Sparsh - 9 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 9

कॉलेज असा एक कट्टा जिथे प्रत्येक विद्यार्थी भारावून जातो ..काहींच्या स्वप्नांना पंखांची गरज नसते तर काहींना पंखच लाभत नाहीत ..काहींना इतके मित्र मिळतात की त्यांच्यासोबत असताना वेळ केव्हा जाते कळत नाही तर काही त्या सर्वांना बघूनच दिवस काढतात ..असाच आमचा ग्रुप ..गेले 3 वर्ष आम्ही भरपूर मज्जा केली ..त्याला काहीच सीमा नव्हती पण आता जबाबदारीची जाणीव होऊ लागली आणि सर्वच सिरीयस झाले ..याला अपवाद म्हणजे शाश्वत आणि विकास ..त्यांनी आयुष्याला कधीच सिरीयस घेतलं नव्हतं मुळात त्यांना गरज वाटली नव्हती पण अभियांत्रिकीच हे शेवटचं वर्ष सर्वाना एक नवीन धडा शिकविणार होत ज्याचा कुणीच विचार केला नव्हता ..क्षण भरपूर जगून घेतले होते तेव्हा आता वेळ होती स्पर्धेच्या जगात उतरायची ..म्हणतात ना दिवस चांगले असेल की संपायला वेळ लागत नाही आणि झालंही अगदी तसच ..कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच शेवटचं सत्र होत ..

मी मानसीला इम्प्रेस जरी करू शकलो होतो तरी तिच्या हृदयात एक विशिष्ट स्थान मात्र बनवू शकलो नाही पण राहुलने मात्र ते स्थान नक्कीच बनवलं होत ..त्याच्यासोबत असताना तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद असायचा ..काय जादू होती राहूलमध्ये माहिती नाही पण तिला आनंदी ठेवण्यात तो नेहमीच यशस्वी होत होता ..मला ते अजिबात सहन होणार नव्हतं पण त्यांच्यावर ईर्षा करत बसण्यापेक्षा मला माझं करिअर जास्त महत्त्वाचं होत ..त्यामुळे मी माझं संपूर्ण लक्ष करिअरवर फोकस केलं ..ते कधी - कधी दिसले की बोलायचो पण मनातून तो भाव कधीच नसायचा ..शेवटच्या सत्राला कॉलेजला कॅम्पस आलं होतं त्यामुळे सर्वांनीच तयारी सुरू केली ..त्याला अपवाद म्हणजे फक्त मी ..मला कॅनडाला माझ्या आवडत्या कंपनिंमध्ये नौकरी करायची असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केलं ..मी माझा बायोडाटा कॅनडाला पाठवला होता आता फक्त वाट होती ती त्यांच्या उत्तराची ..
आज कॉलेजला कॅम्पस आलं होतं त्यामुळे सर्वच मित्र इंटरव्यू देण्यासाठी गोळा झाले होते ..मी मात्र एकटाच कँटीनमध्ये चहा घेत बसलो ..एकटाच बसलो असताना तिथे नेहा आली .आज ती एकटीच होती ..तिनेही मला जॉइन केलं .." अभि सर्वच कॅम्पस द्यायला गेले आणि तू नाही गेला ..तुझं काही वेगळं प्लॅंनिंग आहे का ? " , नेहा विचारू लागली ..

" हो अस म्हणू शकतेस ..मी पहिल्या वर्षाला होतो तेव्हा कॅनडाच्या कंपणीबद्दल एकल होत आणि त्याबद्दल जास्तच ओढ निर्माण झाली ..नेटवर चेक केलं आणि ती सॉफ्टवेअर क्षेत्रातली नावाजलेले कंपनी निघाली ..मी गेले कित्येक दिवस तिथे नम्बर लागावं म्हणून प्रयत्न करतो आहे ..तसा बायोडाटा पाठवला आहे फक्त वाट आहे ती उत्तर येण्याची आणि मला आशा आहे की मला लवकरच बोलाविण्यात येईल " , मी एकाच श्वासात बोलून गेलो ..

" म्हणजे तुझा तिथे नंबर लागला तर आम्हाला कायमच सोडून जाणार ..नको ना रे अभि ..तुला खूप मिस करू आम्ही " , नेहाचा चेहरा फारच उतरला होता ..

