Sparsh - 7 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 7

आयुष्यात गेलेला प्रत्येक दिवस विसरायचा असतो मग तो वाईट असो की चांगला कारण प्रत्येक नवीन सकाळ आयुष्यात नवीन रंग घेऊन येत असते ..कालचा दिवस खूप मस्त गेला ..सर्वांनी धमाल केली होती ..त्यामुळे तोच रंग घेऊन कॉलेजला गेलो आणि समोरच नेहा उभी होती .मला पाहताच माझ्याकडे येत म्हणाली , " अभि काय मस्त स्केच काढतो यार तू ..प्लिज मला पण काढून दे ना माझं स्केच "..

मी काहीही समोर बोलणार तेवढ्यात चेहऱ्यावरचा स्कार्फ काढत मानसी येऊ लागली पण ती आज एकटीच नव्हती ..काही अंतरावरून तो तिच्यासोबत बोलत येत होता ..मी मानसीला याआधी कुणाशी तेवढं बोलताना , हसताना पाहिलंच नव्हतं त्यामुळे पहिल्यांदाच इर्षेचा भाव प्रगट होऊ लागला ..ती अगदीच जवळ आली आणि मी तिच्याकडे लक्ष नसल्याचं भासवू लागलो .. " काय गप्पा चालल्या आहेत तुमच्यात " , मानसी म्हणाली ..

नेहाला राहवलं नाही आणि ती माझ्याआधीच ओरडली , " मी ना !! अभिकडे स्केचच अपॉइंटमेंट फिक्स करत होते ..सांग ना अभि स्केच काढशील माझं .."

" हो का नाही .." , मी म्हणालो ..

" अभि मला पण स्केच काढायचं आहे ..पण जेव्हा तू फ्री असशील तेव्हा सांग " , मानसी लगेच म्हणाली ..

मानसीला मी पहिल्याच क्षणी जेव्हा पाहिलं होतं तेव्हाच तीच चित्र रेखाटायला सुरुवात केली ..आणि अगदी काहीच क्षणात ती हुबेहूब माझ्यासमोर आली ..समोर जरी बोलता येत नसलं तरी मी तिच्या चित्राकडे पाहत नेहमीच गप्पा मारत होतो...मला तिची जेव्हा फार ओढ लागते तेव्हा त्याच चित्राकडे कितीतरी वेळ मी बघत असतो आणि ते चित्र मी सर्वांपासून कस लपवून ठेवलं हे माझं मलाच माहिती ..

" हे कुठे हरवला आहेस ..बाय द वे मिट माय फ्रेंड , माय जाण राहुल ..आम्ही सोबतच ऍडमिशन केलं होतं पण त्याच्या घरी काही प्रॉब्लेम असल्यामुळे राहुलने सत्राच्या शेवटी कॉलेज जॉइन केलं होतं ..आता राहुल रेग्युलर कॉलेज करणार आहे .." , मानसी म्हणाली ..

आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली आणि राहुल तिला कलासला घेऊन गेला ..नेहाही त्याच्या मागेचं गेली ..
मी काही वेळात आपल्या कलासला पोहोचलो ..आज बहुतेक लवकरच आलो होतो त्यामुळे कलासला कुणीच दिसत नव्हतं ..खिडकीजवळ एकटाच बसून होतो आणि गार वारा मनाला स्पर्शून गेला ..मानसीसोबत असताना ती अशी कधीच हसून , खेळून बोलली नव्हती शिवाय त्याला जाण म्हणाली म्हणून फार राग आला होता आणि एक विचार येऊन गेला की खरच त्यांच्यात काही विशेष नात तर नसेल ना ...आणि असेल तर ?? ..नाही नाही ..नसेलच ..आता मेंदूचा फार गोंधळ उडाला होता ..असच डोकं धरून बसलो होतो ..." कुठे हरवला आहेस भावा " , विकास म्हणाला ..

मी थोडा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागलो .." काहीच नाही यार ..थोडं डोकं खराब झालं आहे ..चल एक चहा मारून येऊ "
तो हो म्हणणार त्याआधीच मी त्याला कॅन्टीनला घेऊन गेलो आणि सकाळी घडलेल त्याला सर्व सांगितलं ..आता तो माझ्याकडे पाहून हसू लागला .." इकडे मी टेंशनमध्ये आलोय आणि तुला हसू येतंय " , त्याच्याकडे नजर फिरवत म्हणालो ...

