Prem mhanje prem ast..14 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रेम म्हणजे प्रेम असत- १४

प्रेम म्हणजे प्रेम असत- १४

प्रेम म्हणजे प्रेम असत- १४

रितू विचार करायला लागली...जय काय सरप्राइज देणार आहे? "एक गाडी? नाही.." मला कुठे चालवता येते चार चाकी.. मग अजून काय असेल?" रितू बराच वेळ विचार करत होती.. तिला एकदम क्लिक झालं.. "मे बी जय ने फॉरेन ट्रीप प्लान केली असेल.." हा विचार येता क्षणी रितू खुश झाली..

"फोरेन ट्रीप प्लान केली असेल तर बरीच खरेदी करायला लागणार.. जय बरोबर परदेशात फिरायला जातांना वेगळीच मजा येईल..." तिच्या चेहऱ्यावर हसू स्थिरावलं.. पण नंतर रितू च्या मनात वेगळाच विचार आला..

"जय ने फोरेन ट्रीप प्लान केली असेल असं वाटत नाही.. एक तर त्याला खूप कामं आहेत .. सध्या तर फार बिझी झालाय.. आत्ता इतक्यात फोरेन ट्रीप अवघड वाटतंय... आणि त्याच्या बोलण्यातून काहीतरी वेगळ सरप्राईज असेल असं वाटताताय..त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता पण तो आनंद वेगळाच होता..तो आनंद कदाचित फोरेन ट्रीप चा नसणार.. पण अजून काय असेल?" रितू ला एकदम ही गोष्ट क्लिक झाली..ती खुश झाली पण काय सरप्राईज आहे हे मात्र तिला कळेना.. बराच विचार करूनही ती कोणतीही निष्कर्ष काढू शकली नाही मग शेवटी तिनी विचार बंद केला आणि ती तिच्या कामाला लागली.... मध्ये मध्ये रितू विचार करत होतीच पण जय च्या सरप्राईज बद्दल तिला काहीही हिंट मिळाली नाही.. तिने शेवटी कंटाळून जय ला फोन लावला. जय लकीली यावेळी फ्री होता.. त्याने फोन लवकर उचलला,

"रितू.." इतक बोलून जय हसला..

"जय जय... आय अॅम मिसिंग यु... लवकर येशील आज?"

"हो हो.. काम झालं की लगेच निघणारे.. आज जरा महत्वाच काम आहे सो... बाकी काम करणात नाही हे आधीच सांगून ठेवल आहे.. खर तर आत्ताच निघणार होतो पण नाही निघता आलं.. आय मिस यु टू..."

"ओके.. ये लवकर मी वाट पहातीये... आणि जेवण झाल? आवडली आजची भाजी?"

"येस येस रितू.. तुझ्या हाताला खर चव आहे... आणि सॉरी... मी तुला आधीच सांगणार होतो पण जरा कामात अडकलो सो तुला फोन नाही करता आला.. प्लीज असं समजू नकोस की मला आता तुझं कौतुक नाहीये..." जय नेहमीच रितू चं मन जपायचा.. त्याच्या आयुष्यात रितू साठी एक वेगळेच स्थान होते.. आपल्यामुळे रितू कधी दुखावली जाऊ नये ह्या साठी जय नेहमीच प्रयत्न करायचा.. जय नेहमीच मनापासून बोलायचा.. त्याला छक्के पंजे कधी माहितीच नव्हते... सरळ साध आयुष्य जगण्याकडे त्याचा नेहमीच कल असायचा.. जय च बोलण ऐकून रितू ला गलबलून आलं,

"ए जय, मी कधी तुझ्याकडे कम्प्लेंट केली आहे? तू वेडा आहेस का रे.. आय नो तू किती बिझी असतोस. मी वेळ देत नाहीस असं कधीही म्हणणार नाही.. तुझ्यासाठी तुझा जॉब खूप महत्वाचा आहे ह्याची मला जाणीव आहे..."

"आज नो अश्रू रितू... आज आपल्यासाठी इतका खास दिवस आहे... मला रितू अजून छान कळली.. लव्ह यु सो मच रितू!! आपली माणस जवळ असली की करतो ते काम मनापासून केल जात...बाय द वे, एनी गेसेस अबाउट माय सरप्राईज?" जय ने रितू ला हसत प्रश्न केला..रितू ने सुद्धा थोडा विचार केला आणि ती बोलायला लागली..

"हो हो.. मला सुद्धा एक हळवा आणि हळवा असून खूप खंबीर असलेल्या जय बरोबर सुंदर क्षण अनुभवता येतायत... ओह हो... काय आहे जय तुझं सरप्राईज? ते मला कळल? कसल काय.. सकाळ पासून विचार करतीये.. पण तुझ सरप्राईज काय असेल त्याचा अंदाज नाही येते... तू इतकी जाहिरात केलीस... म्हणजे फालतू काही नसेल.. तू काहीतरी खूप भारी ठरवलं आहेस असं वाटतंय पण मला काही लिंक लागत नाहीये....सो हिंट तरी दे.." रितू हसत बोलली.. जय मात्र वेगळ्याच मूड मध्ये होता..

