Malala books and stories free download online pdf in Marathi

मलाला

मलाला

शेक्सपियर ने म्हंटल आहे नावात काय आहे ? नावात काही असेल नसेल पण प्रत्येक नावात एक अर्थ दडलेला असतो हे नक्की. जसे की साधना म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या , योग , मेहनत वगैरे. असाच प्रत्येक नावाचा काही ना काही अर्थ असतोच. नावांचे ही प्रकार असतात. जसे की स्त्रियांची अणि पुरुषांची नावे वेगळी असतात. पण त्यातही काही नाव कॉमन असतात. जसे की किरण, शितल , सुजल , नवीन ही अशी नावे आहेत जी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी वापरली जातात. टोपणनाव हा ही प्रकार पहायला मिळतो . लाडाने सोनू , मोनू , छकुली, पपी, बंटी ,गोट्या वगैरे वगैरे. आपल्या देशातील नावात बर्याच ख़ास गोष्टि आहेत. जसे की आपल्या कड़े लहान मूल जर जास्तच रडत असेल तर , त्याच्या मृत आजोबा, पंजोबा किंवा पुर्वजाच्या नावाने त्याला हाक मारली जाते. त्यामुळे कित्येक तरुण मुलांची नावे ही त्याना न आवडनारी आउटडेटेड वाटतात. उदा. तात्यासाहेब , आबा , आण्णा, भाऊ , दगडू , कचरू , चिमाजी वगैरे. काही लोक वेगवेगळ्या देवाला/ देवीला नवस बोलतात की अपेक्षित पणे मुलगा/ मुलगी झाली तर तुझ नाव ठेवीन. यामुळे ही बर्याच नावात गम्मत पहायला मिळते. जसे की आमच्या नातेवाईकामधील एकाच नाव सटवाई या देवी वरुण सटवा ठेवलेल आहे. अशा नावाच्या अनेक गमती जमती पहायला मिळतात.

एके ठिकाणी दोन गोड मूलं खेळत होती. मी त्यांना त्यांच नाव विचारल , त्यातील मुलाच नाव होत स्वराज , अणि मुलीच होत हिंदवी. नाव ऐकून लगेच अंदाज आला की ते हिन्दू धर्माचे आहेत. आपल्या कड़े नावं धर्मानुसार आणि प्रदेशा नुसार बदललेली दिसतात. मुस्लिम नावं वेगळी , हिन्दू वेगळी, शिख , ख्रिश्चन वेगळी. फारच दुर्मिळ उदहारण असेल की हिन्दू असुनही मुस्लिम नाव ठेवल असेल किंवा मुस्लिम असुनही हिन्दू नाव ठेवल आहे. असच एक दुर्मिळ उदहारण आहे ‘मलाला’. हे नाव ऐकताच सर्वांच्या डोळ्या समोर आली असेल ती पकिस्तान ची मुलींच्या शिक्षणा साठी लढणारी मुलगी मलाला. बरोबर ओळखलत. मलाला हे मुस्लिम नाव नाही. मग तिच्या वडिलांनी तीच हे नाव का ठेवल ? या नावाचा अर्थ काय ? हे नाव कोणत्या धर्माच आहे ?

१८८० सालची अफगाण– ब्रिटिश युद्धातिल ही गोष्ट आहे. अफगाणीस्तान च्या कंदहार शहराजवळ मैवांद नावाच एक शहर होत. इंग्रज फौजांनी मैवांद शहरावर हल्ला केला. या परकीय आक्रमणाला अफगाणीस्तानातुन जोरदार विरोध झाला. २७ जुलाई ला लढाई ला तोंड फूटल. कड़वे अफगाणी शत्रु हल्ला परतवून लावण्यासाठी पेटून उठले. मैवांद गावात १९ वर्षाच्या धनगराच्या मुलीचे लग्न होते. तिचे नाव होते ‘मलालाई’. लग्नाच्या दिवशी युद्ध सुरु झाल्याने मलालाई चे आई , बाबा यांनी मुलीच्या लग्नापेक्षा देशाच रक्षण महत्वाच समजुन युद्धात उडी घेतली. नवरदेवही यात सामील झाला. त्या वेळी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची देखभाल , औषध पाणी देण्याच काम महिला करत. लग्नाच्या बोहल्यावर चढ़नार्या मालालाईन या कामात स्वतःला झोकुन दिल. मालालाई ही एक उत्तम गायिका होती. ती प्रेरणा देणारे गीत तयार करुण सैनिकांचे बळ वाढवू लागली. या युद्धात एक अफगाणी सैनिक गंभीर जखमी झाला. त्याच्या हातातल निशान जमिनीवर पडल. तेव्हा मालालाई ने हिमतीने तो ध्वज उचलून खांद्यावर घेतला. मलालाईचा पराक्रम बघून सैन्य ही प्रेरित झाले. सैनिक शत्रु पक्षावर तुटून पडले. यामुळे इंग्रजी सैनिकांची पीछेहाट होवू लागली. इंग्रजी सेनापति ने मलालाई ला लक्ष्य केल आणि ती शहीद झाली. पण तिच्या शब्दांनी सैन्याला इतक बळ दिल की ब्रिटिश सैन्याचा पराभव झाला. युद्ध संपल.

अफगाणीस्थानच्या घराघरात मैवांदच्या मलालाई च नाव घेतल जावू लागल. तिच्या शौर्याच्या कथा शाळेत शिकवल्या जावू लागल्या. तिच्या नावाच्या शाळा सुरु झाल्या. शेकडो तरुणांना तिच्या पासून प्रेरना मिळु लागली. अफगाणीस्थानमधील राजाला तिचा अभिमान वाटू लागला. त्याने तिच्या स्मरणार्थ स्मारक उभारले. मलालाई या शब्दाचा अर्थ होता दुःख . गांजलेल्या पश्तुनियांच्या दुःखाने तळमळणारी . मलाला म्हणजे सर्वात आनंदी. झियाउद्दीन यांनी त्यांच्या मुलीचे नाव ज़ात पात , धर्म मागे सोडून फ़क्त अर्थाला / शब्दाला महत्त्व देत नाव ठेवल. आणि माणुसकी श्रेष्ठ असल्याच दाखवून दिल. आणि नावाच्या अर्थाप्रमाणे मुलगी जगलीही. आपण ही आता ज़ात पात , धर्म यांची जुनी पाळमूळ सोडून नव्याने माणूसकीकडे वाटचाल करावी. भारत महासत्ता होइल तेव्हा नावावरून कुणाचाच धर्म ओळखता येवू नये इतका बदल आपल्या मानसिकतेमध्ये व्हावा हीच अपेक्षा.