" हसू नको तर काय भावा ..साल्या पोरीसारखं काय ईर्षा करतो आहेस .लहानपणापासूनचा मित्र म्हणजे ती तस तर म्हणणारच ..आपण नाही म्हणत का सोनालीला " ..विकास म्हणाला ..

हे ऐकून आम्ही दोघेही खळखळून हसू लागलो ..ईर्षा प्रेमाच एक सुंदर नाव ..आपण समोरच्या व्यक्तींसाठी ईर्षा करत असू म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीला गमावण्याची भीती वाटत असते ..संपूर्ण जगाला मूर्खात काढणारे आपण प्रेमात पडल्यावर तसेच वागतो हे आता जाणवू लागलं आणि स्वतःवरच हसू लागलो ..आता मूड मस्त झाला होता ..त्यामुळे पुन्हा एकदा कलासला गेलो ..
त्या दिवसानंतर पुन्हा एकदा प्रवास सुरु झाला नवीन कथेचा ..त्यात कलास होते , फिरणं होत आणि होती ती मज्जामस्ती ..पण एक या सर्वात आमच्या ग्रुपमध्ये एक मेंबर आणखी वाढला ...तो म्हणजे राहुल ..मानसी त्याच्याशी सदैव चिपकुन असायची .घरून येणे , दिवसभर सोबत राहणे आणि घरी जाणे सर्व काही त्याचंच होत ..ते सर्व आमच्यासोबत असले तरीही फक्त त्यांच्यातच गप्पा चालायच्या ..आता तर ते आले की क्लासचा बहाणा करून कँटीनला राहणं टाळू लागलो ..त्यांच्याबद्दलचा राग नसानसात भिनला जात होता तरीही चेहऱ्यावर गोड हसू आणून मी त्यांना कधीकधी भेटत होतो ..असेच काही दिवस गेले ..मी माझ्या अभ्यासात जास्त रमत गेलो ..मला कॅन्टीनला मनमोकळं बोलता आलं नाही की विकासला घरीच बोलावून घेत होतो ..मनातलं सर्व शेअर केल की फार समाधान मिळायचं आणि पुन्हा तिच्याकडे आकर्षिला जायचो ..
असेच काही दिवस गेले ..फेब्रुवारीच्या 28 ला स्नेहसंमेलन होणार होत ..अभियांत्रिकीमध्ये भरपूर शाखा असल्याने सर्व आपल्या परीने जिंकण्यासाठी मेहनत घेत असतात ..आमच्याही शाखेत तारीख कळाल्यापासून सर्वांची जय्यत तयारी सुरू झाली ..जुनीअर्सचे पहिलंच वर्ष असल्याने त्यांना त्यात फारच रस असल्याचं दिसून येत होतं ..नेहा आणि मानसीच्या ग्रुपने ग्रुप डान्स बसविला होता तर शाश्वत , विकास हे आधीच नौटंकीबाज असल्याने त्यांनी ड्रामामध्ये सहभाग घेतला होता ..त्यात त्यांनी सोनालीलादेखील सहभागी करून घेतलं होतं ..मला त्यांनी खूप कन्व्हेंस करण्याचा प्रयत्न केला होता पण तरीही मी कुठल्याही स्पर्धेत सहभागी झालो नव्हतो ..इकडे सर्वांची जय्यत तयारी सुरू होती आणि मी एकटाच लायब्ररीमध्ये बसून लायब्ररीची देखभाल करीत होतो कारण माझ्या व्यतिरिक्त तिथे कुणीच नसायचं ₹₹खर तर मागील काही दिवसात मानसी माझ्याशी साधे दोन शब्दही बोलली नव्हती आणि राहुलसोबत सतत बोलत असल्याने माझा मूड गेला होता ..त्यामुळे राहुलबद्दल राग आणखीनच वाढत गेला ..
नेहा डान्सची प्रॅक्टिस करीत असताना तिच्या सेलवर एक मॅसेज झळकला .." नेहा प्लिज मला बागेत भेट आता लगेच .. " ..शाश्वतने तिला मॅसेज केला ..ती कुठला तरी बहाणा करून त्याला भेटायला गेली ..ती तिथे पोहोचली पण तिला कुणीच दिसलं नाही ..ती त्याला कॉल करणार तेवढ्यात मागून एक हात तिच्या कमरेवर आला आणि त्या हाताने तिला त्याच्याकडे खेचुन घेतलं आणि ती सरळ त्याच्या मिठीत जाऊन पडली ..तिने डोळे वर करून पाहिलं तर तो शाश्वतचा होता .." शहाण्या किती घाबरले मी , अस करतात का कुणी " , नेहा म्हणाली ..