"तुझ्या सरप्राईजच्याच कामात बिझी आहे बघ आज... मल खात्री आहे की तू अश्या सरप्राईज ची कल्पना देखील केली नसशील.. पण तू खुश नक्की होणार ह्याची तर मला खात्री आहेस.."

"हो.. मग सांगून टाक की जय..."

"अ ह.. संध्याकाळ ची वाट पहा मॅडम.. आणि मी फोन बंद करतो... कामं पूर्ण करून लवकर घरी यायचं आहे संध्याकाळी..." जय इतक बोलला आणि याने लगेच फोन बंद केला.. रितू फक्त हसली.. असा कसा माझा गोड जय... आता वाट पाहण्या वाचून नो पर्याय... सो लागा कामाला.. आणि जय ला खुश करण्यासाठी काहीतरी प्लान करा..छान सरप्राईज हवं असेल तर थोडी वाट तर पहावीच लागणार..." रितू स्वतःशी बोलली... आणि हसली...

संध्याकाळी जय ला यायला उशीर झाला... दिवसभर दमून आला असेल म्हणून रितूनी काही बोलण टाळल.. तिनी जेवण वाढल.. तिनी स्वतः जय ला आवडणारे सगळे पदार्थ केले होते.. जेवणाच्या टेबल वर जय आला आणि त्यानी त्याच्या आवडीचे पदार्थ पाहिले आणि तू खुश झाला...खुश होऊन त्यानी बोलायला सुरुवात केली,

“मी तुला सकाळी म्हणाल होतो ना सरप्राइज बद्दल? सांगू काय सरप्राइज आहे? तू काही गेस केलास काही सुचल?? आणि गिफ्ट काय हवय?”

“इतके प्रश्न? तू खूप excited वाटतो आहेस... येस.. सरप्राईज काय ते ऐकायचं आहे... पण तू आधी जेव जय.. दिवसभर कामात होतास.. फ्रेश हो मग आरामात बोलू....”

“हो हो.. जेवतो! पण आपण जेवता जेवता बोलू शकतो... आणि थॅंक्स..माझ्या आवडीचे पदार्थ तू केलेस... स्वयपाक मस्त झालाय!!! आणि आता सरप्राईज काय असेल सांग!!! तू सुद्धा खुश होशील सरप्राइज ऐकून सो आत्ताच सांगायचय... मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पहायचाय! तुला काय सरप्राइज असेल त्याची आयडिया आली?”थोड उत्साहित होऊन जय बोलला....

“नो अरे... मी खूप विचार केला... पण काही कळल नाही... गेस नाही करू शकले.. तूच सांग! आणि गिफ्ट काही नको रे... तू नेहमी असतोस माझ्या बरोबर तेच माझ्यासाठी गिफ्ट!!”

जय च्या चेहऱ्यावर हसू आल आणि त्यानी बोलायला सुरु केल, “ओह हो.. म्हणजे माझा खिसा कापायचा काही विचार नाही तुझा! गुड गुड..”

“मी तुझा खिसा कधी कापते ते? हाहा”

“बर.. ते बोलू नंतर! आधी सांग,तुला बाळांची खूप आवड आहे ना? तुला एक बाळ हव होत ना?”

“येस.. मला बाळ हव आहे.. पण मी तुला आधीच सांगितलय,माझ आयुष्य किती आहे ते माहित नसताना फक्त मला हवय म्हणून बाळाला जन्म देऊन वाऱ्यावर नाही सोडू शकत...मला ते पटत नाही.. सगळ्यांना बाळं आहेत मग मला पण बाळ हवय असा माझा अट्टाहास नाही.....मी परिस्थिती मान्य केलीये आणि ह्या निश्कार्ष्यावर आली आहे.. स्वत:च्या नसत्या हट्टापायी मी अशी कधीच वागणार नाही...”

“आय नो रितू.... तुझ्या मनातून कधीही मरण येऊ शकत हे गेलेलं नाहीये! मी तुझ्या मनाविरुद्ध काही वागणार नाहीये... आणि मी तुला आपल बाळ हव अशी कधी म्हणलो? डोंट वरी! तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही!!”

“मग कुठून आणणार बाळ? तू दुसर लग्न करतोस का काय? मग २ आया एका बाळाचा सांभाळ करणार..अस काही?”

“वेडी आहेस का? मी दुसर लग्न करेन असा विचार कसा केलास तू? मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो..मी तसा कधी विचारही करू शकत नाही..”

“सॉरी..” रितू ला आपण चुकीच काहीतरी बोललो हे जाणवलं आणि ती रडवेली झाली...

“तू ऐकणार आहेस का माझ पूर्ण बोलण?”

“हो.. बोल तू..मी ऐकतीये!”

“मग ऐक शांतपणे.... माझ बोलण पूर्ण झाल कि तू बोल...मला मधे थांबवू नकोस... प्लीज!!!”

“ओके... नाही बोलत मध्ये.. आणि काही गेस पण करत नाही!”

क्रमशः

Rate & Review

AAditya Puranik

AAditya Puranik 3 years ago

Payal Waghmare

Payal Waghmare 3 years ago

Arati

Arati 3 years ago

VaV

VaV 3 years ago