Devacha Shodh books and stories free download online pdf in Marathi

देवाचा शोध - मच्छिंद्र माळी औरंगाबाद

" देवाचा शोध "
नामा म्हणे देव देही दाखविला ।
उपकार केला खेचराने ।।
आज च्या लेखात आपण सदगुरुंनी देहात ईश्वर कसा दाखविला या बद्दल बोलणार आहोत.प्रथमता आपल्याला देव काय आहे हि भुमिका स्पष्ट करायला हवी म्हणजे कसा भेटला हे कळेल.तुकडोजी महाराजांचा अभंग आहे.
दगडाचा देव त्याला वडराचा भेव।।१।।
चिखलाचा देव त्याला पाण्याच भेव।।२।।
लाकडाचा देव त्याला अग्निच भेव।।३।।
सोन्या चांदिचा देव त्याला चोराच भेव।।४।।
देव अशानं भेटायचा नाही रं देव बाजारचा भाजी पाला नाही रं।।५।।
आपण जर देवाचा शोध घेतला तर कधीच सापडवयाचा नाही.आपल्या घरातील कुलूपाची चावी जर हरवली ती शोधतोय शोधतोय पण सापडत नाही आहे.वती जर आपल्या खिशाततच सापडावी अशी गमंत आहे.देव पण कुठे हि शोधुन सापडनार नाही त्याला शोधण्यासाठीच हा मानवी देह दिलेला आहे."कुठे शोधसी रामेश्वर अन कुठे शोधसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातुन उपाशी"चार धाम करा,अनेक तिर्थ काही उपयोग नाही.म्हणुन तुकाराम महाराज देव कुठे आहे अस आपल्या अभंगातुन स्पष्ट करुन सांगतात.
देह देवाचे मंदिर।
आत आत्मा परमेश्वर।
जशी उसात हो साखर तैसा देहात हो ईश्वर।
जसे दुधात हो लोनी तैसा देहात हो चक्रपानी।
देव देहात देहात का हो जाता राऊळात।
तुका सांगे मुढ जना देव देहात का पहा ना।
असे अगदि सोप्या भाषेत माझ्या तुकोबारायांनी आपणां सर्वांस देवाचा पत्ताच एक प्रकारे सांगीतलाय.आजपर्यंत आपण कुठे कुठे शोधलं असेल देवाला पण तो कुठेच सापडला नसेल व सापडनार देखील नाही.कारण आपण चुकिच्या जागी त्याला शोधत आहोत.
*जशी उसात साखर आहे,पण ती दिसत नाही,जसे दुधात लोणी आहे पण दिसत नाही.काही तरी प्रक्रिया करावी लागते ना.अगदी तसेच देव आपल्या शरीरात वास्तव्य करुन आहे.त्याला प्रक्रिये शिवाय पाहता येतच नाही.जसे लोणी पाहाण्यासाठी दुधाच घुसळणे,ज्ञानोबाराय तर सांगतात,तर तैसा हृदयामध्ये रामु असता सर्व सुखाचा आरामु का भ्रांतासी कामु विषयावरी झाला.'जनाई सुध्दा अभंगातुन सांगते-
धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर।
सोहम शब्दांचा मारा केला।
आत विठ्ठल काकुळति आला।
हृदयबंदी खाना केला।आत विठ्ठल कोंडीयेला।
असा हा देव तुमच्या आमच्या सर्वांच्या देहात असुन आपन दुर्लक्षित केलेत !
आलिया संसारा उठा वेगु करा शराण रिघा पंढरीनाथा।
हा देव कुठल्या जातिचा कुठल्या धर्माचा नाही तो प्रत्येकाचा आहे.त्याला रंग नाही रुप नाही.
रंग नही रुप नही। नही वर्ण छाया।
निरगुण निराकार तुचि रघु राया।
परमेश्वर भेट होणे हे सदगुरु रायाच्याच हातात आहे बरका !!.कसे तर दुधातून लोणी कुणाला ही काढायला जमत नाही बरं का त्याला ना सुगरणच लागते,तसेच ह्या देहात भगवंत आहेत व त्याची भेटी व्हावीशी वाटत असेल तर सदगुरुच हवे. शास्र जे सांगते त्यातील तीन लक्षणांनी युक्त हवा प्रथम शब्दज्ञाने पारांगत दुसरे लक्षण अतिमहत्वाचे प्रबोध करण्यास सक्षम हवा भगवंताबद्दल तुकोबाराय सांगतात-
संतचरण रज लागता सहज वासनेचे बिज जळोनि जाय।
कंठी प्रेम दाटे। नयनि निर लोटे।*
हृदयी प्रगटे राम रुप।

अशा अष्टसात्विक भाव प्रगट होणे हे त्याचे लक्षण आहे.आणि हो हरिपाठात सुध्दा ज्ञानोबाराय बोलतात,
रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिध्दि।
बोलायच झाल तर
कष्ठीले संसार शिणे।
जे देवो येती गार्‍हाणे।
तया ओ दे नावे जेणे।तो संकेतु हा।।३१।।
ब्रम्हाचा अबोला फिटावा।
अद्बैतत्वे तो भेटावा ।
एसा मंत्रु देखिला कणवा।वेदे बापे।।३२।।
_किंवा महाराज_
सत्यज्ञानांत गगनाचे प्रावर्ण।
नाही रुप वर्ण गुण जेथ।
तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया।
असा हा परमात्मा सदगुरु कृपेने अनुभवता येतो.म्हणुन नामदेवराय म्हणतात
नामा म्हणे देव देहि दाखविला।
उपकार केला खेचराने।।
*** ? ***