Library - 4 books and stories free download online pdf in Marathi

लायब्ररी - 4

चला आज पार्टी…!!! सुयश ने अनाऊन्समेन्ट केली ..अरे पण कशाबद्दल?? सगळेच विचारायला लागल्यावर तो जरासा लाजला!! अरे ती हो म्हणाली ना!!!रोहन ओरडला…हो पार्टी तो बनती है.. सगळेच भुक्कड लगेच पार्टी करायला निघाले सगळ्यांसोबत मस्ती करत संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही.त्यात संध्याकाळी आईने छोटीशी पूजा ठेवली होती ती ही पार पडली या दरम्यान मला कितीतरी वेळा त्या पत्राची आठवण आली कधी एकदा ते वाचेन अस झालं होतं, त्यातला एक एक शब्द मला नीट लक्ष देऊन ते पत्र उराशी धरून वाचायचं होत म्हणूनच मी ते काम सर्वात शेवटी ठेवलं..
   रात्री भरभर जेवण उरकून मी धडकन माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला,आणि हळुवार पणे ते व्यवस्थित घडी घातलेलं पाकीट उघडून ते पत्र वाचायला घेतलं.
प्रिय निकिता….
      बरेच दिवस झाले तुला पाहिलं नाही बरेच म्हणजे मधले चार पाच दिवस ही मला वर्षासारखे वाटायला लागले रोज तिथे येऊन तुला चोरून पाहण्याचा तर मला छंदच लागला होता.पण आता हा छंद मला बदलावा लावणार म्हणून येणं बंद यानंतर तुला शोधूनही मी सापडणार नाही कारण मी या सगळ्यांपासून दूर चाललोय!! माझं पाहिलं वाहील प्रेम नुसतं मनात राहू नये म्हणून मी ते व्यक्त केलं.. फक्त एकदा तुला भेटायचं होत शेवटचं आज संध्याकाळी सात वाजता लव्हर्स bridge वर ..भेटशील ??? तू आलीस तर बरं वाटेल मला पण हे ही तुझ्यावर सोपवतो तुझी इच्छा असेल तर!!! मी वाट पाहीन…यानंतर मात्र मी तुला कधी भेटणार आणि तुला कसलाच त्रास देणार नाही..फक्त एकदा भेटशील??
अरे देवा मी ते पत्र वाचून मी हात डोक्यात मारून घेतला.. सात वाजता!! आता तर रात्रीचे साडेदहा वाजलेत..शीट शिट्ट शिट्ट…..यार शेवटचं भेटणं ते ही अस काय यार मला ही आजच हे असं शेवटी वाचायचं होत का!!!आता असेल तो? वाट बघून थकला असेल बिचारा मला त्याला भेटायचाच नाही असा समज झाला असेल त्याचा. यार एव्हन तर तो गेलाही असेल!! 
पण एक वेडी आशा मला स्वस्थ बसू देईना…मी भरभर आवरून गाडीची चावी घेऊन बाहेर निघाले या वेळी बाहेर जायचं म्हणजे  खूप साऱ्या प्रश्नणांचे अडथळे पार करून जावं लागतं म्हणून मी हळूच मागच्या दराने आवाज न करता बाहेर पळाले पार्किंग मधून गाडी बाहेर काढून लोटत लोटत कितीतरी लांब गेल्यावर आता आवाज होणार नाही अशी खात्री पटल्यावरच मी गाडी स्टार्ट केली..
असेल का आता तो?? नाही निघून गेला असेल!!! कदाचित थांबलाही असेल!! तो भेटला तर त्याच्याशी काय बोलायचं?? डोक्यात प्रश्ननांनी थैमान घातलं होत विचारांच्या तंद्रीत मी केव्हा Bridge वर पोहोचले कळलं देखील नाहीं..घरापासून वीस पंचवीस मिनिटांवर तो bridge होता पोहाचता पोहचता अकरा वाजले होते.. मी बाजूलाच गाडी उभी करुन आजू बाजूला नजर फिरवली सगळीकडे निरव शांतता पसरलेली रातकिड्यांची किरकिर सोडली तर कुठलाच आवाज जाणवत नव्हता ,तो काय तिथे मी सोडून दुसरं कुणीही मला नजरेस पडेना थोडं का होईना मन खट्टू झालं. नकळत डोळ्यात आलेला चोरट पाणी नक्की कुणासाठी हेही माहीत नसावं याचच मला जास्त वाईट वाटलं रात्रीचा थंड वारा आता मला बोचरा वाटायला लागला..दोन चार पाऊलच चालले असेल की कुणाची तरी चाहूल लागली ..मी मागे वळून बघणारच होते की मागून आवाज आला,मला माहीत होतं तू येशील..तशीच थांबशील !!! प्लिज तू माझ्याकडे पाहिल ना तर मी मात्र सगळं विसरेन..ही भेट शेवटची अस मी पक्क ठरवलंय म्हणून हा अट्टहास की आपलं बोलणं अशाच प्रकारे व्हावं…
मागून आलेला तो आवाज ऐकल्यासरशी माझ्या संपूर्ण अंगातून एक शिरशिरी गेली.अंगावर थंड वाऱ्याने काटा आला …मला त्याला पाहण्याची एवढी उत्सुकता लागली होती की आता माझ्याच्याने राहवेना..
अरे पण तू आहेस तरी कोण मला एवढही माहीत करून घेण्याचा अधिकार नाही का?? 
मी जरा चिडूनच बोलले.. हो आहे ना पण एक करशील तू रागवरणार नाहीस अस प्रॉमिस दे मला तरच तुझ्या समोर येईल …
नाही मी रागावणार नाही!! मी एका दमात म्हणून टाकलं. मी उत्सुकतेने मागे वळले आता धक्के म्हणजे माझ्यासाठी एक गेम झाला होता..त्याला समोर पाहून मी फक्त खालीच पडायची राहिली होते कुठल्या आधारावर उभी होते देव जाणे………..तू??? आता ही काय नवीन थट्टा?? शॉक होण्याच्या पलीकडे आणखी एखादी प्रतिक्रिया असेल तर ती माझी जी त्या वेळी होती ती असेल… अगदीच विचार ब्लॉक झाल्यावर काहीच न सुचून जे भाव चेहऱ्यावर येतात ना अगदी तेच म्हणजे जसे ते विस्फारले डोळे आणि थांबलेला स्वास काहीच न सुचून डोकं बंद पडले आहे तो भास… 