" अग नाही अस काहीच होणार नाही फक्त नौकरीला जाणार आहे माझे आईबाबा , मित्र सर्व इथेच आहेत सो मी जाऊन - जाऊन कुठवर जाऊ " , तिला समजवणीच्या सुरात म्हणालो ..
आमचं बोलणं सुरूच होत की विकास आपली टाय ढिली करत येऊ लागला ..त्याचा मूड फारच खराब दिसत होता ..येताच त्याने फाइल टेबलवर आदळली आणि रागाने चहा ऑर्डर केला ..सर्व त्याच्याकडे पाहू लागले ..त्याने सर्वाना सॉरी म्हणून चहा घेण्यास सुरुवात केली ..तो एकावर एक सिप घेत होता आणि त्याच डोकं आणखीनच जड होऊ लागल ..काही वेळात शाश्वतदेखील आला ..त्याचीही स्थिती काहीशी अशीच होती ..दोघांच्या वागण्यावरून वाटत होत की त्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं .." सालं आमचं नशीब केव्हा उघडणार काय माहिती ?? ..देव आमचं नशीब लिहिताना बहुतेक सुट्टीवर गेला होता ..साल काही चांगलं घडतच नाही .." , विकास खूपच रागाने बोलत होता .." हो यार विकास आपलं नशीबच फुटक आहे ..या जन्मात आपलं काहीच होणार नाही " , शाश्वतनेही त्याच्या सुरात आपले सूर मिसळविले ..आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात विकास म्हणाला , " सॉरी यार अभि आज लेक्चर ऐकण्याचा अजिबात मूड नाही आहे आणि माझं डोकं फार दुखत आहे सो मी आताच निघतोय ..शाश्वत तू येतोय का ? " ...शाश्वतने होकार भरला आणि तो दोघेही बाय न म्हणताच निघून गेले ...नेहा शाश्वतसोबत बोलणार होती पण मी तिला थांबवलं आणि तीदेखील त्याला काहीच बोलली नाही..पण शाश्वतची तिला फारच काळजी वाटत होती ..काहीच वेळात सोनाली आली ..तिचाही चेहरा पडला होता .." तुझं पण सिलेक्शन झालं नाही का ? " , मी हळूच तिला विचारलं .." झालं रे " , सोनालीच उत्तर...

" अभिनंदन ..मग तोंड पाडून का बसली आहेस " , मी पुन्हा एकदा तिला विचारू लागलो ..

" माझ्या मित्रांना जॉब लागली नाही आणि मी आनंदी होऊ का अभि ..आणि हे दोघंही कुठे गेले ? " , सोनाली पोटतीळकीने विचारत होती...

" गेले माहीत नाही कुठे गेले तर ..वर्षभर अभ्यास करत नाहीत आणि आता चिडतात ..समजत नाही का त्यांना अभ्यास पण करायला हवं तसं ..किती वेळा सांगितल अभ्यास करायला पण ऐकणार ते मित्र कसले " , मी रागावून म्हणालो ..तिला विकासबद्दल रागावून बोललेलं आवडलं नाही आणि तीसुद्धा लगेच बाय म्हणून गेली ..मलाही त्याच फार वाईट वाटलं होतं पण मित्र म्हणून एव्हढाही हक्क नव्हता का मला ...आता मात्र मला थोडं वाईट वाटू लागलं पण नेहाला मात्र मी त्यातलं काहीच कळू दिलं नाही ..नेहा आणि माझाही मूड खराब झाला होता ..मी बिल पेड केलं आणि दोघेही घरी निघालो ..आज पहिलीच अशी रात्र होती की त्या तिघांनीही मला एक साधा मॅसेज केला नव्हता ..खर तर आज त्यांना एकट राहायचं होत त्यामुळे मीसुद्धा त्यांना मॅसेज केला नाही ..विचाराच्या तंद्रीत झोप लागायला बराच उशीर झाला ..
रात्री झोपायला उशीर झाल्याने सकाळी उठायला देखील फार उशीर झाला ..त्यातही डोळे लाल - लाल झाले होते ..उठायला उशीर झाल्याने आज उशिराच कॉलेजला गेलो ..कॉलेज सुनसान जाणवत होतं ..नेहाच्या क्लासरूमकडे नजर टाकली तर तिथेही कुणीच नव्हतं ..समोर - समोर होत आपल्या क्लासमध्ये पोहोचलो ..आज सोनाली माझ्या आधीच तिथे पोहीचली होती ..क्लासमध्ये गेलो तरीही तीच माझ्याकडे लक्ष नव्हतं .." गुड मॉर्निंग मॅडम ..वाटतंय लक्ष नाही माझ्याकडे ..का अस काय केलं मी की माझ्यावर एवढी रागावली आहेस " ..माझ्या शब्दांमुळे ती भानावर आली ..ती समोर काही बोलणार त्याआधीच मी तिच्या बाजूला जाऊन बसलो .." सॉरी यार अभि काल जरा जास्तच चिडले ..काल विकास माझ्यावर चिडला आणि त्याचा सर्व राग तुझ्यावर निघाला ..खूप खूप सॉरी " .....

