Navnath mahatmay - 3 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग ३

नवनाथ महात्म्य भाग ३

थोड्याच वेळात ते दोघेही खाली उतरून गर्द जंगलात प्रवेशले.
वनराज सिंहाने डरकाळी फोडून दोघांना सावध करण्याचा प्रयत्न केला!
वनराईचे निसर्ग सौंदर्य पाहून दत्त हरपून गेले.
एका औदुंबर वृक्षाच्या छायेत बसले.
मच्छिंद्रनाथांना दत्तात्रय म्हणाले, "तु जगाच्या कल्याणासाठी दारोदार फिरलास.
भिक्षेच्या रूपात लोकांचे दैन्य-दुःख झोळीत घेतलेस.
मायास्वरूपात जरी स्त्री राज्यात गेलास तरी लोकांचे बोल तुला सोसावे लागले.
पण नियतीपुढे मलाही झुकावे लागते.
आता तुला जवळ घ्यायची माझी इच्छा आहे .
मच्छिंद्रनाथाने जाऊन अनसुयात्मजाला कंठभेट दिली.

थोड्या वेळाने मच्छिंद्रनाथ म्हणाले, "हे करुणानिधी आपण असे भावनाविवश झालेले मला पहावत नाही.
तुम्ही जाणता लोकोद्धारासाठी मला आपल्यापासून व गिरनार पासून पुन्हा विलग व्हावे लागणार आहे.
गर्भगिरी पर्वतावर अक्षय निवास करण्याचा माझा विचार आहे!
माझा प्रिय पुत्र गोरक्षनाथा याला मात्र मी नंतर इथेच गिरनारवर राहून आपली सेवा करण्याचा आदेश केला आहे.

तेव्हा दत्त म्हणाले, "ठीक आहे जाऊन रहा गर्भगिरी वर.
लोक तुला मायबाप म्हणूनही ओळखतील.
गर्भगिरी पर्वताला मी प्रती गिरनार असण्याचा वर देतो आहे!
गिरनार व गर्भगिरी मध्ये काही फरक नाही.
मच्छिंद्रा तु माझेच प्रतिरूप आहेस.
तुझे दर्शन घेतले म्हणजे माझे दर्शन घेतल्या सारखे आहे.

तुला केलेला प्रत्येक नमस्कार हा नऊही नाथांना व मला पोहोचेल.
गिरनारवर तु नसूनही असशील माझ्या रूपात आणि गर्भगिरी वर मी नसूनही असेन तुझ्या रूपात.
पण माझी तुला आज्ञा आहे.
जे भक्त गर्भगिरी वर येतील त्यांना आपल्या सांगण्याप्रमाणे गिरनार यात्रेचे फळ मिळेल.
दर पौर्णिमेला तु गिरनार वर मला भेटायला ये."
हे ऐकुन मच्छिंद्रनाथ म्हणाले, "महाप्रभू आपली आज्ञा शिरसावंद्य आहे !

गिरनार मुळे जसा गुर्जरदेश (गुजरात) पावन झाला त्याप्रमाणे गर्भगिरी मुळे महाराष्ट्र पावन होईल.
मी दर पौर्णिमेला गिरनार वर येईन आणि कोणत्याही रूपात माझ्या व आपल्या भक्तजनांना दर्शन देईन.

माझा शिष्य गोरख शिखरावर निरंतर वास्तव्य करेल. त्यास कृपावलंकीत करावे.
महाराज तथास्तु म्हणाले व मच्छिंद्रासोबत गुरूशिखरावर गेले.
काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ गर्भगिरीकडे निघाले.
दत्ताने मच्छिंद्रनाथांना भावपूर्ण निरोप दिला.
अशाप्रकारे सद्गुरू मच्छिंद्रनाथ गर्भगिरी वर अजूनही वास्तव्यास आहेत.
भक्तांना त्यांच्या वास्तव्याची आजही अनुभूती येत असते.
मत्स्येंद्रनाथ हा हठ योगाचा सर्वोच्च गुरु मानला जातो, याला मछरनाथ देखील म्हणतात.
त्यांची समाधी उज्जैनच्या गढकालिकेजवळ आहे.
तथापि काही लोकांचा असा विश्वास आहे की मच्छिंद्रनाथची समाधी मच्छिंद्रगड येथे आहे, जी महाराष्ट्रातील सावरगाव जिल्ह्यातील मयंबा गावाजवळ आहे.

