Sansaar - 2 books and stories free download online pdf in Marathi

संसार - 2

बैठक बसली, मुलाकड्च्या फार काही न मागता साखरपुडा आणि लग्न करून द्या एवढी मागणी केली . मुली कडची माणसे खुश जाहाली .आदित्य ही खूप खुश जाहाला .खरच त्याला रुही मनापासून आवडली होती .आणि तीच बायको म्हणून घरात यावी, अस त्याला वाटत होत . चार दिवसाने साखर पुड्या चा कार्यक्रम ठरवण्यात आला होता .रुहीचे बाबा आता घरी आले होते .त्यानी घरात ही बातमी सांगितली .सगळे खूप खुश जाहले . रुही सुधा ....पण, आता खरं टेन्शन होत . पैसे जमा करणे .चार दिवसात सगळं जुळवून आणणे. काहीही कमी न पडू देता, सगळं व्यव्सतीथ पार पडायचं, मुलीचं लग्न म्हणजे बापाच्या जीवाला घोर असतो . पण, म्हणतात ना, मुली ह्या बापाचं काळजी असतात, बाप काही न बोलता मुलीला त्याच्या मनातलं कळत . तसच रुहीला ही तिच्या वडिलांच्या मनातल कळलं होत . तिने तिच्या सेविंग मधील काही पैसे काढले .जवळ जवळ पणास हजार पर्यंत रक्कम असेल, ती तिने तिच्या वडिलांच्या सुपूर्त केली .तिने दिलेली रक्कम पाहून बाबांना काही समजेना .त्यानी तिला विचारले,.....हे पैसे कसले ,? यावर रुहीने उत्तर दिले, बाबा हे पैसे माझी थोड्शि सेविंग होती, त्याचेच हे पैसे आहेत . मझ्याकडुन तुम्हाला थोडीशी मदत ......यावर हसतच बाबा म्हणाले, ...माझं बाळ आज एवढं मोठं झलय की बाबांना मदत करायला लागलाय . , .....पण बाळा मला ह्या सगळ्याची काही अवष्क्य्ता नाही ...मी तूझ्या लग्नासाठी आधीच वेगळे पैसे काढून ठेवले होते . मुलगी जाहली, की तिच्या वडिलांनी पैसे बँकेत टाकावे ह्या मतांचा मी आहे ..... नाहीतर मग अश्या वेळी मुलीच्या बापावर रडायची वेळ येते ...एवढं बोलून ते पुन्हा हसू लागले ...पण बाबा अस का होत? रुहीने रडक्या स्वरात विचारले . तिच्या बाबांना रुहीच्या मनातील प्रश्न कळत होते .....तिला समजावण्याच्या सुरात ते म्हणाले, अगं .....ही रीत च आहे जगाची ....आणि मी ह्या मतांचा बिलकुल नाही, की स्त्री ला खूप सोसावे लागते ..तिला खूप जाच असतो .....अगं, ज्याप्रमाणे तूझ्या मनात लग्नामुळे जे चालले आहे, तेच विचार आदित्य रावांच्या मनात ही चालले असणार ....त्याना ही अस वाटत असणार, यनरी मुलगी आपल्याला आपल्या ह्या घराला समजून घेयील .ह्या नवीन वातावरणात अड्जस्ट करून घेयील का?आणि त्याचं प्रमाणे मुलाच्या आई वडिलांना ही चिंता असते .येणारी मुलगी ही चांगली असेल का? काडी काडी करून उभं केलेल्या ह्या संसाराला ती नीट जपेल का? आपण तिला आणि ती आपल्याला समजून घेयील . एक नाही हजार प्रश्न रोज पडत असतात .पण नात्यात पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे आपणच शोधायची असतात .आणि आपणच छोट्या मोठ्या गोष्टी मागे सोडून पुढे जायचं असतं . माणसे जपय्ची असतात . बाबाचं बोलणं ऐकून रुही बाबांना म्हणाली .बाबा मला जमतील ना .....माणसं जपायला... सगळ्याना समजून घ्यायला ..... यावर पुन्हा हसत बाबा म्हणाले, का? नाही जमणार ...नक्की जमेल .....आणि नाही जमलं तर आदित्य राव आहेत की तूझ्या सोबत ....ते तुला प्रतेक कामात साथ देतील, पण तूही त्याना तशी साथ दे ...म्हणजे तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होईल .रुही हे बघ बाळा .....माहेर च्या माणसांशी आपली नाळ जोडलेली असते, पण सासर च्या माणसाशी आयुष्य .ही जरी तारे वरची कसरत असली तरी, ती करण्यात आणि जिंकण्यात च मजा असते ....
