A collection of ideological struggles ... books and stories free download online pdf in Marathi

वैचारिक संघर्षाचा संग्रह...

अनोळखी सुखाची वाट!

कळत जरी असले सर्व मला,
तरी नकळत मन तुझ्यात गुंतते......!
का, कुणास ठाऊक ओढ तुझीच लागते...?
भेटले मुद्दाम ही खंत होती मनाशी,
पण, तूही केला माझा सहवास पसंत सांगावे मी कुणाशी...?
वेळ जात होती अगदी तिला हवी तशी..
वर्ष झाले तुला ओळखते मी जशी...!
कारण, शोधत होते वाट मी अनोळखी सुखाची!
दिवस नसेल कोणता, ज्यात तुला मी नसेल शोधले..
तुला हव ते करण्यात मी अंतःकरण वेचले..
मन दुखावलं असे कदाचितच घडले..
कारण, तू माझे सर्व लाड पुरवले...
अनोळखी शब्द मी माझ्या शब्दावलीतून पुसले..
कारण, मला सख्या नेहमीच तुझे सहवास हवे से वाटले...
असेल तुझ्याही मनात काही शंका..!
नको करुस सख्या त्याच्या कुशंका..
मी आहे तशीच राहणार..! न मी बदलणार, न दूर जाणार...!
नाही केली सख्या कधीही कोणती अपेक्षा मी तुझ्याकडे...
दिलं सर्वस्व होत जे काही माझ्याकडे...
निसंदेह, तुला ते वाटले असेलही स्वार्थ!
पण, सख्या नव्हतं रे ते निरर्थ...
प्रत्येक भेट होती माझ्यासाठी एक आस..
कारण, मला हवा होता तुझाच सहवास......
कालांतराने वाटत असेल तुलाही वागणे माझे कंटाळवाणे....!
पण, अनोळखी सुखाची वाट शोधत होते मन माझे हे शहाणे....
वाट जरी अनोळखी असली! तरी, होती ती सुखाची..
जाऊन माझ्यापासून दूर, नको करुस सख्या ती दुःखाची...
तुझ्याविना जीवनाची कल्पना वाटते मला अपुरी..
नको जाऊस, सख्या दूर सोडून
अनोळखी सुखाची वाट ही अधुरी......!
नको जाऊस, सख्या दूर सोडून
अनोळखी सुखाची वाट ही अधुरी.............!



************************************************



मी रोज नव्याने.....



मी रोज नव्याने स्वतःस उमगते
नाही दुसऱ्या कुणात, मी स्वतः माझ्यात गुंतते....
आनंद असतो गगनात मावेनासा
रोज असतो फक्त सहवास स्वतःचा....
नसते वाट कुणाच्या येण्याची
स्वतः बनावे उमेद स्वतःच्या जगण्याची....
कुणी येऊन, न करावे स्वप्न आपले अस्तव्यस्त
आपणच जपावे, जगावे त्यांना होऊन मस्त....
का द्यावा इतका मान कुणास
की, दुखावतील नेहमीच ते आपणास....
राहावे दूर नकारात्मक भावाच्या
जो करतो निंदा, ज्याच्या - त्याच्या....
एकदा जगून बघा,
अनुभवा आणि जगा या सहवासात....
तुम्हालाही लागेल,
स्वतःच्या स्वप्नांची आस....😎☝️


************************************************



खरी शोकांतिका....


स्त्रीयांची गाथा आहे अबोली,
सुशिक्षितांनीच दिली ही कबुली..
नेहमी तिलाच डावलून पडला तिचा विसर,
तिच्या कर्तृत्वाचा झालाच नाही कुणावर असर..
पुरोगामी म्हणवून मिरवणारे स्वघोषित, स्त्रिधार्जीने अव्वल,
कुणी का करू नयेत त्यांना स्त्री - सशक्तीकरणाचे सवाल..
महाराष्ट्र नव्हे देशातही तेच हाल,
कुणास माहीत, लागतील अजून किती साल?
राष्ट्रपातळी जरी गाजली स्त्री - सुरक्षेने,
तरी, स्त्री अजूनही का धास्तावते असुरक्षिततेने..?
पैशांसोबत तोलला जातो देह तिचा,
पण, घरकामात राबण विषय नाही संभाषणाचा..!
नेहमी विचारतो एक प्रश्न प्रत्येक जण,
स्त्रियांचा नेमका वाली तरी कोण?
नसेल जरी कुणी तुम्हास वाली,
तरी, नका राहू दुसऱ्यांच्या तुम्ही हवाली..


