Tujhi Majhi yaari - 20 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 20

शितल ने अंजली ला व केशव ला सरु बद्दल सांगायला सुरू केलं.

शितल : हरीश दादा वहिनी वर नेहमीच शक घ्यायचा..वहिनी ने कोणाशी बोललेल त्याला पटायचं नाही..तो नेहमी वहिनी ला छोट्या छोट्या कारणा वरून मारायचा..वहिनी खूप रडायची माझ्या जवळ ..माझा जो सखा भाऊ होता किशोर दादा ..त्याच्या सोबत ही वहिनी ने बोललेल हरीश दादा ला आवडायचं नाही ..त्याने वहिनी या आधी ही तीन चार वेळा वहिनी ला किशोर दादा सोबत बोलायचं नाही म्हणून मारल होत...त्या दिवशी ही ..सरु वहिनी किशोर दादा ला मोबाईल मागत होती..तिला तिच्या आई ला फोन करायचा होता...हरीश दादा तिला फोन देत नसे म्हणून वहिनी ..किशोर दादा च्या फोन वरून लपून लपून त्यांच्या आई ला ,अंजली दीदी ला फोन करायची ..त्या दिवशी वहिनी आणि किशोर दादा बोलत उभे होते तेवढ्यात हरीश दादा बाहेरून आला ..त्याला पाहताच किशोर दादा बाहेर निघून गेला..आणि हरीश दादा ने रागाने वहिनी चे केस धरले..आणि त्याला मारत बोलू लागला ...

हरीश : तुला किती वेळा सांगितलं त्या किशोर सोबत बोलायचं नाही..तरी काय काम असत ग तुझ अस त्याच्या कडे ?

वहिनी त्याला विनवणी करत होती ..

सरु : अहो..माझे केस सोडा..दुखत आहेत...किशोर दादा ना मी भावा सारखं मानते ..तुम्ही का उगाच असा संशय घेता ?

हरीश : भाऊ ? म्हणे भाऊ...आहे ना तुला एक भाऊ ..तो पंकज आणि कशाला हवा तुला भाऊ...मला सगळं माहीत आहे..तुला आवडतो ना किशोर ..म्हणून बोलतेस ना त्याच्या सोबत..

हरीश ने सरु चे केस जोरात ओढत विचारल..सरु वेदनेने कळवळत बोलली.

सरु : नाही..तस्स काही नाही तुमचा गैरसमज झाला आहे..

पण हरीश तिचं काहीच ऐकून घेत नव्हता...तो जास्तच चिडत होता..

हरीश : मी दारू पितो म्हणून माझा फायदा घेतेस ? मी नशेत असलो की जातेस ना...त्या किशोर ला भेटायला?

सरु त्याचं बोलणं ऐकून शॉक झाली..ती ही थोड रागात बोलली.

सरु : तोंडाला येईल ते बोलू नका..माझे संस्कार तसले नाहीत ...तुमचे असतील तसे...

तिचं उत्तर ऐकून तर हरीश अजूनच खवळला...त्याने तिला कानाखाली मारली.

हरीश : तू माझे संस्कार काढणार ?माझ्या शी वाद घालते..कोणाच्या जीवावर इतकं बोलतेस ग ?त्या तुझ्या भिकाऱ्या भावाच्या जीवावर की त्या म्हाताऱ्या आई च्या जीवावर ?..की अजून कोण आहे तुझ ? जिवलग अस..

बोलता बोलता हरीश विकृत पने हसला.

सरु खूपच दुःखी झाली होती तिची सहनशीलता आता संपली होती..ती रडत रडत च बोलली.

सरु : मारा मारा एकदाच जीव घ्या माझा...त्या शिवाय तुम्हाला येत तरी काय ? मला जे बोलायचं ते बोला माझ्या आई ला भाऊ ला काही बोलू नका...

हरीश ने सरु च बोलणं ऐकून तिला पुन्हा कानाखाली मारायला सुरवात केली ...मार सहन न होऊन सरु ने त्याला जोरात ढकलून दिलं तस्स तो ..रूम मधल्या बेड च्या कोपऱ्यात जाऊन आदळला...धडपडत उठून तो पुन्हा सरु च्या अंगावर धावून गेला...त्याने तिचा गळा धरून दाबायला सुरुवात केली...सरु ला श्वास घेता येईना म्हणून तिने ...आपल्या गळ्यावरून त्याचा हात काढायचा प्रयत्न केला..पणं सरु ची शक्ती कमी पडत होती .. शेवटी सरु ने जोरात हरीश च्या पोटात लाथ घातली तस्स तो वेदनेने कळवळत मागे सरकला..त्याच्या हातातून गळा सुटल्याने ..सरु जोर जोराने श्वास घेऊ लागली....ती उठून बाहेर जायचा प्रयत्न करत होती परंतु ..तिला उठून उभा ही राहता येईना...आणि हरीश तो तर जास्तच खवळून तिच्यावर धावून आला....त्याने दुप्पट ताकतीने सरु चा गळा धरून दाबायला सुरुवात केली...

हरीश : मला लाथ मारतेस ,थांब माज आला ना तुला...मार आता मार ..

अस ओरडत तो जोर जोराने सरु चा गळा दाबत होता...अखेर सरु ची प्रतिकार शक्ती क्षीण पडत गेली आणि तिने प्राण सोडला...

