Sparsh - 4 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 4

आज सरांना माझ्याकडे काम असल्याने त्यांनी थोडा वेळ स्वतःकडे थांबवून घेतलं होतं ..मी सरांच्या केबिन बाहेर आलो तेव्हा सर्व गर्दी नाहीशी झाली होती .अंधारदेखील पडू लागला होता त्यामुळे लवकरात लवकर गाडीकडे पोहोचलो ..आज संपूर्ण दिवस खूप मस्त गेला होता शिवाय तिला इम्प्रेसदेखील करता आलं होतं ..त्यामुळे फार खुश होतो पण नशीब पुन्हा एक संधी एवढ्या लवकर देईल अस वाटलं नव्हतं ...पार्किंगला पोहोचलो तेव्हा ती तिथेच होती ..बहुदा तिची गाडी चालू होतं नव्हती ..तिने बरेच प्रयत्न केले तरी गाडी काही सुरू झाली नाही ..मी अगदी तिच्यासमोरच उभा होतो ..पण तिने मला विचारनसुद्धा योग्य समजल नाही..शेवटी मीच म्हणालो , " मी काही मदत करु शकतो का तुम्हाला ? "

ती गाडीच्या बाजूला झाली आणि मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो ..सुरुवातीला माझेही प्रयत्न कामी आले नाही वाटलं आता तिच्यासमोर हसू होईल म्हणून पुन्हा अधिक प्रयत्न करू लागलो ..कितीतरी प्रयत्न केल्यावर गाडी सुरू झाली आणि ती धन्यवाद म्हणून आपल्या घरी गेली ..आजचा दिवस माझ्या आयुष्यातील फार सुंदर दिवस होता ..त्यामुळे घरी गेल्यावरही तो आनंद चेहऱ्यावर तसाच जाणवत होता ..आज कितीतरी दिवसांनी समाधानाने झोपी गेलो होतो ..
दिवस जाऊ लागले ..प्रॅक्टिकल एक्साम्स , वायवा जवळ येऊ लागले त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास सुरू करण गरजेचं होतं म्हणून आज सकाळी लवकरच येऊन लायब्ररीला गेलो ..सकाळचा वेळ असल्याने तिथे फार कुणी नव्हतं ..एका कोपऱ्यात खुर्ची पकडून अभ्यास करू लागलो ..काही क्षणातच पुस्तकात रमलो ..तेवढ्यात ती आली आणि म्हणाली , " मी बसु शकते का इथे ? "

मी मान डोलावताच ती बाजूला बसली ..

" तू रोजच अभ्यास करत असतोस का ? " , ती म्हणाली ...

" हो अस म्हणू शकतेस ..का ? " , उत्तर देत बोलू लागलो..

" तू नेहमीच दिसतो ना अभ्यास करत म्हणून म्हटलं ...असो ..मला पण करशील का थोडी फार मदत ? ..बघ हा झेपत असेल तर " , भीत - भीतच तिने विचारलं ..

मी संधी शोधून म्हणालो , " मदत करायला आधी ओळखी तर व्हायला हवी ? "

आता तिला माझ्या शब्दांचा रोख कळाला आणि तिला कळून चुकलं की आपण याला आपलं नावच नाही सांगितलं ..

" हाय ..माझं नाव मानसी " , स्वताची ओळख करून देत म्हणाली ..

" हॅलो ..मी अभिनवं आणि तुला जेव्हा वाटलं तेव्हा काहीपण विचारू शकतेस " , मी म्हणालो

ती थोडी खुश झाली ..आता थोडी गर्दीही वाढू लागली होती त्यामुळे दोघाणीही पुस्तकात लक्ष द्यायला सुरवात केली ..थोड्या वेळाने कलासेसचा वेळ झाला आणि आम्ही दोघेही तिथून निघालो ...

तिला इंप्रेस करण्याचा नादात बरेच दिवस मी शाश्वत आणि विकासशी बोलू शकलो नव्हतो त्यामुळे आज दुपारी कॅन्टीनला भेटल्यावर थोडे भडकले ..माझ्याकडे त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसल्याने मी गप्पच होतो ..तेवढ्यात सोनाली समोर आली ..आताही ते मला बऱ्याच शिव्या घालत होते तेव्हा तीच म्हणाली , " आता आपला अभि प्रेमात पडलाय मग मित्र कसे खास असतील ? " ..तिच्या या शब्दांनी ऍटम बॉम्ब पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली ..एक तर मी त्या दोघांनाही काहीच सांगितली नव्हत त्यातही ही गोष्ट तिने सांगितल्यामुळे दोघेही नाराज होण पक्क होत .

