Aajaranch Fashion - 19 books and stories free download online pdf in Marathi

आजारांचं फॅशन - 19

त्या दिवशी अनिलने मनाशी पक्कं ठरवलं की आता दारूचा सहारा घ्यायचा नाही आणि खरंच हे डोक्याचं बिघडलेलं इंजिन आता ठीक करायचं, ह्या सगळ्या पाठी त्याचा वैयक्तिक वैद्यकीय फायदा तर होताच पण त्याला सविताला परत आणायचं होत, आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट बसवायची होती, त्याला मना पासून मुलांची आणि सविताची गरज होती, ते हि लगेच, कारण सायकोलॉजिकल औषध लगेच काम करत नाही त्याला थोडा वेळ किंबहुना दिवस लागतात आपला प्रभाव जाणवण्यात, आणि त्यात दारू बंद केल्या मुळे, अचानक सोडलेल्या कारणाने जाणवणारे नकारत्मक लक्षणं, ह्या सगळ्यात कुणी तरी आपलंस आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आणि अनिवार्य असत, पण अनिलने हे युध्द एकट्यानेच लढायचं आणि जिंकायचं ठरवलं होत, त्याने मनाशी पक्क केलं की आता पूर्णपणे जो पर्यंतर नवीन अनिल जन्माला येत नाही आणि आपल्या स्वभावात आणि सवयी मध्ये मी जो पर्यंतर सकारत्मक बदल घडवून आणत नाही तो पर्यंतर सविताला कॉल नाही करणार किंवा भेटणार देखील नाही.

कोण जाणे कशी पण अचानक दोन दिवसांपूर्वी वाचलेल्या काश्मीर मध्ये एका अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बातमीची त्याला आठवण झाली. त्याच्या मनात एका विचाराने जन्म घेतला, हे शूर जवान कसल्याही प्रकारच्या वातावरणात राहतात, मिळेल ते खातात आणि प्रत्येक क्षण मृत्यूच्या दारात जगतात, शत्रूंच्या दारू गोळ्यांचा, बंदुकीचा उघड्या छातीने वाघासारखा सामना करतात आणि आपण साध्या खोकल्याला घाबरून जातो, त्यांच्या सारखी पहाडा एवढी हिम्मत, समुद्रा एवढी सहनशीलता आणि सिंव्हासारखं काळीज जरी आपल्या कडे नसलं तरी ह्या छोट्याश्या आजाराशी लढण्याची हिम्मत आपल्याला जमवावीच लागेल नाही तर अश्या षंढपणाच्या घाबरट जगण्या पेक्षा मरण आलेले बेहत्तर.

त्या दिवशी खऱ्या अर्थाने एका नवीन संकल्पनेचा आणि एका नवीन अनिलचा जन्म झाला, पण हे सगळं वाटत तेवढं सोप नव्हतं, खूप जीवघेणा त्रास आणि अडचणींना तोंड द्यावं लागणार होत, आणि त्याची सुरवात दुसऱ्या दिवशी सकाळीच झाली, गॅरेजवर जाताना त्याने एक दुःखद निधनची पाटी पाहिली, त्या वर लिहलेले होते की एका ३५ वर्षाच्या तरुणाचं आकस्मित निधन.

अनिलने असं काही ऐकलं किंवा वाचलं तर त्याला पहिला प्रश्न पडायचा तो म्हणजे कशामुळे, त्याने लगेच खिशातला मोबाइल काढला आणि आपला परम मित्र शार्दुलला फोन केला आणि त्या तरुणाच्या मृत्यूचे कारण विचारले.

शार्दूल म्हणजे कॉलेनी मधले चालते फिरते बी बी सि नेटवर्क होते, कुठे काय आणि कधी घडते त्याला त्याची खडान खडा माहिती असायची आणि एल आई सि च्या क्षेत्रात असल्यामुळे मरणाऱ्यांची तर त्याला पूर्ण माहिती आणि त्यात खुप रस देखील. शार्दुलने पटकन उत्तर दिले कि त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता.

अनिल दोन मिनटे शांत राहून पुढे बोलला.

"कश्या मुळे होतो रे हा ब्रेन स्ट्रोक?

"काय माहित ब्लड प्रेशर वाढल्या मुळे होत असलं"

शार्दुलने अगदी सहज पणे उत्तर दिले पण अनिल साठी ही गोष्ट सहजपणे पचवता येण्या सारखी नव्हती, पूर्ण दिवस त्याच्या डोक्यात ब्रेन स्ट्रोक आणि ब्लड प्रेशर तांडव करत होत. रात्री घरी जाताना तो गॅरेज जवळच्या एका डॉक्टर कडे ब्लड प्रेशर तपासायला गेला, हायपोकॉन्ड्रियाक माणसाचं आणखी एक वैशिष्ट्य असत त्यांचा ब्लड प्रेशर डॉक्टर कडे गेल्या वर किंवा ब्लड प्रेशर तपासण्याची मशीन लावली कि वाढलेलाच असतो, अनिलच देखील तसच झालं बी पी १००/१६० होता.

"काही बी पी ची गोळी सुरु आहे का?

डॉक्टरने विचारलं

अनिलने होकार देत अमुक अमुक गोळी रोज रात्री एक सुरु आहे असे सांगितले आणि त्या बरोबर त्याने डॉक्टरला आपल्या घाबरट स्वभावाबद्दल आणि सायकॅट्रिक औषधांबद्दल देखील सांगितले.

"कदाचित खूप स्ट्रेस मुळे आणि तुमच्या ह्या घाबरट स्वभाव मुळे वाढला असेल, अशा स्वभावाला आम्ही वैद्यकीय भाषेच व्हाईट कोट सिन्ड्रोम असे बोलतो. काही काळजी करू नका घरी जा औषध घ्या आणि आराम करा"

डॉक्टरने अनिलला समजावले.