सरु चा जीव गेला तरी हरीश तिचा गळा आवळत च होता..शेवटी तिची हालचाल पूर्ण बंद झाली तेव्हा त्याने तिचा गळा सोडला .. व स्टोव मधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून ..त्यावर कडी टाकून तो तिथून पसार झाला...हरीश चे सासू सासरे बँकेत गेल्यामुळे त्यांना घरी काय झालं याची कल्पना ही नव्हती परंतु ...जेव्हा हरीश सरु च्या अंगावर रॉकेल ओतत होता तेव्हा च ते आले होते त्यांनी ही सर्व पाहिलं होत..

शितल सर्व सांगता सांगता च थरथर कापू लागली होती..तिच्या डोळ्यापुढे पुन्हा तेच दृश्य उभ राहील होत..अंजली ही ते सर्व ऐकून सुन्न झाली होती ...तिला बोलायची ही शुध्द नव्हती...केशव ही शॉक मध्ये होता..सरु चा मृत्यु इतका भयानक झाला असेल अस कोणालाच वाटलं नव्हत..केशव ने अंजली ला आवाज दिला ...पणं तिच्या कानापर्यंत त्याचा आवाज पोहचत ही नव्हता..

केशव : अंजली...अंजली...

केशव ने तिचा खांद्यावर पकडुन तिला हलवली...तस्स ती सरु....म्हणून मोठ्याने रडू लागली...शितल ही थरथर कापत रडत होती..केशव ला तर कोणाला समजवायचा सुचत नव्हतं...त्याने अंजली ला कस तरी समजावून शांत केलं...अंजली ने ही मग शितल कडे पाहून तिला धीर देत तिचा हात हातात घेतला... व पुढे तिला विचारल..

अंजली : पणं शितल तुला हे सर्व कस समजलं ?

शितल : दादा आणि वहिनी ची भांडण लागली होती तेव्हा मी खिडकीतून पाहिलं होत...पणं दादा ला माहित नाही की हे सर्व करताना त्याला मी पाहिलं आहे..त्याला जर तेव्हा कळाल असत तर त्याने ..त्याने मला ही वहिनी सोबत...म्हणून ...म्हणून ..मी घाबरून ..कोणालाच सांगितलं नाही .आज पर्यंत..त्या नंतर ...काका काकू नी वहिनी ला...हॉस्पिटल मध्ये नेल...दादा ही काहीच माहीत नसल्याचं नाटक करत होता ..आणि काका काकू नी ही त्याला साथ दिली...वहिनी जास्त भाजल्या मुळे...त्या वाचू शकल्या नाहीत...दादा नी काय केलं माहित नाही...पणं सर्व ॲक्सिडेन्टली झालं ..वहिनी स्वयंपाक करत होती ..तेव्हा अस त्याने ... प्रूफ केलं...आणि ...आणि..सर्वांनी ते मान्य केलं...

शितल आपले डोळे पुसत बोलली .

अंजली : तुझा भाऊ ...माणूस आहे की ..राक्षस?त्याला थोडी ही दया आली नसेल का सरु ची ? किती किती साधी सरळ होती माझी सरु...

अंजली रडत रडत बोलली.. व पुन्हा स्वतः च स्वतः ला सावरत बोलली..

अंजली : पणं आता मी सरु च्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही ....thanku शितल ..तुझ्या मुळे ..आम्हाला सत्य समजलं...

शितल : अंजली दिदी मी ही इतके दिवस सर्व मनात ठेऊन होते .. खूप अपराधी वाटायचं मला पणं आज मन थोड हलक झाल्यासारखं वाटतं..पणं दीदी ..प्लीज माझं नाव दादा ला कळू देऊ नका....तो खूप वाईट आहे...तुम्हाला नाही माहित...तो काही ही करू शकतो..

अंजली ने शितल च्या खांद्यावर हात ठेवला व बोलली..

अंजली : काळजी करू नकोस..तुला काहीच होणार नाही..फक्त आता तू तुझ्या भावा विरुद्ध कोर्ट मध्ये साक्ष द्यायची ..आम्ही तो पर्यंत तुझं नाव कळू देणार नाही..

शितल ही हो बोलून घरी निघून गेली..त्यानंतर केशव ने अंजली ला तिच्या रूम वर सोडलं ...आता त्यांच्या कडे पुरावा होता ..ते केस रिओपन करू शकत होते..केशव ने आपल्या इन्स्पेक्टर मित्राच्या मदतीने ..सरु ची केस पुन्हा ओपन केली ...केशव व त्याचा इन्स्पेक्टर मित्र अजय या दोघांनी मिळून .. केस संदर्भात अजून ही माहिती गोळा केली...आणि केस ओपन झाली..त्याचं नोटीस हरीश ला मिळालं ..तो तर शॉक च झाला..सरु च्या मृत्यू नंतर जवळ जवळ चार वर्षांनी ..केस पुन्हा ओपन झाली होती ...आज पर्यंत त्याला वाटत होत ..त्याने जे केलं ते कोणालाच कळणार नाही..पणं आता तर केस कोर्ट मध्ये दाखल होऊ पर्यंत त्याला काहीच माहिती नव्हतं ...त्याने ही थोडी चौकशी केली आणि त्याला केस अंजली ने ओपन केल्याचं समजलं...तो अंजली ला पूर्णपणे ओळखत नसला तरी सरु कडून त्याला लग्ना नंतर अंजली बद्दल माहिती झालं होत ..अंजली सरु ची बेस्ट फ्रेन्ड आहे इतकी तर त्याला माहिती होती...त्याने अंजली बद्दल इतर ही माहिती गोळा केली ...आणि आता तिला भेटायचं अस त्याने ठरवलं.

क्रमशः