Addiction - 11 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 11




माझी कथा एकूण तिच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं ..माझ्या मनाची दशा ती फार उत्तम रीतीने समजून घेऊ शकली होती ..तिनेही आयुष्यात भरपूर दुःख सहन केले असल्याने ती माझ्याशी समरस झाली होती ..ती डोळ्यातले अश्रू पुसत मला पुन्हा एकदा म्हणाली , " निशा नाही बोलत का आता तुझ्याशी ? "

आणि मी शांत होत म्हणालो .. , " बोलतो ग !! आताच काही दिवसाआधी तिने मला फोन केला होता ..तू मामा होणार आहेस ही खूषखबरी द्यायला ...योगेशला देखील तिने याबद्दल आधी सांगितलं नव्हतं ..आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर त्याक्षणी प्रत्यक्ष जाणवत होता ..ती कितीतरी वेळ एकटीच बोलत होती आणि मी फक्त ऐकत होतो ..अचानक तिला काय झालं माहिती नाही पण थोडी गंभीर होत म्हणाली , प्रेम तुझसे एक सवाल पुछु पर सही जवाब देना होगा .."

ती याआधी अस काहीच बोलली नव्हती त्यामुळे थोडा शांत होत म्हणालो , " हो विचार न त्यात काय ? "

आणि ती पुढच्याच क्षणी म्हणाली , " प्रेम तुम मुझसे प्यार करते हो ? ..कुछ भी छुपाना नही ..तुम्हे मेरी कसम .."

आणि तिने शपथ देताच माझ्याकडे पर्याय उरला नाही आणि मी उत्तरलो , " हो प्रेम तर करतो ..पण तू हा प्रश्न अचानक का विचारला ? "

" बस कुछ पुराणी बाते याद कर रही थी तब ये महसुस हुआ ..मुझसे रहा न गया इसलीये पूछ लिया ..पर ये बात तुने पहले क्यो नही बतायी .. "

मी थोडा वेळ तिच्यावर हसलो आणि म्हणालो , " मेरी जाण बताने तो आया था पर तुम ही योगेश को लेकर आ गयी ..और शादी की खूषखबरी बता दि ..इसलीये वो बात दिलं ही मे रेह गयी ..वैसे भी सही हुआ की तुमने योगेश से शादी कर ली ..तुम्हारी कास्ट एक थी इसलीये सब कुछ सही होते गया और अगर हमने शादी के बारे मे पूछ लिया होता तो शायद मेरी कही लाश पडी होती . उससे बेटर है की तुम भी खुश हो और मै भी खुश हु ..दोस्ती भी टिकी हुयी है और सर के नजरो मे मेरा दर्जा भी ठीक है ...."

तिने देखील माझ्या बोलण्यावर सहमती दर्शवली होती ..आम्ही खूप वेळ बोललो आणि नंतर तिने फोन कट केला ..

आता कधीकधी फोन करते ती पण फार काही बोलणं होत नाही ..आणि मला मधातच थांबवत श्रेयसी म्हणाली , " पण तू खुश आहेस का ? "

आणि मी तिच्यापासून दूर जात म्हणालो .., " प्रेम नक्कीच केलंय तिच्यावर पण ती मिळावीच हा हट्ट कधीच केला नाही ..प्रेम म्हणजे मिळविण नसतंच ..प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात स्वताचा आनंद शोधन ..निशा खुश आहे म्हणजे मी पण खुश आहे ..शिवाय आम्ही सर्व नाती जपून ठेवली आहेत याशिवाय आणखी काय हवं असणार ..मी आहे आनंदी .."

आणि श्रेयसी पुढच्याच क्षणी म्हणाली , " प्रेम तू माझा मित्र आहेस याचा फार आनंद आहे ..तू माझ्या आयुष्यात प्रेरणा बनून आला आहेस आणि अशीच सदैव मैत्री निभवत रहा हीच अपेक्षा असेल .."

तो क्षण तिथेच संपला आणि श्रेयसी व माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली ...


श्रेयसी आणि मी आता फार जवळचे मित्र होऊ लागलो होतो ..दोघाणीही आयुष्यात दुःखाचे वेगवेगळे रंग बघितले होते त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकत होतो ..मला तिचा आणि तिला माझा स्वभाव फारच आवडला होता त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा आम्ही सोबत राहत असू ...तिच्या वागण्यावरून ती माझ्याकडे आकर्षित होत आहे असं जाणवू लागलं होतं ..आपल्यावर कुणीतरी प्रेम करत ही भावनाच आनंद देणारी होती ..त्यावेळी ती वैश्या आहे हा विचार देखील माझ्या मनात आला नाही ..मी फक्त ते क्षण जगत होतो ..फक्त मी निशाबद्दल तिला सर्व काही सांगितलं असल्याने ती समोर काही विचार करणार नाही यावर माझा विश्वास होता त्यामुळे मी तिच्याशी बिनधास्त वागू शकत होतो ..सर्व कस मजेत सुरू होत ..