" इट्स ओके डिअर काही हरकत नाही पण आता तुला नेमकं काय झालं ते सांगशील का ? " , माझे शब्द एकूण तिने माझ्याकडे चेहरा केला आणि बोलू लागली " अभि तुला आठवतंय मी एकदा म्हणाले होते की हे क्षण जगू दे ..पण हेच क्षण आता मला खूप त्रास देत आहेत..विकासला गमावण्याची भीती सतत वाटत असते ..जस नेहाने शाश्वत ला प्रपोज केलं तसच कुनीदेखील त्याला प्रपोज केलं तर मी नेहमीच हरवून बसेल यार..मी नाही राहू शकत रे त्यांच्याविना " ..बोलता - बोलता तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ..मी लगेच तिच्या डोळ्यावरून हात फिरवत म्हणालो , " गमावण्याची भीती वाटते ना सांग मग मनातलं ..अस कुळकुळत जगण्यापेक्षा एकदा सांगून मोकळं होणं बरं .." ती माझ्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली , " हो रे तुझं बरोबर आहे पण मी दिसायला काळी- सावळी त्यामुळे त्याला मनातलं सांगायला भीती वाटते आणि त्याने नकार दिला तर ? ..कस सावरू मग मी स्वतःला ? " ..एका मागोमाग प्रश्नाचा भडिमार करण्यास तिने सुरुवात केली ..तेव्हा तिला समजावत म्हणालो , " बघ सोनाली मी जेवढं त्याला ओळखतो त्यानुसार त्याला रंगाने काहीच फरक पडणार नाही ..आणि प्रपोज न करून त्रास करण्यापेक्षा करून नकार एकेलेला केव्हाही बरा ..कारण उद्या जाऊन माहिती झालं की त्याला देखील मी आवडत होते तर तेव्हा तुझ्या हातात काहीच असणार नाही ..सो सांगून टाक मी आहे तुझ्यासोबत .."

आता ती थोडी कॉन्फिडन्ट वाटू लागली .." बर मी सांगते त्याला मनातलं ..जे होईल ते पाहिल्या जाईल" , सोनाली म्हणाली आणि मला थोडा आनंद झाला ..तेव्हा मला काहीतरी सुचलं बर ऐक सोनाली " या दिवसाला खास बनवू या आता काहीच दिवसात ट्रॅडिशनल डे आहे तेव्हा सर्वच सोबत असू आणि त्याचा मूड पण मस्त असेल तेव्हा संधी शोधून सर्व सांगून दे " ..तिलाही माझी कल्पना आवडली होती ..आणि मलाही मानसीला सांगायचं होत की माझ तिच्यावर प्रेम आहे ...फक्त यातलं काहीच मी सोनालीला सांगितलं नाही .
आमचं सर्व बोलून झालं होतं तेव्हाच शाश्वत आणि विकास आला ..मी त्यांच्यासमोर उभा होतो आणि ते माझ्याकडे पाहू लागले ..कुणीच कुणाशी बोलायला तयार नव्हत आणि विकासने येऊन सरळ मिठी मारली , " सॉरी यार अभि काल स्वताचा राग तुझ्यावर काढला ..रात्री मूड नव्हता म्हणून मॅसेज केला नाही ..मी पण सॉरी म्हणत शाश्वत येऊन आम्हाला भिडला ..आणि सोनालीनेही मिठी मारली ..काहीही न बोलता आमच्यात सर्व काही ठीक झालं ..जेव्हा - जेव्हा मैत्री की प्रेम असा प्रश्न विचारला जातो तेव्हा - तेव्हा मैत्री जास्त प्रिय वाटते कारण ते एकमेव नातं असत जिथे विश्वास असतो प्रेम असत शिवाय नसतात त्या अपेक्षां ..आणि जेव्हा एखाद्या चुकीसाठी सॉरी म्हणण्याची गरज पडत नाही तेव्हा ते नात आणखीनच घट्ट होऊन जातं ..आमच्या आयुष्यात समोर काय वाढून ठेवलं आहे हे माहिती नव्हत पण एवढं माहिती होत की काहीही झालं तर आम्ही एकमेकांसोबत असू सदैव ..