" तुला न छेडायला मला खूप गंमत वाटते म्हणून करतो ग " , त्याच उत्तर ..

" बर ते सोड ..मला का बोलाविल आहेस ते लवकर सांग ..मला प्रॅक्टिस करायचं आहे " , ती रागावून म्हणाली ..

" उफ ये अदाये ..काही नाही मला पप्पी हवी आहे तुझ्याकडून " , तो रोमँटिक होत म्हणाला ..

" काहीही इथे कस शक्य आहे ..एवढी हिम्मत नाही हा माझ्यात " , ती दूर जात म्हणाली ..
हे ऐकताच तो गाल फुगूवून बसला ..ती त्याला मनविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होती पण तो काहीच बोलायला तयार नव्हता ..त्याची तशी अवस्था तिला पाहवत नव्हती आणि कुणी पाहत नसताना तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि ती त्याच्यापासून दूर पळू लागली ..तोही तिला मिठीत घेण्यासाठी तिच्या मागे धावू लागला ..शेवटी ती त्याला सापडली ..त्याने तिला घट्ट मिठीत घेतले आणि दोघेही थोडा वेळ तिथेच बसून होते .." बर ऐक ना शाश्वत एक प्रॉब्लेम आहे यार थोडी मदत कर ना " , नेहा म्हणाली ..

" मी असताना प्रॉब्लेम , बोल लगेच सोडवतो .." , तावातावात तो बोलून गेला..

" खरच !!! आम्हाला डान्स करण्यासाठी एक पार्टनर कमी पडतोय ..प्लिज तू जॉइन हो न मला " , ती म्हणाली ..

आता काही खर नव्हतं कारण शाश्वतने कधीच डान्स केला नव्हता ..तो काहीच बोलायला तयार नाही हे पाहून तीच म्हणाली , " प्लिज ना !! आम्हाला पार्टनर मिळाला नाही तर सर्व वाया जाईल ..प्लिज प्लिज!! "

" अग बाई मला डान्स नाही येत पण एक व्यक्ती आहे ज्याला खूप छान येतो डान्स ..तो करू शकतो तुमची मदत " , शाश्वत म्हणाला ..

ती उत्सुकतेने विचारु लागली , " कोण रे ? "

" आपला अभि ..उत्तम डान्सर आहे तो ..खूप बक्षीस मिळाले आहेत त्याला डान्समध्ये " , शाश्वतच उत्तर

" आई शपथ !! मला वाटलं त्याला फक्त अभ्यासच येतो ..विश्वासच बसत नाहीये .." , ती खेचत म्हणाली ..

तो रागावत म्हणाला , " ए शहाणे माझ्या मित्राची गंमत करायची नाही हा !! "

" बर सॉरी !! ..चल मग त्याला विचारू त्याबद्दल .." , ती म्हणाली ..

तो आता तिच्याकडे पाहून हसू लागला ..आम्हीच खूप प्रयत्न केले पण ते शक्य नाही ..तू देखील गेली तरी तो तयार होणार नाही पण एक व्यक्ती आहे जी त्याला नक्कीच तयार करेल ..ती म्हणजे मानसी ..

ती मधातच म्हणाली , " तीच का ? "

" समजदार को इशारा काफी है " , तो हसू लागला ..

" म्हणजे त्याला ती आवडते ? ..माय गॉड ..मला कस नाही कळलं मग ..थांब माझी खेचत असतो नंतर घेतेच मी त्याची मज्जा ..बघच तू .."

बर असो चल मला निघावं लागेल आता ..आणि लगेच एक गालावर पाप्पी देत ती पळून गेली ...तो आताही गालावर हात लावत बसून होता ..

ईश्क की बारीकियो का
बडा अजीब फसाना है
जमाणे सो छुपाकर
हर किसीं को प्यार निभाना है ..

