Tujhi Majhi yaari - 16 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 16

अंजली ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर आली होती .काम संपवून रिटर्न ऑफिस मध्ये येत असताना अचानक पुन्हा तिला पंकज दादा दिसले..आज ते तिच्या अगदी समोर होते ..तिने आवाज देऊन त्यांना थांबवले.

अंजली : पंकज दादा..पंकज दादा..

पंकज आवाज ऐकून थांबला आणि त्याने ही आवाज देणाऱ्या मुली कडे पाहिलं व त्याने अंजली ला ओळखलं.तो ही थोडा खुश होतच ..तिला बोलला.

पंकज : अंजली ..तू इथे ?

अंजली पंकज दादा ला पाहून इतकी खुश झाली होती की तिला त्यांच्या सोबत नीट बोलता ही येईना..

अंजली : हो..दादा.. मी ..मी याच शहरात जॉब करते.. कसे आहात ? काकू कशा आहेत ?

पंकज : ठीक आहे ..हो आई ही ठीक आहे...मी ही याच शहरात कामाला लागलो आहे.

अंजली : अरे वा..म्हणजे आपण एकाच शहरात आहोत तर...पणं दादा तुम्ही गावातल घर का विकल आणि गाव का सोडलं ?

पंकज अंजली चा प्रश्न ऐकून थोडा उदास झाला.

पंकज : सरु च्या एलाजात थोडा खर्च झाला त्यामुळे घर विकाव लागलं..आणि आता गावी काही उरलं ही नव्हत म्हणून आई ला घेऊन इकडे च आलो.

अंजली : सरु चा इलाज ? काय झालं होत तिला ? आणि ती तर मला अजिबात फोन करत नाही .. पाच वर्ष झाली तिची आणि माझी भेट नाही...साधा एक फोन ही करू वाटला नाही का तिला ? इतका काय संसार मागे लागला आहे तिच्या दादा ? तिचा नंबर असेल तर द्या ना दादा..

अंजली बडबड करत होती ..आणि पंकज मात्र उदास आणि खिन्न झाला होता.तो गप्प आहे हे पाहून अंजली शांत झाली व पुन्हा तिने त्याला विचारले.

अंजली : काय झालं दादा ? तुम्ही काहीच का बोलत नाही ?

पंकज : अंजली तुला माहीत नाही का ?

अंजली च्या चेहऱ्यावर आता प्रश्न चिन्ह दिसू लागलं होत.

अंजली : कशा बद्दल ?

पंकज : सरु आता या जगात नाही..

अंजली तर ते ऐकून शॉक च झाली ..

अंजली : काय ? दादा काय बोलतंय तुम्ही हे ?

पंकज हळू आवाजात म्हणाला.

पंकज : चार वर्षा पूर्वी च सरु वारली आहे...

आता मात्र हे ऐकून अंजली चे हात पाय थरथरू लागले होते.जिने फोन केला नाही म्हणून ती रागावणार होती ..तिच्या सोबत भांडणात होती ती या जगातच नाही हे ऐकून तर अंजली ला जबरदस्त शॉक बसला होता..डोळे आपो आप भरून आले होते ..आणि तिच्या नकळत वाहू ही लागले होते...सरु ..सरु या जगात नाही..माझी सरु ..सरु मला सोडून गेली आणि मला काहीच माहीत नाही? अंजली ला आता स्वतः चाच राग येऊ लागला होता.पंकज ला तिची अवस्था कळलं म्हणून त्याने जवळच असणाऱ्या कॅफे मध्ये तिला नेलं तिला पाणी दिल...थोडा वेळ तो ही काहीच बोलला नाही..अंजली ला त्याने थोड शांत होऊ दिलं त्यानंतर तो तिला बोलला.

पंकज : झालं ते झालं आता त्याला कोण काय करू शकत ? मला नव्हत माहित की तुला या बद्दल नाही माहित ते..

अंजली ने ही स्वतः ला पंकज समोर सावरलं व तिने त्याला विचारल .

अंजली : दादा काय झालं होत सरु ला ?

पंकज : स्वयंपाक करताना स्टो चा भडका होऊन भाजली होती ती हॉस्पिटल मध्ये नेल होत पणं नाही वाचली सरु ...

पंकज ही भावूक झाला..अंजली ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला..

थोडा वेळ बोलून झाल्यावर अंजली ने त्यांचा पत्ता घेतला व त्याचा निरोप घेऊन ती रूम कडे निघाली.अंजली च चित्त्त विचलित झाल होत..

अंजली रूम मध्ये येऊन एकदम शांत बसली होती नेहा ही ऑफिस वरून येऊन तिची कपडे कपाट मध्ये घडी घालून ठेवत होती .अंजली ला पाहून ती बोलली.

नेहा: अंजली इतका वेळ ? झालं का काम ?

पण नेहा ला अंजली चा काहीच रिप्लाय आला नाही..म्हणून तिने पुन्हा एकदा आवाज दिला..

नेहा : अंजली .. अग मी मी काय विचारते ?

पण तरीही अंजली काहीच बोलली नाही म्हणून नेहा अंजली जवळ गेली व तिने तिला हलवत पुन्हा विचारल..

नेहा : अंजली काय झालं ? बोलत का नाहीस ?