हळूहळू ट्रॅडिशनल डे जवळ येऊ लागला ..सर्व मित्र त्यांना त्यादिवशी काय कपडे घालायचे आहेत याची तयारी करू लागले ..मुलींनी तर शॉपिंगला देखील सुरुवात केली ..मुलीं साडी लावून येणार होत्या तर आम्ही कुर्ते लावून येणार होते ..सर्वात जास्त क्रेज मला आणि सोनालीला होता कारण त्याच दिवशी आमचं आयुष्य पूर्णतः बदलणार होत ..शाश्वत आणि नेहाने आपल्यातच प्लांनिंग केली होती आणि त्यांना ते सिक्रेट ठेवायचं होत ..आमच्या दोघांव्यतिरिक्त एक व्यक्ती पुन्हा होती ज्याला या क्षणाची खूप आतुरता आहे असं जाणवू लागल तो म्हणजे राहुल ..सर्वांची येण्याची तयारी सुरू झाली ..आम्हालाही वाट होतीच त्या क्षणाची ..

अखेर तो दिवस उजळला ..सकाळपासूनच तयारी करण्यात व्यस्त होतो पण एकही कुर्ता मला आवडला नव्हता ..बेडवर कपड्यांचा ढग पडला होता आणि मला त्यातला एकही ड्रेस आवडत नव्हता ..ममा आत आली आणि ती रूमची अवस्था बघून हसायला लागली ..तिला माझा होणारा गोंधळ कळून चुकला होता आणि तिने बेडवरून आकाशी कलरचा कुर्ता काढला ..मी चेंज करून आलो आणि आरशात पाहिलं .आतापर्यंत झालेला गोंधळ क्षणात नाहीसा झाला ..मलाही तो कुर्ता फारच आवडला ..आईकडे पाहिलं आणि तिने काळजाच बोट माझ्या मानेवर लावलं ..मी बेडकडे पाहिलं तर संपूर्ण रूम अस्ताव्यस्त झाली होती ..मी रूम साफ करायला जावं तेवढ्यात ममाच ते करू लागली आणि माझं टेंशन कमी झालं ..एव्हाना शाश्वत आणि विकास माझ्या घरी पोहोचले होते ..विकास आज ब्लु कलरचा कुर्ता लावून आला होता ..मुळात आमचं सर्व ठरलं होतं आणि त्याच हे सिक्रेट मी सोनालीला सांगितलं होतं ..तेव्हा आता ती देखील मॅचिंग लावून येणार होती ..तशी मी पूर्ण सेटिंग करून ठेवली होती ..फक्त बाकी होत ते कॉलेजला जायचं ..दोघाणीही ममाच्या हातचा चहा घेतला आणि आम्ही कॉलेजला निघालो ..
कॉलेजला पोहोचलो तेव्हा आमची शाखा इंद्रधनुष्याच्या रंगानी बहरली होती ..प्रत्येक विद्यार्थी आपली वेगळी स्टाइल जपत होता ..मूल तर मुलींना साडीवर बघुन वेडेच झाले होते ..प्रत्येक मुलीची एक वेगळीच अदा होती आणि मुलांना आपली वेशभूषा आवडावी म्हणून मुलीही फार सजून आल्या होत्या ..आज आमची शाखा जणू स्वर्गच झाली होती ..जिथे प्रत्येक मुलगी परिसारखी भासत होती ..