नेहाला उशिरा येताना पाहून मानसी नेहावर रागावत म्हणाली , " इकडे पार्टनर भेटत नाहींये तुला त्याच काही नाही आणि तू बस आपली प्रेम करत ..जर पार्टनर भेटला नाही तर मी काय करेल सांगता येत नाही .."

" चिल माय जाण ..मी तेच सांगतेय तुला पार्टनर मिळाला आहे पण एक प्रॉब्लेम आहे ? " , ती नाराज होत म्हणाली ..

" कोण आहे तो आणि आता कसला प्रॉब्लेम ? " , तिच डोकं आणखीनच ठणकू लागलं ..

" आपला अभि ..पण त्याच्याशी तुलाच बोलावं लागेल ..मला खूप भीती वाटते त्याची " , नेहा तिच्याकडे पाहत म्हणाली ..

" तू माझी गंमत करत आहेस का ?? ..अभ्यासाव्यतिरिक्त त्याला काही येत का ?? ..तू नक्कीच खरी माहिती काढली आहेस ना ..नाही तर बघ सर्वच विस्कटेल ? " , मानसी हसत - हसत म्हणत होती ..

" हो ग बाई हेच मलाही वाटलं होतं पण शाश्वत म्हणाला तस ..त्याने पाहिला म्हणे त्याचा डान्स .." , नेहा म्हणाली ..

कॉल येताच मी तिकडे गेलो .." नेहा कशाला बोलावलं ?? ..काही काम होत का ?? " , मी जात- जाताच तिला प्रश्न विचारू लागलो ..

" तुला डान्स करता येतो म्हणे ..आम्हाला डान्ससाठी एक पार्टनर लागतोय तर प्लिज जॉइन हो न आम्हाला " , नेहा विनंती करत म्हणाली ..

माझा मूड आधीच गेला होता शिवाय आताही मानसी बोलली नव्हती त्यामुळे तिला त्याचक्षणी नकार कळवला ..नेहा हे ऐकून नाराज झाली पण मानसिचे शब्द आले , " जाऊ दे ग नेहा त्याला डान्स करता येत असेल तर करेल ना ? ..आपण आपलं बघून घेऊ ..

तिचे हे शब्द सरळ काळजाला लागले .आता इज्जतीचा प्रश्न होता ..त्यामुळे पाठीवर असलेली बॅग काढली ..सरळ नेहाचा हात पकडून घेऊन स्टेजवर चढलो ..चेहऱ्यावरचा राग पाहून अमितने लगेच गाणं प्ले केलं ..गाणं सुरू होताच सर्व काही बदललं ..नेहा फक्त माझ्याकडे पाहत होती आणि मी वेगवेगळ्या धूनवर डान्स करू लागलो ..सतत तीन मिनिटे डांस सुरू होता आणि डांस संपला तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यानी गजबजला ..मानसीचे हात कौतुकासाठी वर झाले होते आणि म्हणाली , " मी पाहिले होते तुझे प्राइज डान्सचे फक्त तुला तयार करायच होत म्हणून बोलले ..बर सॉरी ..पण प्लिज हेल्प कर ना यार " ..

तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बघून शेवटी मी डान्स करायला तयार झालो...

" बर पण माझा डान्स पार्टनर कोण आहे ? " , मी मानसीला विचारलं ..

थोड्या वळापूर्वीच नेहाला माझं सत्य कळाल असल्याने ती लगेच म्हणाली , " तुला फक्त एकच व्यक्ती मॅच करू शकते ती म्हणजे मानसी . "

