Addiction - 7 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 7



सकाळी साडे दहापासून तर सायंकाळी पाचपर्यंत काम करावं लागायचं त्यामुळे जेमतेम अडीच तास कॉलेज करायचो ..आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने तयारी करून सकाळीच कॉलेजला पोहोचलो ..पंकजने एम.ए.ला प्रवेश घेतला असल्याने तो माझ्यासोबत नव्हता आणि बरेच दिवस अभ्यासात खंड पडल्याने काहीच येणार नव्हतं हेदेखील माहिती होत त्यामुळे सर्वात शेवटचा बेंच पकडून बसलो ..बुक काढलं आणि काहीतरी लिहीत होतो ..तेवढ्यात ती येताना दिसली ..तिने लांबवर नजर टाकावी आणि मी दिसलो आणि तिची पावले माझ्याकडे वळू लागली ..कालच्या प्रसंगाने आधीच फजिती झाली होती त्यामुळे हृदयात आणखीच धडधड वाढू लागली ..आज पून्हा एकदा इज्जतीचा भाजीपाला होणार असल्याची खात्री पटू लागली आणि मान खाली घालू लागलो ..शेवटी ती बेंचजवळ येऊन थांबली आणि नाईलाजाने खाली असलेली मान वर करावी लागली ..तिचे पहिले शब्द होते , " सॉरी यार !!"

माझ्या चेहऱ्यावर आता थोडी तरतरी येऊ लागली आणि म्हणालो , " कशासाठी सॉरी ?"

ती लगेच उत्तरली , " कल मैने आपको बिना गलती के ही बहोत कुछ सुना दिया उस वजह से ..बाद मे मुझे मेरे दोस्तने सब कुछ बताया तबसे ठीक नही लग रहा था ..सही हुआ के तुम यही मिल गये वन्स अगेन सॉरी .."

आता कुठे माझ्या जीवात जीव आला ..मी तिच्याकडे बघून फक्त हसू लागलो ..शेवटी तीच पुढाकार घेत म्हणाली , " बाय द वे आय एम निशा मिश्रा आणि तिने मैत्रीचा हात समोर केला "

ती संपूर्ण वाक्य इंग्लिशमध्ये बोलून गेली आणि इकडे हिंदी इंग्लिश सर्व सारखच होत ..त्यामुळे हिम्मत करून आपल्या तुटक्या इंग्रजीत म्हणालो , " आय एम प्रेम सहस्त्रबुद्धे .."

मी बोलताच ती लगेच म्हणाली , " मतलब तुम मराठी हो ..? "

" हा मराठी ही हू ..क्या मै आपसे एक बिनती कर सकता हू ? " , मी म्हणालो ..

ती हसत म्हणाली , " हा कहो ना !! .."

" आप हिंदी मे बात नही कर सकते ..तुम्हारे इतनी अंगरेजि मुझे नहीं आती " , मी थोडा हसत म्हणालो ..

आता आम्ही दोघेही खळखळून हसू लागलो ..