स्त्रिया कधीच काही बोलणार नाहीत या आत्मविश्वासानं त्यांच्यावर घरोघरी अन्याय होतच असतात...आणि चांगल्या सुशिक्षित घरात सुद्धा हे बघायला मिळतेच...ती घरच्यांसाठी कितीही झटत असली तरी, "ती दिवसभर करतेच काय घरीच तर असते" हीच मानसिकता प्रत्येकाची असते...

आम्ही पुढारलो अस समजून, जे "स्त्रियांचा विचार आम्हीच करतो" अस म्हणतात....मग त्यांना का बर आज स्त्री ही खरंच सशक्त आहे का हा प्रश्न कुणी विचारू नये...? आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर देश पातळीवर सुद्धा सारखीच परिस्थिती असल्याचे दिसते...आणि ती परिस्थिती बदलायला किती वेळ लागेल हे सुध्दा अनुत्तरीतच आहे...

राष्ट्र पातळीवर स्त्री सुरक्षितता बाबत बोललं जातं.... अगदी संसदेत बलात्कार, एसिड अटॅक त्याचप्रमाणे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार बाबत बोललं जातं....पण, कृती होताना मात्र दिसत नाही....स्त्री ही एक उपभोगाची वस्तू म्हणूनही तिचा उपहास केला जातो.....पण, घरात ती ५६ तास प्रती आठवडे जरी मोफत सेवा देत असली तरी तिच्या ह्या कामाबाबत कुठेही वाच्यता केली जात नाही....

जरी स्त्रियांना कुणी वाली नसेल तरी आज गरज आहे त्यांनी स्वतः धाडसाने पुढे जाण्याची.......

कवितेचा अर्थ मी मुद्दाम खाली स्पष्ट केलाय कारण, बहुतेक वेळा होतं अस... की, लेखक लिहतो एक आणि वाचक त्याचा अर्थ वेगळाच काढून अर्थाचा अनर्थ होऊन जातो.....म्हणून अर्थ समजावण्याचा हा छोटा प्रयत्न..... आपणा सर्वांसाठी......🙏🙏✍️


************************************************




वर्चस्व....


कोण आणि का, आपल्या प्रयत्नांना छळतो!
का त्यांना आपल्या प्रयत्नाचा मार्ग अडतो....?
का उपहास होतो, एका सामान्य माणसाचा!
का कुणालाच मान्य नसतो मार्ग, त्याच्या ध्येय प्राप्तीचा....?
एखादा असेल अबोल तर, का होत नाही सहन!
सतत त्याच्याच विषयी, का करतात हे चिंतन....?
म्हणवून घेतात स्वतःस ते इतरांचे वाली!
त्यांच्या आचरणात का नसते सहिष्णू शब्दावली....?
करतात दुसऱ्यांचा, सतत अपमान!
का असावा त्यांना, हा अपमानाचा मान....?
स्वतःमधील दुर्गुण दुर्लक्षित करुनी!
गाजवतात वर्चस्व नेहमीच, दुसऱ्यांचे हक्क मारुनी....?

✍️


************************************************



चुकीचं असतं का.❓....एका सामान्य पुरुषाचे सोपे प्रश्न❓😓

हक्काचं कुटूंब असण्याची, इच्छा बाळगणं चुकीचं असतं का?
बायकोचे प्रेम फक्त माझ्यावरच असावे ही इच्छा मनात असणं चुकीचं असतं का?
मुलांनी शिस्त जोपासावी, म्हणून कठोर वागणं चुकीचं असतं का?
बायको - मुलांच्या सुरक्षेसाठी घरी परतण्याच्या वेळेचे बंधन घालणं, चुकीचं असतं का?
बायकोला दुसऱ्या कुणाच्या तरी मोहात पडून, फसवणूक होण्यापासून वाचवणं चुकीचं असतं का?
सगळ्या परिस्थितीची जाण असल्याने कुटुंबाच्या सुरक्षिततेची इच्छा मनी बाळगणं चुकीचं असतं का?
जर, हे चुकीचं असतं...
तर, मग सामान्य पुरुष म्हणून जगणही चुकीचंच ठरेल....नाही का!
कारण, याच आधारावर एक सामान्य पुरुष जगतो.....आणि संकटावेळी अश्रूंचा बांध आमचा देखील फुटतो.....