आम्ही कॉलेजला पोहोचलो होतो पण आम्हाला ज्यांची वाट होती त्या अजूनही आल्या नव्हत्या ..त्यामुळे त्यांची वाट पाहू लागलो ..काही वेळात एक रिक्षा गेटसमोर येऊन थांबली ..रिक्षाच्या या बाजूने नेहा उतरली ..नेहाला पाहताच शाश्वत फ्लॅट झाला होता शिवाय नेहा मॅडमचा चष्मा तिला अधीकच क्युट बनवून जायचा ..माझी आताही नजर तिलाच शोधत होती ..नेहाने पैसे पेड केले आणि रिक्षा समोर गेली .. दुसऱ्या बाजूला उभी असलेली मानसी अचानक समोर आली ..माझ नशीब सॉलिड काम करत होत कारण तिनेदेखील आकाशी रंगांची साडी लावली होती ..फुल स्टीवलेस ब्लाउज ..मोकळे सोडलेले केस ..कानात मॅचिंग इअर रिंगस आणि थोडासा मेकअप ..स्वताची साडी सावरत ती समोर येऊ लागली ..मी तिला पाहताच फ्लॅट झालो ..तिला अस पाहण्यासाठी मी कित्येक दिवसापासून वाट पहात होतो आणि ती प्रतीक्षा आता पूर्ण झाली होती ..ती समोरून येत होती आणि प्रत्येक मुलगा तिच्याकडे पाहू लागला ..मी काही पावलांवरच उभा होतो जिथून ती स्पष्ट दिसत होती ..शाश्वतने डोळ्यांनी इशारा करून नेहाला बाजूला बोलविल त्यामुळे ती मानसीला बहाणा मारून शाश्वतकडे निघाली ..आता फक्त मानसि एकटीच समोरून येत होती आणि तिच्याशी बोलण्यास मी आतुर होतो ..तिचही आम्हा दोघांकडेच लक्ष होत आणि मधात राहुल आला , " ओ माय गॉड !! काय भारी दिसते आहेस तू मानसी ..आज मुलांचं काहीच खैर नाही मला तर वाटत आज मी तुझ्या प्रेमातच पडणार आहे .." तो हसून - हसून तिच्याशी बोलत होता आणि तीही त्याच्या बोलण्यावर लाजत होती ..त्यांचं आम्हा दोघांकडे लक्षच नव्हतं ..आतापर्यंत मस्त असलेला मूड एकदम बदलला ..विकासलाही ते जाणवलं ..मी आता तिची वाट न पाहताच सरळ हॉल मध्ये निघून आलो ..विकासही माझ्या मागेच हॉल मध्ये आला ..आम्ही मागच्या चेअरवर बसून होतो ..मानसी हॉल मध्ये आली होती पण मी तिच्याशी बोलण्या ऐवजी दुसऱ्याशी बोलण्याचा बहाणा करू लागलो ..शेवटी ते दोघेही समोर जाऊन बसले ..," अभि हा शाश्वत कुठे गेला यार ..थांब त्याला फोन लावतो " , विकास अस म्हणताच मी त्याला थांबवलं " जगू दे रे भावा त्याला हे क्षण नेहासोबत ..यानंतर कुणालाच पून्हा ही कॉलेज लाइफ परत मिळणार नाही ..आणि मी म्हणेन तुही शोधून घे एक .."