मानसी समोर काही बोलणार तेवढ्यात सर्वच निघू लागले आणि तिला शेवटी स्वीकारावं लागलं ..
मुळात मी काही वर्षपूर्वी डान्स क्लास जॉइन केले होते त्यामुळे मला बऱ्यापैकी डान्स जमायचा ..स्केच आणि डान्स हे दोन छंद मी नेहमीच जपत आलो होतो ..त्यामुळे मला त्याबद्दल काहीच काळजी नव्हती ..सकाळी सर्व क्लास करायचो आणि दुपारी 3 ते 5 दररोज प्रॅक्टिस ..कोरिओग्राफरदेखील मानसीच होती ...सर्वांनी डान्स छान केला की कौतुक करायला विसरायची नाही आणि काही चुकलं की मग सर्वांची खैर नसायची ..मी तिला नेहमीच शांत पाहत आलो होतो त्यामुळे या चिडण्यात देखील एक वेगळीच मज्जा होती ..मी तिचा तोही स्वभाव फार एन्जॉय करत होतो ..हळूहळू प्रॅक्टिस मस्त चालली होती ..कुणाला समजावून तर कुणावर ओरडून तिने परफॉर्मन्स तयार करून घेतला ..आता ऑडिशनसाठी फक्त 4 दिवस बाकी होते ..शेवटची रिहर्सल करून आम्ही स्टेजवरून खाली उतरलो ..सर्व आपापल्या बॅग भरून निघू लागले ..आता हॉलमध्ये फक्त आम्ही दोघेच होतो ...मानसी आणि मी ..मानसी माझ्याकडे पाहायची पण मी तिच्याकडे पाहिलं की पुन्हा एकदा लक्ष नसल्याच भासवू लागली ..मला ते सर्व समजत होत तरीही शांत होतो पण तिला माझ्याशी काहीतरी बोलायच असल्याचं जाणवत होतं ..शेवटी बॅग भरून मी देखील जाऊ लागलो ..मी काही पावले टाकलीच होती की तिचा आवाज आला , " अभि प्लिज काही वेळ थांब ना ..मला तुझ्याकडे थोडं काम आहे ..प्लिज ."

मुळात तिने पहिल्यांदा मला विनंती केली होती म्हणून एक शब्दही न काढता मी तिच्यासमोर येऊन उभा राहिलो .." ह बोल न काय झालं ? "

" अभि मला कपल डान्स करायचा होता यार पण वेळेवर पार्टनरच मिळाला नाही " , ती नाराज होऊन बोलत होती ..

" हो पण मी यात तुझी कशी मदत करू शकतो ? " , तिला माझा प्रतिप्रश्न ..

" अभि तू करशील माझ्यासोबत डान्स ? " , ती माझ्याकडे पाहत म्हणाली ..

" व्हॉट ?? ..कस शक्य आहे फक्त काहीच दिवस आहेत तेव्हा सर्व कस ऍडजस्ट होईल ? " , मी गोंधळून तिला प्रश्न विचारत होतो ..

" तू फक्त हो म्हण बाकी मी सर्व बघते ..प्लिज !! " , ती म्हणाली ..

मुळात आयुष्यात पहिल्यांदा तिने काहीतरी मागितलं होत त्यामुळे मी तिला होकार कळवला आणि तिच्या चेहऱ्यावर हसूच दर्शन झालं ..

" अभि पण एक प्रॉब्लेम आहे यार आपण इथे प्रॅक्टिस नको करूया तुझ्या घरी केली तर चालेल का ? " , ती फार आशेने मला विचारत होती ..

मीही थोडी नौटंकी करावी म्हणून विचार करण्याच नाटक करू लागलो , " अफकोर्स डिअर चालेल कॉलेजला दोन क्लास करू मग जाउया प्रॅक्टिसला .."

हे ऐकून तिचा चेहरा फारच खुलला होता ..तोच आनंद घेऊन आम्ही घर गाठलं ..