बाबा पण लग्न झल्यावर तुम्ही मला विसरणार तर नाही ना , मी एथे कधी पण येऊ शकेल ना ....हे सगळं मझ्या साठी परक तर नाही होणार ना ... मी नोकरी करून तुम्हाला मदत करू शकेन ना? पुन्हा बाबा हसले, आता माहेर आणि सासर दोन्ही तुलाच सांभाळायचे, सासर सांभाळून तू अह्मला मदत केलीस तरी चालेल, पण सासर सांभाळून ....आणि हो, जर आपण मनापासून काही ठरवले, तर नक्कीच ते यशस्वी होते. असा विश्वास माझा आहे . बाबांशी बोलून रुहीला बरं वाटलं . आपण बाबानी सांगितल्या नुसार चांगला संसार करून दाखवीन . आणि त्यावेळी बाबांना मझा अभिमान वाटेल . बाबांना गुड नाईट म्हणून, ती झौपय्ला निघाली .बाबाचं बोलणं ऐकून काही वेळा पुरत का होईना तीच मन शांत जाहले होते .
तिने मनाचा फार गोंधळ न करता, शांत झौपय्च ठरवलं. जो साचा आपल्या बायका साठी दिलाय ना ज्याला नियती म्हणतात त्या साचा त स्वताला डहाळ्या च तिने ठरवलं . मनाने सगळं स्वीकरायच ठरवलं होत .
दुसऱ्या दिवशी सख्र्पुड्याचि जोरदार तयारी सुरू जाहाली. पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आली .जेवणाचा मेनू ठरवण्यात आला . रुही ही शॉपिंग ला गेली होती .नेहमी शॉपिंग करायला जाताना तिची आई तिला रागवायची, ओरडायची, पण ह्या वेळी ने तिनेच तिला काही पैसे दिले होते . सगळे जण तिचे खूप लाड करत होते . हे कौतुक ,हा लाड, हे प्रेम ह्या वेगळीच जादू असते . जे आज पर्यंत आपलं होत, ज्याच्यावर फक्त आपला हक्क होता, ते आता कर्तव्यात बदलणार होत .
सख्र्पुड्याचा दिवस आज उगवला .सगळे जण आवरून तयार होते .रुही ची बहीण आणि तिच्या घरची माणसे ही आले होती .पाहुणे माणसं घरात आल्यामुळे घराचं वातावरण च बदलून गेलं होत . रुहीची बहीण तिच्या मैत्रिणी तीच आवारत होते . तिला सुंदर साडी नेसवत होत्या . फेन्ट पिंक कलर ची साडी तिच्यावर अगदी उठून दिसत होती . त्यावर शोभेल अशी केसांची हैर्स्ट्य्ल.... मचिँग अश्या बांगड्या, त्याचबरोबर नेलपॉलिश, हातावर सुंदर मेहंदी..... सगळं खूप सुंदर होत .आणि हे सगळं घालून रुही पण अगदी नक्षत्रासारखी दिसत होती . तिच्या आईने मीठ मोहरी ने तिची नजर काढली . तिला ओवाळले. रुही ज्या गाडीतून हॉल मधे जाणार होती, त्या गाडीची पूजा केली आणि सगळे हॉल वर जायला निघाले .
हॉल खूप सुंदर सजवला होता, भरपूर फुले वापरली होती .सुंदर सुमधुर संगीत वाजत होते . ऐकायला खूप छान वाटत होते . रुही येताच नवरी च्या रूम मधे शिरली .तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी आणि तिच्या काही चुलत बहिणी ही शिरल्या . ईकडे मुला कड ची माणसे ही हॉल मधे आली .नवर देव येताच मुली कड ची माणसे त्याचं औक्षण करायला आली . मुलाक्ड्चि म्हणून, मुलाक्ड्च्या माणसा चा तोरा असतोच, आणि पदोपदी म्हणून, ते तो मिरवतच असतात. कार्यक्रमाला सुरवात जाहली .विधीवत सगळं सुरू होत . आदित्य आज खूप सुंदर दिसत होता . अगदी रुबाबदार .... आता रुही आणि आदित्य ह्या नी एकमेकाच्या बोटात अंगठी घातली .सगळ्यानी टाळ्या वाजवल्या .रुही आणि आदित्य नी एकमेकांना पेढा भरवला . नंतर सगळे फोटो काढायला गेले .रुही आणि आदित्य नी वेगवेगळ्या पोच देऊन फोटो काढले .रुही ने आज आदित्य ला नीट पाहिले .आज तिला आदित्य खूप आवडला .कदाचित जसं जसं आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत जातो .त्याच्या सहवासात जातो, तस तस आपल्याला ती व्यक्ती आवडायला लागते . आदित्य च्या प्रति तिने ऐक पाऊल पुढे टाकलं होत . आदित्य तर फुल्ल ऑन लट्टु होता, तिच्यावर, तो कोणाचं लक्ष नाही, हे पाहून तिच्याशी बोलायला बघत होता . सगळं कसं स्वप्ना सारखच वाटत होत .