Shitole. 2 books and stories free download online pdf in English

शितोळे - 2

अंकलीकर शितोळे देशमुख ( " सेनाहरदोसहश्री " ) शितोळे घराण्याने आपल्या पराक्रमाने पुणे प्रांताची देशमुखी तसेच पडवी ( ता . हवेली , पुणे ) व अंकली ( ता . चिक्कोडी , बेळगाव ) येथील देशमुखी व पाटीलकीचे वतन मिळविले . पुणे प्रांताचे राजा देशमुख शितोळे आणि अंकलीकर शितोळे या एकाच घराण्याच्या दोन शाखा आहेत . अंकलीकर शितोळे घराण्याचे मुळ पुरुष तमाजीराव यांचे पणतू बाजी शितोळे हे छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी होते.छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर संताजी , बहिर्जी आणि मालोजी घोरपडे आणि धनाजी जाधव , विठोजी चव्हाण तसेच बाजी शितोळे यांनी औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले . राजाराम महाराजांनी या शौर्याबद्दल बाजी शितोळेंना घोरपडेंच्या पथकाची सरनोबती सांगितली . पराक्रमी बाजी शितोळेंचे निधन सन १७२८ साली झाले ( संदर्भ : अंकलीकर शितोळे घराण्याची कैफियत ) . बाजी शितोळेंचे पुत्र खेत्रोजी शितोळे यांना सन १७११ साली छत्रपती शाहू महाराजांनी ' सेनाहरदोसहश्री ' हा किताब दिला .पण लवकरच खेत्रोजींचे निधन झाले . खेत्रोजीबरोबर त्यांचे बंधू सुलतानजी , आप्पाजी आणि महादजी हे सुध्दा पराक्रमी होते . त्यांनी इ . स . १ एप्रिल १७३० रोजी सेनापती त्र्यंबकराव दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांच्यात डमई ( गुजरात ) येथे झालेल्या युध्दामध्ये , पेशव्यांकडून पराक्रम गाजविल्याबद्दल बाजीराव पेशव्यांनी त्यांना छत्रपती शाहू महाराजांकडे नेऊन त्यांच्या पराक्रमाची तारीफ केली .शितोळे बंधूंच्या पराक्रमावर संतोष पावून छत्रपती शाहूंनी त्यांना मांजरी हा गाव अर्घा तसेच अंकली हा गाव पुरा वंशपरंपरेने इनाम म्हणून दिला . तसेच कृष्णाकाठची काही गावे इनाम म्हणून दिली . यानंतर पराक्रमी शितोळे बंधू । अंकलीला स्थायिक झाले . पुढे ते अंकलीकर शितोळे या नावाने ओळख लागले . छत्रपती शाहू महाराजांनी खेत्रोजीना । पडवी गावची जी सनद दिली होती तिचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे . " श्री स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३८ खर नाम संवत्सरे अधिक भाद्रपद बहुल चतुर्थी भौस वासरे क्षत्रिय कलावंतस श्री राजाशाहू छत्रपतिस्वामी यांनीखेत्रोजी शितोळे यांस दिलें इनाम पत्र ऐसीजे तम्हीं स्वामीकार्यावरी एकनिष्ठ । राहून पुढे विशेष स्वामीकार्य करून आपला गुजारा करून घ्यावा .. हे उमेद घरील्याकरिता , तुम्हावरी स्वामी कृपाळु होऊन मौजें पडवी तालुके पाटस सुभा प्रांत पुणे हा गांव खेरीज हकदार व इनामदार वजा करून देऊन कुलबाब कुलकानु इनाम तुमचे वंशपरंपरेस दिलाअसे . तुम्हीं मौजे मजकूर इनाम वंशपरंपरेनेअनुभवून स्वामिकार्य एकनिष्ठेपणे करीत जाणे . " _ _ _ छत्रपती शाहू महाराजांनी मांजरी गाव तसेच अंकली गाव इनाम म्हणून सुलतानजी व आप्पाजी शितोळे बंधूना । दिले त्याची सनद पुढीलप्रमाणे आहे.