sutka part 4 books and stories free download online pdf in Marathi

सुटका पार्ट 4

एक जुनी पडकी खोली वजा डाक घर तिथं होतं, आत गेल्यावर कुणीतरी काम करताना दिसलं, ती करुकुरणारी खुर्ची त्यावर एक खाकी कपडे घातलेला जक्ख म्हातारा बसलेला होता. चष्म्यातून त्याला फार काही स्पष्टपणे दिसत असेल याची मला जरा शंका वाटली कारण दारात मी उभी असं ताना माझ्या कडे बारीक डोळे करून तो पाहत होता आणि सोबत म्हणत होता. “आला का रे राम्या, बरं झालं. मी का निघतो आता घरला. तू टाळा लावून टाक तेव्हढा.” असं म्हणून तो त्या कुरकुरणार्या खुर्चीतुन उठला. काका मी तुमच्या कडे काम होतं म्हणून आले आहे थोडी माहिती हवी होती, त्या जड भिंगाच्या चष्म्यातून त्याने पुन्हा एकदा मला निरखुन पाहिले.

“काम बीम काय नाई उद्या या आता पाच वाजले. आता नई व्हायचं काम.”

“काका जास्त वेळ नाही घेणार मी. फक्त पाच मिनिटे खूप लांबून आले हो. थोडी मदत करा.” मी केविलवाणा चेहरा करून उभी राहिल्यावर त्याने पुन्हा खुर्ची मधे बस्तान मांडत म्हंटल, “बोल.”

समोरचा मळका टेबल त्यावर काम पुरतीच जागा स्वच्छ दिसत होती आजू बाजूला पेपरचे गठ्ठे धूळ खात पडलेलं, आता नाही तरी म्हणा कम्युनिकेशनसाठी कोणी पत्राचा वापर करत नव्हते, आजू बाजूला पाहिल्यावर मला क्षणभर वाटलं की अजून एक गोष्ट आता आठवणीतली झाली. तेव्हा चटकन एक गोष्ट माझ्या लक्षात आली मी लोढू ला मी नाही सोशल मीडिया वर शोधू शकले पण त्याने प्रयत्न केला असं ता तर मी लगेच सापडले असं ते. त्याने का प्रयत्न केला नाही. कदाचित तो विसरला असेल; मला कदाचित तो ओळखणार ही नाही; होप सो, इथे कुठे त्याचा पत्ता मिळावा?

मी माझ्या पर्यंत पोहोचलेलं एकुलत एक पत्र त्यांच्या समोर धरलं. साधारण पंधरा महिन्या आधी मला ते पत्र मिळालेलं. ते अक्षर पाहून ते लोढूचच होतं हे मात्र मी खात्री ने सांगू शकत होते. ते वहीवर कोरून कोरून लिहायची त्याची सवय मला आज ही चांगली आठवते. ते दीड वर्षा आधीच पत्र पाहून त्या पोस्टमन ने काहीशी नाराजीने मान हलवली कारण त्याचे तपशील शोधायला त्याला ती धुळीत पडलेल अजून एखाद रजिस्टर चाळावं लागणार होतं. धूळ झटकून त्याने एक रजिस्टर खोलून त्यात पाहू लागला, मी त्याच्या समोर लोढूचा फोटो ठेवला. “हा इथे आला होता का? याला पाहिलं का कधी?”

त्याने फोटो नीट निरखुन पाहून नकारार्थी मॅन हलवली, “नाई बा.”

तो रजिस्टर मध्ये त्या पत्रा वरची तारीख शोधत होता, पण त्याला ती काही शोधता येईना, मी ते रजिस्टर स्वतःकडे खेचून घेतलं आणि पटापट सगळी माहिती चाळून पहिली. पण त्यात कुठेच मला हवी ती माहिती सापडली नाही.

“काका, यात तसली काही माहिती नाही. हे पत्र तर मला याच पत्त्यावरून आलं आहे. पण इथे तर याची कोणतीही माहिती लिहिलेली नाही. असं कसं?

“नाही का? मंग आमी नाई काई करू शकत. त्याने रे रजिस्टर खाडकन बंद केलं.”

“अरे यार काय? आता मी…”

पण उशीर ही खूप झाला आहे. उद्या येऊ परत असं म्हणून मी पुन्हा माझी राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी निघाले. ओह शीट, आता जायची सोय तर होईल ना. मला त्याचंच टेंशन आलं, पण कशीतरी गावातून एक शेवटची बस जात होती. सहा वाजता मला ती बस भेटली. अर्ध्या तासात मी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. भयंकर थकवा आलं होतं. थोडंस खाऊन तशीच झोपी गेले. हॉटेल नाही तर ते गेस्ट हाऊस होतं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना राहण्याची हि सोय होतं होती आणि मालकाला काही प्रमाणात पैसे ही मिळत असं ल्याने तिथे तशी बरी सोय होती.

