Prem mhanje prem asat... - 1 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रेम म्हणजे प्रेम असत.... - 1

Featured Books
Categories
Share

प्रेम म्हणजे प्रेम असत.... - 1

प्रेम म्हणजे प्रेम असत....

जय आणि रितू...दोघे बरेच दिवस एकमेकांना ओळखत होते... दोघांच्या मैत्रीला ६ महिने पूर्ण होत आलेले. मधल्या काळात दोघे एकमेकंशी बऱ्याच गोष्टी शेअर करायला लागले होते.. दोघे ठरवल्याप्रमाणे रविवारी संध्यकाळी बागेत भेटले.. त्याला पाहून रितू खुश झाली...आणि ती बोलायला लागली..

"हेलो..कसा आहेस जय?"

"मी मस्त... तू सांग!! ए आज जास्ती वेळ नाहीये...पण आपण नेहमीच रविवारी भेटतो सो थोडा वेळ का होईना पण तुला भेटायला आलोय.."

"थँक्यू रे जय... ए, आपण किती दिवस एकमेकांना ओळखतो आहे. खूप मस्त वाटत तुला भेटून, तुझ्याशी बोलून.."

"हो न रितू.. आता मस्त वाटत तू बरोबर असलीस की... म्हणजे तुझी सवय होतीये मला.. तू आजूबाजूला नसतांना पण तुझी झालेली सवय..तुल सतत भेटायची ओढ.." जय बोलला.

"सेम हिअर!! तू इतका छान मित्र होशील अस मला कधी वाटलच न्हवत जय.. कसे ना आपण मित्र झालो... आपली मैत्री माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होती.. म्हणजे मला वाटले सुद्धा नव्हते की आपल्यात मैत्रीचे इतके सुंदर नाते निर्माण होऊ शकेल.."

"मला सुद्धा...सो आपण हे नाते पुढे नेऊ शकतो?" हळू आवाजात जय ने रितू ला प्रश्न केला... त्याचा प्रश्न ऐकून रितू शांत झाली.. मग तिने जरा विचार केला आणि ती बोलायला लागली,

".. नो नो जय!! मैत्री च्या पुढे नको करायला विचार!! आय सिरिअसली फिल इट.. आपण फक्त चांगले मित्र आहोत.. आणि मित्रच राहू!! मैत्री सारख सुंदर नातं कोणताच नसत.. यु नो न.. आणि यापुढे मी काही विचार नाही केलाय.. आणि मी अजून विचार करावा असं तुला वाटत असेल तर अजून काही ठरवायला मला अजून थोडा वेळ हवाय.."

"वेळ वेळ वेळ..अजून किती वेळ हवाय तुला.. मैत्री करतांना तर अजिबात वेळ नाही मागितलास...आणि आता काय ग? आपली वेव्हलेन्थ जुळली आणि आपण खूप छान मित्र झालो ना.. मग तसच हे नातं अजून थोड पुढे नेलं तर? काय हरकत आहे.. मैत्री नात्यात हक्क येत नाही.. पण आता तू मला माझ्या हक्काची हवी आहेस.." जय थोडा सिरिअस होऊन बोलला..

"मैत्री वेगळी असते जय.... आणि हे नाते पुढे नेणे इतकेही सोप्पे नसते... सो हवाय अजून खूप वेळ.. जोपर्यंत मला मनापासून वाटत नाही तोपर्यंत.. मी माझा वेळ घेणारच..आणि नको दाखवूस माझ्यावर हक्क.. आय माईट साऊंड विअर्ड.. पण नाही..नाहीच!! मला नाही करायचा मैत्रीशिवाय अजून काही विचार!!"

"येस यु आर अॅक्ंटीग व्हेरी विअर्ड!! पण ओके फॉर मी... कॉझ माझा ठरलाय आता.. तू आणि फक्त तू!! घे घे.. हवा तितका वेळ घे.. पण मी दुखावतो गेलोय आज.. तुला दुसऱ्याच्या भावनांची किंमतच नाही रितू.." जय उदास होऊन बोलला...

"सॉरी रे जय.. पण तू मला समजून घे ना थोडं..आणि नको घेउस एकट्यानेच कोणतेच निर्णय!!"

"ठीके ग.. सारख मीच तुला समजून घ्यायचे.. ठीके ठीके..नको बोलायला ह्या विषयावर आता.. " जय ने ह्यावेळी सुद्धा हा विषय सोडून दिला कारण त्याला रितू ला अजून वेळ द्यायचा होता..

