Vibhajan - 9 books and stories free download online pdf in Marathi

विभाजन - 9

विभाजन

(कादंबरी)

(9)

मोहम्मदनं विचारलं,

"मी मुसलमान आहे हे कसं समजलं तुम्हाला?"

"तुम्ही एक दिवस पहाटेला नमाज पढत होते. या गोष्टीला बरेच दिवस झाले. "

मोहम्मद विचार करीत होता. त्या माणसांचा की जी माणसं हिंदू तर होतीच. तरीही ती स्वतःला हिंदू न समजता माणूस समजत होती.

देशात हिंसाचाराचा डोंब उसळला होता. पण आज एक वर्ष होवूनही हिंसा बंद झाली नव्हती. झारखंड कुठे ना कुठे दंगा झाला. अमुक ठिकाणी एवढी माणसं मारली गेली अशा बातम्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर मोहम्मदला परीवाराचीही चिंता वाटत होती. माझा परीवार कसा असेल का असेल वैगेेरेच्या चिंता सतावत होत्या. आपण दंगे जर पाहात बसलो तर आपला परीवार आपल्या दृष्टीस पडणार नाही असं त्याला वाटत होतं. तसा एक दिवस तो त्या हिंदू कुटूंबाला म्हणाला,

"मला आज जायलाच हवं. आज माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हा स्वातंत्र्याचा उत्सव मलाही माझ्या गावात, माझ्या परीवारासोबत मनवायला हवा. तेव्हा आपण मला जावू द्या. मी आपले उपकार कधीच विसरणार नाही. हं वाचलोच तर येईल एकदा भेटायला. तेही भारतात असलो तर...... "

हिंदू परीवारानं त्याला परवानगी दिली. तसा मोहम्मद तब्बल पाच वर्षानं आपल्या परीवाराला भेटायला निघाला.

देश स्वतंत्र्य झाला होता. सर्वांच्या मनात आनंद होता. पाकिस्तान बनला होता. त्याचबरोबर भारतही. आता प्रश्न उरला होता तो निर्वासीतांचा. भारतात कोणी राहावं आणि पाकिस्तानात कोणी राहावं.

दंगली सुरुच होत्या. त्यामुळं राष्ट्रीय सभेनंही स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच फाळणीला नाईलाजानं मान्यता दिली होती. त्यांना फाळणी मान्य नव्हती तरीही... ... .

स्वातंत्र्यानंतर निर्वासीतांचा प्रश्न निर्माण झाला होता. पाकिस्तानचं म्हणणं होतं की जर राष्ट्रीय सभेनं मान्यता दिलीच आहे तर मुसलमानानं पाकिस्तानात राहावं. हिंदूंनी भारतात. मग काय निर्वासीताचे ओंढे सुरु झाले होते. मुसलमान पाकिस्तानात निघाले होते तर कित्येक हिंदू भारतात येत होते. अशातच रेल्वेनं येत असलेल्या लोकांमध्ये कधीकधी चकमकी घडत होत्या. कशासाठी?तर त्याचंही एक कारण होतं.

हिंदूंना वाटत होतं की मुसलमानांमुळं आम्हाला आमची जन्मभुमी सोडावी लागली. तसेच मुसलमानांना वाटत होतं की या हिंदूंमुळं आम्हाला आमची जन्मभुमी सोडावी लागली. अशातच हे निर्वासीतांचे प्रश्न मार्गी लागतांना भयंकर मोठ्या प्रमाणात दंगली घडत होत्या. मुसलमानांनी तर मरेंगे नही तो मारेंगेचा नाराच दिला होता.

मोहम्मद रस्ता चालत होता. रात्रीची ती भयाण वाट. तोही दिवसभर चालायचा. दिवसा मात्र त्यालाही भीती वाटत होती. तसा तो लपून बसत असे. त्यानंही याच भीतीनं दाढी कापलेली होती.