तिच्या बोलण्याने अंजली भानावर आली व तिने नेहा कडे पहिलं व नेहा समोर दिसताच तिने तिला मोठी मारून मोठ्याने रडायला सुरू केलं..नेहा थोडी घाबरली..तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत ती विचारू लागली.

नेहा : अंजली .. अग काय झालं ? कोणी काही बोललं का ? तू रडत का आहेस ? सांग ना प्लीज ...मला टेन्शन येत आहे ..

अंजली : नेहा...सरु..

सरु च नाव ऐकून नेहा ही थोडी चकित झालं..

नेहा : काय सरु ? काय झालं तिला ?

अंजली : नेहा ..सरु या जगात नाही..ती मला सोडून गेली ...

अंजली इतकं बोलून पुन्हा रडू लागली ..नेहा ला ही तिचं ऐकून शॉक लागला.

नेहा : काय ? अग पणं कोण बोललं तुला ? तसं काही नसेल कोणी तरी खोटं सांगितलं असेल तुला..अंजली..अंजली इकडे वर बघ माझ्या कडे...नेहा ने आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा धरला व तिला समजावू लागली..अंजली शांत हो ..थोड शांत होऊन सांग ना..काय झालं ते..

अंजली ने ही तिला पंकज भेटल्याच व सरु बद्दल झालेलं बोलणं सांगितलं ...ते ऐकून नेहा ला ही खूप वाई ट...वाटलं..

नेहा : अंजली ,रडू नको यार ..झालं ते झालं... आता आपण काही करू तर शकत नाही...आपण सरु च्या आई ला भेटून येऊ ... तू शांत हो.. रडून सरु परत येणार आहे का ? सांग मला?

नेहा ने समजावून ही अंजली च रडू थांबत नव्हत..किती ही केलं तरी सरु तिची जिवलग मैत्रीण होती.. तिचं बालपण तिने तिच्या सोबत घालवलं होत...तिच्या सोबत घालवलेले क्षण अंजलीच्या डोळ्या पुढून चित्रपटासारखे सरकत होते...त्या दोघींनी मिळून केलेली पहिली करपले ली चपाती...नसीर सोबत केलेलं भांडण...शेअर करून खाल्लेला डब्बा...ती पूर्ण रात्र अंजली झोपली नाही...ती किती तरी वेळ नेहा ला तिच्या व सरु च्या आठवणी सांगत होती ..आणि नेहा ही तिचं सर्व ऐकून घेत होती.

एक दिवस सुट्टी काढून नेहा व अंजली सरु च्या मम्मी ला भेटायला गेल्या..अंजली ला पाहताच सरु ची मम्मी खूप रडू लागली..

अंजली ही खूप भावूक झाली होती पण तरीही त्यांना धीर देत बोलत होती.

अंजली : काकू प्लीज रडू नका....मला आता माहित झालं ...त्यामुळे मी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही आधी...प्लीज रडू नका...

सरु ची आई ही रडत च बोलत होती.

सरु ची आई : माझ्या चुकी मुळ माझी पोर मला सोडून गेली..मीच तिचं लग्न लाऊन दिलं नसत तर...आज ती ही तुझ्या बरोबर असती ..शिकली असती...माझ्या चुकीची खूप मोठी शिक्षा दिली मला देवाने...

सरु ची आई रडत रडत च सांगत होती.

अंजली : काकू..तुमची चूक नाही..तुम्ही तिच्या भल्या साठी च केलं होत..आता स्टो भडकून तिला भाजल ..त्यात तुमची चुकी नाही..

सरु ची आई : नाही ..माझ्या पोरीचा जीव घेतला त्या नीच माणसान....त्याच्या डोक्यात संशयाची भूत घुसलं होत...त्याचं मारल माझ्या पोरीला...लग्न झाल्या पासून एक दिवस सुखा ने जगू दिलं नाही त्यान माझ्या पोरीला...शेवटी एकदा चा तिचा जीव घेऊन त्याच्या मनाला शांती भेटली असेल..

अंजली आणि नेहा तर शॉक होऊन त्याचं बोलण ऐकत होत्या...

अंजली : काकू अस का बोलता ?

सरु ची आई : पोरी खर तेच बोलते ...त्या राक्षसा न शेवटचं भेटू ही दिलं नाही मला माझ्या पोरी ला...दवाखान्यात गेल्यावर..त्याने आम्हाला तिच्या जवळ जाऊ दिलं नाही...आम्हाला लवकर कळवल नाही..पोलिस .. डॉक्टर सर्वांना लाच देऊन आपल्या बाजूने करून घेतलं.

अंजली तर ऐकून पूर्ण च शॉक झाली होती...सरु ने ही तिच्या छळा बद्दल तिला सांगितलं होत...

अंजली : काकी तुम्हाला इतकं सगळं माहीत आहे तर तुम्ही तक्रार का केली नाही ?

सरु ची आई: पोरी तक्रार करून काय मिळणार होत ? आमचं होत नव्हत ते सर्व तर आम्ही विकून बसलो पणं पोर नाही वाचली वकील आणि केस खेळत बसायला पैसे कुठून आणायचे ?

थोड्या अंशी त्याचं ही बरोबर होत ..पणं अंजली च्या मनाला मात्र ते पटलं नव्हत...थोडा वेळ बसून अंजली व नेहा सरु च्या आई चा निरोप घेऊन पुन्हा रूम वर आल्या.

क्रमशः