Addiction - 13 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 13




इकडे मला समाधानाची झोप लागली होती तर दुसरीकडे श्रेयसी काही झोपणार नव्हती ..आज घडलेला प्रत्येक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहू लागला होता ..काकूच्या शब्दांनी तिच्यावर जादू केली होती ..गेली कित्येक वर्षे ज्या भावनेपासून ती दूर होती ..त्याच भावनांनी तिच्या मनावर संपूर्ण मनावर ताबा मिळविला होता ..वैश्येलाही प्रेम होऊ शकत का ? ..हा राहून - राहून तिला प्रश्न पडून जात होता ..तीच माझ्यावर नक्कीच प्रेम होतं पण मी एका वैश्येला स्वीकारेल का हा प्रश्न तिला सतावू लागला होता ..तिचा माझ्यावरचा विश्वास सांगायचा की मी तिला नक्कीच स्वीकारेल पण त्याच्या घरच्यांचं काय , त्याने मला स्वीकारल्यावर हे जग त्याला ना - ना तर्हेने बोलनार हे सर्व विचार करून तिने मला काहीही न सांगण्याचा विचार पक्का केला ...ती फारच पेचात पडली होती आणि या पेचातुन बाहेर निघण्याची कुठलीच चिन्हे दिसत नव्हती ...

गेल्या काही महिन्यात माझं कामाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं शिवाय प्रमोशनवर प्रमोशन भेटत असल्याने कामाचा व्याप देखील वाढू लागला होता ..वाढत्या व्यापामुळे कुणालाच वेळ देणं शक्य होत नव्हतं ..श्रेयसीशीही अलीकडे मोजकच बोलणं होऊ लागलं ..आम्हाला खूप मोठा प्रोजेक्ट मिळणार असल्याने आमचं त्यावर काम सुरू झाल ..स्वाभाविकच सरानी संपूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली त्यामुळे भूक - तहान न बघता मी जमेल तेव्हढा वेळ काम करत होतो ..मोबाइलवर श्रेयसीचे कितीतरी मिस कॉल आले असायचे पण थकून आलो की लगेचच झोप लागून जायची ..सुमारे महिना भर माझी अशीच स्थिती होती ..त्यातल्या त्यात प्रोजेक्टच्या अप्रुवलसाठी मला कलकत्त्याला जावं लागणार होतं ..4 - 5 दिवस तिथे काम चालणार होत ..सेल देखील बंद ठेवणार असल्याने घरी कळविल होत ..पण कामाच्या ओघात श्रेयसीला मात्र सांगायचं विसरलो ..ठरलेल्या वेळी माझे कलीग आणि मी कलकत्त्याला पोहोचलो ..आमच्याकडे मिटिंगसाठी दोन दिवस होते त्यामुळे दिवसरात्र आम्ही प्रेझेन्टेशनची तयारी करीत होतो ..रात्री थोडा वेळ शांत झोप घेतली की पुन्हा कामावर लागायचो त्यामुळे इतर कुठल्याच गोष्टीला वेळ मिळत नव्हता .सरानीही हे प्रोजेक्ट महत्त्वाचं होत अस सांगितलं असल्याने आम्ही सर्वच जीवापाड काम करीत होतो आणि आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू लागलो ..तिसरा दिवस उजाळला ..बहुउद्देशीय कंपनी असल्याने आम्ही आमच्या कामात कुठलीही कमतरता सोडली नव्हती ..12 वाजताच्या जवळपास मिटिंग ठरली होती आणि मी प्रेझेन्टेशन द्यायला सुरुवात केली ..मी त्यांच्या कंपनीच्या पॉलिसीजचा बराच अभ्यास केला होता आणि त्याच पद्धतीने मी त्यांना गोष्टी पटवून देत होतो ..ते देखील मला बरेच प्रश्न विचारत होते ..मीही माझ्या पद्धतीने त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होतो ..सुमारे दोन तास चाललेली मिटिंग संपली आणि आम्ही सर्वच बाहेर पडलो ..आम्ही आमच काम केलं होतं आता त्यांच्या उत्तराची वाट होती ..

फक्त 2 वाजले असल्याने आम्ही आमचा मोर्चा जेवणाकडे वळविला ..मित्रांनी सरळ पिण्याकडे लक्ष घातलं आणि मीसुद्धा त्यांना काहीच म्हणालो नाही ..मी बाजूलाच बसून सिगारेट ओढू लागलो ..मला टेंशन आलं की मला सिगारेटच त्यातून बाहेर काढत असे ..मित्रांची पार्टी बऱ्याच रंगात आली होती परंतु आजच घरी परत जायचं असल्याने त्यांनी ड्रिंक जास्त केली नव्हती ..शेवटी दुपारचं जेवण आटोपलं आणि आम्ही थोडा आराम करून मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालो ..

