Adrushya - 3 books and stories free download online pdf in Marathi

अदृश्य - 3

केस ची सुनावणी होती आज , विभा तयार होती,पण नायब हि तेवढाच तयारीने केस लढायला आला होता,त्याने खूप मोठा वकील निवडला होता.अर्थातच त्याला जेहेन ला फाशी द्याची होती.

विभा ने तिच्या डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवल होत.सुनावणी सुरु झाली,विभा तयार होती पण अचानक तिच्या डायरी मध्ये जे काही तिने लिहून ठेवल होत ते गायब होतं.

अचानक समोरच्या वकील मृदुल ने केस लढायला सुरुवात केली.मृदुल-जज्ज साहेब, जेहेन अरोरा हिने फक्त अर्णव लाच मारल नाहीये तर हिने या आधी हि खूप मोठा गुन्हा केलेलाय.हिने एका मुलीला ठोकून दिल होत,एवढंच नाही तर त्या मुलीला मदत सुद्धा हिने नाही केली आणि ती तशीच तिथे मरून गेली.पोलीस ला हे नंतर समजलं पण काही पुरावे हे जास्त नव्हते कारण त्या मुलीला नंतर काही कावरेल कुत्र्यांनी खाऊन टाकलं होतं. एवढंच नाही तर हिला नशा करायची घाण सवय आहे.

विभा-साहेब , हे आपल्याला केस कडून वळवताय.

मृदुल-अरे विभा मॅडम, काय बोलताय तुम्ही .

विभा-मग ती मुलगी कोण होती सांगा तिची तपशील केलीये तुम्ही काय पुरावे आहेत तुमच्या कडे.

मृदुल-सेहेम मलिक.आणि हा मी तपशील केलीये आणि कॉपी जज्ज साहेबांना दिलेत.

जज्ज - विभा निगम तुमच्याकडे काय पुरावे आहेत याला खोट सिद्ध करायला.

तिच्या तोंडून तर काहीच फुटेनास झालं होतं.तिला वाईट वाटत होत .

विभा-नाही साहेब

मृदुल-चला मग तर कोर्टाचा टाइम तुम्ही कशाला घालवताय माघार घेऊन टाका.

विभा-साहेब मला अजून एक तारीख द्या ,फक्त एक.

जज्ज -ठीक आहे,पण त्यात पण काही पुरावे नसलेत तर तुम्ही हि केस हारून जाणार.

विभा कोर्टाबाहेर निघाली ,तिला माहित होत की प्रेस वाले तिला सोडणार नाही म्हणून ती त्वरित तिथून वेष बदलून निघून गेली.सेहेम चे फोन येऊन गेले होते. विभा ने तिला घरी बोलावलं.विभा घरी गेली तिथे सेहेम तिची वाट पाहत होती.विभा रडत रडत सेहेम कडे गेली आणि म्हणाली की मी हारले. सेहेम म्हणाली नाही तू तर जिंकली आहेस,तू परत उभी राहली आहे लढायला खूप मोठी गोष्ट आहे.तीच नाव पण सेहेम मलिक होतं. सेहेम ने विभा ला तिच्या गोळ्या दिले आणि ती झोपून गेली.

संध्याकाळ झाली,विभा जागी झाली.तेवढ्यात पोलीस स्टेशन मधून फोन आला,विभा मॅडम लवकर या इथे त्या जेहेन ला पहा काय झालंय तिने आत्महत्येच्या प्रयत्न केलाय.विभा तशीच निघाली,तिथे जेहेन ला भेटली.जेहेन म्हणाली तो तो माणूस होता तो आला होता इथे.विभा म्हणाली कोण नायब?.जेहेन-नाही तो तो त्या दिवशी त्याने मदत मागितली होती तो.विभा-काय तो म्हणजे हे सगळं त्याने केलंय त्यानेच माझ्या डायरीतले माझे महत्वाचे कागद गायब केलेत.

जेहेन-पण तो असा कसा गायब होऊन गेला,तो सापडत का नाहीये .

विभा-तो बदला घेतोय तुझ्याकडून .

जेहेन-तो आलेला तेव्हा त्याने एक धून गुंगुणावली होती .

विभा-ठीक आहे.स्वतःला जास्त शहाणा समजतो तो बघूच.

जेहेन-पण आता काय होईल,कस सिद्ध होईल.

विभा-पण एक समजलं नाही तू त्या मुलीला उडवलं हे त्याला कस समजलं.

जेहेन-नाही माहित.मला भीती वाटत आहे.

विभा-मी त्या हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस करून पाहते जिथे सेहेम ऍडमिट होती.

विभा हॉस्पिटल मध्ये गेली तिथे तिला एक अजून मोठी बातमी समजली कि सेहेम आई होणार होती.म्हणून त्याने अर्णव ला हि मारलं.विभा ने जेहेन सगळं सांगितलं.जेहेन ला अजून वाईट वाटत होत खूप वाईट.

*सुनावणीच्या दिवशी*

जेहेन-ह्या बाई ने मारलंय अर्णव ला ह्या हिने हि हि.जोरजोरात ती ओरडत होती सगळ्यांकडे बघून एकच बोलत होती हिने मारलंय मारलंय .डॉक्टरांनी तिला तपासलं आणि समजलं की तिच्या डोक्यावर परिणाम झालाय.

जेहेन च्या डोक्यावर केस चा खूप प्रभाव पडला होता,तिला मानसिक आजार झाला होता म्हणून तिला फाशी च्या ऐवजी रिमांड होम मध्ये ठेवण्यात आलं.

जेहेन ला तर शिक्षा भेटली पण गुन्हेगार कोण आहे हे समजायचं बाकी आहे .तो अदृश्य माणूस समोर तर येईलच आणि लवकरच येईल.