एकमेकांबरोबर राहण्याचा विषय तिथेच संपला.. आणि दोघे नेहमीसारखे मित्र मैत्रिणीचे नाते जपत होते. एकमेकांबरोबर दोघांना बराच वेळ घालवला होते. इतक्या सहवासामुळे आता जय ला रितू शिवाय राहणे शक्य नव्हते.. जय ला मनापासून रितू बरोबर लग्न करायची इच्छा वाढीस लागते आणि आता जय काय तो सोक्ष मोक्ष लावणारच असतो... जय ला अंदाज होता की ह्यावेळी सुद्धा रितू नकारघंटा चालू करणार पण ह्यावेळी तो तिच्या कडून होकार वदवून घेणारच होता... आता तो गिव्ह अप करणार नव्हता... आणि त्याने तशा निश्चय केला होता. रितू जय ला होकार सांगत नव्हती ह्याचा त्याला फार त्रास होत होता.. आपण ज्या व्यक्तीवर इतके जीवापास प्रेम करतो ती व्यक्ती प्रेमापासून इतकी का पळते हे जय ला जाणून घ्यायचेच होते.. जय ला आता राहवत नव्हते.. तेव्हाच रितू ने त्याला भेटायला बोलावले आणि तो सुद्धा रितू ला भेटायला आला...त्याला ह्याची कल्पना होती की रितू ला काहीतरी चिता सतावती आहे.. पण टेकाय हे रितू स्पष्ट पणे बोलत नव्हत.. ह्यावेळी जय मनोमन काहीतरी निश्चय करूनच आला होता.... त्याने रितू ला समोर पाहिले.. तो हसला आणि त्याने तिला एक फ्लाईंग किस दिली. तिच्या हातात फुलांचा गुच्छ हेवला आणि मग अजिबात वेळ न दवडता बोलयला चालू केले,

"आय लव यु रितू!! विल यु मॅरी मी? हो म्हण आता..वाट पाहिली खूप... आता मात्र बास..." आता फायनल होणार हवाच ह्याच आवेशाने जय बोलायला लागला..ह्यावेळी जय खूप खंबीर आहे हे रितू ला जाणवले होते..

“ओह नो जय.. परत तोच विषय? आणि आज डायरेक्ट प्रपोज केलेस.."

"हो हो.. आज डायरेक्ट प्रपोज.. आता तू हवी आहे मला माझ्या आयुष्यात.. मला हे सुद्धा माहितीये तू स्वतः हा विषय कधीच नाही काढणार..मी माझ्या आयुष्याची महत्वाची वर्ष अशी वाया जाऊन देणार नाही आता.. तुझ अति ऐकल, तुझ्या कलेने घेतलं.. पण आज मला सगळ ऐकायचं आहेच! तू दुखावली गेलीस तरी आय डोंट केअर!!" जय ने रितू चा हात हातात घेतला, हात घट्ट धरला.. आणि तो बोलला..

"तुला खरचं लग्न करायचय माझ्याशी? नक्की ठरवल आहेस? थोडा अजून वेळ थांबणार नाहीस? आणि आज मी जरा दुखावली जातीये.. ” रितू नी क्षणाचाही वेळ न दवडता बोलायला सुरवात केली..

आपल्या मताशी प्रामाणिक असलेल्या जय नी रितू ला उत्तर दिल..

"मी इतका वेळ दुखावला गेलो..त्याच काही वाटल का तुला?"

"तू मला समजून घेत नाहीयेस जय!!"

"बास... आता! आणि तू वेडी आहेस का रितू? तुला माहितीये मी किती मनापासून हे बोलतो आहे.. आणि तू किती वेळा हेच बोलणार ग? मी १०० वेळा सांगितलंय माझ तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माहिती आहे...नक्की माहिती आहे, तुझही माझ्यावर प्रेम आहे तरी तुला माझ्याशी लग्न करायचं नाही...का ते आज मला जाणून घ्यायचे आहेच..आणि काय सारखा सारखा तोच तोच प्रश्न विचारतेस? कंटाळा येत नाही का? मला तर तेच तेच बोलून अक्षरशः वीट आलंय.. पण तुला तेच परत ऐकायचं असेल तर आता परत एकदा ऐक, हो हो….अगदी १०० टक्के मला तुझ्याशो लग्न करायचं आहे.... आय लव यु सो मच!!! मला तूच माझी लाईफ पार्टनर हवी आहेस... तू सांग, तुला मी काय केल कि खात्री पटेल? आणि यु नो ,मी माझे निर्णय सारखे सारखे बदलत नाही.. यु नो मी जे बोलतो ते करतो आणि जे केल त्याचा कधी पश्चाताप करत नाही! बाय द वे,मी गम्मत करतोय अस वाटतंय का तुला? तुझा माझ्यावर विश्वास नाही? तू आज बोल.. आज तू बोल.. मनात जे हे ते बोल.. मी ऐकतोय...पण सगळ सांगयचं.. इफ यु रिअली डोंट विश टू मॅरी मी, स्पष्ट सांगा.. मग मैत्री सुद्धा नको तुझी.. फक्त कामापुरत वाप्वून घेतेस तू..सेल्फिश यु आर!!” आज जय त्याचा राग बोलून दाखवणार होता. त्याला स्वतःला हे माहिती होते की त्याचे रितू वर किती मनापासून प्रेम आहे.. पण रितू ला हे नातं मैत्री पुढे न्यायचे नाही ह्याचा जय ला त्रास होत होता. आणि आज ठरवल्याप्रमाणे तो सोक्ष मोक्ष लावणारच होता... आता आर या पार ह्याच विचाराने तो रितू ला भेटला होता..

क्रमशः