सकाळी मी पुन्हा परत जायला निघणार होते. कारण गावात कुणालाच काही माहीत नाही म्हणून मग थांबून काहीच अर्थ ही नाही ना. सकाळी नाही म्हणून मी पुन्हा तिकडे जाऊन व्यवस्थित चौकशी करावी असा ठरवलं. सकाळी सकाळी उन्हाच्या तिरीप घरात यायच्या आत मी तिथं हजर होते. बराच उशिराने तो पोस्टमन आला पुन्हा त्याच म्हाताऱ्या पोस्टमन ने ऑफिस उघडलं, “राम्या मेला कुठं ताडमडलाय कोणास ठाऊक, असं काहीसं तो खिडक्या खोलता खोलाता बडबडत होता…”

“तुला सांगितलं ना एकदा की इथे माहिती नाही.”

“म्हणजे आम्ही काय करणार, पण काका शिक्का तर इथलाच आहे ना इथूनच ते पत्र आलाय आणि ते अक्षर ही माझ्या मित्राचंच आहे मला पूर्ण खात्री आहे. एकदा पहा काही माहिती मिळतेय का.”

“पण काही असेल तर मिळेल असा काहीसं तो पुटपुटला,” तरी माझ्या समाधानासाठी का होईना त्याने पुन्हा एकदा रजिस्टर चाळलं. “हे बघ मला तर आता जास्त काही आठवत नाही पण रामा माझ्या सोबत कायम असं तो त्याला एकदा विचारून पहा काही माहीत आहे का? काल पासून फिरकला नाही इकडं.”

“हा, कुठे भेटेल तो?” मला आता रामा ला भेटण्याची घाई झाली

“हा वाडी मधी कोणाला पण विचार पार त्याच्या घरी नेऊन सोडतील.”

कोणी तरी मला रास्ता दाखवत त्याच्या घरा पर्यंत आणून सोडलं, छोटसं झोपडीवजा घर होतं. सारवलेलं अंगण अंगणात कोंबड्या पळत होत्या. समोर मस्त फुलझाडं लावून ठेवलेली होती. एकंदरीत प्रसन्न वातावरण होतं तिथलं. अंगांत मस्त फुललेली तुळस आणि मातीने लिंपलेल्या भिंती असूनही स्वच्छ आणि सुंदर अंगण घराला घरपण देत होतं.

“कोणी आहे का घरी?” मी दोन तीन आवाज दिल्यावर एक म्हातारी बाहेर आली. मला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक ओळखीचं हसु आलं, मला बस मध्ये भेटलेली तीच म्हातारी होती ती. मला ही तिला पाहून बरं वाटलं, गाव किती छान असं त ना, प्रत्येक गोष्टीला आपल्यात सामावून घेतं. शहरात चारदा समोरून गेले तरी मख्ख चेहऱ्याने लोक पाहत राहतात. कोण कुठे दूर दूर पर्यंत ओळख नसलेली ही म्हातारी किती सुंदर ओळखीचं हसू आलं तिच्या चेहर्यावर. फक्त अर्धा तास प्रवासात सोबती होतो आम्ही. मला आत येण्याची खूण करून ती मला आत घेऊन गेली. घरात मोजक्याच सामानाची थाटणी होती पण अगं दी पद्धतशीर मांडणी आणि स्वच्छ घर मला जास्तच आवडलं.

“रामा कुठे आहे?”

मी विचारलेला प्रश्न तिला कळला असावा, पण तिने आधी चहा बनवते अशी खून केली, समोर चहा चा कप ठेऊन तिने खुणेने सांगितलं तो बाहेर गेला असावा बहुतेक.

“कधी येणार?”

तिने काही कल्पना नाही अशी मान हलवली. एक शेवटची आशा होती. पुढे काय करावं? अशा विचारांत हरवलेच होते की बाहेरून कोणीतरी आल्याची चाहूल लागली. तो रामाच होता. तो आल्या आल्या आल्या त्याला समोर बसवून मी ते पत्र आणी तो फोटो दाखवला. तो मात्र मला भेटलेला पहिला व्यक्ती होता ज्याने फोटोतल्या व्यक्तीला ओळखलं, “हा मॅडम मी वळकतो की यांना. येतात कधी तरी गावाला, श्रीयश साहेब नाव आहे त्यांचं.” रामा च्या तोंडून ते ऐकुन फार बरं वाटलं.

“आता कुठं भेटेल तो सांगता येईल का?”

“न्हाई बा ते नाही सांगता यायचं, तुम्हाला पत्र लिहिलं ते मलाच टाकायला लावलं होतं तव्हाच त्याची काही टिपणं तुम्हाला भेटली नाई. गेल्या वर्षी ते सहा एक महिने गावात हुत पण कोणाला जास्त काही माहीत नव्हतं अन आता माहीत बी होणार नाही.”

“म्हणजे?” मी आश्चर्यानं विचारलं.

म्हणजे आता ते कायमचे सोडून गेले गावाला, गावात त्यांच्या मालकीचा एक वाडा हाये कधी तरी येत असं तात पण आता येणं होतं नाही.