नवनाथांचे आद्य गुरु आद्य नाथ श्री मच्छिंद्रनाथ यांची जयंती ही भाद्रपद ऋषी पंचमी यादिवशी मानली जाते. मुळातच अयोनीसंभव अवतार असल्याने प्रकट होणे ही तर मुळ चैतन्य शक्तीची एक अगम्य लीलाच आहे .
मच्छिन्द्रनाथांना महाराष्ट्रात आद्य नाथ म्हणून आदरयुक्त प्रेमाने “बडे बाबा”असेही म्हणतात.
मच्छिन्द्रनाथांच्या नावामध्ये कालानुरूप बदल होत आलेले आपल्याला दिसतात.
नेपाळ मध्ये मच्छिन्द्रनाथांच्या नावाची तुलना बुद्धदेवता आर्यवालीकेतेश्वर यांच्या नावाशी केली जाते.
नेपाळमध्ये नाथांची आणखी दोन नावे "करुणामय आणि लोकनाथ" अशीही आहेत.
तसेच नेपाळमधील नाथांचे प्रसिद्ध नाव म्हणजे "रतो मत्सेन्द्रनाथ" हे आहे.
अर्थात पावसाचा देव ...God of Rain

श्री मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य भरून राहिले आहे असा अनुभव येतो .
याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजु करत आहे असे वाटते.
भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तिच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो.
गडावर श्री माच्छिन्द्रनाथांची चैतन्य समाधी आहे तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे.
ही देवी नाथांनी मानलेली बहिण आहे गडावर अखंड धुनी असते ती कधीच विझत नाही.
धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे त्याला "देव तळ" (तलाव) म्हणतात.

दुसरा अवतार “गोरक्षनाथ”