एक दिवस ती माझ्या फ्लॅटवर आली ..मी त्यावेळी जिम मारून सहज बसलो होतो .तस मी तिला येण्याचं कारण कधी विचारत नव्हतो पण मॅडम तयारीनिशी आल्याने मी तिला प्रश्न केला , " काय मॅडम आज इकडे रस्ता कशा काय भटकल्या ..?"

आणि ती माझी खेचत म्हणाली , " रस्ता विसरली नाही हो ..कस आहे ना आज शॉपिंगचा मूड होता तर म्हटलं कुणीतरी बॅग पकडायला सोबत राहावं म्हणून तुला न्यायला आले .."

रविवार असल्याने मला थोडा आराम मिळाला होता पण तिच्या येण्याने सर्व काही विस्कटल ..मी नाही म्हणतच राहिलो पण शेवटी तिच्या हट्टासमोर मलाही हार मानावी लागली ..शेवटी तयारी करून आम्ही माझ्या कारने शॉपपिंगसाठी निघालो ..मॅडमचा पूर्ण प्लॅन तयार होता ..त्यामुळे सर्वप्रथम आम्ही मूवी पाहायला गेलो ...एक तर बऱ्याच दिवसाने मूवी पाहिली होती आणि त्यातही ती बोरिंग निघाल्याने आम्ही अर्ध्यातच उठून बाहेर आलो..सकाळपासून साधा नाश्तासुद्धा केला नसल्याने आधी जेवणाकडे मोर्चा वळवला ..जेवण करताना आम्ही अगदीच एकमेकांसमोर बसलो ..तीच संपूर्ण लक्ष खाण्यात होत तर माझं संपूर्ण लक्ष तिच्याकडे होत ..मी तिला नेहमीच मॉडर्न कपड्यांमध्ये पाहत आलो होतो पण आज मॅडम सलवार सूट लावून आल्याने माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती ..तिने माझ्याकडे पाहिलं की मग मात्र जाणूनच दुर्लक्ष करायचो ..एक तर ती आधीच गोरी पान आणि आज चक्क संस्कारी बनून आली असल्याने माझी नजर काही तिच्यावरून हटत नव्हती ..बहुतेक तिच्याही हे लक्षात आलं होतं ..

जेवण झाल्यावर सरळ आम्ही मॉलला पोहोचलो ..मी जेव्हा - जेव्हा मॉलला जायचो तेव्हा आई- बाबांसाठी नक्कीच शॉपिंग करत असे ..त्यामुळे मी माझा मोर्चा साडीच्या सेंटरकडे वळविला आणि श्रेयसी आपले मॉडर्न कपडे खरेदी करण्यात व्यस्त झाली ..आईसाठी साडी खरेदी करीत असताना एका गुलाबी रंगांच्या साडीकडे माझं लक्ष गेलं आणि श्रेयसीला तो रंग उठून दिसेल म्हणून लपूनच साडी खरेदी केली ..नंतर श्रेयसिकडे जाऊ लागलो ..तिने भरपूर शॉपिंग केली होती त्यामुळे तिच्या सर्व बॅग मलाच धराव्या लागत होत्या ..आणि ती पुन्हा - पुन्हा शॉपिंग करत होती ..शेवटी तिची शॉपिंग झाली आणि मी त्यातून मुक्त झालो ..

मी कार काढली आणि आम्ही श्रेयसीच्या घराकडे निघालो ..काहीच वेळात कार तिच्या घरासमोर थांबली आणि ती कार मधून बाहेर निघाली ..तीने लगेच मला एक गिफ्ट दिलं त्यात बहुतेक शर्ट असावा माझा अंदाज होता ..तरीही मी तिची विचारपूस केली नाही ..ती समोर जाऊ लागली तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की तिला साडी द्यायचीच राहिली ..तिला आवाज मारून बोलवून घेतलं ..ती येताच तिच्या हातात साडी दिली ..ती विचार करत बसणार तेव्हड्यात मी तिला बाय म्हणून घरी जाऊ लागलो ..मी गाडीच्या आरशामधून तिला पाहत होतो आणि तीही माझ्या गाडीकडे एकटक पाहत होती कदाचित हीच आमच्या कहाणीची नवीन सुरुवात होती...

क्रमशः ...