" सर्वच ट्राय करून झालं रे संपूर्ण कॉलेजनेच साल सार्वजनिक भाऊ बनवून सोडलं .." ..त्याच वाक्य अर्धवट राहील कारण माझ त्याच्याकड अजिबात लक्ष नव्हतं ..ते पाहुन तो म्हणाला , " साल्या तुझं पाखरू तर इथे आहे मग तू कुणाला पाहत आहेस .." मी त्याची चेअर गोल फिरवली आणि तोही मागे पाहू लागला ..सोनाली ..विकासने निळ्या कलरचा कुर्ता लावला होता त्यामुळे ती देखील निळ्या कलरची साडी लावून आली होती ..फुल स्टीवलेस ब्लाउज ..उंच अशी सॅंडल आणि थोडासा मेकअप ..मुळात ती सावळी असली तरीही चेहऱ्यावर तेज होत आणि ते तेजच सर्वाना आकर्षित करायच.. " भावा काय दिसत आहे राव ती ..साल ही एवढी जवळ होती आणि आपण तिला साधं बघितलं सुद्धा नाही ..काहीही म्हण पण माझा विचार आता बदलत आहे ..विचार करतोय तिलाच प्रपोज करावं..भारी दिसत आहे न ती ? "
माझ्या बोलण्यावर फक्त त्याने मान हलविली आणि पुढच्याच क्षणी म्हणाला , " साल्या मानसीच काय आचार टाकणार आहेस मग .जा तिला सांग मनातलं " , तो रागावून म्हणाला ..मग मीही खेचत म्हणालो , " मग तू कर न प्रपोज भावा काय भारी दिसत आहे ती ..कर प्रपोज तूच मी सोडतो तिला तुझ्यासाठी " ..तो आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता पण एवढं मात्र खरं की त्याच्यावर माझ्या शब्दाची जादू मात्र जास्तच चढली आणि तोही तिच्याकडेच पाहू लागला ..
सोनाली पावले टाकत - टाकत आमच्याजवळ आली आणि मी विकासला चिडवण्यासाठी , सोनाली येताच तिचा हात हातात घेऊन चेअरवर बसवू लागलो ..तीही फक्त माझ्याशीच बोलत होती ..एवढंच काय तर ती फक्त त्याला हाय म्हणाली .तीच संपूर्ण लक्ष माझ्याकडेच होत म्हणून तो चिडला जोती ...विकासला आणखी ईर्षा व्हावी म्हणून म्हणालो , " सोनाली तुम्हे देख कर कुछ याद आ रहा है .अगर इजाजत हो तो कह दु ..तिने इर्शाद म्हणताच मी शायरी म्हटली ..

अब नही के आरजू की
किसीं के ईश्क मे फनाह हो जाऊ
तब कर दे तू इजहार ऐसें की
फिर एक बार मै तेरा दिवाना बन जाऊ ..

सोनालीच्या तोंडून वाह!! वाह शब्द निघाले आणि विक्या म्हणाला , " साल्या कुठून चोरली बे ..मोठा आला म्हणे शायर " ..तो जळलेलं पाहुन सोनाली आणि मी खूप जोराने हसू लागलो ..तेव्हाच विकास कानाजवळ येत म्हणाला , " साल्या तू सोनालीची स्तुती केली तर मानसी तुझ्याकडे पाहात आहे " ..मी त्याचे शब्द पूर्ण व्हायच्या आधीच म्हणालो , " मग मी काय करू ..तिच्यासोबत आहे न राहुल तो एकवेल तिला शायरी .."

एव्हाना शाश्वत - नेहा पण आम्हाला जॉइन झाले " हे बघा आता कुठे झाले प्रेमवीरांचे दर्शन , बर नेहा नक्की गप्पाच मारत होतात की काही गोड भरविल आमच्या भावाला " , विकास म्हणाला आणि नेहा बिचारी लाजत सोनालीच्या मिठीत जाऊन शिरली ..इकडे आम्ही शाश्वतची खिचण्यात व्यस्त होतो ..

दिवसभर सर्वच मित्र फार एन्जॉय करत होते ..आम्ही आमच्या कलासमेंट्स पाहण्याऐवजी फर्स्ट इयरच्या मुलींकडे पाहू लागलो .त्याही आमच्याकडे हसून पाहू लागल्या की मग मात्र काहीच खर नाही ..विकास आणि मी एका मुलीकडे पाहत होतो आणि तीसुद्धा विकासला भाव देत होती ..इकडे हे बघून सोनालीचा पारा आणखीनच वाढला होता ..आम्ही सोनलिकडे लक्ष दिलं नाही आणि मुलींना पाहतच बसलो ..त्या मुलीही ग्रुपमध्ये आमच्याच चर्चा करत होत्या ..विकास तर हातानेच इशारा करून त्या मुलीला सुंदर दिसत असल्याचं सांगत होता तर इकडे सोनालीच्या नाकाला मिरच्या झोम्बायला सुरुवात झाली ..आज सर्व एकमेकांवर ईर्षा करत होते आणि त्यात देखील वेगळीच मस्ती सुचत होती..कुणी वेगळा ग्रुप करून गप्पा मारण्यात व्यस्त होते तर कुणी सेल्फी काढण्यात तर आमच्यासारखे लाइन मारण्यात ..आम्हीही शेवटची आठवण म्हणून भरपूर फोटो काढून घेतले होते ..दिवसभर एन्जॉय करण्यात वेळेचं भानच उरलं नाही ..आमचे जेवणदेखील आटोपलं होते ..आता वेळ होती त्या क्षणाची ज्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ..सोनालीला विकासशी आपल्या मनातील शेअर करायचं असल्याने विकासला बाहेर काढण गरजेचं होतं ...मी सोनालीला बागेत जाण्यासाठी आधीच सांगितलं होतं ..मीसुद्धा काही काम सांगून बाहेर निघालो आणि माझ्या नंतर ती सुद्धा बागेत गेली ..मी ठरलेल्या योजनेप्रमाणे विकासला कॉल केला .., " विकास थोडं बागेत ये बर मला काम आहे " त्याने होकार कळवून फोन खाली ठेवला ..तो बाहेर गेला आणि मी आतमध्ये आलो ..आता माझाही मूड मस्त झाला त्यामुळे मानसीला मनातलं सांगण्यासाठी शोधू लागलो ..संपूर्ण हॉल शोधून झाला तरी ती सापडली नाही म्हणून बाहेर गेलो ..