दुसरा दिवस ..मानसी घरी येणार असल्याने सर्व काही आवरून घेतलं ..आईलाही ती येण्याचं सांगितलं आणि ती फारच खुश झाली ..त्यामुळे सकाळी मस्त मूड घेऊन कॉलेजला पोहोचलो ..आता काही दिवस अभ्यास करता येणार नसल्याने सकाळी - सकाळीच लायब्ररीत पोहोचलो ..आज क्लास करण्यातदेखील मन लागत नव्हत ..सतत लक्ष घडीकडे जात होते आणि निराश होऊन पुन्हा वाट पाहू लागलो ..आज वेळदेखील माझा अंत पाहू लागली होती .दुसरा क्लास संपण्याची बेल वाजली आणि मी धावत - पळत बाहेर निघालो ..मला पाहून सर्व शॉक होते ..मी धावत - पळतच मानसीच्या क्लाससमोर पोहोचलो ..तिचीही काहीशी अशीच स्थिती होती ..तीही दम टाकत माझ्याजवळ पोहोचली ..आम्ही एकही शब्द न बोलता समोर पावले टाकू लागलो ..मुळात दम लागला असल्याने बोलण्याची ताकदच उरली नव्हती ..काही वेळातच आम्ही माझ्या घरी पोहोचलो ..
घरी पोहोचलो आणि मी कॉलेजचे कपडे चेंज करून घेतले ..तिला डान्स करण्याची फार घाई झाली होती त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तिने डान्स प्रॅक्टिसला सुरुवात केली पण का कळेना आज सुरुवातीपासूनच माझे स्टेप्स मॅच होत नव्हते आणि ती आणखीच जास्त चिडत होती ..प्रत्येक वेळेला असच व्हायचं आणि ती पुन्हा आणखी रागवायची ..दोन तास झाले होते तरीही स्थिती तशीच होती ..तेवढयात आई चहा घेऊन आली ..मी वॉशरूममध्ये गेलो आणि चेहऱ्यावर पाण्याचे थबके मारले ..आरशात पाहून स्वतःलाच विचारू लागलो ..अभि अस का होतंय तुला ?? ..तू तिला मॅच का करू शकत नाही आहेस ?..आणि लक्षात आलं त्याच कारण होती ती ..आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला स्पर्श करण तर सोडाच तिच्याशी साधं बोलायला देखील शब्द अडखळू लागतात मग तर तिला स्पर्श करताना असच काहीतरी होणार होत ..मी बाहेर आलो आणि ती वॉशरूमला गेली ..काही वेळात ती बाहेर आली ..दोघाणीही चहा घेतला .तिच्या डोळ्यात असलेला राग आता शांत झाला होता आणि ती प्रेमाने समजावू लागली , " अभि तुला माहिती आहे असं का होतंय ..प्रेम ..म्हणजे तू माझ्या डोळ्यात ते शोध एकदा की दोघांचीही नजर भिडली की मग मात्र तुला काहीच समस्या जाणार नाही ..शाल वि स्टार्ट अगेन ? "

आम्ही पुन्हा एकदा डान्सला सुरुवात केली ..तिने स्वताच परवानगी दिली असल्याने सुरुवातीला असलेली ऑकवर्डनेस आता नाहीशी झाली आणि तिच्या डोळ्यात बघू लागलो ..डोळ्यात बघितलं आणि केव्हा तिचा झालो काहीच कळाल नाही ..तिने सांगितलेल्या सर्व स्टेप्स मॅच केल्या होत्या शिवाय तिला स्पर्श करतानाही एक वेगळीच नशा मला जाणवत होती ..डान्स संपला तेव्हा ती आनंदाने बोलून गेली , " एक्सलंट .मार्वलस !! आणि सरळ येऊन मिठीत पडली ..तिच ते अस वागणं माझ्यासाठी काय होत ते तिलाच कळाल नव्हतं ..

कैसे बया करू मै तुझसे
ये हाल - ए - दिलं
जब भी सोचता हु बात कर लू
तुम इक नयी पहेली बन जाती हो

तिच्या अशा वागण्याने मी अगदीच भारावून गेलो ..तरीही ते भाव तिला कळू दिले नाही ..तिने तीन ते चार वेळा माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली आणि ती घरी निघून गेली ..ऑडिशन पूर्वीपर्यंत आम्ही सतत प्रॅक्टिस करत होती ..ती काही चुकलं की स्वतःवरच नाराज व्हायची .आणि पुन्हा एकदा उठून प्रॅक्टिस करायला लागायची ...विचार देखील केला नव्हता पण या चार दिवसात खरच तिने आपला शब्द पूर्ण केला ..मी तर फारच खुश होतो कारण तिच्यासोबत राहून काही वेळ मला घालवायला मिळाला होता ..ऑडिशनसाठी आमचे दोन्ही डान्स निवडल्या गेले होते त्यामुळे आता वाट होती 28 फेब्रुवारीची ..


28 फेब्रुवारी ..


सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता त्यामुळे लवकरच उठून सर्व तयारी करून घेतली होती ..दोन्ही डान्ससाठी लागणारे ड्रेस घेऊन मी कॉलेजला पोहोचलो एव्हाना सर्वच तिथे दाखल झाले ..सुरवात गायन स्पर्धेने होणार होती त्यामुळे आम्हाला वेळ होता ..गाण्याची सुरुवात झाली आणि हॉलमधील संपूर्ण नजाराच बदलला ..सर्विकडे शिट्या वाजत होत्या आणि हॉल विविध आवाजाने बहरल्या गेला ..गीतांनी छान स्टेज सजवून घेतला ..आता वेळ होती ती नाटक स्पर्धेची ..त्यानंतर लगेच डान्सस्पर्धा असल्याने आम्ही तयार होण्यासाठी चेंजिंग रूमला पोहोचलो ..इकडे नाटक स्पर्धेने सर्वाना हसवून सोडलं होत ..आता वेळ होती ती डान्सची ..सर्वांनी स्टेज सजवून ठेवला होता ..आमचा ग्रुप डान्स पण उत्तम झाला होता ..काहीच वेळात आमचा कपल डान्स होणार होता म्हणून दोघेही तयार होऊन वाट पाहू लागलो ..खर तर नर्व्हसनेस आमच्या चेहऱ्यावर अगदीच जाणवत होती पण तरीही ऑल द बेस्ट देऊन आम्ही डान्ससाठी सज्ज झालो ..संगणक अभियांत्रिकी नाव जाहीर झालं आणि आमच्या शाखेने ओरडण्यास सुरुवात केली ..दोघेही स्टेजला नमन करत डांससाठी तयार झालो ..तिथे पोहोचलो ..सर्विकडे अंधार होता आम्ही आमच्या पोझीशन घेतल्या आणि गाणं प्ले झालं ..

तुमको पाया है तो जैसे खोया हु
कहना चाहु भी तो तुमसे क्या कहू
तुमको पाया है तो जैसे खोया हु
कहना चाहु भी तो तुमसे क्या कहू

किसी जबान मे वो लफज ही नही
की जिनमे तुम हो क्या तुम्हे मै बता सकू
मै अगर कहू तुमसा हसीन
कायनाथ मे नही है कही
की जिनमे तुम हो
क्या तुम्हे मै बता सकू

तिचा हात हात घेत सर्वांसमोर पहिल्यांदाच हा क्षण जगत होतो ..दोघेही एकमेकांत एवढे गुंतलो होतो की समोर आपल्याला कुणी पाहत असल्याचं भानच नव्हतं ..कधी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तर कधी तिच्या कमरेला पकडून स्वतःच्या मिठीत घेत होतो ..तर कधी तिचे केस माझ्या चेहऱ्यावर यायचे आणि पुन्हा एकदा गीताच्या शब्दात हरवला जायचो ..

शोखियो से डुबी ये अदाये
चेहरे से झलकी हुयी है
जुल्फ की घनी - घनी घटाये
शान से ढलकी हुयी है
लेहराता आंचल है जैसे बादल
बाहो मे भरी हो जैसे चांदणी
रूप की चांदणी..

मै अगर कहू तुमसा हसीन
कायनाथ मे नही है कही
की जिनमे तुम हो
क्या तुम्हे मै बता सकू

तुम हुये मेहेरबान
तो है ये दास्तान
हो ..तुम हुये मेहेरबान
अब तुम्हारा मेरा है एक कारवान
तुम जहा मै वहा

मै अगर कहू
हमसफर मेरी
अफसरा हो तुम या कोई परी
तारीफ ये है भी तो सच है कुछ भी नही

तुमको पाया है तो जैसे खोया हु
कहना चाहु भी तो तुमसे क्या कहू
किसीं जबान मे वो लफज नही
की जिनमे तुम हो क्या तुम्हे मै बता सकू ..

मै अगर कहू तुमसा हसीन
कायनाथ मे नही है कही
की जिनमे तुम हो
क्या तुम्हे मै बता सकू ..
सच है कुछ भी नही

गाणं संपलं तेव्हा ती माझ्या हातात होती आणि दोघांचेही डोळे एकमेकांवर होते ..संपूर्ण हॉल टाळ्यानी गजबजला आणि त्या आवाजाने आम्ही भानावर आलो ..परत येताच सर्वांनी स्तुतीसुमने उधळली .तिच्या चेहऱ्यावर डान्स उत्तम झाल्याने समाधान आलं होतं ..काही वेळात सर्व परफॉर्मन्स झाले होते आणि आता आम्ही वाट पाहू लागलो ..कारण जिंकन तीच स्वप्न होत तर तिला आनंदी पाहणं माझ स्वप्न ..
आता आमच्या दोघांचेही स्वप्न फक्त निकालावर अवलंबून होते

क्रमशः...
Share

NEW REALESED