मग तो बांध फुटण, चुकीचं असतं का??

नेहमीच स्त्रिविषयी प्रत्येकच जण, लिखाण करत असतो...मी सुद्धा त्याला अपवाद नाही....पण, आज एका सर्वसामान्य पुरुषाने विचारलेले काही सोपे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतेय....जुळवून घ्याल हीच मनात निस्वार्थ इच्छा....😌🙏

अर्थाचा निरर्थ होऊ नये हीच आदराची विनंती.....🙏😌

कृपया नोंद घ्यावी....✍️


***********************************************



एक शिकवण..❗



कधी - तरी मन उदास व्हावे
त्याला घेऊन कुठेतरी दूर जावे..
नसेल जिथे कुणी, जीवनातील आगंतुक
म्हणेल कुणी मनातील स्वप्नांना, अमुक - तमुक..
जावे कधी दूर, दुनियेत पक्ष्यांच्या, अनुभवावा आस्वाद त्यांच्या असण्याचा..
अनुभव घेऊन परतावे, त्यांच्या दिवस - रात्रीच्या जगण्यासाठीच्या धडपडीचा..
माणूस नाही, तर हेचं मुके जीव, देतील शिकवण संकटांना तोंड देण्याची..
न थकता, न पडता, न हरता नेहमी प्रयत्नरत राहून स्वतःचे ध्येय गाठण्याची..



************************************************



जणमानस...⁉️

पुरामुळे झालीय लोकं हवालदील
महावितरणने देखील केलं नाही कमी बील!
काय ती शोकांतिका काय ते प्रश्न
काय ती शोकांतिका काय ते प्रश्न
फरक पडतो का कुणाचं असणं - नसणं?
का झालेत लोकं इतके निर्दयी
जे कधीतरी जपायचे मणुसकी हृदयी
खून, बलात्कार, पाशवी वृत्ती
खून, बलात्कार, पाशवी वृत्ती
कधी बदलेल, सांगा बघू ही प्रवृत्ती?
अभ्यास करून थकलाय विद्यार्थी
आता म्हणे होणार नाही आज्ञार्थी
का होते निरुत्साही मन
का होते निरुत्साही मन
कोरोना काळी संकटात प्रत्येक जण.


************************************************




वंचितांचा बाप...


अंधारात पेटतो दिवा धिमा - धिमा,
संसार उजेडात नेणारा तोच माझा भीमा..
नव्हती जरी घरी भाकरी खायला,
भीमा मागे हटला नाही कधी मेहनत घ्यायला..
सिद्ध केले स्वतःचे व इतरांचे अस्तित्व ज्याने,
काटेरी वाटेवरील मिळालेल्या जखमाही तोच जाणे..
समाज काय म्हणेल हा प्रश्न नव्हताच मनी,
कारण, सर करायची होती मोठी वाट अनवाणी..
स्व:सुख ज्यास कधी ना मान्य झाले,
याच निस्वार्थाने वंचित प्रवाहात आले..
ज्यांचा स्पर्शही होता किळसवाणा प्रकार,
अश्या प्रतिगामी विचारांना दूर सारून देऊ केलेत त्यांना अधिकार.....
वंदनीय,
डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर,
यांना शत् शत् नमन.....



************************************************



सखे...

का ग सखे आज धीर तुझा सुटला!
तुझा विश्वास जिंकणारा मागे का हटला....?
आज तर तुझ्या अश्रूंचा बांधही फुटला!
मनातील ज्वालामुखी नकळत आज पेटला....!

तुझे अश्रू मला आतून बोचले!
एकच प्रश्न, तू ते कसे सोसले....?
का झालीय तू मानसिक परावलंबी!
निर्णायक होऊन बन तू स्वावलंबी....

नसेल पटत इतरांचे खोचक बोल!
तू माझ्याजवळ तरी, तुझे मन खोल....
किती सहनशील तु ग झालीस!
त्यांचे वर्चस्व नेहमीच वाहत आलीस....

