

मी म्हणाले ..शेवंता .भेटच न झाल्या पेक्षा ..२ दिवस तर २ दिवस तुझ्या घरी ,या निसर्ग सहवासात राहायला मिळाले यातच आनंद माणू या. पुन्हा कधी तरी .महेश्मामा इकडे येईलच ..मी नक्की येईन त्याच्या सोबत.

सकाळी लवकर उठायचे होते ..लवकर झोप लागली ..

परतीचा दिवस..

शेव्न्ताच्या बाबांनी आवाज दिला ..बाहेर अजून उजाडले नव्हते ..दूरदूर शांतता होती .पक्षी जागे झाले होते ..नदीच्या प्रव्हाचा आवाज गोड संगीत -गाण्य सारखा वाटत होता ....आम्ही निघाली.

निरोप घेतांना मन भरून आलाय असे वाटू लागले .. गाडीत बसतांना मी शेवंता कडे पाहिले ..ती तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू थांबवत होती ..आमचा बेस्ट फ्रेंड .झेंडू ..शेपूट न हलवता ..माझ्याकडे पहात होता..मला राहवले नाही ,रुमालाने मी माझे डोळे पुशीत राहिले ..

महेश्मामा ने गाडी सुरु केली ..शेवंताचे "सुंदरबन." मागे मागे ..पडत गेले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाल-कथा -

शेवंताचे सुंदरबन "

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो- ९८५०१७७३४२

email

arunvdeshpande@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------------------------------------