भारत स्वतंत्र्य झाला तरी स्वातंत्र्यलढा अद्याप संपलेला नव्हता. ठिकठिकाणी दंगली, कापाकापी, बलात्कार यानं जनता त्रस्त झाली होती. काही केल्या दंगे क्षमत नव्हते. त्याची चिंता राष्ट्रीय सभेलाही लागली होती. त्याचबरोबर म. गांधींनाही. काय करावे सुचत नव्हते.

मोहम्मद चालत चालत आपल्या गावी पोहोचला. त्यानं पाहिलं की गाव शांत चित्तानं झोपलेला आहे. तसा तो घरी आला.

देशात दंगा भडकलेला असला तरी गाव मात्र आजही शांत होतं. मात्र एक प्रश्न त्यांना आज ही सतावत होता. तो म्हणजे निर्वासीताचा. कोण कुठे राहायला जायचं.

मोहम्मद गावात पोहोचला. तसा तो घरी पोहोचला. तशी शफिना झोपलेली होती. तिला बिलगून ती लेकरं झोपली होती. मोठी झरीना दहा बारा वर्षाची झाली होती. तर युसूफ सात आठ वर्षाचा झाला होता. त्या माऊलीनं आपली मुलं कशी वाढवली ही विचार करायला लावणारी गोष्ट होती.

मोहम्मद घरी पोहोचला. तसा त्यानं आवाज दिला.

"शफिना$$ शफिना$$"

शफिना गाढ झोपेत होती. आवाज ओळखीचाच वाटत होता. तशी ती उठली. तसा एक विचार चमकून आला. कदाचित मारणारा वैरी तर नसावा. कारण हिंदू मुसलमान दंगली उसळल्या होत्या. जरी गावात दंगलीचा प्रकार नाही. तरीपण कोणाचा काय विश्वास. तशी ती म्हणाली,

"कोण? कोण बोलताय आपण?"

"मी..... मी..... "

"मी! मी कोण? कोण हवंय आपल्याला?"

"मी मोहम्मद. तुझा पती. "

"पती! माझा पती अन् अर्ध्या रात्री!"

"होय अर्ध्या रात्रीच. दंगलीच्यानं रात्रीच आलोय. देशात दंगली भडकल्यायेत. लोकं एकमेकांना कापत सुटलेत. हिंदू मुसलमानांची कत्तल करीत सुटलेत. अन् मुसलमान हिंदूंची. म्हणून रात्रीलाच आलोय मी. "

"एवढे दिवस कुठे होते आपण?"

"आधी दार उघड. मग सगळं सांगतोय. "

शफिनानं दार उघडलं. तसा तो आतमध्ये आला. तसं शफिनानं पुन्हा दार लावून घेतलं. तशी ती म्हणाली,

"जेवलात की नाही?"

"नाही. मला आता विना जेवनाची सवय पडली. "

"म्हणजे?"

"अगं मला जेवन नाहीही मिळाले तरी चालते. "

"म्हणजे? मी समजले नाही. "

"अगं मी झाडाची पानं खावून बरेच दिवस जीवंत राहू शकतो. मी तशी सवयच केली. बरेच दिवस मी झाडाचाच पाला खात जीवंत राहिलोय. "

"पण माझ्या हातचं जेवन तुम्हाला नक्कीच आवडेल. "

"बरं वाढ शिल्लक असेल तर. नाही तर बनवत बसशील. बनवू वैगेरे नको. कारण मला तेवढी जेवणाची आवश्यकता नाही. तुझ्या हातचं तर आता दररोजच खायचं आहे. "

शफिनानं बनवलेलं व पातेल्यात शिल्लक असलेलं जेवन आणलं. ते त्याला वाढून ती म्हणाली,

"जेवा. बरेच दिवसापासून तुम्ही माझ्या हातची चव पाहिली नाही. "

मोहम्मद जेवू लागला. त्याचबरोबर त्याला मनात उद्भवलेले प्रश्नही विचारु लागला. तिही त्याची उत्तरं देवू लागली.

गाव कसं काय आहे?दंगे वैगेरे कसे काय आहेत?इत्यादी प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळताच गाव आपली मातृभूमी किती चांगली असं त्याला वाटू लागलं होतं.

