Tujhi Majhi yaari - 12 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 12

सुट्टी मध्ये सरु तिच्या मावशी कडे मुंबई ला गेली.अंजली मात्र सुट्टी मध्ये घरीच होती ती कुठेच गेली नव्हती.अंजली ला वाचनाची खूप आवड होती त्यामुळे सुट्टी मध्ये ती गावातील वाचनालयातील पुस्तके आणून वाचू लागली .सरु ला जाऊन दहा पंधरा दिवस झाले होते .सरु ने अंजली ला आपल्या मावस भावाच्या फोन वरून फोन केला.अंजली च्या घरी लॅन्ड लाईन फोन होता .फोन अंजली ने च उचलला.

अंजली : हॅलो..

सरु : अंजली मी सरु बोलतेय ..

सरु चा आवाज ऐकून अंजली खुश झाली ..

अंजली : सरु... नालायका ..जाऊन दहा पंधरा दिवस झाले ..आणि आज फोन करतेस?

सरु : सॉरी अंजली अग दादा कामाला जातो ना त्याला सुट्टी नसते आज सुट्टी आहे म्हणून त्याचा फोन भेटला म्हणून केला फोन ...अंजली कशी आहेस ?

अंजली : बर बर ठीक आहे. ..मी मस्त आहे तू कशी आहेस ?

सरु :मी पणं मजेत आहे मावशी कडे..

अंजली : अरे तुझी मजाय मग ..सरु कुठे कुठे फिरायला गेली होतीस ग ?

सरु : मी ना.. अग गेले होते दोन तीन ..ठिकाणी ..पणं मला नाही लक्षात ..

अंजली : अशी कशी ग तू वेडी सरु..

अंजली हसू लागली ..

सरु : अंजली हसू नको ना. अग इथ खूप वेगळं वातावरण आहे..खूप गर्दी असते इथे..आणि वरून इथे सगळे दरवाजे बंद करून आप आपल्या घरात बसतात..कोणी कोणाशी जास्त बोलत ही नाही..

अंजली : अग शहरात असच असत वेडी..बर कधी येणार आहेस ?

सरु : अजून थोडे दिवस तरी नाही..निकालाची तारीख जवळ आली की येईन .

अंजली : लवकर ये ना सरु ..मला तुझी खुप आठवण येते..

सरु : हो ग मला ही येतेय तुझी आठवण ..ठीक आहे मी जरा लवकर येईन..

मग थोडा वेळ गप्पा मारून दोघींनी फोन ठेवला. त्यानंतर मात्र सरु चा परत फोन आला नाही.सुट्टी अशीच गेली आणि आता निकालाची तारीख जवळ येऊ लागली .अचानक अंजली खूपच आजारी पडली ..तिला टायफड झाला होता.अंजली चे मम्मी पप्पा खूप च काळजीत होते ..अंजली चार दिवस हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होती..चार दिवसांनी तिला घरी आणलं गेलं...आता घरीच तिच्या वर उपचार चालू होते ..गावातल्या डॉक्टर कडे जाऊन चेक अप करून यायचे ...अंजली आजारपणामुळे खूप कमजोर झाली होती. दुपारची वेळ होती ..अचानक सरु घरी आली ..तर अंजली झोपली होती .सरु आलेली पाहून अंजली ला बर वाटलं .

अंजली : सरु कधी आलीस ?

सरु : कालच आले ..अंजली इतकी कशी आजारी पडली तू ?

अंजली तिच्या बोलण्यावर कस नुस हसली ..अंजली ला सरु खूपच उदास दिसली ..अंजली ची मम्मी उठून आतल्या रूम मध्ये गेल्या नंतर ..अंजली ने सरु ला विचारल .

अंजली : सरु काय झालं ? इतकी का उदास आहेस ?

सरु अंजली ला पाहून रडायला लागली..अंजली ला तिला शांत ही करता येईना .

अंजली : सरु काय झालं का रडतेय सांग तरी..

अंजली ला बोलताना ही त्रास होत होता.

सरु : अंजली मम्मी ला माझ्या आणि सुदीप बद्दल समजलं आहे ..मम्मी खूप चिडली ..आणि तिचं माझं लग्न ठरवलं आहे... काल मी मावशी कडून सकाळी आले ..आणि दुपारी मला पाहुणे आलेले पाहायला...उद्या माझं लग्न आहे अंजली यादी वर शादी..

सरु सांगता सांगता परत रडू लागली..अंजली सर्व ऐकून शॉक च झाली .

अंजली : सरु ..अस कस लग्न ? ते ही उद्या ..तू तर अजून १८ वर्षाची ही नाहीस ...कायद्याने गुन्हा आहे ..१८ वर्ष आधी लग्न करणं..

सरु : अंजली कायदा फक्त नावाला असतो पाळत कोण ?

अंजली : सुदीप सोबत बोलली स का तू ? तो काय म्हणतोय?