मुंबईच्या ऐरपोर्टवर पोहोचलो तेव्हा साधारणतः 10 वाजले होते ..सेल स्विच ऑन केला तेव्हा श्रेयसीचे कितीतरी मिस कॉल , मॅसेज दिसले ..तिला कॉल करण्यापेक्षा सरळ तिलाच गाठायचं ठरवलं आणि कॅब बुक केली ..कॅबला बसलोच होतो की सरांचा फोन आला आणि त्यांनी प्रोजेक्ट आपल्याला मिळालं असल्याने अभिनंदन केलं .प्रोजेक्ट मिळालं असल्याने उद्या ऑफिसला सेलिब्रेशन होणार होत ..मीही आज जाम खुश होतो ..एक तर ज्यावर दिवसरात्र काम केलं ते प्रोजेक्ट मिळालं होतं , दुसरं म्हणजे टेंशन फ्री झालो होतो आणि तिसर म्हणजे आज श्रेयसीशी भेटता येणार होत ..खर सांगू तर मीही तितकाच तिच्याकडे आकर्षिल्या जात होतो ..ट्रॅफिक क्लीअर करत - करत मी तिच्या फ्लॅटवर पोहोचलो ..बाहेरून बेल वाजविण्याचा प्रयत्न करीत होतो तरी कुणीच उत्तर देत नव्हतं ..बाहेरून देखील दार लावून नव्हतं ..माझ्या डोक्यात ना - ना शंकांनी घर करायला सुरुवात केली ..तेवढ्यात मला आठवलं की श्रेयसी बाहेरच चावी ठेवत होती ..मी खिडकीत बघितलं तर तिथे चावी सापडली आणि दार उघडून आत पोहोचलो ..श्रेयसीची रूम पूर्ण अस्ताव्यस्त झाली होती ..पाय ठेवायला सुद्धा जागा शोधावी लागत होती ..तसच बेडरूममध्ये गेलो आणि बघितलं तर श्रेयसी बेडवर पडून होती ..मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि तिला उठविण्याचा प्रयत्न करू लागलो पण ती शुद्धीवर नव्हती एवढंच काय तर तिचे डोळेसुद्धा उघडत नव्हते फक्त श्वास कसातरी सुरू होता ..मला काय करू आणि काय नाही अस झालं आणि मी पुरता गोंधळलो ..तरीही स्वताला सावरल आणि तिला उचलून हॉस्पिटलला घेऊन गेलो ...एक तर ट्रॅफिक आणि त्यातही ती निपचित पडलेली त्यामुळे हृदयाच्या घंटा आणखीनच जोराने वाढू लागल्या होत्या ..ड्रायव्हरला मी गाडी लवकर चालविण्यासाठी सांगत होतो आणि तोही परिस्थितीची दखल घेत गाडी लवकर चालवू लागला होता ..शेवटी हॉस्पिटलला पोहोचलोच ..

हॉस्पिटलला पोहोचलो पण डॉक्टर तिथे उपलब्ध नव्हते ..डॉक्टर साहेब मिश्रा सरांचे खूप जवळचे मित्र असल्याने मी त्यांना फोन केला आणि ते देखील लवकरच आले ..श्रेयसीचे चेकअप करण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली ..ती फारच सिरीयस जाणवत होती त्यामुळे मला फारच भीती वाटत होती ..सरांचं चेअकप करून झालं होतं आणि सरानी तात्काळ ऑपरेशन करायला सांगितलं ..मी त्यांना काय झालंय असे बरेच प्रश्न विचारत होतो पण ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते ..त्यांनी मला काही औषध लिहून दिली आणि मी औषध आणायला बाहेर गेलो ..परत आलो तेंव्हापर्यंत ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती ..मी सरांना पुन्हा एकदा तिच्या स्थितीबद्दल विचारलं आणि त्यांनी श्रेयसी सिरीयस असल्याबद्दल सांगितलं ..ऑपरेशन थेटरच दार बंद झालं आणि इकडे माझी स्थिती दयनीय झाली ..एक तर मी निशाला आधीच गमावल होत त्यामुळे श्रेयसीला गमावन मला परवडणार नव्हतं ..कितीतरी दिवसांनी मी प्रेमात पडलो होतो आणि आता तिच्याविना जगन देखील अशक्य झाल होत ..माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि हात - पाय थरथर कापू लागले ..भूक देखील लागली होती पण काहीच खायची इच्छा नव्हती ..रात्रीचे 1 वाजले होते आणि डॉक्टर साहेब बाहेर आले ..त्यांच्या चेहरा पडला होता ..आता ते काय बोलणार होते यावरच माझं संपूर्ण लक्ष लागून होत...


क्रमशः ...