Addiction - 8 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 8




रोज डे ..आमच्या कॉलेजमयीन जीवनातला सर्वात सुंदर दिवस ...प्रत्येकाला त्या दिवसाची आवर्जून वाट असायची ..तसा तो आमच्या जीवनातही खास होता ...निशा कॉलेजमध्ये सर्वात फेमस त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर असायच्या तर मी तिची शेपटी ..कुठेही असलो की दोघे सोबत दिसायचोच ..त्यामुळे कपल नसताना देखील लोक आम्हाला कपल म्हणत होते ..रोज डे असल्यामुळे मी तिचा पिऊन म्हणून काम सांभाळत होतो ..तिला येणारा प्रत्येक मुलगा गुलाब देऊन जायचा आणि तीही तो प्रत्येक गुलाब माझ्याकडे सोपवायची ..गुलाब देणारे आणि गुलाब यांची संख्या इतकी वाढली की हातात गुलाब मावेना ..त्या दिवसाचा रंग तिच्या चेहऱ्यावर पुरेपूर खुलला होता आणि मी अगदी जवळून ते पाहू लागलो ..आपण सर्वांसाठी खास आहोत ही गोष्टच फार सुखावून जाते ..तरीही देणार्यांची संख्या काही कमी होत नव्हती .. मी हे सर्व बघून तिला चिडवू लागलो आणि ती माझ्याकडे पाहून फक्त हसायची ..तिच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक रंग मी न्याहाळू लागलो ..सर्वांनी तिला गुलाब दिलेच होते आणि ती म्हणाली , " प्रेम सभी ने मुझे विश किया पर तुने एक भी रोज नही दिया ..क्यू ? "

आणि मी तिची थट्टा करत म्हणालो , " अभि क्या एक रोज लेकर दुकान खोलने का इरादा है.. वैसे भी पहले सेही इतने आकर है ..और एक का क्या करोगी ? "

आणि ती चिडूनच मला म्हणाली , " वो मै देख लुंगी पहले दे तो सही .."

आज कॉलेज बाहेरच दुकानात गुलाबाची फुले सजवली होती त्यामुळे पळतच तिकडे गेलो आणि एक छोटंसं गुलाब तिच्यासाठी घेऊन आलो ..तिच्या हातात ते दिलं आणि तिचा चेहराही गुलाबासारखा खुलून आला ..तिने तिच्या हातात असलेले सर्व गुलाब परत माझ्या हातात दिले आणि मी दिलेलं गुलाब तिने केसात माळल..मी मनोमन फारच खुश झालो ..

विशेष म्हणजे आज आम्ही दोघेही बाहेर जेवायला जाणार होतो ..बाईसाहेब आज फार नटून थटून आल्या होत्या ..तो रंग खराब होऊ नये म्हणून तिने मलाच गाडी चालवायला चावी दिली ..गाडी चालविण्यात देखील एक वेगळीच मज्जा होती ..गाडी ब्रेकरवर आदळली की तिचा हात आपोआपच माझ्या खांद्यावर यायचा आणि मी तो प्रत्येक क्षण एन्जॉय करू लागलो ..सुरुवातीला ती ओरडेल अस वाटल म्हणून आरशात पाहू लागलो पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येऊ लागलं आणि मी पुन्हा जाणूनच मस्ती करू लागलो ..ती कधीतरी एकदा मला खांद्यावर मारायची पण मी काही ती संधी सोडणार नव्हतो ..शेवटी हॉटेलला पोहोचलो ..मॅडम टेबल वर बसणार तेवढ्यातच मी जाऊन आधी चेअर मागे खेचली ..तिने जेवण ऑर्डर केलं ..माझं सर्व लक्ष बाजूच्या वातावरणावर होत ..आज निशा इतकी सुंदर दिसत होती की आजूबाजूचा प्रत्येक पुरुष तिच्याकडे पाहत होता आणि निशाची खेचण्यासाठी म्हणालो , " आज पुरुषांच काही खर नाही !! मला वाटत एक दोन अपघात नक्कीच होतील फक्त तुला पाहण्याचा नादात .."

आणि ती लाजत म्हणाली , " कुछ भी बोलता है यार तू ..खाना खा पहले .."