इकडे विकास बागेत पोहोचला पण मी त्याला कुठेच दिसलो नाही उलट सोनालीच तिथे बसून होती .." बघ हा मला बोलावलं आणि स्वताच कुठे गायब झाला काय माहिती ..आणि तू इथे काय करत आहेस ? " त्याने एकामागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली ..

" ये इथे बस आधी ..त्याच सोड ..मी आहे न आणि तुला काहीतरी खास सांगायचं होत सो प्लिज बस ना " , सोनाली म्हणाली आणि तो लगेच खाली बसला , " हा ..बोल "

" विकास ..तुला कदाचित माझ्या शब्दांवर विश्वास बसणार नाही पण तरीही ऐक ..कॉलेजला आले तेव्हाच तू दिसला आणि पाहिल्याचं क्षणी तुझ्या प्रेमात पडले ...का कस माहिती नाही ..तुला न माहिती होता मी कित्येकदा तुझ्याकडे लपून पाहायचे ..तुझ्या जवळ येण्यासाठी तुमच्या ग्रुपला जॉइन होणं गरजेचं होतं ..खूप लोकांनी मला समजावलं की यांच्यात नको पडूस पण मी तुझ्या प्रेमाखातीर सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं ..तू जेव्हा - जेव्हा एखाद्या मुलीकडे बघायचास तेव्हा फार वाईट वाटायचं पण मी काहीच करू शकले नाही ..गेली 5 वर्षे घुटमळत जगत आले पण आता शांत राहणं शक्य नाही ..तू उत्तर होकाराच द्यावं अशी माझी इच्छा नाही पण मला तुला सर्व सांगायचं होत म्हणून आज मन मोकळे करते आहे .." मला तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायच आहे ..बनशील का माझा लाइफ पार्टनर ? " ..त्याला काय बोलू आणि काय नाही अस झालं होतं ..तिने ते ओळखलं आणि म्हणाली , " उत्तर देण्याची आताच गरज नाही ..पण उत्तर दे नकार असला तरीही मला राग येणार नाही .." त्यांचं बोलून झालं होतं

मी इकडे मानसीला शोधायला निघालो होतो ..ती आमच्या शाखेत कुठेच दिसत नव्हती ..म्हणून बाजूलाच असणाऱ्या इलेक्ट्रिकल शाखेत गेलो आणि समोरच एका ओपन प्लेसमध्ये ती दिसली आणि मी समोर जाऊ लागलो ..काही पावले टाकली आणि समोरच दृश्य पाहून हादरलो ..

राहुल हातात गुलाबाचं फुल घेऊन होता ..त्याने आपले गुडघे जमिनीला टेकले आणि म्हणाला , " मानसी जेव्हापासून प्रेम काय असत हे समजलं तेव्हापासून तुझ्यावर प्रेम करतो ..तुझी साथ मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले ..तस तुला कुठल्याच मुलाशी मैत्री करायला आवडत नव्हतं तरीही तुझ्या मागे लागून लागून तो हक्क मी मिळविलाच पण मला आता हे नात समोर न्यायचं आहे .." प्लिज मॅरी मी ना !! ..मी तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन फक्त मला तुझी साथ हवी आहे ..देशील ती साथ ? "

तिने लगेच हातातला गुलाब घेतला आणि तो आता उत्तराची वाट पाहू लागला ..माझंही संपूर्ण लक्ष तिच्या बोलण्याकडेच होत ..


क्रमशः ...