==============

गोरक्षनाथांच्या जन्मावर विद्वानांचे मतभेद आहेत.
राहुल संकृत्यायन हा त्यांचा जन्म आठव्या शतकापासून ते 13 व्या शतकापर्यंत मानतो.
नाथ परंपरेची सुरुवात फार प्राचीन आहे, परंतु या परंपरेला गोरखनाथांकडून पद्धतशीर विस्तार प्राप्त झाला.
गोरखनाथांचे गुरू मच्छीन्द्रनाथ होते.
चौर्याऐंशी सिद्धांपैकी दोघांनाही प्रमुख मानले जाते.
गुरू गोरखनाथांच्या जन्मासंदर्भात जनमानसात एक आख्यायिका प्रचलित आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की गोरखनाथ सामान्य माणसासारखे आईच्या उदरातून जन्माला आले नव्हते.
ते गुरु मच्छीन्द्रनाथांचे मानसपुत्र होते.
त्यांचे शिष्य देखील होते.
एकदा भिक्षा मागण्यासाठी गुरु मच्छीन्द्रनाथ एका खेड्यात गेले.
जेव्हा त्यांनी एका घरात भीक मागण्यासाठी आवाज दिला तेव्हा घर मालकाने भिक्षा दिली आणि आशीर्वाद द्यावा म्हणून मुल होण्यासाठी विनवणी केली.
गुरु मच्छीन्द्रनाथ यांचे हृदय दयाळू होते.
म्हणुनच घराच्या मालकाची विनंती स्वीकारत त्यांनी त्याला मुल होईल आशीर्वाद दिला आणि एक चिमुटभर विभुती देऊन सांगितले की, योग्य वेळी तुझी पत्नी आई होईल.
तिला एक तेजस्वी मुलगा होईल, ज्याची कीर्ती दिगंतरात पसरली जाईल.
आशीर्वाद दिल्यानंतर गुरु मच्छीन्द्रनाथ आपल्या पुढच्या यात्रेसाठी गेले.
बारा वर्षानंतर गुरु मच्छीन्द्रनाथ त्याच गावात परतले.
तेव्हा काहीही बदलले नव्हते.
गावही तसेच होते .
मागील भेटीत गुरू मच्छीन्द्रनाथनी आशीर्वाद दिलेल्या घराच्या मालकाच्या घरी पोहोचल्यावर, गुरूंना त्या मुलाची आठवण झाली.
त्यांना पाहुन त्याच घराच्या मालकाने पुन्हा मुलाची भीक मागितली.
गुरु मच्छीन्द्रनाथांनी त्याला मुलाबद्दल विचारले.
गृहिणी आणि मालक काही काळ गप्प राहिली, परंतु सत्य सांगण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता .
दोघांनी सर्व काही सत्य सांगितले जे काही घडले होते ते .
असे झाले होते की गुरु मच्छीन्द्रनाथांचे आशीर्वाद मिळाले तरीही त्यांचे दुर्दैव आडवे आले होते .
एका भिक्षूवर विश्वास ठेवल्यामुळे जवळपासच्या भागातील महिलांनी त्यांचा उपहास केला होता .
त्यामुळे त्याच्याही मनात थोडासा अविश्वास निर्माण झाला होता आणि त्याने गुरूंनी दिलेली विभुती जवळच्या शेणात फेकून दिली होती .
गुरु मच्छीन्द्रनाथ एक परिपूर्ण महात्मा होते, त्यांनी ध्यान केल्यावर त्यांना सर्व समजले .
ते शेणाच्या ढिगाकडे गेले आणि त्यांनी मुलाला हाक मारली .
त्यांच्या हाकेसरशी बारा वर्षांची निरोगी मुलाची गोंडस आकृती त्यांच्यासमोर उभी राहिली .
ज्याचे नाक धारदार होते , ललाट उंच होते आणि रूप मोहक होते .
गुरु मच्छीन्द्रनाथ यांनी मुलाला मालकाकडे नेऊन दाखवले .
आणि मुलाला पाहून मच्छीन्द्रनाथ म्हणाले, "मुला, तू शेणापासून उद्भवला आहेस, म्हणून तुझे नाव गोबरनाथ असेल.
यानंतर त्यांनी गोरखनाथाला बरोबर घेऊन त्यांना नाथ पंथात सामावून घेतले आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन ग्रामीण भागात गेले .
दोघे उत्कल राज्यात पोचले .
राज्याबाहेरील असलेल्या एका मंदिरात गेल्यावर मच्छीन्द्रनाथ यांना आपल्या शिष्याबद्दल गुरुची भक्ती पहायची होती.
ते म्हणाले, मुला, मला खूप भूक लागली आहे.
भूक शांत करणे फार महत्वाचे आहे, नाहीतर माझे आयुष्य संपेल.
गुरू मच्छीन्द्रनाथांची इच्छा ऐकून गोरखनाथ म्हणाला , मी आता काय करावे?
तु काहीतरी भिक्षा मागुन मला खायला दे .
गोरखनाथ आपल्या गुरूची आज्ञा पाळत शहरात भिक्षा मागण्यासाठी गेला .

बराच वेळ त्याला काहीच मिळाले नाही, त्यानंतर त्याने पुढे पाहिले तर एका ठिकाणी पितृ श्राद्धाची पूजा एका ब्राह्मणाच्या घरात चालू होती .
अनेक पक्वान्ने शिजवली केली जात होती .
जेव्हा गोरखनाथांनी तेथे आलख आलख शब्द जोरात केआणि भीक मागितली .
तेव्हा घराच्या मालकिणीने काही पक्वान्ने आणि दहीवडे आणून गोरखनाथच्या कमंडलुमध्ये ठेवले .
ते घेऊन गोरखनाथ परत आला .
भीक मागितलेले सर्व पदार्थ त्याने आपल्या गुरूसमोर ठेवले .
आणि मच्छीन्द्रनाथांना खुप प्रसन्न केले .
मच्छीन्द्रनाथ पक्वान्ने खाऊ लागले आणि त्यातील प्रत्येक पदार्थांची प्रशंसा करु लागले.
त्या सर्व पदार्थांपैकी दहीवडा त्यांना सर्वात जास्त आवडला.
ते गोरखनाथला म्हणाले मला दहीवडा खुप आवडला आहे,तर तु जा आणि माझ्यासाठी आणखी दही वडा घेऊन ये .
गोरखनाथांनी आपल्या गुरूच्या आज्ञेचे पालन केले आणि मग त्या घराजवळ जाऊन परत भीक मागायला सुरवात केली.

क्रमशः