Farmhouse - 4 in Marathi Horror Stories by Shubham S Rokade books and stories PDF | फार्महाउस - भाग ४

Featured Books
Categories
Share

फार्महाउस - भाग ४

तो दचकून जागा झाला .  तो बेडवरतीच होता .  तो घामाने निथळून निघाला होता . तो त्याच खोलीत होता , जिथे तो झोपला होता . शेजारीच बाप्पा बसले होते . त्याला चेहऱ्यावरचा घर्मबिंदू टिपताना पायाला भयंकर वेदना जाणवल्या . त्याच्या पायावरती कोणीतरी धारदार वस्तू ने ओरखडे   ओढले होते . त्यामुळे रक्तस्राव होत होता . बप्पांनी पटकन ते रक्त पुसून घेऊन त्याला अँटीसेप्टिक लावले .

" कुठे गेलता .....

" मला माहिती आहे तो बंगला ,  ती वाट ...

" मग चल लवकर ,  नाहीतर उशीर होईल ....

"  पण मग मी इथे आलोच कसा ....?

"  म्हणूनच म्हणलं तू शिपाई हाइस ,  साध्या माणसाला हे शक्य नाही ....

" पण ते स्वप्न होतं की वास्तव....?

" ते  स्वप्न नव्हतं ....!

     बप्पा आणि गण्या तिथे पोहोचले .ते वर गेले . त्याच खोलीत गेले . दार सताड उघडं होतं .  सर्वत्र दिव्याचा प्रकाश पडला होता .  पिवळसर उजेडात फरशीवरती रक्ताचे शिंतोडे व काहीतरी रक्ताने माखलेलं सरपटत गेल्यासारखं वाटत होतं . जसं एखादं मढं . खोलीत सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडाले होते .  रक्ताचे फटकारे मारल्यासारखी ती खोली गोगलगायींच्या सरपटण्याने झाली होती . मात्र आता तिथे एकही गोगलगाई नव्हती . ना तिथे तो मनुष्य होता ज्याला गण्याने वाचवलं होतं . मग झालं तरी काय ....? त्या मनुष्याच्या मृत्यू झाला का .....? त्याला काहीच कळू शकत नव्हतं . रक्ताने माखलेली ती खोली फक्त घडलेल्या घटनांची साक्षी होती ती .....

" ती डायरी...  ती डायरी कुठे आहे ते शोधायला पाहिजे....." गण्या

"  कुठली डायरी ........" बप्पा

" तो माणूस म्हणाला होता .....टेबलावर आहे वाटतं ....

   त्याने डायरी उचलली . ती पूर्ण कोरी होती . बाजूलाच काही पाने पडली होती .   ती पाने डायरीचीच होती पण फाडून वेगळी केली होती .  त्या पानावरती काहीतरी लिहिलं होतं . गण्या त्या पानावरचा वाचनात गुंग झाला . त्याला भानच राहिले नाही की तो कुठे होता...

पहिला दिवस 

    ' आज भल्या पहाटे झोप मोड झाली .आज तिसरा खून झाला होता .पंधरा दिवसात तिसरा खून झाला होता , तो सुद्धा एकाच पद्धतीने.   पहाटेच डिपार्टमेंट मधून फोन आला " सर खून झाला आहे "  आता मी विशेष तपासासाठी नेमलेल्या पथकात असल्याने मला जाणे भागच होते .

      आता दिवसाची सुरुवातच खराब झाली म्हटल्यावर दिवस कसा चांगला जाणार . दिवसभर कोणाची ना कोणाची किर-किर माझ्या मागे होतीच . सकाळची बातमी दुपारपर्यंत सगळ्याच्या    कर्नोपकर्नी झाली त्यामुळे मंत्री साहेबांनी फोनवरून  झापले . डिपार्टमेंटमधे समोर उभा करून हजेरी घेतली ती वेगळीच . एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तरी एक गोष्ट मात्र चांगली घडली होती .  खूप दिवसानंतर आम्ही रात्री हॉटेलवर candle light dinner साठी जाणार होतो  , म्हणून मी आनंदात घरी आलो .  घरी आलो खरा पण घराला कुलूप होते  . माझ्याकडे शिल्लक असलेली चावी होती . मी कुलुप उघडून आत गेलो .  सोफ्याजवळच्या टीपॉय वरती एक चिठ्ठी होती .

" किती फोन करायचे माणसानं ....
ड्युटीवर असलं म्हणून आम्हाला विसरायचं का ....।?
मामाची तब्येत बिघडली आहे जरा जाऊन येते ....
हॉटेलवरून जेवण मागून ठेवलं आहे ,  जेवून घ्या

मी फोन काढून बघितला तर 27 मिस कॉल होते . मी माघारी फोन लावला तर नॉटरिचेबल.

दुसरा दिवस

काही मानसे खरंच विचित्र असतात......
तुरुंगात एक कैदी आहे . त्याचा या केसमध्ये काही संबंध असावा म्हणून त्याला विचारायला गेलो तर त्या विक्षिप्त माणसाने मुर्खासारखी उत्तरे दिली .
सरळ सांगेना म्हटल्यावर नेहमीची पद्धत वापरली तरीही सांगेना  .....

झालं . त्या चार पानावर एवढाच मजकूर होता  .

त्याला पोलिसांच्या सायरनचा आवाज आला.

" काय करायचं बप्पा ...?
बप्पांनी उत्तर दिलं नाही . ते उत्तर द्यायला तिथे नव्हतेच  ते केव्हाच ती डायरी घेऊन पसार झाले होते .  तो पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीत सापडला . त्यांने पळायचा वायफळ प्रयत्न केला ,  पण तो निष्फळ ठरला . तो पुन्हा एकदा तुरुंगात पोहोचला .


क्रमःश