" हीच का मैत्री ? ..जी गोष्ट तू सांगायला हवी होती तीच गोष्ट दुसर्याकडून ऐकायला मिळत आहे " , शाश्वत रागाने बोलत होता ..

" पोरगी भेटली तर आम्हाला विसरलास होय रे !! ", इकडे विकास रागाने बोलत होता ..

मला काय करू काहिच सुचत नव्हतं ..सर्वात आधी मी सर्वांसाठी चहा बोलवला ..

" बसा दोघेही सांगतो सर्व ..एक संधी तर द्या बोलायची " , मी स्वताची बाजू मांडत बोलू लागलो ..

दोघेही खाली बसले पण त्यांचा राग काहीसां शांत झाला नव्हता ..

" जिथे मला स्वतःलाच नव्हतं माहीत की मला काय झालं तिथे तुम्हाला कसं सांगणार भावांनो ..हो तिला पाहिलं तेव्हापासून आवडायला लागली हे नक्कीच खर आहे पण आज कित्येक दिवसानी मला तीच नाव माहिती झालं शिवाय तुमच्या मदतीविना मला ती पटणार आहे होय ..आता तुम्ही मदत करणार नसाल तर ..." एकाच श्वासात सर्व काही बोलून गेलो ..

" तू फक्त बोट ठेव ..आणि ती झालीच समज तुझी " , विकास म्हणाला आणि शाश्वतनेही त्याला सहमती दर्शवली

त्यांच्या अशा बोलण्यान माझं थोडं टेंशन कमी झालं कारण ते रुसले की मग मनवायला मात्र नाकी नऊ यायचे ..त्यामुळे दोघेही शांत झाल्याने आता माझ्या जिवंत जीव आला ... " पण भावा आम्हाला आमची वहिनी तर दाखव " , शाश्वत म्हणाला ...

मी इकडे - तिकडे पाहिलं पण ती कुठेच नव्हती ..एव्हाना आमचा चहा घेऊन झाला होता आणि आम्ही कलासकडे निघालो ..आम्ही निघावं आणि ती समोरून जावी अशी ती वेळ ..तिला पाहताच तिच्याही नकळत मी त्यांना तिला दाखवलं आणि ते पाहतच राहिले ...

" चॉइस भारी आहे राव , लई आवडली वहिनी आपल्याला म्हणत दोघेही माझी खेचू लागले त्यात आता सोनालीही जॉईन झाली .."
आता प्रत्येक दिवस माझे सोबती माझी गंमत करायचे आणि मी त्याही क्षणांना आनंद बनवून जगून घ्यायचो उलट त्यांचं चिडवनही मला हवंहवंसं वाटू लागलं ...आयुष्यात पहिलं प्रेम खूप खास असत अस म्हणतात आता त्याचा प्रत्ययही मला येऊ लागला ..जिथे जायचो फक्त तिचाच विचार यायचा ..आणि महत्त्वाचं म्हणजे कलासबाहेर निघालं की तिच्याशी एकदा तरी नजरानजर नक्कीच व्हायची ..कधीकधी ती मैत्रिणींसोबत बाहेर बोलत बसलेली असायची आणि मी तिला लपून - छपून पाहत बसायचो ..खूप गमतीदार क्षण होते ते ..ज्या मुलाने कधी पुस्तकावर नजर फिरवून पाहिली नव्हती आज त्याच मनच कुणाच तरी झालं होतं आणि त्याच्या नजरेत फक्त तीच होती ..पहिल प्रेम नक्की काय असत हे आता जाणवायला लागलं होतं..
लायब्ररीमधून पुस्तक काढायला आणायला जावं म्हणून मी लायब्ररीकडे जात होतो तेवढ्यात मागून एक आवाज आला ..ती मानसीची मैत्रीण होती .." हे अभि तू मागे मानसीला म्हणाला होता न काहीही समस्या असली तर विचारू शकता ? " , नेहा म्हणाली ...