मी पुन्हा एकदा तिला म्हणालो , " सच्ची !!! आजूबाजूमे देख तो सही ..सब 'तेरी ही और देख रहे हे "

तिने मागे वळून पाहिलं आणि सार्यांनी नजरा खाली केल्या ..आम्ही दोघेही जेवण करताना थोडं फार बोलत होतो ..शेवटी जेवण झालं आणि आम्ही घराकडे निघालो ..

पुन्हा एक प्रसंग आठवतो मला निशाच्या हट्टीपणाचा ..15 नोव्हेंबर म्हणजे तिचा वाढदिवस ..वाढदिवसाला तिच्या घरी नेहमीच पार्टी असायची ..त्याही दिवशी तिच्या वडिलांनी पार्टी ठेवली होती ..निशाणे मला रात्रीच येण्यासाठी सांगितलं होतं ..इकडे कॉलेज , फिरणं यामुळे कामाच ओझं फारच वाढलं होत त्यामुळे सर मला सुट्टी देणार नाहीत हे आधीच माहिती होत ..त्यामुळे मी सरळ जॉबवरच गेलो ..निशाणे मला सकाळपासून कितीतरी कॉल केले होते आणि सरांना सुट्टी मागण्यासाठी विनंती करू लागली ..मी सरांच्या केबिनमसमोर पोहोचलो पण त्यांचा बिघडलेला मूड पाहून माझी आतमध्ये जायची हिंमतच होत नव्हती आणि दुसरीकडे निशाणे हैराण करून सोडलं होत ..मी लवकर - लवकर काम आटोपु लागलो पण माझं संपूर्ण लक्ष होत ते वेळेकडे ..आज वेळ देखील जायचं नाव घेईना ..म्हणून स्वताला कामात व्यस्त करून घेतलं ..शेवटी सायंकाळचे 5 वाजले ..सर्वांसाठी बँक बंद झाली असली तरीही मला आणखी जास्त काम करावं लागणार होत पण मी माझ्या मित्राला सर्व हँडल करायला सांगून तिथून पळ काढला ..एक तर निशा हट्टी होती आणि मला आधीच म्हणाली होती की , " तू आला नाहीस तर केक कापणार नाही " त्यामुळे रूमवर जाऊन कपडे चेंज करण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नव्हता ..मी परिधान करून होतो त्याच कपड्यावर पार्टीसाठी निघालो ..तिने मला 6 वाजता येण्यास सांगितलं होतं पण त्यात पुन्हा अडथळे येऊ लागले ..त्यात मुंबईची ट्रॅफिक सुद्धा मला त्रास देऊ लागली ..आता तर निशाचा कॉल सुद्धा रिसिव्ह करत नव्हतो ..सुमारे दीड तासांचा प्रवास करून तिच्या घरी पोहोचलो .माझं नशीब छान निघालं होत की अजून सर्व लोक आले नव्हते ..मी जसा घरात प्रवेश केला तशीच निशा मला स्वतःच्या बेडरूम घेऊन गेली ..मी बाथरूममधून फ्रेश होऊन निशाकडे आलो ..तिने लगेच मला एक बॉक्स दिला ..आणि मी तिला म्हणालो , " हे काय निशा ? " आणि ती उत्तर देत म्हणाली , " हे बघ प्रेम यात काही कपडे आहेत ..लवकर परिधान करून बाहेर ये ..मी वाट पाहत आहे तुझी .." आणि लगेच खाली निघून गेली ..पहिल्यांदाच मी तिच्या रूम मध्ये गेलो होतो ..आजूबाजूला बघितलं ..तिने रूम फारच सुंदर सजवली होती शिवाय मध्यभागी आम्हा दोघांचा फोटो लावून होता ..माझं संपूर्ण लक्ष त्यावरच होत ..बाहेरून लोकांचा आवाज येत होता त्यामुळे लवकरच तयारी करून खाली परतलो ..निशाचे आणि माझे सर्व मित्र पार्टीला पोहोचलो होते त्यामुळे गेल्या - गेलीच यांच्याशी बोलण्यात व्यस्त झालो ..एव्हाना सर्व लोक आले होते आणि केक कापण्यासाठी निशा समोर आली ..मी मागे कुठेतरी उभा होतो त्यामुळे तिने माझ्याकडे नजर टाकली आणि नजरेनेच खुणावून समोर येण्यासाठी सांगितलं ..मी येत नाही हे पाहून तिने आमच्या सर्व मित्रांना समोर बोलविल आणि मीही समोर आलो ..शेवटी सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात तिने केक कापला आणि हॅप्पी बर्थडे टू यु म्हणत सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या ..केक कापताच तिने घरच्यांना केक भरविला आणि त्यानंतर लगेच मला भरविला.. निशाला माझ्याबद्दल इतकी काळजी वाटते हे बघून मला फारच आनंद त्याक्षणी वाटत होता ..मी तिथेच हसायला लागलो आणि ती मला इशारे करून करून काय झालं असं विचारू लागली ..मी मात्र शांतच बसलो ..काय होती यार ती ? कशाचच भान न ठेवणारी ..आणि माझ्यासाठी काहीही करणारी ...