रात्रीला कसाबसा जेवन करुन मोहम्मद शफिनासमवेत व मुलाबाळासमवेत झोपी गेला. असाच दुसरा दिवस उजळला.

दुस-या दिवशी मोहम्मद आल्याची बातमी गावात वा-यासारखी पसरली. तेव्हा अख्ख्या गावाला आनंद झाला. ज्या गावच्या लेकरानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचा बरावाईटपणा न पाहता टेलिफोनच्या तारा तोडल्या. त्या मोहम्मदला पाहायला अख्खं गाव येत होतं. कोणी म्हातारे कोतारेही येत होते. कोणी दोन चार प्रश्नही विचारत होते. पण त्या प्रश्नावर मोहम्मद मौन बाळगून होता. तसा तो येताच अख्ख्या गावाला आनंद झाल्यानं लोकांनी तो आनंद साजरा केला.

मोहम्मद गावात राहू लागला होता. दंगे देशात सुरुच होते. गावात यत्किंचीतही झळ नव्हती. मात्र गावातील लोकं अद्यापही शहरात जावू शकत नव्हती. कारण कोणाच्या केव्हा लक्षात पडेल व कोण कोणाला केव्हा ठार करेल हे सांगता येत नव्हते.

भारत स्वतंत्र्य झाला खरा. पण निर्वासीतांचा जो प्रश्न बाकी होता. तो प्रश्न काही सुटत नव्हता. मोहम्मदला त्याची झळ आजतरी पोहोचली नव्हती. पण फतवा निघाला होता की आता मिस्लिमांचं पाकिस्तान बनलं असल्यानं मुस्लिम ल लोकांनी भारतात न राहता पाकिस्तानात राहावं. तर पाकिस्तानात असणा-यांनी भारतात राहायला यावं. त्यानुसार काही लोकं रेल्नेगाडीनं तसेच बैलगाडीनं तर काही जण पायी स्थलांतरण करीत होते. मायभुमी सोडतांना तसेच आपल्या पुरखांच्या जागा सोडतांना त्यांच्या डोळ्यात पाणी साठत होते. तसं रस्त्यानं जाता जाता मरणाचीही भीती होतीच. त्याचबरोबर नवीन स्थळी कोठे राहू, काय खावू? हा ही प्रश्न होता.

लोकांजवळ देशांतर्गत राहात असतांना पुष्कळ दस्ताऐवज होतं. तेवढं सारं कसं घेवून जायचं हाही प्रश्नच होता. शिवाय भरपूर शेत्याही होत्या. ते सोडून जाणं कसं जमणार होतं. त्यातच ज्यांच्याजवळ काही नव्हतं, ते जात होते. तर ज्यांच्याजवळ काही होतं. त्यांचा प्रश्न होता. ते मात्र कसं करायचं?यावर विचार करीत होते. अशातच म. गांधींनी एक घोषणा केली. ज्यांना पाकिस्तानात जायचं असेल त्यांनी जावं. ज्यांना जावंसं वाटत नसेल, त्यांनी देशातच राहावं.

म. गांधींच्या शब्दाचीच लोकं वाट पाहात होते की काय कुणास ठाऊक. लोकांनी स्थलांतरण कमी केलं होतं. तरीही ज्यांना सुरक्षीतता वाटत होती. ते राहात होते. तसेच ज्यांना सुरक्षितता वाटत नव्हती. ते मात्र अजुनही स्थलांतर करीत होते. नव्हे तर हे स्थलांतर करतांना ज्या दंगली उसळल्या होत्या. त्या दंगलीचाच परिणाम की काय? कुणाचे मुलं बाळं देखील या स्थलांतरात हरवली होती.

जसा स्थलांतराचा प्रश्न बाकीच्या रहिवाशांना सतावत होता. तसाच प्रश्न मोहम्मदलाही सतावत होता. त्याचीही इच्छा देशातच राहायची होती. मोहम्मदची इच्छा नव्हती की स्थलांतर करावे. कारण ही त्याची पुरखाची भुमी आहे असं त्याला वाटत होतं. कित्येक पिढ्या त्याच्या याच मातीत गेल्या होत्या. स्वातंत्र्याची लढाई लढतांना त्याच्या पिढीनं तसेच त्यानंही याच भुमीत रक्त सांडवलं होतं. तसेच त्यानंही याच भुमीसाठी तारा तोडल्या होत्या.