ती पाहता - पाहता आपल्या बेंचवर निघून गेली..तिच्याबद्दल थोडी फार माहिती काढली तेव्हा माहिती झालं की ती या कॉलेजला 11वि पासूनच शिकत होती आणि न चुकता टॉपर आली होती ..खूप आधीपासून एकाच कॉलेजला शिकत असल्याने ओळख्या भरपूर होत्या त्यामुळे तिचा पाय एका जागेवर काही राहत नसे ..सकाळी आल्यापासूनच इकडून - तिकडे भटकत बसायची ..दररोज सकाळी सरांच्या कलासपूर्वी तीच लेक्चर ठरलेलं असायचं ..आणि सर्व शांतपणे तीच एकूण घ्यायचे ..कधीतरी माझ्याकडे नजर आलीच तर मी नजरेनेच तिची स्तुती करायचो ..तिने नजरेने ती प्रशंसा स्वीकारली की मग थोडी मज्जा वाटायची ..
मी साधारणतः एकटाच राहत असल्याने क्लासमध्येही माझी काही खास ओळखी नव्हती त्यातही पंकज एम.ए.ला असल्याने मला इथे एकटच राहावं लागायचं ..त्यामुळे त्या क्लासमधली एकमेव मित्र म्हणजे ती ...एकदा असाच एकटाच कँटीनला बसलो होतो ..तिने मला तिच्याकडे येण्याचा इशारा केला पण माझी काही जाण्याची हिम्मत झाली नाही ..शेवटी तीच माझ्याकडे आली आणि मी काही बोलणार त्याआधीच माझा हात ओढत ती आपल्या मित्रांकडे घेऊन गेली ..तिने फार आनंदाने माझी ओळख त्या सर्वांशी करून दिली ..तिच्या ओळखीमुळेच मला काही मित्र मिळाले ..त्या दिवसापासून ते फक्त तिचे नाही तर माझेही मित्र बनले ..शिवाय ते सर्व श्रीमंत घरातले असल्यानें त्यांच्यासोबत असताना बिल देण्याची कधीच गरज पडत नव्हती ..त्यांच्यासोबत राहताना आता एकटेपणादेखील दूर झाला ..निशाचा मित्र म्हटल्यावर सर्व स्वतःच येऊन भेटत असत अशी तिची ख्याती होती आणि कँटीन तर दररोज ठरलेली असायची ..निशामुळेच माझी कॉलेज लाइफ सुंदर बनत चालली होती ..

निशा म्हणजे बिनधास्त व्यक्तिमत्त्व ..हवं तसं मनमोकळेपणाने बोलायची आणि जगायची ..राग तर अगदी नाकावर असायचा त्यामुळे तिचे मित्र सहसा तिच्या वाटेला जात नसत .कधी - कधी तर मुलांना सर्वांसमोर शिव्या घालायला घाबरत नव्हती ..अशी होती ती ..त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं तिच्यापासून दोन हात लांब राहायचो ..अभ्यासातही हुशार ..जवळपास सर्वच शिक्षकांशी बाईसाहेबाच्या ओळख्या ..त्यामुळे तिच्यासोबत राहण्याची एक वेगळीच मजा असायची ..दिवसभराचा सर्व त्राण तिच्यासोबत्तीत हरवला जायचा ..

खूप मजेशीर दिवस होते ते ..सहा दिवस काम करून कंटाळलो असायचो आणि तिच्या सहवासात सर्व कंटाळा क्षणात दूर व्हायचा ..तशा बाईसाहेब खुप हौशी ..दर रविवारला रूमखाली यायच्या ..तिला हवं तिथे घेऊन जायची ..ती गाडी चालवीत असताना सतत बडबड करीत असायची आणि मी अगदी शहाण्या बाळाप्रमाणे तीच शांतपणे सर्व एकूण घ्यायचो ..गाडीवर तिच्या मागे बसण्याचीदेखील एक वेगळीच मज्जा होती ..एखादा ब्रेकर आला की मग माझे हात आपोआप तिच्या खांद्यावर जायचे ..मी लगेच ते काढून घेतले की ती हसायची आणि मला ते तीच हसनदेखील अधिकच गोड वाटायचं .. हे झालं तीच पहिलं रूप तर बाकीच्यांसाठी ती रुद्रावतार असायची ..एकदा चिडली की बाईसाहेबना सांभाळणं अगदीच कठीण जायचं ..त्यामुळे तिचे सर्व मित्र सहसा तिला वचकूनच असायचे..बाईंचा केव्हा पारा वाढेल आणि आफत येईल ही खात्री नसल्याने सहसा कुणीच तिच्याशी पंगा घेत नसत पण या सर्वात मात्र मी नेहमीच अपवाद बनत गेलो ..माझ्यावर ती कधी रागावली अस मला आठवत नाही आणि माझ्या चुकाही ती हसून माफ करायची ..