मी उत्तरलो , " हो म्हणालो होतो ...मग ? "

" एक तर पेपर जवळ येत आहेत आणि त्यात काही गोष्टी आताही समजण्यापालिकडे आहेत सो प्लिज थोडी हेल्प कर ना " , नेहा विनंती करत बोलू लागली ..

" अग मला मदत करायला आवडेल पण इथे लायब्ररीत तेवढं सांगणं शक्य होणार नाही ..सो एखादी दुसरी जागा बघावी लागेल " , मी म्हणालो ..

ती विचार करतच होती की मी म्हणालो , " तुम्हाला काही समस्या नसेल तर रविवारला माझ्या घरी येऊ शकता ..अभ्यास पण करता येईल शिवाय कुणाचा त्रास पण होणार नाही ."

तिने काही क्षण विचार केला आणि होकार भरला ...मी तिला घराचा पत्ता सांगितला आणि लायब्ररीकडे निघालो ..आज वार होता गुरुवार त्यामुळे पुन्हा दोन दिवस वाट पहावी लागणार होती ..मानसी आपल्या घरी येईल या आनंदानेच मी वेडावलो होतो ..आणि रविवारची वाट पाहू लागलो ..
शेवटी रविवार आला ..मी सकाळीच उठून माझी रूम छान आवरून घेतली होती ..तशी माझी रूम आवरलेलीच असायची पण आज मला सर्व काही नीट असायला हवं होतं ..कित्येकवेळा एकच गोष्ट मी वारंवार पाहत होतो ..सकाळी लवकरच उठून अंघोळ करून घेतली होती ..आईलाही त्या दिवसभर सोबत राहणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे आई त्यांच्या जेवणाची तयारी करू लागली होती ..सकाळी घळयाळीत दहाचा टोला पडला आणि मी धावतच दार उघडायला गेलो ..दार उघडलं तर समोर नेहा होती ..मी तिला आतमध्ये बोलावलं तिच्या मागेच मानसी उभी होती ..आज ती पांढरा सलवार लावून आली होती ..मी पहिल्यांदा तिला पाहिलं होतं त्यानंतर आज पहिल्यांदाच सिविल ड्रेसवर पाहत होतो .आज ती खूपच भारी दिसत होती त्यामुळे काही क्षण फक्त तिच्याकडे पाहण्यातच गेले .नंतर मला जाणवलं की मी नेमकं दारावरच उभा होतो आणि ती आत येण्यासाठी वाट शोधत होती ..शेवटी मी तिला वाट मोकळी करून दिली आणि ती आतमध्ये आली ..आल्या - आलीच मी त्यांना आईची ओळख करुन दिली ..आईने चहा नाशता बनवायला घेतला ..काही वेळात आम्ही नाश्ता करून करून माझ्या बेडरूमला गेलो ..रूममध्ये प्रवेश करताच दोघ्याही फक्त रूमकडे पाहतच राहिल्या ..संपूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती ..रूमच्या एका कोपर्याला एक आलमारी होती त्यात जवळपास 50 - 60 स्पर्धांचे बक्षीस होते ..रूममध्ये फ्रेश फुलांनी गुलाबदानी सजवली होती ..त्यामुळे सर्व काही प्रसन्न वाटत होतं ..

शेवटी नेहाणेच बोलायला सुरुवात केली , " बापरे !! एवढे पुस्तक ..कुणी वाचत का पण याना ?"

" अग जवळपास माझे सर्वच पुस्तक वाचून झाले आहेत हे ऐकून तर त्याना शॉकच बसला होता ..त्या दोघीही कितीतरी वेळ फक्त माझ्या रूमकडेच पाहत होत्या ..शेवटी मीच पुढाकार घेऊन अभ्यास करण्यास सुरुवात केली .."