सोड अबोला, कर तुझ्या प्रश्नांचे निरसन
करून खात्री, होणार नाही त्याची अडचण....
स्व:त्व जपून नेहमीच सखे तुझे
सार्थक करेल, निस्वार्थ प्रेम माझे....❣️

✍️☝️😊

😘❣️....Dear Asmi....❣️😘


***********************************************



लव्ह यू जिंदगी.....


लाईफ किती कन्फ्युझिंग असते ना...😣😣....जस, आपण तिच्याबाबत विचार करतो.....🙄 तस, कदाचितच कुणाच्या बाबतीत होत असावं.....😓...कारण, माझा अजून तरी तसा योगायोग आलेला नाही....😁...लहान होते तेव्हा, लोकांनी मी शांत म्हणून, माझं नाव त्याचप्रमाणे ठेऊन दिलं...कुणाला माझे डोळे आवडले म्हणून, माझं नाव "नैना" ठेऊन दिलं....मग त्यातही वाटणी करण्यात आली बरं का....!! एक नाव हे हिंदू लोकांसाठी आणि एक हे मराठी लोकांसाठी....🤦🤷😂

असाच प्रवास सुरू झाला...घरचे विचार अतिशय प्रतिगामी......🥴 मुलींनी, जीन्स घालू नये....पासून ते मुलींनी, मुलांशी बोलूच नये......🤷 पर्यंत त्या कुचकामी विचारांनी मजल गाठली....🤐.....पण, काय असतं ना, घरचे हे घरी असतात.....कॉलेज - शाळा आपल्याला बघावी लागते त्यामुळे, त्यांनी सांगितलं ते कधीही चुकीचं होतं...... अस, मी म्हणत नाहीच.......पण, वेळेनुसार त्यांनी त्यांचे विचार मात्र बदलायला हवे होते.......☝️ अस मला वाटतं........मग काय.......!!. वेळ आली, मुलांशी बोलण्याची तेव्हा आपण किती रागीट हेच दाखवून मुलांशी बोलणं व्हायचं..... कारण, मग मुलं लाईन मरतात, मागे लागतात इतपत आपल्याला पटणारं मुळीच नव्हत..... कारण, मग आपलं डोकं फिरलं की, आपण कधी मुलांना उचलून, फिरवून 🤼🏋️ फेकून देऊ हेच आपल्या नियंत्रणात नव्हत...😂😂

नंतर - नंतर ओळखी झाली, ती जवळच्या मैत्रीच्या व्याख्येची.... विश्वास तर बसत नव्हता......😒 पण, हेवा वाटायचा... सगळ्यांच्या मैत्रिणी असतात, आपलीही असावी.......म्हणून, बळजबरी म्हणा किंवा काही.....🤷 केली मैत्री आणि निभावली देखील.... पण, कुणास माहिती असतं..... आपण, ज्या कायद्यांच्या मर्यादा जपतो त्याच मर्यादा तोडण्यात पुढचा उत्सुक असतो.... म्हणून, काही बालिशपणामुळे माझ्या जवळच्या मैत्रिणीला वाटले........ मी तिचं सुख हिरावून घेते आणि मग तुटली एकदाची मैत्री....... मनाला एक आनंद ही होऊन गेला...... की, जीवनात जी व्याख्या आपल्याला कधीच नको होती.......☝️😎 त्यात आपण पडलो खरे पण, ती खरंच आपल्याला नको होती हे सिद्ध झालं.........😂

नंतर ठरवलं, आता फक्त अभ्यास करूयात कशाला उगाच लोकांशी जुळवून घेऊन, स्वतःच्या मनात ज्या पवित्र व्याख्या आहेत.... त्याबद्दल उगाच नकारार्थी भाव आणायचा..?? म्हणून लागली अभ्यासाला..... पण, काहींना मी एकटी बघवत नव्हतीच......🥴😓 मग आली एक "जवळची मैत्रीण " या व्याख्येखाली मला दुखवायला....काही वर्षे होतो सोबत........ पण, मग मला जे काही चांगलं मिळत होतं ते तिला बघवत नसे किंवा तेच आणि तसच तिलाही मिळावं हीच तिची धडपड असायची...... या आणि अश्या हव्यासापोटी तिने मला दिसावं म्हणून काही - काही (ती प्रभावी भासवण्याचा, अपयशी प्रयत्न!!) करू लागली.... पण, मला त्यात रस नव्हता.... कारण, माझं ध्येय हे फक्त तिथपर्यंत मर्यादित नव्हतच..... हे तिला तरी कोण सांगणार ना??