श्री स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४९ शुभकृत नाम संवत्सरे आषाढ बहूल दशमी सौम्यवासरे क्षत्रिय कुलावतस । श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी यांनी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमान भावी सुमा प्रांत कोल्हापूर यास आज्ञा केली । ऐशीजे . राजश्री सुलतानजी व आप्पाजी शितोळे हे स्वामींच्या राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक स्वामींच्या पायासी निष्टा धरून कार्य करीत आहोत..याचे चालवणे स्वामी यास आवश्यक..यांचे विषयी राजश्री पिराजी घोरपडे सेनापती यांनी राजश्री अंताजी यास मागमे विनंती संगोन पाठविली..त्याजवर स्वामी टकसंबे प्रांत मजकूर हा गाव हद एक इनाम करून दिला असे तरी मौजे मांजरी पूर्व इनाम चालविणे.श्री स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ५१ साधारण संवत्सरे श्रावण शु . ६ भृगुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शाह । छत्रपति स्वामी यांनी मोकदम मौजे अंकली रायबाग यांसी आज्ञा केली ऐसीजे . राजश्री सुलतानजी शितोळे व आप्पाजी शितोळे बीन बाजीबा शितोळे हे निष्ठेनें सेवा करितात . यांचे वंशपरंपरेने चालविणे आवश्यक जाणोन यांजवर स्वामी कृपाळु होऊन मोजे मजकूर पेशजींच्या मुकासी यांजकडुनदूर करवून हल्ली यांसी विषयीचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें मौजे मजकूर नूतन इनाम कुलबाब कुलकानू हली पटीवपेस्तर पटी खेरीज हक्कदार व इनामदार दिला..असे तुम्ही त्यांचे आझेंत वर्मोन चतुःसीमा पूर्वी यादीप्रमाणे मौजे मजकूरचा ऐवज यांशी त्यांचे वंशपरंपरेनें वसूल होत जाणे . प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप नकरणे . पराक्रमी अशा सुलतानजी आणि आप्पाजी शितोळे या बंधूंचे निधन सन १७४० च्या सुमारास झाले . त्यानंतर आप्पाजीचे पुत्र सटवाजी आणि महादजी यांनी पेशव्यांच्या उत्तरेतील स्वारीत मोठा पराक्रम गाजविला ( सन १७५६ ) . ऑगस्ट १७६४ मध्ये निजामाविरुध्दच्या राक्षसभुवनच्या लढाईत माधवराव पेशव्यांकडून लढताना महादजी शितोळेनी । पराक्रमाची शर्थ करून निजामाच्या सैन्यास ठार मारत पुढे जात..असे तुम्ही त्यांचे आझेंत वर्मोन चतुःसीमा पूर्वी यादीप्रमाणे मौजे मजकूरचा ऐवज यांशी त्यांचे वंशपरंपरेनें वसूल होत जाणे . प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप नकरणे . पराक्रमी अशा सुलतानजी आणि आप्पाजी शितोळे या बंधूंचे निधन सन १७४० च्या सुमारास झाले . त्यानंतर आप्पाजीचे पुत्र सटवाजी आणि महादजी यांनी पेशव्यांच्या उत्तरेतील स्वारीत मोठा पराक्रम गाजविला ( सन १७५६ ) . ऑगस्ट १७६४ मध्ये निजामाविरुध्दच्या राक्षसभुवनच्या लढाईत माधवराव पेशव्यांकडून लढताना महादजी शितोळेनी । पराक्रमाची शर्थ करून निजामाच्या सैन्यास ठार मारत पुढे जात.निजामाच्या बाजूने लढणारा त्याचा दिवाण विठ्ठल संदर याच्या हत्तीच्या माहूतास भाल्याने ठार मारले . या युध्दात विठ्ठल सुंदर आणि त्याचा पुत्र मारला गेला . या पराक्रमावर वष होऊन माधवराव पेशव्यांनी महादजींची अंकली तसेच मांजरी गाव ची सनद पुढे चालविली ; तसेच त्यात मोठी दक्षिसी दिली . दरवर्षी आषाढी एकादशीस पंढरपुरास जाणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी अंकलीकर शितोळेचा । मालाथा घोडातसेच पुण्याचे नरसिंह शितोळे यांना पागोटाआणि पोशाख हा आहेर देण्याचामान आहे