माझ्या परिस्थितीबद्दल तिला फारच चांगल्याने ठाऊक असल्याने मी न सांगताच माझ्या एक्साम्सचे पैसे भरून ती मोकळी व्हायची ..मला तेव्हा तिने तसे पैसे भरलेले आवडायचे नाही त्यामुळे मी तिला तस स्पष्ट बोलायचो आणि बाईसाहेब म्हणायच्या , " चिंता मत कर यार जीस दिन तू बडा आदमी बन जायेगा ना ऊस दिन ब्याज के साथ सारे पैसे वापस लुंगी "..तिच्या अशाच वागण्यावर मी सतत फिदा असायचो ..ती कॉलेजला फार फेमस असल्याने प्रत्येक व्यक्ती तिच्यावर ईर्षा करायचा ..तिला कधी - कधी या सर्व गोष्टींचा फार त्रास व्हायचा आणि त्यादिवशी ती आपल्या मनातील सर्व काही शेअर करायची ..त्यादिवशी एक वेगळीच निशा मला पाहायला मिळायची ..त्यामुळे आमच्या मैत्रीला आम्ही कुठल्याच बंधनात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही ..कदाचित हीच मैत्रीची खरी परिभाषा होती ..निशा मिश्रा हे कोड आता मला हळूहळू सुटू लागलं होतं ..

त्यावेळी सेमिस्टर पॅटर्न नव्हतं त्यामुळे वर्षात केवळ एकदाच पेपर असायचे ..आम्ही वर्षभर मस्ती करण्यात व्यस्त असायचो तर निशा वर्षभर वाचत बसायची ..पाहता - पाहता एक वर्ष संपण्याच्या मार्गावर आलं .पेपरला फक्त आता एकच महिना शेष होता ..त्यामुळे अभ्यासात मन लावणं फार गरजेच होत ..ऑफिसला अकरा वाजता जायचं असल्याने सकाळी अभ्यासाला वेळ मिळत नव्हता त्यामुळे आता क्लास करण्याऐवजी लायब्ररीमध्ये बसू लागलो ..निशाही माझ्यासोबतच लायब्ररीमध्ये बसू लागली ..मला मिळेल तेवढा वेळ अभ्यास करायचो शिवाय काही आलं नाही तर ती मदत करायला असायची ..मदत करताना थोडा भाव खायची पण माझ्यासाठी ती काहीही करायला तयार असे ..आमचा बऱ्यापैकी अभ्यास झाला होता ..पेपर आले तसे गेलेही आणि डोक्यावरच ओझं कमी झालं ..आता पुन्हा एकदा आम्हाला हवं तसं बिनधास्त जगता येणार होत ..

नेहमीप्रमाणेच आम्ही दोघे पुन्हा एकदा फिरायला निघालो ..ती श्रीमंत असली तरी रस्त्यावर उभं राहून भेळ खायला तिला फारच आवडत असे ..तिला भेळवाला दिसला आणि तिने लगेच गाडी थांबवली ..तिला हवी तशी तिखट भेळ तिने बनवून घेतली ..मला फारस तिखट खायला आवडत नसे आणि ती आरामात सर्व पचवून टाकायची ..काही क्षणात भेळ खाऊन झाली ..मी तिच्यासोबत बाहेर खायला गेलो की तीच नेहमी बिल पेड करत असे त्यामुळे मला त्याच नेहमीच वाईट वाटायचं ..आज मी स्वतःच तिच्याआधी पैसे काढून देण्याचा प्रयत्न करू लागलो आणि ती ओरडतच म्हणाली , " ओय ..तुझे इतने सस्ते मे नही छोडणे वाली मै ..रखं अपने पैसे जेब मे ..जीस दिन मांगुंगी ना पुरा वालेट खाली कर जाना है " ..आणि मी काढलेले पैसे तिने लगेच आत टाकायला लावले ..ती तशीच होती शिवाय ती ते पैसे कधीच घेणार नव्हती हेही मला माहित होतं ..पण तिच्या हट्टीस्वभावासमोर कधी कुणाचं चाललं होतं जे आता माझ चालणार होत ..तिची ही बिनधास्त तऱ्हा मला वेड लावून जायची ..हळूहळू आम्ही जिवलग होत चाललो होतो ..खरच अविस्मरणीय दिवस होते ते ..

क्रमशा ..