नेहा ही मानसीच्या कलासची सी .आर. होती त्यामुळे ती माझ्याकडून सर्वच कन्सेप्ट क्लिअर करून घेत होती ..तर मानसीदेखील तिला अडचण गेली की प्रश्न विचारत होती ..नेहा अगदी माझ्यासारखीच होती पुस्तकप्रेमी त्यामुळे तिने मला पार भांभावून सोडलं होत ..मी एका प्रश्नःच उत्तर दिलं की तिचा पुन्हा प्रश्न तयार असायचा ..तर मानसी हे सर्व पाहून हसत होती ..थोडी हसी मजाक करता - करता सुमारे तीन तास गेले ..आता अभ्यासाचा देखील कंटाळा आला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूक देखील लागली होती ..आई स्वयंपाक करत होती ..बहुतेक मानसीला आईने एकटच काम करणं आवडलं नव्हतं त्यामुळे ती देखील आईला मदत करण्यास जाऊ लागली ..नेहाही तिकडे जाणार तेवढ्यात मी तिला थांबवलं आणि आम्ही गप्पा मारण्यात व्यस्त झालो ..

" तुमचा सर्वांचा फोटो मस्त दिसत आहे ..बेस्टी आहात न तुम्ही " , नेहाने भिंतीकडे लावलेल्या फोटोला पाहत विचारले ..

" हो ग जीव आहोत एकमेकांचा " , मी चेहऱ्यावर हसू आणत म्हणालो ..

" केव्हाचा आहे फोटो हा ? " , तिने पुन्हा एकदा विचारलं ..

" शाश्वतच्या वाढदिवसाला काढला होता हा फोटो ..खूप मजा केली आम्ही त्यादिवशी आणि हाच फोटो आमच्या सर्वांच्या घरी आहे " , मी म्हणालो ..

नेहा आमच्या सर्वांबद्दल फार फार बोलत होती आणि मी तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होतो ..तिच्या प्रत्येक शब्दात शाश्वत हे नाव नक्कीच यायचं .तिने त्याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी केल्या होत्या पण मी तिला त्याच्या खऱ्या स्वभावाबद्दल सांगितलं तेव्हा एक वेगळीच चमक तिच्या चेहऱ्यावर मला जाणवू लागली ...
इकडे आई आणि मानसी दोघेही स्वयंपाक बनवीत असताना गप्पा मारत होत्या ...

" काकू , हे सर्व बक्षीस अभिनवचे आहेत " , मानसीचा प्रश्न

" हो ग फार हुशार आहे तो अगदी लहान होता तेव्हापासूनच ..अशी कुठलीच स्पर्धा नाही ज्यात त्याने बक्षीस जिंकले नाहीत " , आईच उत्तर

" आणि त्याच्या रुममध्ये जेव्हढे पुस्तक ठेवले आहेत ते खरच त्याने वाचले आहेत " , मानसीचा प्रतिप्रश्न ..

" म्हणजे काय ..सर्वच वाचले ..आमचा अभि आहेच हुशार आणि मी खूप लकी आहे की मला त्यांच्यासारखा मुलगा मिळाला " , आई म्हणाली ..

मानसी माझ्याबद्दल आईला विचारत होती आणि आई तिला सर्व काही सांगत होती ..शेवटी स्वयंपाक झाला आणि आम्ही जेवायला बसलो ..आईच्या हाताला फार सुंदर चव होती त्यामुळे जेवण सुरू असताना त्या तिची स्तुती करताना थकत नव्हत्या ..शेवटी जेवण झाल आणि त्या पुन्हा आपल्या घरी निघाल्या ..खर तर मला त्यांनी जायलाच नको होतं पण पर्याय नव्हता ..पण जाताना तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता ..आईनेही नकळत माझी भरभरून स्तुती केली होती शिवाय कुणालाच माहीत नसलेल्या माझ्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यामुळे तिचा माझ्याबद्दलचा विश्वास वाढला असावा असं तिच्या चेहऱ्यावरन वाटू लागलं ..शेवटी दोघीही हॅन्ड शेक करून घरी निघाल्या ..त्याक्षणी तिच्या चेहऱ्यावरच गोड हसू बघून मला समाधान मिळालं होतं ..मैत्री तर नक्कीच झाली होती ..फक्त तिला मनातल सांगायला आणखी काही वेळ स्वताला द्यायचा होता ..मलाही तिला लवकरात लवकर माझ्या मनातील सांगायचं होत आणि त्यासाठी मी योग्य संधीची वाट पाहू लागलो ..कारण फक्त मला ती आवडून चालणार नव्हती तर तिलाही मी आवडायला हवं होतं आणि आजच्या तिच्या वागण्यांने हे लवकरच घडणार याची शाश्वती वाटू लागली..

क्रमशः ..
Share

NEW REALESED