तर, म्हणून म्हणते मी लाईफ बोहत कन्फ्युज है बॉस...... इसे सही ढंग से जो जिये वो जी जाए...... इसलिये, एन्जॉय करते रहना चाहिए....... किसी को दिखाने के लिये नही......☝️😎 बल्की खूद की मन की शांती के लिये.....😊😊



************************************************



स्वार्थी मैत्री.....


कोण म्हणतं मैत्रीत स्वार्थ नसतो...... त्यातही स्वार्थ असतोच....कारण आपण इतरांकडून त्याने/तिने कस वागावं हे ठरवतो..जर का, मग ते आपल्या आखून दिलेल्या आराखड्याच्या विपरित वागले... तर, मात्र आपण त्यांच्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतो... आणि त्यांना दोष देत बसतो...
माझ्यासोबत देखील काहीसं असच घडलंय..😔
मी खूप अपेक्षा ठेवल्या की, आपली मैत्री आपण टिकवू मग कुणीही का नको येऊ देत आपल्यात. पण, समोरच्या व्यक्तीला दुसऱ्याचं प्रेम हवं होतं हे मला कळलंच नाही... आणि झालो आम्ही दूर.. तिथून विचार केला की, आता बास...✋ आता नाही करणार मैत्री.. पण, परत कुणी आली "मैत्रीण" म्हणून...पण, आता आधी सारखे आराखडे न आखता मी जस सुरू होतं तसं सुरू ठेवलं.....पण, आता आधी पेक्षा माझं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी झाल्याने माझ्या सोबत "जी" कुणी होती "ति" ला ते डोळ्यात खुपायला लागलं होतं....आणि तिची नेहमी तक्रार असायची की, "बाकीचे तुलाच का इतके प्रेमाने बोलतात मला का नाही?" आता याचं उत्तर मात्र माझ्या कडे नव्हते..🙄 करण, एखाद्याच्या प्रश्नाचं उत्तर तर आपण देऊ शकतो... पण, एखाद्याच्या मूर्खपणाचे नाही....मग आयुष्यात कुणी आपल्याला आवडण्याचा क्षण ही आला पण, तेच "ती" च मधात येऊन भडकावण्याचे काम सुरूच होते... आणि मी मैत्री जपण्यात कसलीच कसर सोडत नव्हते.....
मग हळूहळू तिने ही इतरांना प्रेमाची भिक मागण्यास सुरुवात केली.. "घरचे तिला प्रेमच करत नाही" हे सांगून इतरांना आपल्या कडे आकर्षित करू लागली.. खोटं बोलू लागली...हे मला कळत होते पण, मैत्री प्रिय असल्याने मी शांत होती....मग माझ्याच एका जवळच्या मित्रासोबत सुध्दा "ती" ला थोडा वेळ घालवायचा होता कारण, त्याच माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं आणि हे कसं तिला पचणार!?
मग सुरू झालं प्रेमाचं नाटक.... त्याला वेगळं बोलण मला त्याच्याबद्दल वेगळं सांगून भडकावन सुरू होते.. परंतु आता मात्र माझा संयमाचा बांध फुटला होता कारण, माझ्याच एका जवळच्या मित्राबद्दल नको ते ती बोलत असे....आणि शेवटी मीच आमच्यातील न आखलेला पण, माझ्याकडून तितक्याच आपलेपणाने जपलेला आराखडा मिटवून शेवटी तिला स्वतःपासून दूर केले आहे.....नको मला अशी मैत्री जी स्वतः धोक्याची पातळी ओलांडून आपल्याला त्या गोष्टीबद्दल दोषी ठरवेल....😠😠

आता मी एकटीच आहे आणि नेहमी एकटीच असेल.....
नकोय मला त्या खोट्या थापा....
"अपन अच्छे दोस्त है... हमेशा ऐसे ही रहेगे"
म्हणणाऱ्या.....😠✋

🥰🤗☝️
🥰🤗✍️👇


***********************************************

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