म. गांधींनी नंतर जी घोषणा केली. ती घोषणा व्हायचीच होती. त्यापुर्वी मोहम्मद च्या घरी त्याच गावचे हिंदू बांधव यायचे. ज्यांचेशी त्याचे ऋणानुबंध होते. ते विचारायचे की मोहम्मद आता काय करणार?त्यावर मोहम्मद म्हणायचा,

"सरकारी आदेश आहे. जावंच लागणार. "

त्यावर लोकं त्याला त्याच्या मातृभूमीची आठवण देत. पण त्याच्याजवळ काय उपाय होता. अशातच ती दंगलखोर माणसे गावात आली. कुणीतरी त्यांना या गावात मुसलमान राहात असल्याची कल्पना दिली होती. ती कोणत्या धर्माची होती हे कळत नव्हतं. पण त्यांच्या एकंदर अवतारावरुन ते त्याला चेतावणी द्यायला आले होते. असे वाटत होते. त्यातच हे गाव त्यांनी खाली करावं अशी तंबी ते देवून गेले. त्यावेळी त्यांनी मोहम्मदला वेळही दिला होता.

मोहम्मदने त्यांचं न ऐकता तो गावातच राहिला. अशातच ती आंदोलनकारी माणसं एक दिवस पुन्हा गावात आली. तसा त्याला तो मोहम्मद गावातच दिसला. त्यामुळं की काय. आंदोलनकारी भडकले. तशातच एक आंदोलनकर्ता म्हणाला,

"तुम्हाला गाव सोडून जायला सांगीतलं होतं ना. "

"ज्यांना जायचं होतं ते गेले. आम्ही कशाला जाणार गाव सोडून?"

"तुम्ही काय मुजोरी करता काय? हा पाकिस्तान मागणं काय आम्ही म्हटलं. आमची मागणी होती की तुमच्या मुसलमानांची?"

"त्यात आमचा काय दोष?"

त्या आंदोलनकारींच्या हातात शस्र होती. त्यांच्या मनात राग धुमसत होता. तसा मोहम्मद म्हणाला,

"मी खाली करणारच नाही गाव. मी सत्याग्रही आहे. शिवाय मी या देशासाठी लढणारा देशभक्त आहे. "

मोहम्मद बोलत होता खरा. पण त्या बोलण्यानं आंदोलनकारींचा पारा पार भडकत चालला होता. त्यांना स्वस्थ वाटत नव्हता. अशातच एका आंदोलनकारींचा पारा वाढला व त्यानं ती तलवार त्यांच्या मस्तकावर लावली. तशी शफिना घाबरली. ती त्या आंदोलन कारींच्या पाया पडू लागली. मात्र यात मुलं घाबरली होती.

शफिना एकीकडे आंदोलनकारींच्या पाया पडत होती. तर दुसरीकडे मुलांना पळून जायला खुणवीत होती. अशातच मोठी मुलगी झरीना आपला भाऊ युसूफला घेवून घरातून निघून गेली.

आंदोलनकारींच्या आक्रमक पवित्र्याने घाबरलेली झरीना युसूफला घेवून रडत रडत तिथून निघून गेली.

गावातील मुसलमान समाज. या समद्या मुसलमानाला या आंदोलनकारींनी मारुन टाकलं होतं. त्यांनी क्षणभरही पुरेसा वेळ दिला नव्हता. अशातच युसूफला घेवून झरीना जात होती.

ते रक्ताचे पाट वाहात होते. आजुबाजूला शवांचा सडा पडला होता. ते शव आपल्याच माणसांचे होते. ते शव... ... जे शव मोजता येत नव्हते. अनेक शव ते. ते शव कशासाठी?असा विचार प्रत्येकाला येत असेल. जो तो हळहळत होता.