तो माझ्या समोर होता ….अभिनव  पाटील त्याच नाव ऐकल्यापासून जी भीती मनात दाटली होती ना शेवटी तीच खरी ठरली…हा चेहरा मी किती तरी वेळा माझ्या अवती भवती पाहिलेला पण या गोष्टीकडे माझं कधी लक्षच गेलं नाही तो हाच हे मात्र आत्ता कळलं. तेव्हा खर तर कस रिऍक्ट व्हावं कळेना .अस अचानक कुणी समोर आलं आणि माझं तूझ्यावर प्रेम आहे असं म्हणालं तर तुम्ही काय कराल?? माझीही तीच अवस्था झाली……स्पिचलेस…..
आता आमच्यात कुठलाही दुरावा नाही की कसलं अंतर नाही,फक्त आम्ही आणि तो अंगावर काटा आणणारा थंड वारा..दोन पावलावर उभा असलेला तो अजून जवळ येताना पाहून मला नक्की त्या थंड वाऱ्याने अंगावर काटा येतोय की त्याच्या असण्याने हेच कळेना ..प्रेम जरी नसलं तरी फार विरोधात होते असे काही नाही…तो मात्र जरासा गोंधळलेला आणि मुलिंशी बोलण्याचा शून्य अनुभव असलेला तो…मला मात्र फार गोड वाटला,(गोड वाटला म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी प्रेमात पडलीय) पण सध्या तरी माझ्याकडे उत्तर नाहीय…
तो बावरल्या नजरेने  मला सोडून नजर जाईल तिकडे पाहत होता, नजर मिळवणे त्याला जड जात होतं बहुतेक आणि मी मात्र नजर न हटवता त्याच्याकडं पाहत होते म्हणूनच तो जास्त बैचेन झाला असेल का??? किती बालिश प्रश्न मला माझीच हसायला आली….
तो मात्र गोंधळला बिचारा माझ्यासमोर अपराद्यासारखा उभा होता…चिल….रिलॅक्स हो मी काय तुला कापून खाणार नाहीय की तू एवढा घाबरला आहेस.!! माझ्या त्या मोकळ्या बोलण्याने काही प्रमाणात का होईना वातावरण मोकळं झालं तो थोडासाच हसला पण मला ही छान वाटलं..
 एक इच्छा होती तुला शेवटचं भेटण्याची thank you तू आली त्या बद्दल!! मी खूप वाट पाहिली पण नंतर शेवटी जाणारच होतो की तू आलीस छान वाटलं.हे प्रेम वैगेरे व्यक्त करणे मला येत नाही,पण आज व्यक्त व्हावं वाटतंय कारण यानंतर अस व्यक्त होता येईल की नाही माहीत नाही.
तो हळू आवाजात एक एक गोष्ट माझ्या समोर मांडत होता.तुला त्रास दिला त्याबद्दल सॉरी आता कधीच तुला माझा त्रास होणार नाही..म्हनूनच मी लांब चाललोय…जमलं तर आठवण ठेव तो उठून जायला लागला आम्ही आल्यापासून अर्धा तास उलटला असेल पण तेव्हापासून तोच बोलत होता मी तर फक्त ऐकतच होते…अरे असा कसा हा एकतर मला काय बोलावं हे कळत नाही आणि हा मात्र आपलं आपलं बोलून निघाला देखील,धड थांब ही म्हणता येईना आणि जा ही म्हणता येईना..
मी कायमचा चाललोय अस म्हणून मोकळा जाऊ का नको ते तर विचार!!!!
 पण मी थांब कस म्हणू??? 
पण मला का थांबवायचं त्याला???
देवा !!!!! सगळाच गोंधळ…
 इथे कुणी प्रेमी असेल तर त्याला किती उत्सुकता असते उत्तर ऐकण्याची आपल्या प्रियकराने कराने किंवा प्रियकरणीने आपल्याशी बोलावं किंवा निदान होकार तरी द्यावा अस तर वाटेलच ना एखाद्याला हे काय….तो रस्त्याकडे जाताना मला पाठमोरा दिसत होता…शेवटी मीच   हळू आवाजात पण त्याला ऐकू जाईल आशा उद्देशाने बोलले,उद्या संध्याकाळी  नऊ वाजता….
त्याने हलकेच मान वाळवून माझ्याकडे पाहिलं तो गालात हसला बहुतेक, अंधारात मला व्यवस्थित दिसलं जरी नसलं तरी मला खात्री होती मनातून खुश तर तो ही झाला असणार…
मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत होते ………