सरु : मम्मी मला कुठेच बाहेर जाऊ देत नाहीये ..खूप विनवणी करून तुला भेटायला आले आहे ..मी ..आणि तस्स ही सुदीप काय करणार ? ते ही अजून शिकत आहेत ..कुठे ठेवणार ते मला सोबत घेऊन गेले तर ? आम्ही राहणार तरी कसं ?

अंजली : सरु ...तू नको बोलली नाहीस का लग्ना साठी?

सरु : अंजली मम्मी ने सांगितलं आहे ..मी जर लग्न नाही केलं तर ..तर ती जीव देईल..

अंजली : सरु ,मावशी अस कस वागू शकतात ?मी मी..येऊ का तुझ्या घरी ?

सरु : नको अंजली मम्मी कोणाचं च ऐकत नाहीये..तू तुझी काळजी घे ..मी ..मी जाते ..

सरु इतकं बोलून रडत पळतच तिथून निघून गेली..अंजली मागून तिला आवाज देत राहिली.

अंजली : सरु ,सरु ऐक तर ..

अंजली चा आवाज ऐकून तिची मम्मी तिच्या जवळ आली..अंजली बेड वरून उठायचा प्रयत्न करत होती पणं अशक्त पणा मुळे तिला ते जमत नव्हत.

अंजली ची मम्मी : अंजली काय झालं ? सरु का गेली लगेच ?

अंजली :मम्मी ..सरु च लग्न ठरवलं आहे तिच्या मम्मी ने ..उद्या तिचं लग्न आहे ...अस कस करू शकतात त्या ?

अंजली ची मम्मी : अंजली तू ..तू शांत हो ..आपण काही करू शकत नाही यात.. आता तिच्या मम्मी ने ठरवल आहे आणि उद्या लग्न आहे तर आपण काय करू शकतो? तू तू..शांत बस आराम कर..तुझी तब्बेत ठीक नाही ना ?

अंजली : अग मम्मी पणं सरु अजून लहान आहे ..तिला अठरा वर्ष ही पूर्ण नाहीत आणि तिच लग्न?

अंजली ची मम्मी : अंजली सरु च लग्न लहान वयात होण हे काही आपल्या गावा साठी नवीन नाही..आपल्या गावात तर याच वयात मुलींची लग्न होतात ..तुला माहित आहे ना ? त्यात सरु चे बाबा ही नाहीत..तिच्या मम्मी ने तिला दहावी पर्यंत शिकवलं ना ? आता करत असतील तिचं लग्न ..मग आपण काय बोलू शकतो ?

अंजली : मम्मी आपण पोलिसात कळवू या का ?

अंजली ची मम्मी : अंजली वेड लागलंय का तुला ? पोलिस सरु च्या घरच्यांना धरून नेतील शिक्षा होईल त्यांना..तू तुझं डोकं नाही तिथे चालवू नकोस ..हा आता लग्नाला वेळ असता तर आपण समजावलं असत तिच्या मम्मी ला पणं आता उद्या च लग्न आहे तर आपण काही करू शकत नाही..तू आरम कर तुझी तब्बेत किती खराब आहे ...

अंजली ने मम्मी ला समजवायचा प्रयत्न केला पण तिच्या मम्मी ने ही तिचं काही ऐकलं नाही..अंजली मनातच चरफडत राहिली की आपण सरु साठी काहीच करू शकत नाही ..दुसऱ्या दिवशी सरु च लग्न चोरुन एका मंदिरा मध्ये तिच्या घरच्यांनी लाऊन दिल ..अंजली लग्नाला गेली नाही..अंजली अजून आजारी च होती त्यामुळे तिच्या मम्मी ने तिला पाठवल ही नाही .सरु च्या लग्नानंतर पाच सहा दिवसांनी अंजली ठीक झाली ..तेव्हा त्यांचा दहावीचा निकाल ही लागला ..सरु काठावर पास झाली होती पणं आता त्याचा काही उपयोग नव्हता तिचं लग्न झालं होत आता तिला पुढे शिकता येणार नव्हत .रेखा मात्र दोन विषयात नापास झाली त्यामुळे तिच्या घरच्यांनी ही तिचं शिक्षण बंद केलं.अंजली व निशा ने मात्र एकाच कॉलेज ला अॅडमिशन घेतलं आता त्याचं कॉलेज लाईफ सुरू झाल .

अंजली व सरु च एकत्र कॉलेज करायचं स्वप्न मात्र स्वप्न च राहील..आता सरु व अंजली च्या वाटा वेगवेगळ्या झाल्या होत्या.

क्रमशः

( बाल विवाह कायद्याने गुन्हा असून ही अजून ही सर्रास पने सर्वत्र मुलीचं वय १८ वर्ष पूर्ण होण्या आधीच त्याच लग्न केल जात . कायदे मात्र हजार केले जातात पण ते कायदे पाळणारा समाज मात्र आपल्या भारतात अजून ही निर्माण झाला नाही ही आपल्या देशाची शोकांतिका आहे . )