मी सकाळपासून काम करून थकलो होतो त्यामुळे फारच भूक लागली होती ..एव्हाना माझे सर्व मित्र जेवण करून निघाले होते पण निशाणे मला सोबतच जेवण करू म्हटलं असल्याने मला तिच्यासाठी थांबावं लागलं ..एक - एक व्यक्ती जेवण करून निघू लागला आणि माझ्या पोटात कावळे ओरडू लागले ...थोड्याच वेळात टेबल सजविण्यात आला आणि तीच संपूर्ण कुटुंब सभोवती बसल ..तिच्या वडिलांनी माझी घरच्या सर्वांशी ओळख करून दिली .मी मात्र थोडा ऑकवॉर्ड फील करू लागलो ..निशाला ते जाणवलं आणि तिने हातावर हात ठेवून माझी ऑकवॉर्डनेस दूर केली ..हसत - हसत सर्वांचे जेवण सुरू झाले .काही गप्पा मारत जेवण करू लागले तर काहीसं शांतपणे जेवण करू लागले आणि मी माझं सम्पूर्ण लक्ष जेवणाकडे दिलं होतं ..जेवण चविष्ट असल्याने मी पोटभर खाऊन घेतलं ..खाऊन झाल्यावर डकार घ्यायला विसरलो नाही ..हे विशेष ...

जेवण आटोपलं आणि घरी जाण्यासाठी निघालो..मी एकटाच निघतोय हे पाहून निशा मागूनच धावत आली ..तिने पार्किंगमधून कार काढली आणि मला सोबत घेऊन आम्ही माझ्या रूमकडे निघालो ..गप्पा मारत - मारतच रस्ता सर होऊ लागला ..तीच संपूर्ण लक्ष कार चालविण्याकडे होत तर माझं संपूर्ण लक्ष तिच्याकडे ..शेवटी काही वेळातच कार माझ्या रूम जवळ थांबली आणि मी खाली उतरू लागलो ..तीही खाली उतरली आणि मी तिला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ..ती गाडीत जाणार तेव्हड्यातच मी तिला थांबवलं आणि म्हणालो , " गिफ्ट नकोय का तुला ? " आणि ती लगेच मागे वळत म्हणाली , " का नकोय ..हवंच आहे !! "

मी एक छोटासा बॉक्स तिच्या हातात सोपवला आणि तिने तेव्हाच तो उघडून बघितला ..त्यात एक सुंदर लॉकेट होत ..त्यात एक चैन ..त्याच्या मध्यभागी दिलंच लॉकेट आणि त्यात एका बाजूला तिचा फोटो ..ती ते पाहून फारच खुश झाली आणि लगेचच गळ्यात चैन घालू लागली ..ती चैन घालण्याचा प्रयत्न करीत होती तरीही तिला घालायला काही जमेना म्हणून मीच पुढाकार घेऊन लावायला मदत केली ..पहिल्यांदाच तीच गोर शरीर मला पाहायला मिळालं होतं त्यामुळे थोडा विचार चक्रेत अडकलो पण स्वताला सांभाळून घेऊन चैन गळ्यात घातली ....उशीर फारच झाला होता ..तीला घरून फोन येऊ लागले होते त्यामुळे ती मला मिठी मारून जाऊ लागली ..ती निघाली आणि मीया आताही तीच्या कारकडे पाहू लागलो ..शेवटी ती दिसेनाशी झाली आणि मी देखील रूमकडे गेलो ...

क्रमशः